करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद !!!

काय करायचं?? कसं रहायचं?? रहायचं की परत जायचं पुन्हा परत भारतामधे?? असे शेकडे प्रश्न आहेत जे  सध्या ऑस्ट्रेलियात रहाणारे – म्हणजे नौकरी करणारे किंवा शिकणारे लोकं विचार करित असतिल. तसेच इतर ठिकाणी रहाणारे भारतिय पण असाच विचार करित असतिल. जे कांही आज ऑस्ट्रेलियात सुरु आहे, ते इतर ठिकाणी सुरु होऊ नये अशी इच्छा आहे.

ऑस्ट्रेलियामधे ज्या लोकांनी मार हाण केली त्या मुलांचे मी फोटोग्राफ्स बघितले. सगळी मुलं जस्ट १३ ते १५ वर्षाच्या रेंज मधली वाटतात. त्यांचं म्हणणं असं की ही सगळी भारतिय मुलं इथे कमी पैशामधे कामं करतात, त्या मुळे लोकल मुलांना कामं मिळत नाहित. आता  मुलं तिथे गेल्यानंतर शिक्षणाचा थोडा तरी खर्च निघावा म्हणुन शिक्षणाव्यतिरिक्त थोडं फार काम ( गॅस स्ट्रेशन, आणि रेस्टॉरंट्स मधे) करतात.

कितिही नाही म्हंटलं तरी ऑस्ट्रेलियामधल्या लोकांचे पुर्वज हे खुनी, दरोडेखोर, थोडक्यात आउट लॉ असल्यामुळे त्यांना इंग्लंडमधुन (डीपोर्ट) तडिपार करण्यात आलं होतं  ऑस्ट्रेलिया या बेटावर. आजचे तिथले रहिवासी म्हणजे ह्याच गुन्हेगारांची पुढची पिढी!

आज हे जे ऑस्ट्रेलियामधे होते आहे, ते अगदी पुर्वापार चालंत आलेलं आहे अमेरिकेत आणि इंग्लंड मधे. फक्त ह्या सगळ्यांची दाहकता कमी होती.. कींवा फ्रिक्वेन्सी पण कमी होती. अधुन मधुन एखादी केस असायची.. पण सध्या ऑस्ट्रेलियामधे जे चाललंय ते अगदी इतक्या जास्त लेव्हलला आहे, की जर यावर वेळिच काही कारवाई केली नाही तर तिथल्या भारतिया विद्यार्थ्यांना खुप त्रास होइल. तसंही,सध्या पण त्यांचे एकेकट्याने बाहेर निघणे बंदच झालेले आहे.

एका ऑस्ट्रेलियन ब्लॉग वर वाचलं, की सध्या चार ऑस्ट्रेलियन एकत्र भेटले आणि वेळ जात नसेल तर, नॅशनल पास टाइम म्हणजे ’ लेट्स गो करी बॅशिंग’ झालेला आहे.रेशिअल अब्युझ हे ह्या ऑस्ट्रेलियन लोकांच्या रक्तामधे भिनलेले आहे.आणि ते आपलं रेशिअल श्रेष्ठत्व असल्याचे वेळोवेळी दाखवुन देण्याचा प्रयत्न करतात.अमेरिकेत तर तिथले निगर्स पण स्वतःला एशियाई मुळाच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात.

तुम्ही बघा, क्रिकेटचे मैदान जरी असले, तरिही तिथे पण हे रेशिअल डिस्क्रिमिनेशन सरळ दिसुन येतं. त्यांच्या खेळाडूंनी काही कॉमेंट केली तर त्याला काहिच शिक्षा होत नाही, पण तेच जर एखाद्या भज्जी सारख्या क्रिकेटरला मात्र मॅचेस वर बॅन्स अशा शिक्षांना सामोरं जावं लागतं. आपलं बिसिसिआय पण पुर्ण पणे षंढ पणे काहिही प्रतिक्रिया न देता..त्यांना  वरचढ दर्जा देण्यातंच मोठेपणा मानते.

खरी गोष्ट अशी आहे, की भारतिय विद्यार्थी त्यांच्या पेक्षा कित्येक पटीने हुशार आहेत, आणि हे प्रत्येक टेस्ट मधे प्रुव्ह होतंय. त्यांच्यामधला  इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स हा हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त करतो. १५ हजार अब्ज डॉलर्स ची ही ऑस्ट्रेलियन शिक्षण इंडस्ट्री सध्या स्टेक वर आहे. आता पर्यंत गेले ते गेले, पण पुढे मात्र किती विद्यार्थ्यांना त्यांचे पालक ऑस्ट्रेलियामधे शिकायला पाठवण्याची हिम्मत करतात ते सांगता येत नाही.

जरी आता पर्यंत फक्त ७ केसेस रिपोर्ट झाल्या असल्या तरी अशा कित्येक केसेस आहेत की ज्या मधे फक्त पैसे हिसकाउन घेणं आणि थोडीफार मारहाण करणे, हेच फक्त  चालायचं. आणि असे प्रसंग फारसे पोलिसांकडे रिपोर्ट केले जात नव्हते. या वेळी जे स्कृ ड्रायव्हरने भोसकणे झाले,आणि झालेले मृत्यु, यामूळे इंटरनॅशनल मेडीयाचे लक्ष या प्रकाराकडे आकर्षित झाले.

यावर उपाय म्हणजे , भारतिय विद्यार्थ्यांनी एकत्रित फिरणे , आणि एखादा मारहाणिचा लहानसा प्रसंग जरी झाला तरी, तो पोलिसांना रिपोर्ट करावा..सेल्फ डिफेन्स पण महत्वाचा. अर्थात स्टूडंट्स जरी तिथे शिकायला जरी गेले असले, तरीही त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हात उचलायला हरकत नाही.

तिथल्या पोलिसांची वागणुक पण  खुपंच संशयास्पद दिसत होती. थोडक्यात त्यांनी पण भारतिय विद्यार्थ्यांवर हात साफ करुन घेतले. व्हिडीओ इथे आहेत.

हे सगळं वाचतांनाच एक जुनी केस १९८७ ची आठवली.न्यु जर्सी मधे एक गॅंग फॉर्म झाली होती.. तिचं नांव होतं डॉट बस्टर्स.. ( डॉट=कुंकू.. म्हणजे एशियन्स )या गॅंगने एक पत्रक प्रसिध्द केलं न्युज पेपर मधे. त्यात म्हंट्लं होतं,की आम्ही काहिही करु भारतियांना न्यु जर्सी मधुन बाहेर हाकलण्यासाठी. या गॅंगच्या लोकांनी कित्येक घरं लुटली, लोकांना मारले, आणि सक्सेसफुली अशी लुटमार सुरु ठेवली. असंही म्हंटलं जातं की पोलिसांमधले काही लोकं या गॅंग मधे सामिल होते.त्यामुळे हे असंच १९८९ पर्यंत चाललं. तेंव्हा एक एशियन ग्रुप तयार झाला आणि त्याने जेंव्हा केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तेंव्हा मात्र या डॉट बस्टरने हळू हळू हल्ले कमी केले.. १९९८ मधल्या ५८ केसेस ( रजिस्टर्ड केसेस ) चा आकडाच ह्या बॅशिंगचा सिरियसनेस दाखवतो.

मला काल एक कॉमेंट आली एका राज ठाकरेंच्या फॉलोअर ची. ती कॉमेंट इतकी व्होलाटाइल होती की मी ती पब्लिश न करणेच योग्य वाटले.. एक भारतिय माणुस आपल्याच बांधवांना मारल्याचा आनंद व्यक्त करतो, आणि लिहितो, की जे झालं ते बरं झालं, असंच इथे पण भैय्या लोकांच्या बद्दल व्हायला हवं असंही त्या गृहस्थाने लिहिलं होतं ..ते सगळे गेले कशाला परदेशात? त्यांनी तिथे जाउन तिथल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत … वगैरे वगैरे.. अजुनही बरंच काही होतं की जे इथे पोस्ट करणे शक्य नाही.

बस्स! इथेच थांबवतो आता.. लेख फार मोठा होतोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , . Bookmark the permalink.

7 Responses to करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद !!!

 1. sahajach says:

  आम्ही जेव्हा दुसऱ्या देशात रहातोय तेव्हा ईथले सगळे नियम पाळतोय….बहुतांश भारतिय असेच करतात असे मला वाटते……किंबहूना अनेक देशात कायद्याचा बडगा चांगलाच कडक असतो…..आणि आपण परक्या देशात आहोत तेव्हा जरा जपूनच ही एक वृत्ती असते……
  ऑस्ट्रेलियात जे चाललय त्याची तुलना महाराष्ट्रातल्या भय्यांशी कशी करणार आपण….ते जे महाराष्ट्रात करताहेत तसे ईतर कुठेही कोणी वागू शकत नाही…
  राज ठाकरेंना माझा मुळीच विरोध नाही…..पण ह्या विषयाची व्याप्ती मोठी आहे…ही दलदल आहे…विचार करायला सुरुवात केली तर अनेक प्रकारे ती साफ करा्यला लागणार आहे असे दिसते….मुळात या दोन्ही प्रकारातले साम्य हेच की दोन्ही कडे एका ठिकाणची लोक दुसरीकडे स्थायिक झालेली आहेत ज्यांना स्थानिक असंतोषाला सामोरे जावे लागतेय….

  बाकी ऑस्ट्रेलियातली परिस्थीती चिंताजनक आहे…..

 2. archana says:

  recession chaa parinaam aahe sagalaa. recession/unemployment kamee zale kee suraleet hoil sagale.
  baakee bharteey lok jithe jaataat tithe tyanche population waadhalyamule highlight hotat aani sthanik lokanchyaa ragache dhanee hotat.
  baaki population-explosion,unemployement hya vishayanchee vyaptee khup mothee aahe.unfortunately Raghunath Dhondo Karvyanshivay hyaver kuthech aani kuneech kaam klele naahee.Bicharyaa Sanjay Gandheecha prayanta changalaa hota pan tyala “Emergency”chee background hotee tyamule virodhach jasta zalaa.aso!!

 3. Aparna says:

  आपण म्हणता ते जर कारण असेल तर बरेचदा विद्यार्थ्यांना असे बाहेरचे काम करायला विसा कायद्याप्रमाणे परवानगी नसते. थोडक्यात ती कामे illegal पणे करतात. तेही चुकीचे आहे. अर्थात म्हणून अशा रेसिझमचे समर्थन होऊच शकत नाही.

  • शिकायला जाणारे बहुसंख्य विद्यार्थी हे मिडल क्लास चे असतात, आणि तिथल्या रहाण्यासाठी इथुन पालक पैसे पाठवु शकत नाहित, म्हणुन अशी कामं केली जातात.

 4. bhaanasa says:

  ९/११ जेव्हा झाले त्यावेळी आम्ही आठ दिवस कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेलो नव्हतो. एवढेच काय सगळ्यात त्रास लहान पोरांना झाला. आणि हे कशामुळे तर केवळ गैरसमज. आपण भारतिय आहोत आणि ह्या हल्ल्यांमुळे अनेक वर्षे पोळलोत हे समजतच नाही आणि समजून घ्यायची गरजही नाही. रंग व चेहरेपट्टीच्या साम्यात सरसकट अनेक लोक भरडले गेले.
  ऒस्ट्रेलियातील बातम्या वाचून, पाहून फार वाईट वाटले. ह्या सगळ्या मागे शेवटी प्रमुख कारण एकच आहे, लोकांना जॊब नाहीत. घरात जेवणाची भ्रांत पडू लागली की विवेक सुटतो माणसाचा. 😦 पण तरीही रेसिझम अयोग्यच आहे.

  • भानस
   प्रतिक्रिया अगदी मनापासुन लिहिलित. मुलं इतक्या दुर शिकायला पाठवायची आणि तिथे मग असे प्रकार? पालकांनाच खरी काळजी असते.
   खुप वाईट वाटतं. पालक इथे पोटाला चिमटे घेउन पैसे वाचवुन मुलांना पाठवतात… असो.. सगळे पॉइंट्स आधिच लिहुन झालेले आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s