केजी १ ते १२वी

आज  १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघू या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी नाकात दम आणला होता. कुठेही जायचं म्हंटलं की क्लासेस, आणि परीक्षांचा नुसता रतीब लागलेला होता. दर रविवारी क्लासेस मधे परीक्षा घेतल्या जायच्या. आणि क्लासेस पण अगदी शाळसारखे.अभ्यास न करता गेलं तर क्लासच्या बाहेर उभं करायचे एक पिरियड..!

एखाद्या दिवशी म्हंटलं की जाउ दे.. क्लासेस ला बुट्टी मार, चल जरा नाशिकला जाउन येउ.. तर म्हणायची अहो बाबा, तुम्हालाच सिरियसनेस नाही माझ्या १२वी चा. आता काय बोलणार? मी आपलं सहज अगदी थोडा तरी चेंज मिळावा म्हणून म्हणायचो.. आज तिला शाळेत जाउन १४ वर्ष झालीत. अगदी केजी १ चा पहिला दिवस आठवतोय..

खूप खूप वर्षानंतर घरामधे जन्मलेले पहिलं लहान मुलं, म्हणून अगदी झाल्या पासूनच सगळ्यांचीच खुप लाडकी होती. आजी, आजोबांच्या सारखं अंगा खांद्यावरच असायची. खेळणं पण आजोबाच्या सोबत ..

आजोबा, मी डॉक्टर.. हं…. सांगा काय होतंय? डोकं दुखतंय की ओकी होते आहे? असं सारखं दिवसभर चालायचं.आजोबा बिचारे मग कधी डोकं दुखतं हो डॉक्टर असं म्हणत तपासून घ्यायचे. आणि आजी सोबतच आपला पोळपाट घेउन कणकेच्या गोळ्याचा नकाशा बनवायचं महत्कार्य मोठ्या आनंदात आणि हौसेने पार पडायचं. मग त्या कणकेच्या गोळ्याचा रंग अगदी काळाकुट्ट झालेला असायचा आजीच्या/आईच्या पोळ्या होई पर्यंत.शेवटी तिने केलेली ती कळकट पोळी तव्यावर भाजली की मग तिला मात्र अगदी अत्यानंद व्हायचा, आणि मग ती पोळी ताटलीत घेउन घरात सगळ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न व्हायचा. अर्थात, खाणारे रोजचे दोन नेहेमीची हक्काची माणसं म्हणजे आजोबा, आणि बाबा. 🙂

तसेच दुकान दुकान , भाजीवाली होणं हे पण खेळणं आवडायचं तिला. घरातल्याच दोन चार वांगी बटाटे एका लहान टोपलीत घेउन -आणि ती टॊपली  नसल्यास एखाद्या भांड्यात डोक्यावर घेउन घर भर फिरायची.. आमच्या घरासमोर एक भाजी वाला यायचा, त्याची नक्कल करित .. भाजी घ्या भाजी म्हणंत..! बरं घरामधल्या प्रत्येकाने भाजी घेतलीच पाहिजे असं पण होतं, कोणी भाजी घेतली नाही तर रडू यायचं..

शाळेच्या पहिल्या दिवशी आईच्या बरोबर स्कुटीवर बसून गेली होती.. शाळेत जायचं ते कशाला? हाच एक तिला पडलेला मोठा प्रश्न होता. त्यामुळे अगदी सकाळी ऊठल्या पासूनच रडारड सुरु व्हायची. मोठ्या मुश्किलीने युनिफॉर्म चढवून आई सोबत स्कुटीवर जायची . शाळेजवळ पोहोचली की मोठ्यांदा गळा काढून रडणं सुरु व्हायचं. मग तिला सांभाळत स्कूटी स्टॅंडवर लावणे ही पण एक कसरत होती.

कसं तरी करून शाळेमधे ढकललं (!) की मग रडणं सुरु असायचंच.. पण टीचर म्हणायची, तुम्ही जा आता.. नाही तर ती रडणं थांबवणार नाही. मग सौ. थोड्या अंतरावरून लपून बघायची.. काही वेळाने रडणे थांबले की मग सौ. घरी यायची.

असा हा प्रकार   काही महिने चालला, नंतर मात्र अगदी आनंदाने जायला लागली शाळे मधे. आज हे आठवतंय कारण शाळेचं पर्व संपलं तिच्या आज पासून. उणा पुरा १४ वर्षांचा काळ कसा गेला तेच कळत नाही.

शाळेमधे काही दिवसानंतर रुळल्यावर मात्र मग खेळण्याचे विषय आता थोडे बदलले होते. घरी आली की मग खांद्याला आईची पर्स अडकवून घरभर फिरायचं.. आणि हाय ममता.. किंवा हाय योगीता असं म्हणत फिरायची. ममता आणि योगीता दोघी पण तिच्या टीचर होत्या . आणि या वयात टीचर म्हणजे सर्वस्व झालेलं असतं . प्रत्येक गोष्टीमधे टीचरला फॉलो करणं चालायचं.टोमॅटॊ केचप ओठांना चोपडून मग मी बघा टिचर सारखं लिपस्टिक लावलंय.. अशा अनेक घटना आता केवळ स्मृती मध्येच उरल्या आहेत.

घरचं आजोबांच्या बरोबरचं आणि आजी सोबतच खेळणं सुरु होतंच. फक्त विषय आता डॉक्टर कडून शाळेकडे वळला होता. ही टिचर व्हायची आणि आजोबा स्टुडंट.. मग कुलकर्णी यु स्टॅंड अप.. आय विल मेक यु स्टॅंड ऑन द बेंच इफ यु डोन्ट राईट… असे टीचरचे डायलॉग्ज आणि त्या वेळेचा तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहुन मजा वाटायची.सारखी यु स्टॅंड अप, आणि सिट डाउन म्हणून आजोबांना अगदी नकोसं करुन ठेवायची.पण त्यांनी कधिच तक्रार केली नाही. अगदी न कंटाळता दिवसभर खेळायचे तिच्याशी.

शाळे्तून आली, की तुमच्यावर उपकार केले, मी शाळेत जाउन आली.. अशा मुद्रेने दप्तर, बुट आणि अंगातले कपडे काढून फेकले की खेळायला तय्यार.अगं आधी थोडं जेऊन घे.. तर ही बाई आपली अहो आजोबा.. म्हणून त्यांच्या मागे… आजोबांचं पण सोशल वर्क म्हणजे पत्रिका पहाणं आणि लग्न जुळवण  हे आ्वडीचे काम पण त्यांना जरा बाजूलाच ठेवावं लागायचं.(दोन्ही गोष्टी पैसे न घेता करतात ते गेली ६० वर्षं , त्यामुळे खूपच गर्दी असते आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची)   पहिली दोन वर्ष मजेत गेली. केजी आणि सिनियर केजी म्हणजे नुसती मजा मजा होती. पण कंटाळा होता एकाच गोष्टीचा.. तो म्हणजे होम वर्क!

या विषयावर तर मी कितीही लिहू शकेन.. पण आता थांबवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , , . Bookmark the permalink.

23 Responses to केजी १ ते १२वी

 1. Ganesh says:

  महेंद्र सर,
  रिजल्ट कलवा आम्हाला देखिल.
  गणेश

  • गणेश..
   आत्ताच रिझल्ट पाहिला. छान मार्क्स आहेत
   KULKARNI RADHIKA MAHENDRA
   ,ENGLISH : 076,
   HINDI : 080,
   MATHS & STATS. : 096,
   PHYSICS : 085,
   CHEMISTRY : 085,
   BIOLOGY : 084,
   PCM 88.6%

 2. sachin g says:

  chaan lihataa aapan…. sahaj…

 3. Ganesh says:

  राधिकाचे हार्दिक अभिनन्दन …..
  तिला थोड़ा वेळ दयाला हवा विचार करायला…
  I wish her all the best
  गणेश

 4. A response says:

  Manapasun Abhinandan!!!!!!!!!!!!!!!

 5. sonalw says:

  congradulations..radhikasakat tumha saglyanna. 🙂

 6. Rohini says:

  तुमचे आणि तुमच्या लाडकीचे हार्दीक अभिनंदन… आणि post देखिल मस्त आहे… माझ्याच बालपणिची फिरुन आठवण करुन दिलीत त्याबद्दल धन्यवाद…

 7. रोहिणी, सोनल,

  शुभेच्छां बद्दल धन्यवाद..!

 8. Yogesh says:

  मी आपला ब्लॉग नियमित वाचतो.खुप छान लिहता आपन. आज रिझल्ट लागला म्हणुन कॉमेन्ट देतोय. राधिकाला खुप छान मार्क्स मिळालेत. तिच्या भावी आयुष्यासाठी मनापासुन शुभेच्छा!!!!!!

 9. bhaanasa says:

  महेंद्र, तुमचे, राधिकाचे व तुमच्या सौंचेही अभिनंदन! चांगलेच मार्क्स मिळालेत.
  हो ना, ह्या विषयावर आपण कितीही लिहू शकतो. मग आता पार्टी कुठे आहे? आम्हाला विसरू नका. 🙂

  • पार्टी? शुध्द शाकाहारी उपहार गृहात कुठे तरी जाउ या. राधिका सध्या नागपुरला गेली आहे. शनिवारच्या सकाळच्या फ्लाइटने परत येते आहे, ती आल्यावरंच जाउ या कुठे तरी.

   पण राधिकाचे मार्क्स बघुन रसिका.. (सध्या १०वी ला आहे ती) पण खुप हुरुप आला आहे अभ्यासाचा.. 🙂
   अहो माझा मित्र म्हणत होता तु शिकवलं नाहिस म्हणुन तिला इतके मार्क्स पडलेत. जर तु शिकवलं असतं तर नक्कीच काठावर पास झाली असती.

 10. Prasad says:

  राधीकाला आणि तुम्हाला हार्दीक शुभेच्छा!!!..१२ वी म्हटल की हल्ली मुलांपेक्षा पालकांनाच जास्त टेन्शन असते..असो..लेख अतिशय सुरेख झाला आहे..वडीलांचे मुलीवरचे ‘गुपित’ प्रेम या लेखातल्या प्रत्तेक शब्दात जाणवते आहे. आम्हीपण आता ऑगस्ट एंडला एक्सपेक्ट करतो आहे. मला मुलगे व्हावी ही खुप इच्छा आहे. बघुया…

  • प्रसाद
   धन्यवाद..
   मी नेहेमी म्हणतो, चांगला मुलगा होणं आपल्या हातात नाही, पण चांगला जावई पाहाणं नक्कीच आहे..
   विचार करा.. आणि मनापासुन शुभेच्छा…
   प्रतिक्रीये करता आभार..

 11. Amol says:

  छान लिहिता तुम्ही.
  तुमचं आणि तुमच्या मुलीचं अभिनंदन!

  -अनामिक
  http://anaamik.blogspot.com

  • अमोल
   प्रतिक्रिये बद्दल आभार. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची खरंच गरज आहे..अजुन सिईटी चा निकाल बाकी आहे , त्यामुळे टेन्शन आहेच अजुनही.

 12. mipunekar says:

  तुमचे आणि तुमच्या मुलीचे हार्दिक अभिनंदन. ई-पेढे कुठे आहेत?
  तिला CET मध्ये पण असेच सुयश मिळो!!!!!!

  • धन्यवाद.. इ पेढे.. शोधतोय कुठल्या इ दुकानात मिळतात ते.. 🙂 मिळाले की पाठविन..

 13. Aaditya says:

  Are Abhinandan Mama….
  Party kuthe? … Nagpur, Nashik kee Mumbai…

 14. ajayshripad says:

  प्रथम अभिनंदन… सर…!
  छान लिहंलय सर…! खरच सांगतो शाळेची आठवण आली आज…! तुम्ही कुठल्याही विषयावर लिहा, फार आवडतं वाचायला.

 15. महेन्द्र
  तुमचे व राधिकाचे अभिनन्दन.

  मी देखिल तुमच्या ब्लोग चा नियमित वाचक आहे. या वर्षी माझी मुलगी १० त गेली आहे म्हणजे लवकरच मलाही या सर्वातून जावे लागेल.

  Core Engineering केव्हाही चान्गलेच. नन्तर कुठेही जाता येते. पण कितीही म्हट्ले तरी Industry मधे मुलीना काम करताना मर्यादा येतात. त्यामुळे मुली IT पसन्त करतात. एकाच जागी काम व हात काळे न करता जास्त पैसे हे समॊर दिसत असताना कोण उगाचच त्रास करुन घेइल.

  Foods and Nutrition हे एक चान्गले फि्ल्ड मुलीसाठी उपलब्ध आहे. Pharamaceuticals सारखे Neutraceutical मधेही खुप सन्धी असू शकतात. माझी सौ. याच फ़िल्ड मधे आहे.

  खगोल शास्त्रात interest असेल तर खगोल मन्डळात या. त्यातील career opportunities समजतील.

  अर्थात मुलान्च्या आवडी निवडी प्रथम. त्याना ठरविण्याची सन्धी दिलीच पाहिजे.

  पुन्हा एकदा तुमचे व राधिकाचे अभिनन्दन.

  महे्श नाईक

  • महेश,
   धन्यवाद.. अहो खरोखरंच खुप टेन्शन येतं ह्या सगळ्या गोष्टींचं. माझे वडील प्राचार्य होते त्या मुळे राधिकाला प्राध्यापक व्हायचंय.. एक मावस आजोबा, इंजीनिअरिंग कॉलेज मधे एच ओ डी म्हणुन रिटायर्ड झालेत, पुणे कॉलेज मधुन त्यामुळे तो पण एक इन्फ्लुअन्स आहे . आणि माझं इंडस्ट्रियल लाइफ तिने बघितलं आहेच, सारखं टूर्स.. आणी टेन्शन्स , त्यामुळेच कदाचित इंडस्ट्रिअल काम नको म्हणते आहे. अभ्यासु तर आहेच ती त्यामुळे ती कुठलाही कोर्स पुर्ण करेल अशी खात्री आहे.

   खगोल शास्त्रात इंट्रेस्ट आहे कां ते विचारतो तिला उद्या परत आली की..
   प्रदिर्घ आणि माहिती पुर्ण प्रतिक्रिये करता आभार..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s