आता १२वी तर झाली.. पुढे काय??

हा मिलियन डॉलर क्वेश्चन मुलांना अगदी खायला उठतो. मग अशा वेळी, अगदी कोणीही आणि काही म्हंटलं की हळवं झालेलं मन  उगाच भरुन येतं.. असं वाटायला लागतं, की आपण जो कोर्स करतोय, त्याला काही व्हॅल्यु आहे की नाही? पुढे नोकरी चा प्रश्न आहेच..

स्वतःचं मत पक्कं झालेलं नसतं, मग कधी वाटतं, की एम एस सी , करावं, तर कधी वाटतं की लिटरेचर मधे एम ए करावं.. फ्रेंच किंवा जर्मन विषयात वगैरे.. निर्णय काहीच होत नाही फक्त कन्फ्युजन वाढतं. ह्या वेळी मनाची अशी नाजूक अवस्था असते, की जिला सांभाळणं अतिशय आवश्यक असतं. प्रत्येच जण यातुन गेलेला असल्यामुळे मला काय म्हणायचं आहे ते अगदी फार न लिहिता पण लक्षात येइल.

आजकाल   बरेच आयटी मधे बिई केलेली मुलं ही नोकरी साठी वण वण भटकताना दिसतात. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ची प ण अशिच अवस्था आहे.पण थोड्य़ाफार प्रमाणात का होईना  ओपनिंग्ज आहेत ! केवळ ह्याच कारणासाठी मला कोअर इंजिनिअरिंग ( मेक , सिव्हिल, इलेक्ट) प्रिफर करावंसं वाटतं.. रेसेशन मुळे , सगळ्यांचा इंटरेस्टच संपला आहे,नवीन मुलांना नोकरी वर ठेवण्याचा.

बरं.. आमच्या सुकन्येला इंडस्ट्री मधे नोकरी करायची नाही तर ऍकेडेमिक मधे करियर करायचं आहे. तेंव्हा म्हट्लं, की अगदी कुठलीही ब्रॅंच घेतली तरीही हरकत नाही- कारण एम ई  जर लेक्चररशिप वगैरे काही करायची असेल तर एम ई करावं लागेलच..म्हणजे ग्रॅज्युएशन सुरु करण्याआधी पासूनच पुढचं लक्ष नक्की केलं तरच सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आजकालच्या मुलांचं अगदी आधीपासून ठरलेलं असतं की पुढे काय करायचंय ते.. आमच्या वेळि तर आम्ही अगदी जसं समोर आलं तसं आयुष्य जगलो. नथिंग वॉज प्लान्ड!

सिईटी दिलेली आहे. मागच्या आठवड्यात तिचा फोन होता की आता एम एस सी करते म्हणून.. म्हंटलं मुंबईला परत ये , मग पाहू.. काय करायचं ते..

पिजी नंतर पुन्हा नेट सेट द्यावीच लागते, आणि गव्हर्नमेंट जॉब्स साठी एम पी एस सी.. कित्ती टेन्शन आहे नां?? मला पण टेनशन आलंय म्हणून जास्त काही लिहित नाही.. काही गोष्टी त्या जगन्नियन्त्याच्या मर्जी वर सोडून देतो. बघू या.. काय होतं ते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा... Bookmark the permalink.

16 Responses to आता १२वी तर झाली.. पुढे काय??

 1. Rohini says:

  अगदि खरयं… हल्ली स्पर्धा एवढी वाढली आहे की मुलांचा खुपच गोधळ उडतो… पण आजकालची मुलंदेखिल smart असतात… त्यांना बरीच महिती पण असते… त्यामुळे काळजी करु नका… राधिका नक्कीच आपला मार्ग शोधेल 🙂 ( अर्थात मार्गदर्शन हे हवच ! )

 2. sonalw says:

  आमच्या वेळि तर आम्ही अगदी जसं समोर आलं तसं आयुष्य जगलो. नथिंग वॉज प्लान्ड!
  Ekdam kharay majhya babtit suddha.
  mala watat ‘academics’ as a field is ok. to primary level cha decision aahe, macro level. pan tila kuthala wishay shikaayla, shikwaayla, kinva research karayla aawdel he aadhi samjun ghyayla hav..magach tharwata yeil ME ki MSc ki ajun kahi option niwadaayche ka te. that’s a micro level which will matter when she will actually start her journey. Tumhala kaay watat?

 3. Anonymous says:

  Don’t worry, everything will be fine. Just keep supporting her.

 4. अनिकेत says:

  फॉरेन लॅन्गेज एखादी करावी. प्रचंड स्कोप आहे. मि बघतोय ना घरी. बायको जॅपनीज ट्रांन्स्लेशन करते आहे ना. जपान वरुन तर कित्ती ऑफर येतात पण आम्हाला दोघांनाही भारत आणि पुणे सोडायचे नाही आहे.

  नोकरी म्हणली नोकऱ्या आहेत, बिझीनेस म्हणलं तर अगदी कमी भांडवली ट्रांन्स्लेशन कंपनी टाकता येते नाहीतर फ्रि-लॅन्सींग आहेच. बाकीचे उद्योग सांभाळुन करता येते. बर शाळा-कॉलेजेस-इंस्टीट्युशन्स मध्ये ही स्कोप आहेच

 5. Prasad says:

  आता एक बर आहे की लोक नुसते इंजिनीयर किंवा डॉक्टर चा विचार करत नाही. त्यापलीकडे जाऊन विचार करता आहेत. आमच्या वेळेस “इंजिनीयर किंवा डॉक्टर” बस!!!..ऑल द बेस्ट!!

 6. रोहिणी,
  तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. मुलांचा पण आपला व्ह्यु असतो. त्याप्रमाणे त्यांचे पण कन्सेप्ट्स ठरलेले असतात. उद्या सकाळी ती परत येइल, तेंव्हाच काय तो निर्णय घेउन.

  सोनल,
  माझे वडील प्रिन्सिपॉल होते ना, त्यांनी त्यांचं लाइफ कसं होतं ते सांगितलं. त्याचा परिणाम असावा हा.

  अनिकेत,
  आमची दुसरी कन्यका, फॉरिन लॅंग्वेज च्या प्रेमात पडली आहे. तिचं १०वी सुरु आहे . तेंव्हा डिसिजन घ्यायला दोन वर्ष आहेत अजुन.

  प्रसाद,
  तिला अभ्यास आवडतॊ ( वेडी आहे ती 🙂 )
  प्रतिक्रिये करता तुम्हा सर्वांचे आभार..
  दिवसभर अलिबागला होतो, आता पण कर्नाळ्याच्या समोरचया हॉटेलला बसलोय , आणि आत्ता कम्प्युटर सुरु केलाय.. म्हणुन रिप्लायला वेळ लागलाय.

 7. Aparna says:

  कन्यकेला शुभेच्छा..इतरांनी सर्व म्हणून झालंच आहे…:)
  पण हे कर्नाळ्याच्या समोरचं की पायथ्याचं छोटं हॉटेल हो?? उगाच नॉस्टॅल्जिक व्हायला होतयं

  • हो तेच ते!! आम्ही दिघी पोर्ट ला गेलो होतो. हे नविन पोर्ट होतंय . अलिबागच्या पुढे ,जंजिऱ्या साठी आपण मुरुडहुन जिथुन बोटी घेतो तिथुन – बोटीने अर्धा तास जावं लागतं. अजुनही कन्स्ट्रक्शन सुरु आहे . कमित कमी १८ महिने लागतिल पुर्ण व्हायला..
   अगदीच नविन साईट असल्यामुळे आजचा पुर्ण दिवस अगदी काहिही खायला मिळालं नाही. म्हणुन मग मुंबईला पोहोचायच्या आधी जरा जेवायला थांबलो ह्या हॉटेल मधे. तशी बरिच हॉटेल्स आहेत, पण त्यातल्या त्यात हे बरं वाटतं मला !

   शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

 8. swati says:

  kuthalihi stream nivadali tari tithe kashta aahetach …fakta career jevha actually suru hota tevha tyat kaam kartana swatahala samadhan milan mahatwacha aahe. aani je kahi karato te manapasun aawadat asel tar professional barobar personal life pan aapan enjoy karato…fakta tase vichar manat rujayala lavkar suruwat vhayla havi. asa mala watat…tumachya donhi mulina mazya manapasun shubhechha!

  • Swati
   “professional barobar personal life pan aapan enjoy karato’
   हे मात्र तुम्ही अगदी १०० टक्के बरोबर बोललात. अगदी मनापासुन पटले तुमचे विचार. तिला अभ्यास आवडतो अगदी मनापासुन.. म्हणुनच ती म्हणते आहे की तिला ऍकेडमिक करियर बनवायचं आहे . एम ई, नंतर मे बी पिएचडी वगैरे. नोकरी पण फक्त लेक्चरशिपचीच करायची आहे. जेंव्हा इतका फोकस्ड अप्रोच असतो मुलांचा तेंव्हा पालकांनी काहिच न बोलणं बरं , म्हणुन मी अगदी ती म्हणते ते मान्य करतोय..
   प्रतिक्रिये करता आभार.

 9. राधिकाचं अभिनंदन!
  मला वाटतं तिनं शासकिय परीक्षांचा अभ्यासही करावा.. [एम्.पी.एस.सी / यु.पी.एस.सी.] … आता इंजि., डौक्टर यांच्यापेक्षाही मुलं शासकीय नोक-यांकडे अधिक वळताहेत. एखादी फौरेन लॅग्वेज – आय. एफ. एस. साठी नक्कीच उपयोगी ठरावी.

  मात्र मुलांवर असं करीअरचं लोढणं लादणं बरं नव्हे. … निर्णय त्यांनाच घेऊ द्या.. आपण मार्गदर्शन करा!

  • स्वतःच्या इन्ट्युशन मुळे जो निर्णय घेतला जातो तो नेमका बरोबर असतो. म्हणुनच मी निर्णय न लादण्याचा निर्णय घेतला आहे.
   प्रतिक्रियेकरता आभार..

 10. Nitin says:

  टेन्शन लेनेका नही, देनेका!!

 11. PRATIK PAWAR says:

  MI ATH MSCIT CHLO AHI MALA PODI INJNIARING SAYT GEYCI AHEI

 12. baravi nanter kay karave ias chya bhartisathi kontya exam dyavyat

Leave a Reply to Aparna Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s