दिल ढुंढता है..

this is what i wanaa do.हे गाणं कधीही ऐका.. माझं खुप आवडतं गाणं आहे हे. कधीही लावलं तरीही आपले ते “फुर्सत के” दिन आठवतात. ’मी’च नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक माणुस स्वतःला या गाण्याशी कोरिलेट करतो.. मला तर सारखं वाटत असतं की ’ते’ दिवस  … कुठे गेले ? अजूनही ५ डेज alibaghअ विक आहे. पण बहुतेक शनिवारी किंवा रविवारी कांहीतरी काम निघतच- आणि ते पण न टाळता येण्यासारखं..!  😦

कधी प्लान करावा की अगदी कांहीही न करता बसून रहावं, त्या कंटाळा ब्लॉग वरच्या कुत्र्या सारखं.. एक लेख होता त्या ब्लॉग वर.. माणुस बसलाय , हातात सिगारेट आहे पण ओढत नाही, डोळॆ उघडे आहे पण पहात नाही वगैरे वगैरे.. मला ते पोस्ट जरी विनोद म्हणून पोस्ट केलेले असले तरीही अगदी मनापासून आवडले होते.

आता हेच बघा ना, धाकट्या मुलीला उद्या क्लासला सुटी आहे, तर तिच म्हणणं होतं की उद्या एस्सेल वर्ल्ड ला जाउ , पण नेमका आत्ताच एक फोन आला, की सोमवारी सकाळी ८ वाजता एन एस आर वाय कारवार ला एक मिटींग आहे. आता सकाळची ८ ची मिटींग म्हणजे रविवारी संध्याकाळच्या फ्लाइटने जावे लागणार, म्हणजे रविवारची वाट लागली, म्हणजे रात्री डिलरसोबत डिस्कशन्स करुन दुसऱ्या दिवसाच्या मीटिंगची स्ट्रॅटेजी तयार करता येईल. त्याचा पण रिसेंटली ऍक्सिडॆंट झाल्यामुळॆ व्हिल चेअरलाच चिकटून आहे तो, त्यामुळे त्यालाही भेटणं आवश्यकच आहेच.

हा डिलर माझा अगदी जुना मित्र. जेंव्हा मी नर्मदा प्रोजेक्टवर काम करायचो, तेंव्हा पासून हा मित्र.मुळचा गोव्याचाच! पण तेंव्हा दिल्लिच्या एका कंपनित काम करायचा. नंतर आमचा डिलर झाला गोव्याचा. अतिशय सॉफ्ट स्पोकन आणि  मनमिळाऊ गोंयकर..

तरीही कधी तरी कामाच्या राम रगाड्यातुन थोडा वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढण्याचा.. किंवा ’ स्व’ बरोबर रहाण्याचा एक प्रयत्न प्रत्येक जण नेहेमीच करित असतो.  मग सुरु होतं लहान लहान गोष्टींच्या मधे आनंद शोधणं.

मुरुड हुन निघालो आणि दिघी ला पोहोचलो. कोंकणातल्या लोकांचा या पोर्ट ला विरोध आहे, कां?? तर म्हणे काम सुरु केल्यापासून धुळ खूप उडते. मला साईटला जायला रीक्षापण मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने एक रिक्षावाला तयार झाला. एखाद्या एरियाची डेव्हलेपमेंट लोकांना कां नको असते हे मला कधीच कळू शकलेलं नाही.?????  ते गॉड फॉरसेकन गांव की जिथे कोणीही जात नाही, त्या ठिकाणी तयार झाल्ल्यावर तिथल्या लोकांना पण रोजगार उपलब्ध होइल.. पण नाही!!!!!!! पोर्ट नको म्हणताहेत गांवकरी. अर्थात त्यांना मॅनेज करुन काम सुरु आहेच पोर्ट चं.

footदिवस पुर्ण साईटवर घालवला. आणि संध्याकाळी मुरुडहून निघालो. मुरुड ते अलिबागचा सुंदर रस्ता.. आणि कार मधे ’स्व’ बरोबर ’मी’ . मस्त वेळ जात होता. आता हे अंतर आहे फार तर १५० किमी  पण रस्त्यामुळे जरा जास्तच वेळ लागतो. अलिबाग पर्यंतचा रस्ता अगदी समुद्राला समांतर. निसर्गाच्या निरनिराळ्या छटांची झालेली उधळण मन वेधून घेत होती.नारळी पोफळीची झाडं.. आणि समुद्र.. !मधेच एखादं चुकार आंब्याचं झाड पण दिसायचं . मुकुट काढलेल्या राजा सारखं.. कारण आंबे संपलेत ना आता!

डाव्या साईडला समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र रे्तीवर झाडांच्या पानांनी शाकारलेली एक झोपडी (शॅक) होती. तिथे सुंदर पाळणा बांधला होता. त्या मामाला कांदा भजी आणि अंडा भुर्जी बनवायला सांगितलं. दिवस भराचा थकवा आणि रेती पायाला मस्त वाटंत होती. थोडा वेळ समुद्राच्या पाण्यात पाय बुड्वून आलो मला वाटतं कमीत कमी अर्धा पाउण तास तरी गेला असेल-पायाखालची रेती सरकताना मस्त वाटत होतं.. इथे बराच वेळ पाण्यामधे उभा राहिलो..  .

मग त्या झोपडीतल्या पाळण्यावर पहूडलॊ किती वेळ गेला ते समजलंच नाही समोर समुद्र -खाली रेती.. !!-

त्या मामा कडली अंडी संपलेली होती, कांदा चिरायचा होता भजी करण्यासाठी, आणि मला पण  नक्की काही आठवत नाही. पण एखादा तास तरी नक्कीच गेला असावा. हा अगदी क्वॉलिटी टाइम स्वतःच्या साठी स्वतः वापरलेला– खूप दिवसांच्या नंतर. म्हणतात ना बिझिनेस विथ प्लेझर..kantala

मला आठवतं , एकदा गोव्याला गेलो होतो कांही कामासाठी , तेंव्हा एक दिवस काम नव्हतं.. म्हणजे सुटी होती. तेंव्हा इर्विंग वॅलेस चं एक पुस्तक ( सेव्हन मिनिट्स) मी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर बसुन पुर्ण वाचून काढलं होतं एका दिवस भरात.. ( ही गोष्ट आहे २२०-२२ वर्ष जुनी) त्या नंतर पुन्हा तसा कधी वेळ मिळाला नाही.

मला हे अगदी मान्य आहे, की बऱ्याच शा गोष्टी फॅमिली मेंबर्स बरोबर पण एंजॉय करु शकतो, पण हा ’दिल ढूंढता है” सिंड्रोम विथ फॅमिली घालवलेल्या वेळानंतरही मला हॉंटींग करित असतो.

बस्स!!  . इथे एक दिवस येउन   एकटं.. एकदा इथे पुन्हा एकटं यायचं आणि दिवसभर अस्संच पाळण्यावर लोळत किंवा समुद्रात डुंबत दिवस काढायचा.. सौ. मुलीसोबत माहेरी गेली की… 🙂 !!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

10 Responses to दिल ढुंढता है..

 1. nimisha says:

  हाय महेन्द्र,

  छान लिहीलंयस…पटतंय मला….पण असं निवांत एकटेपण एन्जॉय करण्यासाठी देखिल मनाची एक वेगळी घडण लागते रे…नाही तर होतं काय नं की ‘आत्ता आपल्याबरोबर तो हा/ही असता तर कित्ती मजा आली असती किंवा तो/ती असता तर किती मजा आली असती ‘ असेच विचार येत रहातात आणि मनाला एक हुरहूर लागून राहाते.तुला सांगू आयुष्यातले काही क्षण तरी एकट्याने एन्जॉय करता आले पाहिजेत…म्हणजे काही दुःख जशी आपण अगदी जवळच्या व्यक्तीला देखिल न सांगता सहन करतो,तसंच आनंदाचे क्षणही जगता आले पाहीजेत्.

  निमिषा

  • निमिषा
   मला वाटलं होतं की हे पोस्ट बघुन सगळे मला जाम शिव्या घालणार.
   पण, धन्यवाद. मला काल ते प्रकर्षाने जाणवलं, एकटं असतांना..!

 2. महेंद्रजी,
  सुंदर लिहलंय माझे जुने दिवस आठवले

 3. सामंत साहेब
  प्रतिक्रियेकरता आभार..

 4. alhadmahabal says:

  “दिल ढूंढता है” गाणं तर आवडतंच…
  आपला हा ब्लॉगपोस्टही आवडला…

  आल्हाद

 5. आल्हाद
  प्रतिक्रियेबद्दल आभार..

 6. bhaanasa says:

  मस्त. स्वत:चाच स्वत:च्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न. नितांत जरूरीचा.

 7. अरे वा! एकांत असण्याचा अनुभव काही औरच असतो… त्यातल्या त्यात अशा शांत समुद्रकिनारी… ! असेच काही प्रसंग मी एकट्याने अनुभवले आहेत.. जसं – भल्या पहाटे उठुन बाइक वरुन पाठीमागच्या घाटात जाउन सुर्य उगवताना पाहणे.. टेरेसवर चढुन सुर्य मावळताना पाहणे.. मज्जा येते..!

 8. datta shelar says:

  saheb, me tummha pekasha lahan assen…pan tumache vichar anni awad …mastach..sundar lihata ki ji manala awadate….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s