चेन लेटर्स..

ganeshaही पत्र मला अगदी इरीटेट करतात. एकच पत्र हे कमीत कमी १० -१५ लोकांच्या कडून फॉरवर्ड केलं जातं. तुम्हाला भावनांना हात घालुन ही पत्रं आपल्या  मित्रांना फॉर्वर्ड करा असा ’आदेश’ दिला जातो. जर तुम्ही हे पत्र फॉर्वर्ड केले नाही तर मात्र तुमचं फार वाईट होईल असंही वॉर्न केलं जातं.

हा प्रकार अगदी मी लहान असतांना पासून सुरु आहे. तेंव्हा फक्त संतोषी मातेची पत्र पाठवली जायची, त्या संतोषी मातेच्या पत्रामधे लिहिलं असायचं की एका माणसाने हे पत्र फाडून फेकले तर त्याचे कसे वाइट झाले, आणि दुसऱ्याने पत्र १६ लोकांना पाठवले तर त्याचे कसे भले झाले हे अगदी रंगवून रंगवून सांगितलेलं असायचं.  आजकाल इ मेल्स..म्हणजे आपण किती सुधारलो आहोत नाही क?पण मानसिकता आपली तशीच आहे २५ वर्षां्पूर्वीची..

मुंबईला महालक्ष्मी व्रत करण्याचं फॅड खूपच वाढलंय हल्ली.. या व्रतामधे एक पुस्तक ( ज्या मधे व्रताची पुर्ण कहाणी दिलेली आहे ते) वाटायचं असतं. दर गुरुवारी करायचं व्रत आहे हे.

आमच्या घरी महालक्ष्मी ची अशी बरीच पुस्तकं जमा झालेली होती. त्या मधलं एक पुस्तक मी वाचलं. त्यात काही कहाण्या आहेत . असंही लिहिलं आहे की जो कोणी व्रत करायचं विसरला त्याचं वाईट झालं.   सवाष्णींना बोलवा, आणि ह्या व्रताचं पुस्तक हळदीकुंका सोबत वाटा म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न होइल . मला असं वाटतं की ते पुस्तक छापणारा  या व्रताचा क्रिएटर आहे. त्या पुस्तकांत असंही लिहिलं आहे की जर **** कंपनीचे पुस्तकंच वाटा, तरच व्रत सफल होईल.. अन्यथा नाही.. !मी तर सरळ ती पुस्तकं फाडून फेकून देतो.

आजकालच्या या यांत्रिक युगात आणि तंत्रज्ञानाच्या महास्फोटात पण आपण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या म्हणून त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे इमाने इतबारे दहा पंधरा लोकांना ते पत्र फॉर्वर्ड करतो. आपलं मन हे इतकं कमकुवत आणि हळवं  झालेलं आहे, सध्याच्या प्रॉब्लेम्स मुळे की आपण सरळ त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे वागतो. एक मन सांगत असतं की ह्यात काहीच अर्थ नाही पण तरीही आपण आपण सरळ सरेंडर करतो..

वर जे पत्र दिसतंय ना गणपतीचं ते मीच तयार केलंय बरं का .  तुमच्या पर्यंत पोहोचलं की माझी आठवण काढा. मी हे पत्र का बनवलं असं विचारताय?? अहो  मला आजपर्यंत आलेल्या  हजारो फॉर्वर्ड पत्रांचा बदला आहे हा….. :).

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to चेन लेटर्स..

 1. Vinay says:

  ha ha… dev jar ashi patraka vaatun prasanna jhala asta, tar mag Prahlad, Arjun, Rushi-muninna valkala ghalun tapashcharya karavi lagli nasti…

  nusta devla samor ubhe rahun patraka vatli ki icchha purna… Prahlad la Bhagwan Vishnu, Arjun la shastra-astra vidya aani Vishwamitranna swarga aapo aap disla asta…

  mi asli fwds saral delete karto. foto changla asel, tar tyacha wall paper mhanun upayog karto. baki kahi karat nahi… hya e-mail fwd cha ek changla bhaag aahe, ki delete kartana asa vaatat nahi “devaacha chitra aahe, phaadun kacharyat kasa takaycha?”

 2. अशा पत्रांची जी मालिका आहे.. त्यात बरेच इतर देव-देवीही आहेत.. जसं मला आलेल्या मेल मध्ये – कोल्हापुरची देवी, साईबाबा, गणेश इ. एक मात्र खरं –

  ” आपलं मन हे इतकं कमकुवत आणि हळवं झालेलं आहे, सध्याच्या प्रॉब्लेम्स मुळे की आपण सरळ त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे वागतो. एक मन सांगत असतं की ह्यात काहिच अर्थ नाही पण तरिही आपण आपण सरळ सरेंडर करतो.. ”

  मी मात्र अशा मेल फौरवर्ड न करता [ – देवांना नमस्कार करुन ] डीलीट करतो. आता नमस्कार करताना ही प्रार्थना जरुर असते की – देवा अशा या सेंडर्स ना माफ कर! अशा मेल पाठविणा-या स्पॅमर्स आणि तुझे भक्त या दोघांचाही मी आदर करतो. मात्र तुझ्या नावाने चाललेले हे स्पॅम मी माझ्याकडुन पुढे चालु ठेऊ इच्च्छित नाही. मला माफ कर. नमस्कार!

  • आपल्या आवडत्या देवाचे फॉर्वर्ड्स असले की डिलिट करणे शक्य होत नाही.. मला तरी..
   इतर तस सगळेच फ़ॉरवर्ड मी पण सरळ डिलिट करतो …!

 3. mipunekar says:

  माझी बदल घ्यायची पध्दत जरा वेगळी आहे.
  जो मला अशी मेल करतो त्यालाच मी ती मेल १०,२० वेळा पाठवतो. आणि अजून पण आजूबाजूला कुणाला कोणाला आली असेल तर त्यांना पण सांगतो की १०० वेगवेगळ्या लोकांना पाठवण्या पेक्षा ज्यानी पाठवली त्यालाच पाठवा ना.आणि मग सगळे ज्यानी पाठवलं त्याच्या कडे जाऊन त्याला हाय करून येतो.त्याचा चेहेरा पाहण्यासारखा होतो.आणि तो परत अशी मेल कधीही पाठवत नाही.

 4. bhaanasa says:

  ह्या प्रकरणाने मीही फार वैतागले आहे. मात्र प्रथमपासूनच एक गोष्ट मी कटाक्षाने टाळली ती म्हणजे पुन्हा कोणाला तरी ह्या चक्रात अडकवणे. डिलीटही करत नाही. बरेचदा देवांचे फोटो अतिशय सुंदर असतात त्यांना ठेवते. 🙂

  • हे पोस्ट लिहिलं त्या दिवशी मला एक ( कोल्हापुरच्या अंबाबाईचा) १४ लोकांनी पाठवला होता. आणि अजुनही रोज कमित कमी ४-५ लोकं तो इ मेल फॉर्वर्ड करताहेत. त्यामुळे मी खुप वैतागलो होतो.
   तुमचं म्हणणं पटलं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s