कॅम्लिन चे दिवस

परवा कॅम्लिन ची एक जुनी जाहिरात पहाण्यात आली १९६२ सालची. ही जाहिरात जेंव्हा भारतामधे सर्वप्रथम क्रेऑन्स मिळायला लागले तेव्हाची आहे. एक लहानसा शोध किती बदल घडवून आणतो नाही कां? ह्या जाहिरातीला जाहिरात म्हणण्यापेक्षा एक लेखच म्हणावं लागेल.याचं कारण म्हणजे नवीन प्रॉडक्टची विकायचा तर लोकांना माहिती तर असायलाच हवी न.. ना्हीतर उगाच नुसते फोटो पाहून कोण विकत घेईल तुमचं प्रॉडक्ट. कुठलंही पेंटींग करायचं तर ब्रश, कलर्स आलेच.. क्रेऑन्स बद्दल तर कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता.त्यामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली.

raju

त्याच प्रमाणे ही दुसरी जाहिरात, वॉटर कलर्स ची. ही पण वाचनिय आहे. इथे पोस्ट करतोय. जर राजु पेंट करु शकतो तर तुम्ही कां नाही?  अतिशय एनकरेजिंग जाहिरात आहे ही. माझ्या लहानपणी वाचल्याच आठवते.

camelwatercolour

शाळेमधे असतांना कॅम्लिनचा पेन असणं म्हणजे कांहीतरी ग्रेट होतं.कारण इतर कंपन्यांचे पेन्स अगदी टुकार क्वॉलिटीचे असायचे. तसा फाउंटन पेन चा शोध पण अगदी माझ्या जन्माच्या थोडा आधी लागल्या मुळे, तो पण अगदी प्रिमिटीव्ह अवस्थेतंच होता. माझ्या घरी टांक, आणि दौत पण होती .. खुप जुनी..  बोरू ने लिहील्याने अक्षर सुधारते असं आमची आजी नेहेमी म्हणायची पण हा बोरु म्हणजे काय हे कधीच पहायला मिळालं नाही….. इच्छा मात्र नक्कीच आहे पहायची.

फाउंटन पेनच्या दिवसांत कॅम्लिनचं एकछत्री राज्य होतं. पेन ची निब २५ पैसे आणि ५० पैशांना मिळायची. आणि पेन ची किंमत होती १रु. २५ पैसे. नंतरच्या काळात चायनिज पेन्स आले होते, पण कॅम्लिन आपल्या दर्जा मुळे टिकुन राहिले.

d_p_dandekarही कंपनी सुरू केली होती दांडेकरांनी १९३१ साली. घोडा छाप ( मला वाटतं ही फ्रेज आपण जी वापरतो, ती तेंव्हा पासूनची असावी) शाई आणि शाईच्या गोळ्या बनवणारी ही कंपनी.ब्रिटिश इंकला पर्याय म्हणजे घोडा छाप शाई. काय हसू येतंय कां- घोडा छाप लिहिलं म्हणून.. पण हे खरं आहे.. नंतर जवळपास १०-१२ वर्षानंतर दांडेकरांनी कंपनीचे नांव कॅम्लिन केलं. आणि उंट – जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जिवंत राहु शकतो, त्याला बोध चिन्ह बनवलं.

आपल्याला सगळ्यांनाच ह्या उंटाला पाहिलं की बरं वाटतं. मी स्वतः नोटीस केलंय 🙂 . मुलगी लहान असतांना तिच्याबरोबर मी पण बरेचदा कलरींग करायचो.. 🙂 ईट्स प्लेझर!

१९६२ पर्यंत कॅम्लिन फक्त  शाइच्याच व्यापारात होती. पण नंतर मात्र डायव्हर्सिफाय करुन वॉटर कलर, कंपास बॉक्स,रबर, स्टॅंप पॅड , खडू,क्रेऑन्स, आणि पेन बाम पण ( हो पेन बाम पण होता त्यांचा, जो नंतर बंद करण्यात आला)वगैरे विकण सुरु केलं . मला आठवतं मी ५ वर्षाचा असतांना मला क्रेऑन्स आणुन दिले होते वडिलांनी. 🙂

१९७४ साली लाकडी पेन्सिल् सुरू केल्या. आणि काचेवर पेंट करण्यासाठी ग्लास कलर हे बनवणे सुरू केले १९९९ मधे!

camlinही कंपनी अगदी लहानपणापासून जीवनाचा एक अविभाज्य अंग झालेली आहे .   जेंव्हा बॉलपेन मिळणं सुरु झालं होतं , तेंव्हा मात्र ही कंपनी अगदी बंद होण्याच्या मार्गावर होती पण , वेळीच डायव्हर्सिफिकेशन मुळे तरुन गेली..

माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. खुप सुंदर आठवणी आहेत .. म्हणूनच अजूनही मुलींचा कंपास किंवा क्रेऑन्स बघितले की मन भरुन येतं आणि चित्र रंगवाव, किंवा चार दोन रेघोट्या ओढाव्याशा वाटतात मला …

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , . Bookmark the permalink.

9 Responses to कॅम्लिन चे दिवस

 1. Prasad says:

  लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला..धन्यवाद!!

 2. nimisha says:

  माझ्याही लहानपणी मी आजोबांकडून हट्ट करुन क्रेयॉन्स घेतल्याचं आणि त्यानंतर कागदा ऐवजी त्याचा छानपैकी घ्ररातल्या हॉलमधल्या भिंती रंगवण्याचा उपदव्याप करुन मग आईचे धपाटे चुकवण्यासाठी पुन्हा आजोबांच्या मागे जाऊन लपल्याचं छान आठवतंय्….!

 3. Nimisha, Prasad
  Thanks for the reply.

 4. mugdha says:

  ajunhahi mala camel chya crayons, pencils cha prachanda aakarshan aahe…aahet maajhyakade ajunahi
  chhan lihilayat…:)

 5. Yogesh says:

  खुप छान पोस्ट आहे.तुम्हाला बोरु पाहयची इच्छा आहे ना?माझ्या घरी आहे. माझे आई -बाबा शिक्षक होते आता ते रिटायर झालेत. जुन्या काळी बोरुने ते तरन्ग तक्ते, भिन्तीवरील फलक विद्यार्थ्यासाठी करायचे.कधी शक्य झाल तर आपण नक्की भेटु या.

 6. Aparna says:

  छानच लेख…मलाही बोरु पाहयची इच्छा आहे

 7. Dr.Anil Dhakane says:

  I remember camel have a fine quality “compas box”also.In 1978 my 10 th class I have on camlin box of rs 10.That is the only I have in the class.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s