मारिओ

मारिओ हा गेम खेळला नाही असा माणुस विरळाच. तुम्ही अगदी कुठल्याही एज ग्रुप मधले असाल तरिही हा गेम तुम्ही निश्चितच कधी ना कधी खेळले असालच.मारिओ
ह्या केवळ ५० केबी च्या गेम ने एके काळी सगळ्य़ांना अगदी वेडं करुन ठेवलं होतं. माझ्या कडे एक व्हिडीओ गेम होता, जो कॅसेट्स वर चालायचा.तेंव्हा हा गेम खेळायला जे पॅड्स होते ते  एका वायरने जोडलेले असायचे कन्सोलला.एकंदरीत जरा क्लम्झी होतं सगळं  प्रकरण.  आता मात्र  एक्स बॉक्स आणि पी एस ३ च्या जगात पण हा गेम कन्सोल किती दिवस  टीकुन रहातो हे पहायचं.
पिएस२ हल्ली फक्त ५ ते ६ हजारात मिळतं. आणि त्यावरच्या गेम्सच्या सिडी’ज पण अगदी स्वस्त ( अर्थात पायरेटेड) अगदी स्वस्त अव्हेलेबल आहेत. त्या मुळे  पीएस २ हा खुप पॉप्युलर गेम आहे. मी जे कन्सोल रेफर करतोय त्या गेमची किंमत फक्त १००० -१२०० रुपया पर्यंत अजुनही आहे. म्हणुनच असं वाटतं की  आता हा गेम कस्नोल इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
मी जेंव्हा हा गेम विकत घेतला होता, ( १९८७ साली) तेंव्हा हा गेम म्हणजे अगदी मोस्ट सॉट  फॉर गॅजेट होतं. ह्याच्या किमती अगदी २२०० ते ४००० रु पर्यंत होत्या. म्हणजे तुम्हाला जर शुटींग गेम खेळायचा असेल तर लेसर गन साठी वेगळे पैसे द्यावे लागायचे. रेसिंग गेम खेळायला स्टेअरिंग व्हिल वेगळं मिळायचं. पण ते मी घेतलं नव्हतं.सगळॆ गेम्स हे डॉस बेस्ड होते.
ह्या कन्सोल वर खेळायला मिळणाऱ्या कॅसेट्स ची नांवं.. १००० इन १ ( म्हणजे हजार गेम्स एका कॅसेट मधे) किंवा तत्सम असायचं . अर्थात खरोखर हजार गेम नसायचे, फक्त एकाच गेम्सचे बरेच व्हेरिएशन्स असायचे त्यात.
सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे मारिऒ.. हा अतिशय ऍडीक्टीव्ह गेम आहे/होता. मी अगदी तासन तास खेळंत बसायचे हा गेम.सौ. अक्षरशः चिडायची . पण मी थोडा नादिष्ट्च आहे 🙂 कदाचित म्हणुनच असेल जेंव्हा हा गेम चोरिला गेला तेंव्हा ती मात्र खुश झाली होती. कदाचित माझा छंदिष्ट पणा  हेच कारण असेल की मला ती अजुनही पिएस३ घेउ देत नाही.
आणि या सोबतंच माझा दुसरा आवडता गेम म्हणजे ’कॉंट्रा’ ! हा गेम पण मी नेहेमी खेळायचो. टेट्रिज काही फारसे आवडंत नव्हते, तरी पण कधी तरी खेळायचो. मारिऒ नंतर सुपर मारिओ ची पण कॅसेट आणली होती पण त्या गेम मधे असलेल्या बग मुळे गेम नेहेमीच हॅंग व्हायचा.
कम्प्युटरवर गेम खेळणं हे पण माझं आवडतं काम.या मधे फ्री डाउन लोडेबल गेम्स बरेच खेळलो, पण सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे “क्लॉ”. हा गेम मी जवळपास ९ महिने खेळत होतो. वन ऑफ द बेस्ट गेम्स ! ह्या गेमची सिडी लावुन मग खेळावं लागायचं. अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचलो होतो. फक्त शेवटचे कांही वर्ल्ड्स बाकी होते.. असो.. पण नंतर सिडी खराब झाली आणि गेम सुटला. सिडी कशी खराब झाली हे मात्र अगदी गौडबंगालंच आहे.
मारिओ हा गेम फक्त ५० केबी चा गेम आहे आणि नेटवर अव्हेलेबल आहे. डॉस गेम्स डॉट कॉम ह्या वेब साइटवर बरेच फ्री डाउन लोडेबल गेम्स आहेत. जर तुम्ही पण डॉस गेम्सचे चाहते असाल तर या साइटला भेट ही दिलीच पाहिजे. चार्ली द डक हा पण गेम याच ठिकाणि आहे. लहान मुलांना हा गेम खुप आवडतो. तसेच सांता , आणि … अहो हे सगळं मी सांगण्या पेक्षा तुम्हीच कां भेट देउन डाउन लोड करित नाही हे गेम्

MARIOमारीओ हा गेम खेळला नाही असा माणुस विरळाच. तुम्ही अगदी कुठल्याही एज ग्रुप मधले असाल तरीही हा गेम तुम्ही निश्चितच कधी ना कधी खेळले असाल .ह्या केवळ ५० केबी च्या गेम ने एके काळी सगळ्यानाच अगदी वेडं करून ठेवलं होतं.

मी अगदी पहिल्यांदा हा गेम खेळलो तेंव्हा हा एका कॅसेटमधे अव्हेलेबल होता. कंप्युटर व्हर्शन नंतर आलं.  (खरी गोष्ट सांगायची तर १९८७ मधे कम्प्युटर इतकं कॉमन झालेलं नव्हतं.कम्प्युटर नसल्यामुळे गेम्स खेळायला कन्सोल निघालं होतं मार्केटला.)माझ्या कडे एक व्हिडीओ गेम    होता -मारिओ, जो कॅसेट्स वर चालायचा.तेंव्हा हा गेम खेळायला जे पॅड्स होते ते  एका वायरने जोडलेले असायचे कन्सोलला.एकंदरीत जरा क्लम्झी होतं सगळं  प्रकरण. .

पिएस२ हल्ली फक्त ५ ते ६ हजारात मिळतं. आणि त्यावरच्या गेम्सच्या सिडी’ज पण अगदी स्वस्त ( अर्थात पायरेटेड) अगदी स्वस्त अव्हेलेबल आहेत. त्या मुळे  पीएस २ हा खुप पॉप्युलर गेम आहे. मी जे कन्सोल रेफर करतोय त्या गेमची किंमत फक्त १००० -१२०० रुपया पर्यंत अजूनही आहे. आता मात्र  एक्स बॉक्स आणि पी एस ३ च्या जगात पण हा गेम कन्सोल किती दिवस  टीकून रहातो हे पहायचं. असं वाटतं की  आता हा गेम कस्नोल इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.

मी जेंव्हा हा गेम विकत घेतला होता, ( १९८७ साली) तेंव्हा हा गेम म्हणजे अगदी मोस्ट सॉट  फॉर गॅजेट होतं. ह्याच्या किमती अगदी २२०० ते ४००० रु पर्यंत होत्या. म्हणजे तुम्हाला जर शुटींग गेम खेळायचा असेल तर लेसर गन साठी वेगळे पैसे द्यावे लागायचे. रेसिंग गेम खेळायला स्टेअरिंग व्हिल वेगळं मिळायचं. पण ते मी घेतलं नव्हतं.सगळॆ गेम्स हे डॉस बेस्ड होते.

ह्या कन्सोल वर खेळायला मिळणाऱ्या कॅसेट्स ची नांव.. १००० इन १ ( म्हणजे हजार गेम्स एका कॅसेट मधे) किंवा तत्सम असायचं . अर्थात खरोखर हजार गेम नसायचे, फक्त एकाच गेम्सचे बरेच व्हेरिएशन्स असायचे त्यात.

सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे मारीऒ.. हा अतिशय ऍडीक्टीव्ह गेम आहे/होता. मी अगदी तासन तास खेळत बसायचे हा गेम.सौ. अक्षरशः चिडायची . पण मी थोडा नादीष्ट्च आहे 🙂 कदाचित म्हणूनच असेल जेंव्हा हा गेम चोरीला गेला तेंव्हा ती मात्र खुश झाली होती. कदाचित माझा छंदिष्ट पणा  हेच कारण असेल की मला ती अजूनही पिएस३ घेउ देत नाही.

आणि या सोबतच माझा दुसरा आवडता गेम म्हणजे ’कॉंट्रा’ ! हा गेम पण मी नेहेमी खेळायचो. टेट्रिज काही फारसे आवडत नव्हते, तरी पण कधी तरी खेळायचो. मारीऒ नंतर सुपर मारिओ ची पण कॅसेट आणली होती पण त्या गेम मधे असलेल्या बग मुळे गेम नेहेमीच हॅंग व्हायचा.

कम्प्युटरवर गेम खेळणं हे पण माझं आवडतं काम.या मधे फ्री डाउन लोडेबल गेम्स बरेच खेळलो, पण सगळ्यात जास्त आवडता गेम म्हणजे “क्लॉ”. हा गेम मी जवळपास ९ महिने खेळत होतो. वन ऑफ द बेस्ट गेम्स ! ह्या गेमची सिडी लावुन मग खेळावं लागायचं. अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचलो होतो. फक्त शेवटचे कांही वर्ल्ड्स बाकी होते.. असो.. पण नंतर सिडी खराब झाली आणि गेम सुटला. सिडी कशी खराब झाली हे मात्र अगदी गौडबंगालच आहे.

मारीओ हा गेम फक्त ५० केबी चा गेम आहे आणि नेटवर अव्हेलेबल आहे. डॉस गेम्स डॉट कॉम ह्या वेब साइटवर बरेच फ्री डाउन लोडेबल गेम्स आहेत. जर तुम्ही पण डॉस गेम्सचे चाहते असाल तर या साइटला भेट ही दिलीच पाहिजे. चार्ली द डक हा पण गेम याच ठिकाणि आहे. लहान मुलांना हा गेम खूप आवडतो. तसेच सांता , आणि … अहो हे सगळं मी सांगण्या पेक्षा तुम्हीच का भेट देऊन डाउन लोड करित नाही हे गेम्स?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

14 Responses to मारिओ

 1. अनिकेत says:

  हो मी पण ही साईट वापरतो गेम्स साठी कमी साईझचे जुन्याकाळातील तरीही ऍडिक्टीव्ह गेम्स आहेत या साईटवर. मारीओ माझा पण आवडीचा. आधी व्हिडीओ गेम पार्लर मध्ये कॉईन टाकुन हा गेम खेळायचो. मग घरी व्हिडीओ-गेम कॅसेट वर आणि नंतर संगणकावर.

  प्रिंन्स हा ही अत्यंत आवडता गेम. कित्तीवेळा खेळलो असेन. त्याला हॅक पण होता. पासवर्ड देउन खेळलो की कुठल्याही लेव्हलला जाता यायचे. कित्तीही लाईफ़ मिळायचे.
  काही दिवसांपुर्वीच नविन प्रिंन्स 3D मिळाला, पण तो काही जमला नाही खेळायला. फारच कठीण दिसत होता. ऍनीमेशन आणि साऊंड इफेक्ट्स मात्र ए१

  • प्रिन्स ऑफ पर्शिया मला फारसा आवडत नव्हता. खरं तर त्या काळी जेंव्हा फक्त टेट्रिज होतं तेंव्हा मारिओ चं ग्राफिक अगदी खुपंच ग्रेट वाटायचं.कॉंट्राच्या मी सगळ्या स्टेजेस पार केल्या होत्या, तसेच, मारिओ च्या पण. मस्त दिवस होते ते..

 2. Rohan says:

  अरे दादा सही विषय … अरे लहान असताना ते ६४-in-1 ची कसेट मिळायची. एक-सो-एक भन्नाट गेम्स त्यात. कांट्रा, मारियो, आइस क्लैम्बर, बोम्बरमान असे आणि कितीतरी गेम्स खेळत आम्ही रात्र जागवायचो आणि बेट्स लागायच्या स्टेज जिंकायच्या. ‘मारियो’चा तर मी बादशाह होतो. स्टेज १-२ मधून थेट ४-१ आणि स्टेज ४-२ मधून थेट ८-१ हा हा … मला अजून शोर्टकट लक्ष्यात आहेत … जुने दिवस आठवून दिल्याबद्दल खुपखुप आभार … !!!

  • अनिकेत says:

   त्या ६४ इन १ मध्ये अजुन एक गेम होती.. नाव नाही आठवत. कार रेस ची. पेट्रोल संपत जाते मग पांढऱ्या कार ला धडक दिली की पेट्रोल मिळते. मध्येच गाडी घसरुन फुटते. मध्येच एक सुपरमॅन जातो.. फिनीश लाईन जवळ आली की..!!

   • हो.. मला पण आठवतं..
    तुम्ही क्लॉ खेळला आहात कां? मस्त गेम आहे तो .अजुनही कुठे सिडी मिळेल तर बघा.
    त्या नंतर फ्लॅश गेम्स आले, पण ह्या जुन्या डॉस गेम्सची त्यात मजा नाही.

   • rohan says:

    अरे तो गेम म्हणजे ‘रोड फायटर’ … माझ्याकडे अजून कसेट आहे ती … 🙂

 3. Nitin says:

  thnx for sharing the link

 4. Rohit Darane says:

  तुमच्या साठी मरिओचे सर्व नविन एपिसोड

  1.SuperMario War
  2.MarioForever Galaxy
  3.Castle BUster
  4.SuperMario Maniac
  5.Sonic Armaggedon
  6.Mario Online
  7.Super Sonic Mario
  8.Mario with Shotgun

  येथून डाउनलोड करून घ्या

  http://hard2hard.blogspot.com/2009/06/super-mario-collections.html

 5. Rohan says:

  कार रेस ची. पेट्रोल संपत जाते मग पांढऱ्या कार ला धडक दिली की पेट्रोल मिळते. मध्येच गाडी घसरुन फुटते. मध्येच एक सुपरमॅन जातो.. फिनीश लाईन जवळ आली की..!!

  तो गेम बहुदा ‘रोड रेसर’ मी त्यात तितका माहीर नव्हतो पण माझा एक मित्र जबरी पार करायचा एक-एक स्टेजेस …

  प्रिन्स ऑफ पर्शिया सुद्धा एक भन्नाट गेम आहे. डोक्यालिटी वाला … 😀

  • रोड रेसरच आहे तो गेम. सिडी वरुन खेळावा लागायचा. मी बराच खेळलोय. मी हार्ड कोअर गेमर होतो एके काळी>.. 🙂

 6. Amol says:

  WOW, Kay mast topic aahe, Mala dos based madhye DAVE aavadaycha, to pan same mario sarkha hota, aani Wolfstein 3d pan awesome hota, pan sarkha khelun khelun chakkar yayachi. I am hard core gamer too I just bought PSP.

  Any ways I dont know about claw,I will search for it, BTW COMMANDOS is also same addictive capability, Lai doke lavayala lagte. Mazya kade aahe lappy madhye. havay ka ? 112 MB only.

  • अमोल
   नेकी और पुछ पुछ?? हवे का म्हणजे काय? नक्कीच.. मला अजुनही गेम्स खेळायला आवड्तं. अगदी फेस बुकावरचे गेम्स पण मी खेळतो.. 🙂 माफिया वॉर सारखे.. :)वर रोहनने मारिओ च्या गेम्सची लिंक टाकली आहे. ९० एम बी आहेत मस्त गेम्स आहेत सगळे.

Leave a Reply to rohan Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s