ट्विटर

गेल्या काही दिवसांपासुन ट्विटर जरा जास्तच न्यूज मधे आहे. मग फेस बुक जास्त पॉप्युलर की ट्विटर -हा वाद चांगलाच रंगलाय. twitफेस बुक आणि ट्विटरवर तुम्हाला बऱ्याच सेलेब्रिटीज सापडतील. भारतीय सेलिब्रेटीज ंमधल्या शुभा मुदगल यांना मी फॉलो करतोय, पण त्यांचं एकही ट्विट अपडेट नसतं. मला वाटतं की एकदा अकाउंट ओपन केल्यावर स्टेटस अपडेट केलेलं नाही त्यांनी.भारतीय सिलेब्रिटीज मधे ट्विटींग इतकं पॉप्युलर नाही अजुन.. ट्विटींग ही पण एक सवय आहे.

ऑपरा कोणाला फॉलो करते तर ही बघा नांवं.. क्विन रैना अबदुल्ला ( कुठल्या देशाची राणी ही असं म्हणताय — अहो जॉर्डनची लिटरसी करता बरंच काम करते ही राणी.. आय लव्ह हर गट्स.. ), लॅरी किंग,डेमी मुर, जेनी मॅक कर्थी ( बरोबर लिहिलं असावं) आणि अशा अनेक सिलेब्रिटीज..

ऑन द कॉंटररी मी ऑपरा विनफ्रे आणि लॅरि किंग ला पण फॉलो करतो, त्या दोघांचेही अपडेट्स अगदी रेग्युलर असतात. आता ऑपराला १३ लाख लोकं फॉलो करतात 🙂 आणि ती फॉलो करते   १४ लोकांना..!मी ऑपरा चा फॅन आहे. डोना ह्यु पेक्षा ऑपराचा शो कधिही चांगला असतो. तसेच लॅरी किंग शो पण चांगला असतो ,पोलिटिकल व्ह्युज साठी.  🙂 सेलेब्रेटीज च्या नावाने सुरु केलेल बरेच फेक अकाउंट्स पण इथे आहेत !

ट्विटींग ची खरंच कांही गरज आहे कां? ट्विटर वर गेल्यावर असं लक्षात येतं की काही लोकं टिवटर चा खूप छान वापर करतात तर कांही लोकं आपला ब्लॉग, प्रॉडक्ट, कंपनी प्रमोट करण्यासाठी ट्विटर वापरतात. कांही लोकांनी तर कांही साइटसे फिड्स आपोआप ट्वीट केले जाण्याची पण सोय केलेली आहे. टिव्टरमधे तुम्ही एखादी लिंक पोस्ट केली तर ती सरळ टायनी यु आर एल मधे कन्व्हर्ट करण्याची सोय ट्विटर टुल बारने करुन दिलेली आहे, की ज्या मुळे एखादं पेज शेअर करणं सोपं जातं. ट्विटरमुळे बऱ्याचशा न्यूज ज्या नॉर्मली आपण इग्नोअर करतो त्या तर नक्कीच वाचल्या जातात. मी स्वतः, जर त्या ट्विट लिंक सोबत ती लिंक कशाबद्दल आहे हे दिलेलं नसेल तर कधीच क्लिक करित नाही.

एक बातमी होती, ट्विटरला गुगल टेक ओव्हर करणार म्हणून. ट्विटर चा वापर गुगल तर कधिपासुनच करतंय गुगलचा पण अकाउंट आहे ट्विटरवर.. म्हणजे काय, तर आपल्या युजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटरचा वापर करण्याचा मोह गुगलला पण टाळता आला नाही. मायक्रो ब्लॉगिंग हे टुल तसं फारसं पॉप्युलर झालेलं नाही आपल्या इथे .

ट्विटरला मायक्रो ब्लॉगिंग पेक्षा सोशल साइट हे नांव जास्त संयुक्तिक ठरतं. एक सर्व्हे वाचला होता, की आपण फार जास्त एकलकोंडे झालेलो आहोत. कोणाशी रिअल लाइफ मधे बोलण्यापेक्षा व्हर्चुअल रिलेशन्स, चॅटींग करणं आपण जास्त प्रिफर करतो, बायकोने सांगितले, की समोरच्या वाण्याकडून काहीतरी आणा, किंवा भाजीवाल्याकडून कोथिंबीर घेउन या.. आणि नेमकं त्या वेळी जर तुम्ही चॅट करित असाल, तर तुम्हाला… हॅट बॉ.. काय हे……!.. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला सायकीक डिसऑर्डर होण्याची शक्यता आहे असं एक्स्पर्ट सायकिऍट्रिस्ट सांगतात. तेंवा , अशा परिस्थिती मधे तुम्ही नेट पासून काही दिवस दुर रहाणेच बरे.

दोन दिवसांपुर्वी एक सर्व्हे करण्यात आला होता, त्या सर्व्हे मधे असं लक्षात आलं की ९० टक्के ट्विट्स हे केवळ १० टक्के युजर्स करतात . बाकी सगळे सायलेंट असतात.ट्विटर हवं की नाही?? यावर माझं उत्तर आहे हो.. अवश्य असावा ट्विटर अकाउंट की जिथे सिएनएन, आणि इतर न्युज चॅनल्स चा फिड घेउन ठेवावा, म्हणजे महत्वाचे अपडेट मिळत रहातात.तसेच तुमचे मित्र असतिल तर त्यांच्याशी संपर्क ठेवणे पण सोपं जातं.

मी पण आता सुटिच्या दिवशी दिवसभर नेटवर वेळ न घालवता, घरामधली कामं करायची, वाचन करायचं असं ठरवलंय. हल्ली मला कम्प्युटर स्क्रिन्वर पेपर वाचायला जास्त आवडायला लागलाय- खरोखरच्या पेपर पेक्षा ( मला वाटतं ही पण एक डिसऑर्डर असावी!! हे बरं की वाईट माहिती नाही, पण मी आता जास्त वेळ ऑन लाइन रहाणं बंद करणार हे अगदी निश्चित!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

9 Responses to ट्विटर

 1. ajayshripad says:

  छान, मस्त लिहलय सर….! खरच कधि-कधी ऑनलाइन नसलं की चुकल्यासरखं होतं…! हा सुद्धा मानसिक आजार असावा का,,?

 2. Mugdhaaa says:

  your wife will thank you for your decision of not being busy with computer on holidays….!! 😉 i bet on that…

 3. महेंन्द्रजी,
  नेहमीप्रमाणे हाही लेख मस्तच झालाय !
  १. हां, ट्विटर मध्ये तुम्ही तुमच्या बलौगचे अपडेटही जोडू शकता त्या साठी http://twitterfeed.com/ ही सर्विस आहे.
  २. तुम्ही जर रेग्युलतर अपडेटर असाल तर तुम्हाला चांगले फौलोअर्स ही भेटतात.. ब-याचदा, स्पॅमर्सही! मग अशांना मात्र ब्लौक करावे लागते, त्यासाठी तुम्हाला तुमच्या फौलोवर्सवरती नजर ठेवणे महत्त्वाचे!

  बाकी ” तुम्हाला सायकिक डिसऑर्डर होण्याची शक्यता आहे !” हे खरं आहे.. ब-याच लोकांना मी ट्विटरशिवाय पॅनिक होताना पहिलंय.. कंम्प्युटर नाहीतर अशांना मोबाईलवरुन ट्वीट्स पाठवताना बघितलंय!

  मात्र हे फॅड फक्त ट्वीटर पुरतंच नाही… त्यामध्ये और्कुट अन् आता फेसबुक ही आहेच!

 4. भुंगा
  प्रतिक्रियेकरता आभार.

 5. आल्हाद alias Alhad says:

  @ महेन्द्र कुलकर्णी
  जेनी मॅक कर्थी असं लिहून वाचकांची जीभ दोन दोन क मधे अडवण्यापेक्षा जेनी मॅकार्थी लिहीलं असतंत तरी चाल्लं असतं की हो! (तसंही त्या बयेला मराठी येतंय कुठे?)

  बाकी ही पोस्ट वाचून मला मी ट्विटर वर नसल्याचा अभिमानच वाटला!

  आल्हाद

  • अल्हाद

   हो.. मॅकर्थी पण चाललं असतं.. 🙂
   प्रतिक्रियेकरता आभार. पण एक सांगतो, सि एन एन आणि टाइम मॅगझिनचा फिड घ्यायचा ट्विटरवर.. बरेच चांगले टॉपिक्स वाचायला मिळतात. इतकंही काही वाईट नाही ट्विटर..

 6. सुशान says:

  महेंद्र जी,

  सर्फिंग करताना हा ब्लॉग सापडला. लई खास लिवताय राव. झकास वाटल. आता अधून मधून आपली इकड पण चक्कर होनार (u r bookmarked, man!). आनी ट्यूटरवर मी बी हाय पर तुमास्‍नी लय काय काय माहिताय, आमाल तिकत नाय; तुमच्यामुळ आनखी लई काय काय समजल बगा.

  चांगला मराठी ब्लॉग चालवल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s