सिगारेट्सच्या जाहिराती.. १९१० ते १९५०

एखादा सिनेमाचा हिरॊ सिगारेटची जाहिरात करतो, ते पुर्वी आपल्या कडे सर्वमान्य होतं. तसेच दारुच्या जाहिराती पण सिनेमाचे हिरो, अशोक कुमार, धर्मेंद्र करायचे.  एक तद्दन फालतू व्हिस्की होती त्याची जाहिरात करायचे . सिगारेट्स च्या जाहिराती पण राज बब्बर च्या पाहिल्याचे आठवतात.. रेड ऍंड व्हाईटच्या..!

कांही जुन्या जाहिराती पाहिल्या, अर्थात त्या सगळ्या अमेरिकेतल्या आहेत – काळ आहे १९२० ते १९४० चा. काही जाहिरातीत दाखवलं आहे की डॉक्टर्स पण सिगरेट रेकमंड करताहेत.. खोटं वाटतं?? इथे बघा..

drcamel

dr

dentist

जाहिरातीमधे डॉक्टर्स चा वापर — तुमचा डॉक्टर सांगतोय, की तुम्ही ही सिगारेट ओढा -मला तर  कल्पनाही करवत नाही.  सिगारेट्स मुळे दातांचे नुकसान होते, ते फिल्टर मुळे कमी प्रमाणात होते, म्हणून डेंटीस्ट दाखवलाय जाहिरातीमधे रेकमंड करतांना एक पर्टीक्युलर ब्रॅंड. अशा प्रकारच्या जाहिराती अगदी कॉमन होत्या. ह्या जाहिराती आज बघतांना वाट्त की त्या काळात सिगारेट्स्चे दुष्परिणाम माहिती नव्हते कां?? की केवळ इंडस्ट्रीसाठी अशा जाहिरातींना परवानगी देण्यात येत होती?

मार्लबोरो ने एक सुंदर गोंडस बाळ वापरलं होतं त्यांच्या जाहिरातींसाठी. ही जाहिरात बघा, तेच बाळ म्हणतंय आईला , की तूआता आपली मार्लबोरो पेटव मला रागावण्या आधी… किती विअर्ड वाटतंय ना?? पण मार्लबोरो सिगारेट ही एक लेडीज सिगारेट म्हणून प्रमोट करण्याचा हा एक प्रयत्न होता. दुसऱ्या एका फोटॊ मधे तेच बाळ आपल्या बाबांना म्हणतंय .. काय ते पहा इथे..

marlboro-for-mommieskid

१९२० ते ३० च्या सुमारास स्त्रियांनी स्मोकींग करणं हे जस्ट ग्लोरिफाय होत होतं. स्त्री म्हंटलं की तिला स्वतःला आपण सुंदर दिसणं अर्थात  वजन ताब्यात ठेवणं   ह्या गोष्टींच्या मधे फार पूर्वीपासून इंटरेस्ट होता. इंग्लंड मधे तर अगदी घट्ट ड्रेसेस घालणं हे सौंदर्याचे लक्षण समजले जायचं.विषयांतर होतंय.. पण स्त्रीच्या ह्याच विकपॉईंटचा फायदा मार्केटिंग करता जाहिरातदारांकडून घेतलेला या जाहिरातीमधे दिसतो.तसेच, या जाहिरातींच्या वरून स्त्रियांनी सिगरेट ओढण्याला सामाजिक प्रतिष्ठा पण मिळालेली दिसते.या जाहिरातीतली  स्त्री म्हणते की स्विट्स पेक्षा सिगरेट चालेल.. !

या व्यतिरिक्त स्त्रियांनी सिगरेट ओढणं हे फॅशनेबल समजलं जायचं- किंबहुना तसं समजलं जावं म्हणून ही जाहिरात केली गेली असावी.

cigarette dieting

pinkcigs

या दोन जाहिराती बघा.. यावर काही लिहीण्याची गरज नाही..

blowinherface-706711

आता या शेवटच्या दोन जाहिराती. मला वाट्त की हळू हळू हेल्थ अवेअरनेस सुरु झाला होता, आणि मग नंतर मात्र “हेल्दी सिगरेट्स “विकणं सुरु झालं.(????????) या सिगरेट्चा मॅन्युफॅक्चरर म्हणतोय की ह्याच्या सिगरेट्स हेल्थ साठी चांगल्या आहेत. (?????)

simply un believable

सगळ्यात शेवटी एक महत्वाची जाहिरात.. रेनॉल्ड रिगन आहे ह्या जाहिरातीमधे.. बघा तर खरं.. मला वाटतं जेव्हा रिगन टिव्ही , रेडीओ वर काम करायचा तेंव्हाची जाहिरात असावी ही.. बराच तरुण दिसतोय रिगन या जाहिरातीमधे.

chesterfield2520reagonnf1

मार्लबोरो ही लेडीज सिगरेट म्हणून प्रमोट करण्याचा प्रयत्न तर संपूर्णपणे फेल झाला, म्हणून मग कंपनीने आपली स्ट्रॅटेजी बदलुन मॅनलीनेस आणि सिगरेट्स यांचं कॉंबो म्हणुन काउ बॉय ऍड कॅंपेन सुरु केले. त्याचा मात्र कंपनीला खूप फायदा झाला आणि हा ब्रॅंड एकदम टॉप लेव्हल ला पोहोचला.अजूनही काउबॉय ऍड्स सुरु असतात या कंपनीच्या.

cowboy

ह्या जाहिरातींना शह म्हणून ऍंटी स्मोकिग ग्रुप पण बराच ऍक्टीव्ह होता आणि त्यांनी पण काही जाहिराती प्रसिद्ध केल्या त्यातलीच मला आवडलेली ही जाहिरात..malboro

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

8 Responses to सिगारेट्सच्या जाहिराती.. १९१० ते १९५०

 1. nimisha says:

  महेन्द्र,
  तु खरचं ग्रेट आहेस हं ! कुठून ह्या सगळ्या जाहीराती मिळवल्यास रे?
  छान लिहीलायस लेख!
  तु खरंच मला नॉस्टॅलजीक़ बनवतोयस …..

  • निमिषा
   जाहिराती गुगल काकांनी दिल्यात… शोधा म्हणजे सापडेल. मला फक्त एक जाहिरात इ मेल मधे आली होती, इतर मी शोधल्या नेट वर.. धन्यवाद..

 2. mugdhamani says:

  🙂 “before you scold me mom , may be you would light up marlboro” he tar bhannatach…masta aahe….

 3. sahajach says:

  Vegala vishay….mast aahe post….
  mala ya vishayat aadhich gati kami…..pan maja aali ya jahirati baghayala……

 4. मुग्धा, तन्वी
  प्रतिक्रियेकरता आभार,

 5. Bhagyashri says:

  गंमतच आहे, डॊक्टरसनीच…. फोटोज पाहून मजा आली. हटके…. 🙂

 6. Pingback: जाहिराती « काय वाटेल ते……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s