इंजिनिअरिंग नंतर काय?

हा प्रश्न मला कधीच पडला नाही. कारण वेळच मिळाला नाही विचार करायला. पण आज जेंव्हा मला लोकांचे फोन यायला लागले, की माझ्या मुलाने मेकॅनिकल मधे बिई केलंय. तो आय टी कंपनीत सिलेक्ट झाला होता,पण आता ती कंपनीने कळवले आहे की आता तुमची गरज नाही. अशा परिस्थिती मधे मग मात्र थोडं कठीणच होतं नाही म्हणून सांगणं.

लोकांना हे कळत नाही की प्रत्येक कंपनीत एक एच आर डिपार्टमेंट असतं. आणि मी फार तर अप्लिकेशन एच आर कडे फॉर्वर्ड करु शकतो. त्या पलीकडे काहीच नाही. आणि मग त्या मुलाला एच आर ने कॉल पाठवला नाही की ही मंडळी नाराज होतात माझ्यावर! खूप जुने संबंध बिघडले आहेत माझे..!!!!!

बी ई झाल्यवर एखाद्या आयटी कंपनी मधे नोकरी.. हीच जीवनाची इती कर्तव्यता का? इतरही ऑप्शन्स आहेत ना. मेकॅनिकल मधे बिई केल्यावर कोअर कॉम्पिटन्सी मधे काम मिळवण्याचा प्रयत्न  न करता ,आणि जेंव्हा आय टी कंपनी मधे  काम मिळत नाही हे लक्षात आलं म्हणून इंजिनिअरिंग कंपनीत ऍज अ सेकंड चॉइस  ट्राय करताय…… पण आता पर्यंत इंजिनिअरिंग कंपनीतले पण कॅंपस आटोपले आहेत,तुम्ही जर आधीपासून इंजिनिअरिंग कंपनीत ट्राय केलं असतं तर आतापर्यंत कॅंपस मधे सिलेक्शन झालं असतं. तेंव्हा नुसत्या ओळखीच्या जोरावर घेतले जाणे शक्य होणार नाही हेच कळत नाही मुलांना..असो..खूप वाईटपणा घ्यावा लागलाय या प्रकारच्या रिक्वेस्ट पुर्ण न करू शकल्या मुळे.. असो…

सहज जरा चेक केलं, की जर इंजिनिअरिंग नंतर नोकरी मिळत नसेल तर काय करावं?? पुढे काय ऑप्शन्स आहेत?? हे चेक केलं तर खालील माहिती मिळाली..
एम टेक.. किंवा एम ई.
ह्या साठी गेट एक्झाम द्यावी लागते.

एम बी ए करण्यासाठी सिएटी, एम ए टी, जे एम ई टी, एमएच सिईटी च्या परिक्षा द्याव्या लागतात.

परदेशी शिक्षणासाठी जायचं असेल तर.. जिआरई, जीमॅट, टॉफेल ,आयएलटीईएस, किंवा टिएसई  ह्या परिक्षा आहेत.

भारतामधल्या इतर अपॉर्चुनिटीज
कॉमन एंट्रंस फ़ॉर डिझाइन, एन आय डी एंट्रंस टेस्ट , फाउंड्री ऍंड फोर्ज टेक्नॉलॉजी, कोर्सेस फॉर एलेक्ट्रॉनिक्स डिझाइन ऍंड टेक , बंगलोर.. अशा अनेक अपॉर्चुनिटिज आहेत.

जर नोकरीच करायची असेल तर, डिफेन्स मधे , नेव्ही, एअर्फोर्स मधे , पण नोकरी साठी अप्लाय करु शकता. तुम्हाला एकदम ऑफिसर ग्रेड मधे (सेकंड लेफ्टनंट ) म्हणून नोकरी मिळू शकते.

पब्लिक सर्व्हिस कंपन्यांच्या  पण वेब  साईट्स ला भेट देऊन तिथे पण प्रयत्न करायलाच पाहिजे.  या मधे सेल, आयोसिएल, एन्टीपीसी, ओएनजीसी, बिपीसीएल, बिईएमएल , बिईएल, बिएसएनएल, डीआर्डीओ , एच ए, नाल्को , किंव शिपयार्ड्स.. जसे जिआरेसई , गोवा शिपयार्ड मधे प्रयत्न करायला हरकत नाही.

काही लोकांना जर टिचिंग मधे करियर करायचं असेल तर पोस्ट ग्रॅजुएशन करुन मग नेट सेट पास करणं  आवश्यक असतं.

सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक इंजिनीअरने इंडीयन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ची परीक्षा ही दिलीच पाहिजे. सोबतच महाराष्ट्र स्टेट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा पण एक ऑप्शन आहे.त्या कंपनी  मधे अर्ज करा.

जर तुम्हाला ऍकेडमिक करियर करायचं असेल तर , सिएसायआर, इस्रो, बिएआर्सी, डिआर्डीओ हे पण ऑप्शन्स आहेत.

सगळ्यात शेवटी.. अगदी प्रथितयश कंपन्यांच्या वेब साईटस वर ’करियर विद अस’ असा ऑप्शन असतो. तिथे जाउन आपला बायोडाटा सबमिट केल्यास पण तो कंपनीच्या एच आर च्या डाटा बॅंक मधे रहातो आणि मग जेंव्हा कधी कंपनीला गरज पडते तेंव्हा तुम्हाला बोलावले जाऊ शकते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

10 Responses to इंजिनिअरिंग नंतर काय?

 1. datta shelar says:

  good topic for new comer

 2. Prasad says:

  Very useful information. Thanks

 3. आरती says:

  Very True..We also get bogged down by such new comers who seek some advice (or recommendation – in short) for job….What to do…Relatives, friends from Vidarbha keep on sending their kids to me for guidance cum job, They don’t understand that it is very difficult here….

 4. Gurunath says:

  इंजिनीयरींग ऑप्शनल विषय घेऊन यु.पी.एस.सी पण देता येईल….. भारी पोस्ट्स असतात…..

  • बरोबर. पण युपीएससी पेक्षा आय ई एस काय वाईट आहे?? ते पण चांगलं आहे. सरळ क्लास १ ची पोस्ट मिळते.

 5. PRATIK PAWAR says:

  MALA KOP BITI VATHY LHGLA AHG KOTLI SIYT GIVH

 6. Abhijit says:

  Thanks a lot sir for ur valuable information.
  I am recently competed my BE in the stream of computer science.
  But Im really confuse about my carrier after completion of my BE…
  Now Getting way what to do….
  Thanks once again sirji…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s