पुस्तकं -टर्मिनेटेड ??

aटर्मिनेटर ने पाठ्य पुस्तके टर्मिनेट केली आहेत असं म्हणतात..म्हणजे या पुढे शाळांमधे मुलांना पुस्तकं न्यायची गरज पडणार नाही कॅलिफोर्नियात. कॅलीफोर्निया चे विद्यमान गव्हर्नर  अर्नॉल्ड ची आयडीया आहे ही पैसे वाचवायची..

अर्नॉल्ड श्वार्जनगर! कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.  त्याच्या कडे पाहिलं की मला खूप बरं वाटतं. एक प्लिझंट व्यक्तिमत्त्व आहे त्याचं . मला वाटतं केवळ व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा गव्हर्नर म्हणून निवडून आला असावा.  जसा आपल्या कडे गोविंदा सारखा टुकार नट पण निवडुन येऊ शकतो तसंच असावं हे पण ….

त्याचे सगळेच चित्रपट पाहिलेले आहेत पण मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट म्हणजे किंडर गार्डन कॉप.. खूपच सुंदर काम केलंय त्याने त्या चित्रपटात. श्वार्जनेगर चा टिपिकल चित्रपट नाही तो..म्हणजे नुसत्या मारामाऱ्या आणि खून नाही  त्या चित्रपटात.

असो.. काल एक बातमी वाचली. अर्नॉल्ड ने कॅलिफोर्नियामधे पाठ्य पुस्तकांची गरज नसल्याचे जाहीर करुन मुलांनी आता काळाच्या बरोबर राहुन नेटवर पाठ्यपुस्तके वापरावी  असा फतवा काढला आहे. या मागचे कारण म्हणजे – आजकाल मुलं  इंटर्नेट्च्या जवळ पोहोचलेली आहेत हे फेस बुक , ट्विटर आणि इतर गोष्टींवरुन लक्षात येते.त्यामुळे मुलांना इंटर्नेटवर पुस्तकं वाचणे जास्त सोपे जाईल . मुलं सगळ्यात जास्त ऑन लाइन टेकनिक वापरतात, त्यामुळे ऑन लाइन बुक्स हे  नक्कीच पॉप्युलर होतील.

दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकांमधे ऑन लाइन असल्यामुळे चेंजेस करणं सोपं होईल. अर्थात कॅलिफोर्नियात ही नेते काही आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत . हे जे कांही केलं जातंय ते केवळ ३.५ करोड डॉलर्सचा पुस्तकं छापायचा खर्च वाचवायचा एक उपाय म्हणून श्वार्जनेगरने हा निर्णय घेतला आहे.

पुस्तकं या पुढे मूर्त स्वरुपात नसणार म्हणजे पलंगावर लोळत वाचत पडायचं सुख यापुढे मुलांना मिळणार नाही. अभ्यास करायचा म्हंटलं, की पिसी वर पुस्तकं वाचायचं, आता कंटिन्युअस वाचनामुळे डॊळ्यांचे जे काही नुकसान होईल त्याकडे मात्र सोईस्करपणे कानाडोळा केलेला आहे.मुलांचे होणारे आरोग्याचे नूकसान ह्या काही करोड डॉलर्सच्या बचतीच्या पूढे  खूपच जास्त आहे असे मला वाटते.

शाळा सुरु झाली  की नवीन पुस्तकं.. त्यांचा तो नवीन वांस.. आणि मग कव्हर्स घालण्यासाठी होणारी  तारांबळ, त्यावर नांव टाकण्यासाठी  म्हणून लेबल्स चिकटवणे , आणि…. ते आवडीच्या कार्टून्सचे लेबल मिळवण्यासाठी बाबांना १० दुकानांत फिरवलेले..अगदी त्यांनी चिडे पर्यंत.. !माझ्या धाकट्या मुलीनी एकदा मला दोन तास वेगवेगळ्या दुकानात फिरवलं होतं बार्बिचं नेम लेबल मिळवण्याकरता!  हे सगळं आता मुलं मिस करणार तर कॅलिफोर्नियामधे!!!

एकंदरीत काय.. तर कुठेही जा.. राजकारणी सगळे सारखेच!!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , , . Bookmark the permalink.

9 Responses to पुस्तकं -टर्मिनेटेड ??

 1. Methos says:

  पुस्तकं या पुढे मुर्त स्वरुपात नसणार म्हणजे पलंगावर लोळंत वाचत पडायचं सुख यापुढे मुलांना मिळणार नाही. अभ्यास करायचा म्हंटलं, की पिसी वर पुस्तकं वाचायचं, आता कंटिन्युअस वाचनामुळे डॊळ्यांचे जे काही नुकसान होईल त्याकडे मात्र सोइस्करपणे कानाडॊळा केलेला आहे.मुलांचे होणारे आरोग्याचे नुकसात ह्या काही करोड डॉलर्सच्या सेव्हिंगच्या पूढे खुपच जास्त आहे असे मला वाट

  पूर्णत: बरोबर नाही. Amazon kindle मुळे ओझे पण वाचते, डोळे पण चांगले राहतात.

 2. Vijay says:

  uttam…….. avadale mala. pan objection barobar nahi. pustake terminate kelyane ebooks adhik akarshit kelya jau shakataat. utaam teachers che classes online hovu shakataat… ani barech kahi… be positive.

  Dole games khelun kharab honyapeksha abhyas karun hone kahi vait nahit

 3. Nilesh says:

  Tumchi blog mi follow karato. Faar chaan lihita. Sahajpana awadun jato. Keep it up. Good job.

  Nilesh Joglekar

 4. अनिकेत says:

  हो, बाकीचे ई-बुक रिडर्स पण आहेतच की, किंडल सध्या तरी फारच महाग आहे. बाकी हा निर्णय कित्ती दिवस टिकतो ते बघुच कारण अर्नॉल्डने त्याची कॅलेफॉर्नीयातील मुदत संपत असल्याने त्याच्या जन्म देशातुन- ऑस्ट्रियातुन अध्यक्षपदाची निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

 5. मेथोस, विजय, अनिकेत निलेश
  प्रतिक्रियेकरता आभार.

 6. ajayshripad says:

  दादा नेहमी प्रमाणेच अप्रतिम….!

 7. archana says:

  anoldcha ha nirnay jara chukicha asala taree to khup changala environmentalist aahe.americansnee aapalee lifestyle badalalee paheeje he thankaun sanganaara paheela maerican neta.global warming baddal americans jara ignorant aahet, tyana jaage karayache prayatna hyane khup pramanikpane kelay.

  • अर्थात, या निर्णयाला काही पॉझिटिव्ह शेड्स पण आहेतच. जसे पुस्तकांचे वजन कमी होणार.. हे सगळ्यात जास्त महत्वाचे. मला वाटत नाही की आपण इथे भारतामधे जितकं मोठं दप्तर शाळेत नेतो, तितकं मोठं अजुन कुठल्या देशात न्यावं लागत असेल म्हणुन..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s