जाहिराती

एका मित्राचा फोन आला होता. म्हणे तुझा ब्लॉग वाचला – ते सिगरेटच्या जाहिरातीचं पोस्ट.. म्हणाला की जेंव्हा एखाद्याची कॉपी करतोस तेंव्हा कमीत कमी नांव तरी देत जा.. मला प्रथम काहीच लक्षात आलं नाही.. म्हणाला, अगदी याच विषयावर टाइम मॅगझिन मधे (यु एस एडीशन ) ला एक लेख आलाय.अगदी तू दिलेल्या जाहिराती यात आहेत सगळ्या. म्हणजे तू नक्कीच इथून ढापला असेल..  विघ्नसंतोषी लोकं असे असतात, मी लेख ढापलेला आहे हे प्रूव्ह करण्यात त्याला कसला आनंद होत होता  🙂 जर मित्रच असे असले तर शत्रूची गरजच काय ??

उत्सुक ते पोटी टाइमचा अंक आणि ती लिंक  ( जी मित्राने मोठ्या उत्साहाने पाठवली होती मेल ने )  उघडली. तर जाहिराती त्याच , पण लेखाचं कंटेंट पुर्ण वेगळं होतं. त्यांचा लेख माझ्या पेक्षा खूपच सरस होता. दुसरी गोष्ट म्हणजे माझा लेख आहे तो १२ तारखेचा आणि टाइम मधला १५ तारखेचा… ताबडतोब मित्राला फोन केला, सांगायला , की माझा लेख ओरिजिनल आहे म्हणून..

कसल्या फालतू गोष्टींना आपण महत्व देतो ना? जरी त्यानी मला म्हट्ल की मी कॉपी केली आहे लेखाची , तरीही तसा काहीच फरक पडत नाही. पण ह्युमन टेंडन्सी!!! आणि इगो.. !!!

जाहिरातींचे विश्व गेल्या कित्येक वर्षांपासून ( अनादी कालापासून म्हंटलं तरीही चालेल) अस्तित्वात आहे. तुम्ही गुगल सर्च मधे व्हिंटेज जाहिराती म्हणून सर्च करा, किंवा इथे क्लिक करा.. खूप सुंदर जाहिराती आहे या पेज वर. व्हिंटेज जाहिराती, अमेरिकन तर खूपच आहेत, पण भारतामधे जाहिराती म्हंटलं की , भरत दाभोळकरांचं नांव डोळ्यापुढे येते.  अटर्ली बटर्ली डेलिशस.. अमुल.. असं धेडगुजरी ना धड हिंदी ना धड इंग्रजी असं स्लोगन त्याने काढलं आणि अमुलला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवलं. माझ्या कडे खूप जाहिरातींचा संग्रह आहे अमुलच्या. प्रत्येक वेळेस करंट टॉपिक वरचं होर्डींग हे असतंच अमुलचं. वर्ल्ड कप च्या वेळी क्रिकेटचं, किंवा ऑलंपिक च्या वेळी त्या विषयावर. मुंबईला एक जागा फिक्स आहे त्या होर्डींगची , मी नेहेमी बघत असतो !भरत दाभोळकर ची कार मला बरेचदा पाहिलेली आठवते. कार ऑन स्टेरॉइड .. भले मोठे टायर्स लावलेली टाटा इस्टेट कार होती ती.

नंतर भरतने आपली झेन ऍडव्हर्टायझिंग कंपनी विकून टाकली आणि मग थिएटर मधे काम करणं सुरु केलं. हा माणुस एक फिटनेस फ्रिक आहे. अवाढव्य शरीर, टक्कल केलेलं.. रोज शेव्ह करतो टक्कल हा माणुस.. ह्याचे पहिले नाटक बॉटम्स अप सुपर हिट झालं होतं, नंतर याने तारा रम पम पम, कार्पोरेट आदी चित्रपटात काम केलं.. अर्थात माझं मत असं आहे की जाहिरातींच्या फिल्ड मधलं याचं काम जास्त नावाजण्यासारखं आहे. स्पेशिअली अमुल ऍड्स…

हे जाहिरातींचे विश्व मला नेहेमीच फॅसिनेट करित आलंय.एक क्रिएटीव्हीटी पहायला मिळते या मधे !! कांही  अगदी फालतु ऍडव्हर्टाइझमेंट्स असतात, जसे कॉम्प्लॅन ची जाहिरात. यामधे दाखवलंय की जी मुलं कॉम्प्लॅन घेतात, त्यांची उंची दुप्पट वाढते. म्हणजे जर तुम्ही अगदी लहान पणापासुन कॉम्प्लॅन घ्याल तर तुमची उंची ५ फुट दहा इंचा ऐवजी १० फुट २० इंच होईल कां?? असे मुलभुत प्रश्न माझ्या लहानशा मेंदुला कुरतडत असतात.

तशिच एक जाहिरात.. हमाम साबणाची. या जाहिरातीवर गायत्रीने छान लिहिलंय तिच्या ब्लॉग वर.. अतिशय इरिटेटींग जाहिरात आहे ही पण.  खरी गोष्ट म्हणजे या जाहिरातींचा टार्गेट ऑडीयन्स असतो तो टिन एजर्स, कींवा प्रिटीन्स…आणि त्यांच्या पर्यंत मेसेज नक्कीच पोहोचतो अशा जाहिरातींच्या  माध्यमातुन!!!!

आवडलेल्या जाहिराती तर खूपच आहेत, पण त्यातल्या ह्या काही ऍड्स इथे पोस्ट करतोय.. बघा..पहिली जाहिरात आहे एका एन जी ओ ची.. “सेव्ह ट्री”

ही दुसरी.. आहे सोनी टिव्हीची..

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , . Bookmark the permalink.

3 Responses to जाहिराती

 1. bhagyashree says:

  sony bravia chi atonaat aawdli ! pahili adhich awdli hoti.. pan sony chi class ahe! colors nachtayt agadi ! really colors came alive! 🙂

  and ignore and neglect unwanted comments.. tumcha marathi blog vachun US edition Time magazine tari kasa copy karel lekh? 😀 kahi nahi niwwaL yogayog asava ha !

  • भाग्यश्री
   अमुलच्या जाहिराती पाहिल्यात कां? जर नसतिल तर जरुर सर्च करा गुगल वर. कींवा फेस बुक वर कम्युनिटी आहे .. मस्त आहेत जाहिराती..
   माझा लेख पाहुन कॉपी केलाय असं म्हणत नाही मी. पण त्या मित्राचं म्हणणं होतं की मी कॉपी केलाय म्हणून.. आणि काय तसं नसल्यामुळे इगो हर्ट झाला होता. ( नसता इगो .. म्हणत्तात ना तोच!!) 🙂

   प्रतिक्रियेकरता धन्यवाद..

 2. bhagyashree says:

  amul pahnar nahi asa kasa hoil ? Deccan varun jatana chaukat nehemi navin add disaychi ! athvat nhaiye tevapasun ! 😀

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s