पान मसाला आणि जर्दा पान खाऊन सगळी कडे रंगपंचमी खेळणारे महाभाग पाहिले की कधी कधी खूप राग येतो. त्यातल्या त्यात जर एखादा माणुस कारचे दार उघडून, किंवा काच खाली करुन थुंकताना पाहिलं की तर अजूनच चीड येते. अगदी अंगावर आल्या सारखं वाटतं ! पण आपल्या कडे हे तर अगदी कॉमन आहे. न टाळता येण्यासारखे!!
जगातील सगळ्यात घाण रस्ते हे भारतामध्ये आहेत. प्रत्येक इमारतीच्या जिन्याच्या कोपऱ्यांमध्ये पान मसाल्याचे , किंवा पानाचे लाल डाग दिसतात. अगदी किळसवाणं होतं जिन्याने वर जातांना. असे जिने केवळ मुंबईतच आहेत असे नाही. हेच चित्र भारतामधे कुठेही गेलात तरी दिसून येतं. कांही दिवसांपूर्वी एक आर्टीकल होतं मुंबई मिरर मधे – पान ५ रू.. सफाई ५ करोड रुपये.. !! रेल्वे ५ कोटी रुपये खर्च करते हे डाग साफ करायला. आपल्याला सिव्हिक सेन्स थोडा कमीच आहे असं वाटतंय नां??
जाऊ द्या, फार वाईट वाटून घेऊ नका. बेसबॉल कॅप उलटी घालुन , गम चघळणं आणि वाट्टेल तिथे चिकटवणे हा नॅशनल गेम झालाय. इतरांच्या हायजिनची चिंता न करता वाटेल तसे वागणे .. म्हणजे कुल समजले जाते अमेरिकेत ! च्विंगम मुळे कॉन्संट्रेशन वाढते असे लक्षात आले म्हणून अमेरिकेत सैनिकांना पण गम देण्यात येत होती.
तर काय सांगत होतो, काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी पेपरला वाचलं होतं की मोस्ट अनहायजिनिक साईट म्हणून ज्या साईट्स चा उल्लेख करण्यात आला, त्यामधे गम मुळे खराब ( डिफेस) झालेल्या साईट्सचे प्रमाण खूप आहे.
या च्विंगम ची हिस्ट्री मोठी इंटरेस्टींग आहे. इ.स. १०३८ मधे मार्मलेड प्लम ट्री चा गम हा चिवेबल असतो, हे लक्षात आल्यावर एडवर्ड बीमन ह्याने पहिले च्विंगम तयार केले. पण जेंव्हा लक्षात आलं, की ह्याची टेस्ट काही सरळ अक्सेप्ट केल्या जाऊ शकत नाही , तेंव्हा फ्लेवरिंग एजंट्स वापरुन मार्केटिंग केले होते. जेंव्हा याचा शोध लावला गेला, तेंव्हा हे गम इतकं लोकप्रिय होईल असे त्याच्या निर्मात्याला पण वाटले नसावे.इथे पहिली जाहिरात आहे च्विंगम ची…!! बेमन डॉक्टर असल्यामुळे त्याने हे एक मेडीसिन म्हणून प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता.
असो.. तर मोस्ट अन हायजिनिक साईट्स मधे सगळ्यात जास्त अन हायजिनिक साईट म्हणजे ब्लार्नी स्टॊन.. ह्या स्टॊन ला किस करणे हे एक फॅड आहे. कॉर्क जवळ आयर्लंड मधे ब्लार्नी कॅसल आहे, की जो १४४६ मधे बांधण्यात आला होता.या कॅसलमधे असलल्या दगडाला किस करण्यासाठी ओणवं होऊन किस करावा लागतो. कित्येक लाख लोकं त्या दगडाचे चुंबन घेतात त्यामुळे हा दगड म्हणजे सगळ्यात जास्त अनहायजेनिक साईट म्हणुन फेमस आहे. ह्या दगडाला किस केल्यामूळे गुडलक मिळतं! मे गॉड ब्लेस देम!!
बरं पुन्हा च्विंगम बद्दल.. दुसरी साइट ही आहे वॉशिंगटन डीसी मधिल सिएटल थिएटरची भिंत! ह्या भिंतिवर इ.स. १९९० पासुन बऱ़्याच लोकांनी आपली च्विंगम ह्या भिंतीवर चिकटवली होती. आणि त्यामुळे ही भिंत ही एक टुरिस्ट अट्रॅक्शन झालेली आहे. लोकं थिएटर च्या बाहेर रांगेत थिएटरला व्हिजिट करण्यासाठी उभे रहायचे, तेंव्हा, आपलं च्विंगम या भिंतीवर चिकटवायचे. काही लोकांनी तर आपल्या गम वापरुन डिझाइन्स पण तयार केलेले आहेत या भिंतीवर.बरेचदा ही भिंत स्वच्छ पण करण्यात आलेली आहे, पण पुन्हा लोकं ती भिंत च्विंगम ने झाकून टाकतात.
च्विंगम क्लास रुम मधे टेबल च्या खाली , चिकटवणे हे अगदी कॉमन आहे. तसेच काही ठिकाणी तर संपुर्ण झाड च्विंगमने कव्हर करुन टाकलंय लोकांनी. फोटो पोस्ट करतोय इथे..च्विंगम वर बंदी आणणारं एकमेव राष्ट्र म्हणजे सिंगापुर, जगात इतर कुठल्याही ठिकाणी च्विंगम वर बंदी नाही.
तिसरा नंबर आहे पॅरिस चं ऑस्कर वाइल्ड चं थडगं. मुलींच्या लिपस्टिकचे डाग असल्यामुळे मोस्ट अनहायजिनिक मधे तिसरा क्रमांक आहे ह्या थडग्याचा. मला हे कळत नाही की जरी हे मान्य केलं की ऑस्कर वाइल्ड हा एक मोठा नाटककार, फिलॉसॉफर आणि लेखक होता, तरी पण त्याच्या थडग्याचे चुंबन घेउन काय मिळतं लोकांना??
जाउ द्या.. पण ह्या मोस्ट अनहायजिनिक टुरिस्ट अट्रॅक्शन मधे भारताचे नाव नसलेले पाहुन बरं वाटलं..! 🙂
कसं सुचत रे तूला अश्या हटके टॉपिक वर लिहायला …. मस्त आहे एकदम … बाकी आपल्याकडे तर काय आनंद आहे सगळीकड़े … पण चित्र बदलतय… 🙂
<>
That is just because India is unhygenic but not attractive for tourists
नितिन
तुमचं म्हणणं मला तरी मान्य नाही. भारत कसाही असला तरिही लोकांना खुप अट्रॅक्ट करतो.बनारसला कधी गेलात तर तिथे गंगाकिनारी रहाणारे खुप परदेशी लोकं भेटतिल. आणि टुरिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यु, तर गोवा , आग्रा, आणि रेस्ट ऑफ भारत अट्रॅक्शन आहेच ना . कधिही बघा, मुंबई ते औरंगाबाद फ्लाईट बघा, कायम फुल असते.. 🙂
रोहन,
तशी बाय डीफॉल्ट वाचनाची आवड तर आहेच!पेपर्स वाचत असतो, आणि इतर ही लिंक्स असतातच ट्विटर फिड वरच्या.. 🙂
महेंद्र खरं तर ना, ह्या पान खाऊन जिकडे तिकडे थुकणारे लोकांना फार कडक शिक्षा केली पाहिजे. कित्येक वेळा लोकांच्या अंगावरही पडलेले आहे. मग मारामारी….:(
टुरिस्ट प्लेसेस नांवे लिहून, कचरा टाकून खराब करणे ह्याचा अतिरेक झालाय अगदी. शी… थडग्याचे कसले ….. जाऊ दे. ज्याची त्याची आवड. 😀
हे मात्र बरोबर आहे, भारतात यायचे अट्रॆक्शन परदेशी लोकांना खूप आहे. २००४ मध्ये आमचा एक अमेरिकन मित्र व त्याची मैत्रिण आले होते आमच्याबरोबर. खूप मजा आली त्यांना मायदेश पाहून. पुन्हा यायचेय त्यांना. 🙂
भाग्यश्री
फार दुर कशाला, मुंबईच्या अगदी जवळ एलिफंटा केव्ह्ज म्हणजे तर अगदी गर्दुल्ल्यांचं आणि गर्द ट्रेडर्सचं अगदी मालकी हक्काचं ठिकाण झालंय..
ताजमहालावर एल लेख लिहायचाय. दुसऱ्या ऍंगलनी. रिसेंटली गेलो होतो आग्ऱ्याला . वाईट परिस्थिती आहे ताज ची पण!
far chaan… gelya kahi mahinyat majh GK tumachya blogmule barach wadhlay. khup informative aahe he article. tas tar baryach goshtinbaddal lihawas watat kinva tyala wach fodawishi waatate. taj kaay kinva Ganaga nadi kaay, aapli daiwat aahet ti pan devapeksha dusar hakkach thikan nahi waat laawayla. aapan wadilanna ‘aho-jaho’ karato pan dev mhanje are ture.
महेद्र्साहेब, खुप सेंसिटिव टोपिक निवड्लाय बुवा तुम्ही.य़ा पिचकारी मारण्यावर एखादा कायदाच हवाय.मला स्व:ताला खुप वेळा यापिचकारयाचा उपद्रव झालेला आहे.तसे आम्हि समदु:खी चार पाच मित्र असू. थुंकून वर शिव्याघालणारे ह्या महाभागाचा इतिहास तसा जुनाच आहे[ एकनाथकालिन पहिला लिखित पुरावा सापडतो. अशाच एका पिंच्चकारयाने त्यांना एकविस वेळा स्नान करायला लावले होते,आत त्या काळि उघ्ड्याने रहायचि सोय होती ,पाण्याचा प्रोब्लेंम नव्हता म्हणून ठिक आहे हो.आणी ते संत एकनाथ होते.] आम्हा पामरांचे काय?
यावर एखादे आंदोलनच व्हायला हवे. काहीना ही जरा अतिशयोक्ती वाटेल पण जरा स्व:तावर कोणीतरी थूंकलय आणि वरून शिव्या देतय किंवा हस्सून फक्त सारी म्हट्ल्यावर काय? वाटत …कल्पनाकरा….. मग कळेल.
असो.भोग भोगायचे दुसर काय?…….[आत जरा संत झाल्यागत वाटल बघा.]