अगदी नर्सरी पासून जे ऍडमिशनच्या नावाखाली पालकांना छळण्याच काम हे शिक्षण संस्थांचे मालक सुरु करतात, ते अगदी मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत चालु रहातं. मुलीची अगदी केजी १ ला ऍडमिशन ला घ्यायला गेलो होतो तेंव्हाच आठवतंय. आधी फॉर्म आणला होता भरायला. आता घरी फॉर्म भरणार तेवढ्यात एक मित्र ज्याच्या मुलाची ऍडमिशन अगदी मागच्या वर्षीच झालेली होती केजी १ ला तो एक अनुभवी पालक म्हणून मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक पालक म्हणून काय बोलायचं किंवा काय बोलायचं नाही ते सगळं ….! ही जी गोष्ट लिहितो आहे ती आहे साधारण १४ वर्षांपूर्वीची! पण आजही यात काही फरक पडलेला असेल असे मला तरी वाटत नाही.
ऍडमिशन एका आठवड्यावर आलेली होती. आम्ही हि काय आहे??? अंब्रेला.. अगं म्हण नं.. अंब्रेला किंवा याच धर्तीवर इतर गोष्टींची इंग्रजीनावांची उजळणी सुरु केली होती. रोजच्या वापरात अगदी शुध्द मराठी शब्दच होते. त्याला इंग्रजी ची झाल्लर लागली नव्हती , म्हणजे काय, तर -त्या काळी आमची मुलगी केळं खायची.. बनाना नाही, द्राक्ष खायची .. ग्रेप्स नाही ..आंबा खायची मॅंगो नाही.. अगदी सगळे मराठी शब्दच वापरात होते. घरी साधारण पणे आपण जसं मराठी बोलतो तसंच होतं . आजी आणि आजोबा असल्यामुळे फारच लाडा कोडात गेली होती दोन वर्षं…
मित्र म्हणाला होता, की ए बी सी डी आलं पाहिजेच, कुठल्याही परिस्थितीत! ते बाकी ती पटकन शिकली. मराठी गाणी कविता मात्र खूप यायच्या. अगदी भटो भटॊ कुठे गेला होतात?? कोंकणात… तिथुन काय आणलं.. फचर ( फणस म्हणता येत नव्हतं नां… 🙂 ) अनेक अशाच कविता आणि श्लोक यायचे पण इंग्रजी मात्र अजिबात शिकवलं नव्हतं. सौ. ला पण मुलीनी आई म्हटलेलंच ( ममा पेक्षा) किंवा बाबा ( पपा पेक्षा) जास्त आवडायचं त्यामुळे आम्ही पण आई- बाबाच होतो, आमचे , ममा- पपा झाले नव्हते…
शेवटी तो एकदाचा ऍडमिशनचा दिवस उजाडला. पॅरेंट्सचा पण इंटर्व्ह्यु होता. त्या दृष्टीने आम्ही पण तयारी केली होती. जातांना नवीन लुई फिलिप चा पांढरा शुभ्र शर्ट ( जो नेहेमी मिटिंग्ज्सलाच वापरतो तो ) आणि काळी पॅंट घालुन तयार झालो. टाय पण अडकवला होता.
इतकी मेहनत घेउन तयार झाल्यावर अशी कॉमेंट?? बहुन ना इन्साफी है ये ! जाउ दे! तिला म्हंटलं, की ते बरं होईल गं.. डोनेशन कमी भरावं लागेल आपल्याला! सौ. पण तयार झालेली होती, तिच्याकडे बघून हलकेच डावा डॊळा मोडला, म्हंटलं, आता मोठी शाळेत जायला लागली, तुला दुपारी घरी बोअर होत असेल तर दुसरा चान्स……………………….. !! जाउ द्या !. आमची तिघांची वरात शेवटी एकदाची निघाली शाळेत जायला. तेंव्हा माझ्याकडे कार नव्हती . माझ्या बाइक वर मागे सौ. आणि पुढे मोठी कन्यका! असे आम्ही शाळेत पोहोचलो.
तिथे पोहोचल्यावर मात्र मुलगी थोडी घाबरल्या सारखी झाली. पण लवकरच सावरली. शाळेचं नांव.. सेंट झेविअर्स .. (मी त्याला संत झवेरिलाल म्हगट्लं की मुलगी खूप चिडायची नंतर मोठी झाल्यावर)ईंटर्व्ह्यु ला आत गेलो. तर बेटा व्हॉट इज युवर नेम? म्हटल्यावर ही अगदी गप्प!! म्हंटलं टेल ना बेटा … टेल युवर नेम.. बेटाच्या चेहेऱ्यावर ची रेषही हलायला तयार नव्हती. अगदी ब्लॅंक भाव चेहेऱ्यावर घेउन आमचा बेटा बसला होता..कसं तरी आमच्या बेटाने नांव सांगितलं.. आणि आम्हाला हुश्श! झालं. उगाच टेन्शन आलं होतं , ऍडमिशन मिळते की नाही ते. बरं आम्हाला असं रिलॅक्स झालेलं त्या टिचरला पहावलं नसावं म्हणुन तिने एक चार्ट काढला, त्यावर फळांची चित्र होती. त्यातल्या पेरु वर बोट ठेउन म्हणाली, व्हॉट इज धिस?? अगदी खणखणीत आवाजात उत्तर आलं.. पेरु आहे हा.. माहीतिये मला!!!! आणि असा इंटर्व्ह्यु सफळ संपुर्ण झाला.
प्रिन्सिपॉल मुद्यावर आल्या, किती डोनेशन द्यायचं , वगैरे गोष्टींची मांडवली केली गेली आणि ऍडमिशन पक्की करुन आम्ही घरी आलो.आता १२वी पास झाली ! इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनची धावपळ सुरु आहे, अगदी केजी १ च्या वेळची ऍडमिशन धावपळ आणि आजची इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनची धावपळ यात खूपच साम्य जाणवतंय..
फरक फक्त एकच आहे,लहान असतांना आम्ही तिच्या ऍडमिशनचं ठरवलं, आणि आता इथे ती इंजिनिअरिंग ला न जाता बीएससी करायचं म्हणते आहे. त्यामुळे तिला खुप कन्व्हिन्स करणं सुरु आहे. तशी सिईटी दिलेली होती, त्यामुळे ऑन लाइन फॉर्म तर भरलाय.
नुसता वैताग आहे झालं. ऍज अ स्टॉप गॅप म्हणून मुलीची बीएससी कॉम्प ला ऍडमिशन केली काल पाटकर कॉलेजल. १८ हजार अक्कल खाती जमा… कारण इंजिनिरींगची ऍडमिशन झाली की ही ऍडमिशन कॅन्सल करावी लागेल आणि ऍडमिशन कॅन्सल केली तर किती पैसे परत मिळतील ते सांगत नाहीत कॉलेज वाले.सगळीकडे कसं अगदी बाजारीकरण झालंय.
आज सिईटीच्या फॉर्म चं व्हेरिफिकेशन आणि सबमीशन होतं. फॉर्म तर ऑन लाइन भरायचा होता, पण नंतर मात्र सगळी डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करण्यासाठी पर्सनली जावं लागलं. खूप मोठी रांग होती. अख्खा दिवस गेला रांगेत. एका रांगेत नंबर लावून आधी फॉर्म चेक करुन घेतला. नंतर दुसऱ्या रांगेत लागून सबमिशन!
इथे पण रांगेत जवळपास दोन तास उभा होतो.बरेच कॅरेक्टर्स दिसले, की मुलगा/मुलगी मोठे झाले आहेत हे मान्य न करता, अगदी पब्लिक प्लेस मधे रुमालाने मुलाचे तोंड पुसणे, किंवा, त्याला वॉटरबॅग मधून पाणी देणे इत्यादी प्रकार करित होते. सगळ्या फॉर्म्स च्या झेरॉक्स आणल्या की नाही, आणि इतर गोष्टींवर सारखं टोकणं सुरु होतं मुलांना. छान करमणूक होती.
सौ. ने संपादित केलेल्या एन्सायक्लोपेडीयाच्या ( मराठी चरित्र कोषाच्या) पहिल्या भागाचे उदघाटन पुण्याला आहे उद्या, म्हणून ती बिझी… हुश्श!!! थकलो आता!! अगदी सगळं काही नकोसं झालंय.. वाटतं सरळ सन्यास घेउन टाकावा!!!!
शेवटी एक गोष्ट लक्षात आली.. की बस्स.. काहीच बदललेलं नाही गेल्या १४ वर्षात 🙂
अहो बी. एस्सी.ला जाऊ नये म्हणून पटवतायचा अर्थ त्यात काही स्कोप नाही असही नाही. माझी एक मैत्रीण नंतर एम. एस्सी आणि पी. एच. डी. करुन आता इथे संशोधन करतेय. थोडक्यात शास्त्रज्ञ आहे. सध्या चतुरंगला विज्ञानमय़ी म्हणून एक सदर येतंय ना वाचताय का? Good luck
please stick to engineering.BSc nanter PG karave lagel aani taree engineeringchi grace aani respect naheech tyala.
BE nanter 1000 options asataat careerche, pahije tar diversifypan karataa yete grduate zalyaver, pan BSc la kunee vicharat naahe farase.BSc is almost outdated course.
अपर्णा, अर्चना
प्रतिक्रिये करता आभार . तसंही तिला सध्या तरी लेक्चरर व्हायचंय. म्हणजे पीजी करणं आलंच. सोबतंच युपीएससी, आय ई एस ची पण परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी केली तर चांगलं करियर करता येइल .
माझी लहान बहीण तिने पण बीई करुन नंतर मग एम बी ए फिनान्स केलंय. बेसिक ग्रॅजुएशन इंजिनिअरिंग असावं असं मला वाटतं..
हा!!हा!!हा!!…तुमचा अनुभव वाचुन हसावे, रडावे, की घाबरावे हेच कळत नाही आहे.. 🙂
प्रसाद
घाबरायचं काही कारण नाही. अगदी सहज होऊन जाते प्रत्येक गोष्टं. ती केजी १ ची धावपळ आठवली की आम्हाला पण आज हसु येतं ! 🙂
चौथ्या आणि पाचव्या परिच्छेदांमधला एक परिच्छेद गाळलात की काय?
masta vatla tumcha anubhav 🙂
aata mala kaltay aai babani kay mehnat gheli aasel
mala ghatlela marathi mediumlach pan shevti sagla aalach na kay kay yeta shlok mhan jara
aai punekar tyamule marathi agdi shudha shikavlela 🙂
pan ek goshta bari aahe ki shalet admission sathi aajun tari jatichya adharavar det nahit
nahitar puna maratha aaslyacha pashchatap jhala aasta (jokes apart) jasa engineering chya veli jhala 😛
अरे बाप रे. हा लेख तर मी विसरूनही गेलो होतो. गेल्या चार वर्षात इतके लेख लिहिले आहेत की लक्षातही रहात नाहीत.. आज पुन्हा एकदा हाच ब्लॉग पुन्हा वाचला, आणि मजा वाटली. हे सगळं काही करण्यातही एक प्रकारची वेगळीच गम्मत असते हे नक्की. सगळेच आईवडील हे एंज~ऒय करतात..
आमची वेळ यायची आहे अजून.
नितीन
वेळ प्रत्येकावरच येते.. आणि ती वेळ यावी म्हणून आपण वाट पहात असतो. 🙂