सेकंड लाइफ

technology-second_life.gifम्हणतात मांजरीला नऊ आयुष्य असतात. तसेच आपल्याला किमान दोन तरी आयुष्य असायला काय  हरकत आहे?प्रत्येकाच्या मनात एक वेगळा हटके काही तरी किडा असतो, ज्याला इंग्रजीत ’फेटी” म्हणतात.कोणी रिअल लाइफ मधे असतो इंजिनिअर , पण त्याला व्हायचं असतं डॉक्टर.. बॅंकरला व्हायचं असतं इंजिनिअर.. अशा बऱ्याच इच्छा असतात सुप्त मनामधे दडलेल्या. कोणाला  बॉंडेज, तर कोणाला …….जाउ द्या.. बाकीचं  तुमच्या कल्पना शक्ती वर सोडून देतो पुढचं सगळं.

सेकंड लाइफ !लिडन लॅब नावाच्या एका कंपनीने हे एक व्हर्चुअल वर्ल्ड  लॉंच केलं गेलं २००३ मधे. यामधे एक थ्री डायमेन्शनल जग उभं केलं गेलं  आणि त्या जगात तुम्ही  तुमच्या फॅंटसिज जगु शकाल अशी पण सोय केली गेली आहे. तुम्ही रीअल लाइफ मधे अगदी ५० किलो वजनाचे छाडमाड व्यक्तिमत्त्वाचे असाल तरीही या सेकंड लाइफ मधे तुम्ही सिक्स पॅक बॉडी बिल्डर पण असू शकता.म्हणजे आपली स्वप्नं जगायची सोय इथे केलेली आहे. एखाद्या अगदी सुमार व्यक्तिमत्त्वाच्या मुलीला जर मॉडेल व्हायचं असेल तर इथे होता येतं.काय मस्त वाटतंय ना? आपला अवतार बनवायची इच्छा झाली ना?

हा गेम तयार केलाय लिडन लॅब ने. व्हर्च्युअल वर्ल्ड ची कल्प आणि थ्री डायमेन्शनल ३६० डिग्री वर्ल्ड तयार केलंय. इथे रहाणाऱ्या लोकांना रेसिडंट्स म्हणतात.. आणि प्रत्येकाला ( रेसिडंट्स ला) एकेका ’अवतार’ घेउन रहावं लागतं.

काल फेस बुक वर पण याच धरती वरचा एक गेम दिसला म्हणून यावर लिहावंसं वाटलं.

सेकंड लाइफ हे अतिशय ऍडक्टीव्ह व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. म्हणून या पासून थोडं दुरच राहिलेलं बरं. या वर्ल्ड मधले अवतार हे एकमेकांशी संवाद साधू शकतात, सोशलाइझ  होऊ शकतात. ए्कमेकाशी बोलण्यासाठी चॅट विंडो असते. आणि बोलणं हे ठरावीक अंतरातील लोकांना ऐकू जातं.जर एका अवताराला दुसऱ्याशी खाजगी बोलायचं असेल तर मात्र इंस्टंट मेसेजिंग चा वापर करावा लागतो.बरं एवढंच नव्हे तर एकमेकांशी व्हर्चुअल सेक्स्युअल संबंध पण ठेवू शकतात. म्हणजे काय , रीअल लाइफ प्रमाणे इथे पण हेवे दाव, संशय इत्यादी प्रकार आलेच.जर आपल्या जगात जे काही आहे तशाच गोष्टी तिथे असतील तर सेकंड लाइफ लोकांना इतकं अट्रॅक्ट का करतं?

या जगामधे पण इकॉनॉमी आहेच.म्हणजे पैशाला पण महत्व आहेच. तुमच्या कडे जास्त पैसा असेल तर तुम्ही जास्त मजा करु शकता व्हर्चुअल वर्ल्ड मधे. लिंडन डॉलर हे चलन या जगात चालतं.हे चलन , व्हर्च्युअल खरेदी करता, म्हणजे घर, कार,स्किन, कपडे ,  ग्रोसरी किंवा तत्सम रोजच्या जरुरीच्या गोष्टींसाठी वापरलं जातं.मॅक्स मनी, किंवा व्हर वॉक्स वापरुन यु एस डॉलर च्या बदल्यात लिंडन डॉलर विकत घेता येतो.  म्हणजे खरे पैसे द्या.. आणि खोटे पैसे घ्या!! 🙂 काही कंपन्या सेकंड लाइफ मधे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी डॉलर्स चार्ज करतात.

२००७ मधे ब्राझिल मधे स्वतःचे पोर्टल सेकंड लाइफचे सुरु करण्यात आले.कैझन गेम्स नावाची कंपनी हे पोर्टल रन करते. सेकंड लाइफ हे शिक्षण , गॅंबलिंग, धार्मिक, किंवा आर्ट ची पोर्टल्स पण आहेत. हे कमी वाटत असेल तर ऑन लाइन सेक्स गेम्स खेळण्याची पण सोय आहे. बिडीएसएम , किंवा तसेच काही गेम्स पण इथे इन्क्लुड केले गेले आहेत २००८ पासुन. ज्या कोणाला किंकी सेक्स मधे इंटरेस्ट असेल , त्यांच्यासाठी पण गेम्स आहेत .

आर्टिस्ट आपली स्वतःची आर्ट म्हणजे चित्रकला किंवा इतर काहीही इथे डिस्प्ले करु शकतात. थिएटर मधे पण काम करण्याची सोय आहे इथे.

तुम्ही स्वतःचं घर इथे विकत घेऊ शकता. स्वतःचं विश्व उभं करू शकता. दुसरं लग्नं.. जर तुमचं रीअल लाइफ मधे झालेलं असेल तरिही इथे पुन्हा करु शकता. पण जरा सांभाळून.. कारण डिव्होर्स सेटलमेंट चार्जेस इथे पण द्यावे लागतात बरं का. नाही तर या सेकंड लाइफ मधे पण शुगर डॅडी होऊन बसाल !!!!!! 🙂

हे एक पुर्ण पणे वेगळंच आयुष्य आहे. अमेरिकेत तर  खूपच लोकप्रिय झालाय हा गेम , पण भारतात मात्र तितकीशी लोकप्रियता मिळालेली नाही सेकंड लाइफ ला. हे सेकंड लाइफ बरं की वाईट ते इथे मी लिहिणार नाही. ते सगळं आपलं आपण ठरवायचं!

Second Life General Fees
Fee Benefit
Free Sign Up, Avatar Creation, Login ID, Access, Participation
US$1 266 Linden Dollars (variable) – brokered purchase; may go to LL or a resident seller
US$0.30 per transaction fee for buying Linden Dollars on Lindex currency exchange
3.5% of transaction value per transaction fee for selling Linden Dollars on Lindex currency exchange
US$9.99/month Premium membership (512 m² mainland, access to higher mainland ranges as below, 300 Linden Dollars per week, access to live and ticket support)
US$125/month Land as below, plus Concierge service (live support access)
US$150 Island relocation
US$50 Island rename
US$100 Island interuser transfer (includes relocation and renaming)
US$500 plus 20 premium memberships Unique avatar surname for an organization
Second Life Land Use Fees
Monthly Land Fee Additional Land Parcel Size (m2) Square Equal Line Length (m) Max Prims
US$5 1/128 Mainland Region 512 22×22 117
US$8 1/64 Mainland Region 1024 32×32 234
US$15 1/32 Mainland Region 2048 44×44 468
US$25 1/16 Mainland Region 4096 64×64 937
US$40 1/8 Mainland Region 8192 90×90 1875
US$75 1/4 Mainland Region 16,384 128×128 3750
US$75 OpenSpace 65,536 256×256 750
US$125 1/2 Mainland Region 32,768 181×181 7500
US$95* Homestead 65,536 256×256 3750
US$195 1 Mainland Region 65,536 256×256 15,000
+US$95 +1/2 Mainland Region (when already at US$195 level) 32,768 181×181 7500
US$195 Private Island on pre-2007 server technology (second hand purchase only) 65,536 256×256 15,000
US$295 Private Island on current server technology 65,536 256×256 15,000

वर दिलेले आकडे हे केवळ तुम्हाला या गेम मधे किती पैसा गुंतला आहे हे लक्षात यावं म्हणून दिलेले आहेत. व्हर्च्युअल वर्ल्ड मधे पैसे कमावण्याची पण सोय आहे, पण जर तिथे पैसे कमी पडले तर वर लिहिल्या प्रमाणे – यु एस डॉलर्स खर्च करुन तिथले चलन विकत घेतले जाऊ शकते.करोडॊ डॉलर्सची देवाण घेवाण होते या व्हर्च्युअल प्रॉपर्टी साठी.

माझ्या काही मित्रांनी फोन केलेत आणि त्या सेकंड लाइफ चा साइट ऍड्रेस विचारला म्हणुन इथे देतोय. रजिस्ट्रेशन फ्री आहे. सेकंडलाइफ वर..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , , . Bookmark the permalink.

11 Responses to सेकंड लाइफ

 1. Amol says:

  Great Info. Almost all citizens of this world are not happy with what they have in this life. They have found out different ways to solve this problem. America ( for that matter lots of developed nation citizen) believes that, thought its artifical and not permanent, this will temporary give the satisfaction and In India people think that no sceond life can solve the problem and they wish for “Mukti from life”.

 2. mugdhamani says:

  tarich mhantala kahitari navin kasa aala nahi tumchya blog war ajun…
  chaan maahiti…mastach nehemi pramane:)

 3. mipunekar says:

  sahich ki…. jaun dokavayala harakat nahi. tumhi tikade asal tar bhetu 🙂

  share kelya baddal dhanyawad…

 4. पुणेकर,
  मी नाही बरं का तिथे. मला तर बरेच वर्षांपासुन हे माहिती होतं. पण कधी तिथे रजिस्टर केलं नाही. पण रजिस्ट्रेशन फ्री आहे .करायला हरकत नाही.. 🙂 बेस्ट लक! 🙂

 5. nimisha says:

  याबद्द्ल मी बर्याच दिवसांपूर्वी वाचलं होतं आणि अमोलने म्हटलंय त्याप्रमाणेच मी भारतीय असल्यामुळे असेल कदाचीत पण मला चुकूनही तिथ्रे जाऊन नविन अवतार धारण करावा असं वाटलं नाही.
  भौतिक सुख म्हणजेच सर्वस्व मानणार्यांसाठी मात्र ह्या खेळाची नितांत आवश्यकता आहे जेणेकरुन त्यांना खोटं का होईना पण आयुष्यात सर्व काही मिळवल्याचा आनंद घेता येतो.

 6. Bhagyashri says:

  Mahendra, 100% sahamat. mala Dr ani full time Chitrakaar vhayacha hota. pan aamhi keli khardeghashi…:(

 7. Prasad says:

  जपुन बर का…. हे फार ऐडेक्टीव्ह आहे… एकदा का व्हरच्युअल जगात गेले की या जगात जगणे विसरुन जाल.. 🙂

 8. तुम्ही लिहिलेला विषय खरोखरच विचार करायला लावतो आहे. आता असेच विर्तुअल वोर्ल्द मधील काही गेम्स लहान मुलासाठी पण निघाले आहेत. माझी १० वर्षाची मुलगी असाच एक गेम खेळते आणि बर्याच वेळा ती त्या जगात असते. असायची असे म्हणणे योग्य ठरेल. मधे मधे तिला त्याचे वेड लागले असे म्हणायला हरकत नाही त्यातुन बाहेर काढायला बरेच कष्ट लागले. पण ते आमच्या लवकर लक्षात आल्याने जरा कष्ट कमी पड्ले. थोड्क्यात सान्गायचे म्हणजे, हे गेम्स वेड लावणारे असतात.

 9. sonalw says:

  I agree with amol completely. This is the difference in the basic philosophy of life in indian and western world, and it has a deep impact on what we choose in this modern world also.
  Thanks mahendraji, khup chaan information.

 10. निमिषा, भाग्यश्री, प्रसाद, नारायणि, सोनल…
  अभिप्रायाकरता धन्यवाद. सकाळपासुन जरा व्हायरल फिवरने आजारी असल्याने रिप्लाय करायचा कंटाळा केला होता. आता बरंय.. ताप उतरलाय! धन्यवाद

  निमिषा, मी यात थोडं वाचन केलं, तर काही सायकॉलॉजिस्टस च्या मधे ही एक मेंटल डिसऑर्डर आहे, तर काही सायकॉलॉजिस्ट म्हणतात या मुळे बरेच से गुन्हे कमी होतिल, कारण तुम्हाला जे काही करायचं होतं ते तुम्ही सायबर लाइफ मधे केलंय, त्यामुळे रिअल लाइफ मधे करण्याची इच्छा मरुन जाइल. आणि काही लोकांच्या मते ही डिसऑर्डर बऱ्याचशा गोष्टी करण्याकडे इन्स्टीगेट करते.. मला तर दोन्ही विचार पटताहेत.

  नारायणी.. तुमचं म्हणणं अगदी खरंय.. आमच्या घरी पण कॉम्प्युटर म्हणजे खेळ खेळण्याचं यंत्रंच झालं होतं . आणी मला पण गेम्स ची आवड आहेच त्यामुळे मुलिंना तरी मी काय म्हणणार? पण लवकरच त्या कंटाळल्या.. लकीली…. 🙂 रोल प्लेईंग गेम्स सगळ्यात घोकादायक आणी ऍडक्टिव्ह असतात.
  ..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s