टॅटो,पिअर्सिंग, बॉडी आर्ट

stars_किंबरली व्लॅमिंक ने आपल्या चेहेऱ्यावर ५६ स्टार्स चे टॅटो काढून घेतले – ही  बातमी सगळ्यांनीच वाचली असेल. बरं तिचं म्हणणं असं होतं की तिने फक्त ३ टॅटॊ काढण्यास सांगितले होते, पण त्या फ्रेंच आर्टीस्ट ने ५६ स्टार्स काढले चेहेऱ्यावर.. किंबरली चं म्हणणं असं की तिला निटसं फ्रेंच येत नाही त्यामुळे कदाचित   त्याला कळलं नसावं किंबरली ला काय म्हणायचंय ते.

पहिला प्रश्न माझ्या मनात आला, की तिला कसं कळलं नाही इतके टॅटॊ काढे पर्यंत? तर तिचं म्हणणं असं आहे की तिला झोप लागली. होती. आता तुमच्या चेहेऱ्यावर इतकं खोदकाम सुरु असतांना तुम्हाला झोप लागू शकेल??.

थोडं गुगलिंग केलं, आणि कळलं की आजकाल टॅटो काढतांना झायलोकेन हे लोकल अनस्थेटीक टॅटो काढण्याच्या  भागावर लावले जात. कदाचित त्या मुळे टॅटो काढतांना त्या मुलीला त्रास झाला नसावा, आणि म्हणून तिला झोप लागली असावी.

आजची न्युज अशी आहे की त्या किंबरलिने मान्य केलंय की तिने स्वतःचा ५६ स्टार्स काढायला सांगितले होते!! वडील रागावतील म्हणून तिने खोटे आरोप केले होते आर्टीस्ट वर!चला, म्हणजे ती बातमी वाचून मी उगाच विचार करित बसलो तर!

ग्रामिण भारतामधे टॅटो हे एक कल्चरचा भाग झालेला होता, मागल्या पिढी मधे . मध्यंतरी हे फॅड बरंच कमी झालं होतं. पण आता अमेरिकन कल्चरचा परिणाम म्हणा हवं तर , शहरी भागात सुध्दा अगदी टॉप एंड लोकं.. जसे सिनेमा हिरो, इंडस्ट्रिअलिस्ट कलर्ड टॅटॊ फ्लॅश करतांना दिसतात. बरेचसे टिव्ही वरचे हिरो, आणि संजय दत्त , हेमामालिनीची मुलगी.. ( काय नाव आहे तिचं कोण जाणे ) ने पण पाठीवर गायत्री मंत्र टॅटॊ करुन घेतला आहे.शहरी भागा मधे हल्ली इम्पोर्टेड डाय आणि पिगमेंट्स वापरुन रंगित टॅटॊ करणारे एक्सपर्ट्स भारतामधे पण आलेले आहेत.त्यामुळे लाल , गुलाबी आणी हिरवा रंग वापरुन केलेल टॅटो पण बरेच पहायला मिळतात.

fleshremovalएक गमतीशिर बातमी वाचनात आली,  जवळपास १३०० वर्ष बी सी. च्या इजिप्शिअन ममी च्या कातडी वर पण निळ्या शाईने काढलेले टॅटो आहेत.  म्हणजे ही टॆक्नॉलॉजी डेव्हलप झालीय १३०० वर्ष बिसी  पासून!आफ्रिकेत कातडी वर सुरीने डीझाइन काढणे हा पण एक लोकप्रिय प्रकार आहे.फ्लेश रिमुव्हल ने केलेले डिझाइन आयुष्य भर जात नाही. 😦

अमेरिकेत गेल्या २५ वर्षात जवळपास १० मिलियन अमेरिकन्सनी कमीत कमी एक टॅटो तरी काढून घेतला आहे. जवळपास ४००० टॅटॊ स्टूडिओ आहेत यु एस मधे . पुर्वी फक्त सेलर्स, बायकर्स टॅटॊ बनवून घ्यायचे पण हल्ली जनरल लोकं पण टॅटॊ बनवुन घेतात. टॅटॊइंग आणि पिअर्सिंगचं फॅड खूपंच वाढलंय हल्ली च्या काळात.अगदी कॉमन माणुस पण टॅटो काढून घेतो हल्ली अमेरिकेत.. इट्स कूल मॅन…. नवीन ट्रेंड आहे हा.

अंगावर स्किन खाली रंग इंजेक्ट करुन टॅटो बनवला जातो. आपल्या इथे मुंबईला पण  लोकल च्या ब्रिज वर काही टॅटो वाले दिसतात बसलेले. हे लोकं एकच निडल वापरुन कित्येक लोकांना टॅटॊ काढतांना मी पाहिलं आहे. म्हणजे हायजीनबाबतीत ऐसी की तैसी!खरं तर ओ प्रत्येक टॅटॊ काढल्यावर टॅटो मशिन २५० डिग्री वर १० पाउंड प्रेशरवर स्टर्लाइझ करणे आवश्यक आहे. आणि टॅटो काढल्यावर उरलेली इंक फेकून द्यावी अशीही अपेक्षा असते.पण असं होत नाही, आणि तिचं शाई , आणि तीच मशिन पुन्हा पुन्हा वापरली जाते भारतामधे.

एकदा टॅटो काढल्यावर जवळपास ५० टक्के लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना तो काढल्याचा पश्चाताप लवकरच व्हायला लागतो. आणि मग सुरु होतं की टॅटॊ रिमुव्हल टेकनिक्स चा शोध! टॅटॊ रिमुव्हल च्या बऱ्याच पद्धती आहेत , पण जरी तुम्ही टॅटो चे मार्क्स काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे डाग रहातातच आणि ज्या पद्धती आहेत त्या पण खुप पेनफुल आहेत.असो.. !

त्यातल्या त्यात लेसर टॆक्नॉलॉजी ही जास्त पॉप्युलर आहे. पण हल्ली सायंटिस्ट – टायट्रेशन टेक्नॉलॉजी वापरुन इंक काढण्यासाठी दुसरे केमिकल तयार करण्याच्या मागे लागले आहेत. बघू  या कधी यश मिळतं ते!

most-pierced-womanपिअर्सींग आपल्या देशात तर फारच पॉप्युलर आहे पण ते लिमिटेड आहे फक्त कान, आणि नाक या दोनच ठिकाणी. एका मित्राने एक मेल पाठवला होता त्यात काही फोटो होते पिअर्सिंगचे .. हॉरिबल.. शरिरावरची कुठलीही जागा शिल्लक ठेवलेली नव्हती त्या चित्रात…… बस्स! यातंच काय ते समजून घ्या.तो फोटो इथे पोस्ट करू शकत नाही. पण हा एक दुसरा फोटो बघा..

स्वतःला वेदना करुन घेउन इतकं पिअर्सिंग किंवा टॅटो काढून घेण्या मागचा लोकांचा उद्देश काय असेल?त्यातल्या त्यात नाइफ आर्ट हा म्हणजे अघोरी प्रकार वाटतो . तो फोटॊ पहातानाच कसं तरी होतं.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , . Bookmark the permalink.

11 Responses to टॅटो,पिअर्सिंग, बॉडी आर्ट

 1. mugdhamani says:

  baapre!!! bhayanak..
  स्वतःला वेदना करुन घेउन इतकं पिअर्सिंग किंवा टॅटो काढुन घेण्यामागचा लोकांचा उद्देश काय असेल?>> ha prashna malahi nehamich padato….
  aani tyaat cool kaay aahe he hi mala samajat nahi..

 2. nimisha says:

  अरे आज् तुझी ही पोस्ट वाचली आणि एक गोष्ट आठवली.
  आमच्याकडे माझ्या लहानपणी गंगूबाई म्हणुन धुणं-भांडी घासणारी बाई होती.तिच्या हातावर ‘ग़ंग़ूबाई भ्रतार शिवराम’ असं तिचं आणि तिच्या नवर्याचं नाव गोंदवलेलं होतं.सुरुवातीला तिचा संसार बरा चालला पण नंतर मात्र तिचा नवरा दारु पिऊन तिला मारझोड करायला लागला,शिव्या द्यायला लागला,त्याने दुसरी बाई देखिल ठेवली.माझी आई तिला म्हणायची सोड त्याला अन रहा आमच्याच कडे २४ तास सर्व घरकाम करायला,पण तुला माहीत आहे ती काय म्हणाली?
  ती म्हणाली,’ताई,मी जलमले तवाच सटवाईनं माज्या कपालाव्रर माजी तकदिर लिवलीय् आनी माज्या नवर्याचं नाव बी माज्या रक्तात घुस्लयं..आता मी जिती हाय तोवर काय बी जालं तरी ह्ये माज्या हातावर्चं ओझं माला वोडावंच लागेल्”
  कधी काळी मोठ्या कौतुकाने,दुःख सहन करुन हातावर कोरलेलं गोंदवण नंतर आयुष्यभर ओझं होऊन बसतं.कुठ्ल्या तरी क्षणाच्या कायमच्या नोंदी कशाला रे करतात माणसं आपल्या शरीरांवर,जेव्हा माहीत असतं की खरं तरं permanent काहीच नसतं!

  • मनःस्पर्शी.. किती साध्या सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगुन गेली गंगुबाई..

  • मनःस्पर्शी.. किती साध्या सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगुन गेली गंगुबाई..

 3. किंबरली व्लॅमिंक ने आता स्वत:चे नाव “छप्प्न्न टिकली ” ठेवावे.. नाही का?

  हेमा मालिनीच्या मुलीचे नाव इशा देवोल – त्या बाइनी ही पाठिवर – कदाचित देवाचे आशिर्वाद नेहमी पाठीशी असावेत म्हणुन -गायत्री मंत्र टॅटॊ करुन घेतला आहे.

  • दिपक
   थॅंक्स.. तिचं नाव अगदी स्मृतीआड गेलं होतं..
   हो छप्पन टीकली ठेवायला हरकत नाही. तिच्या ’बा’ ने कोर्टात केस करायची धमकी दिली आहे आणी ९ हजार पाउंडाचा अबृनुकसानीचा दावा पण ठोकला आहे असं पण छापुन आलंय..तिच्या घरी म्हणे सगळ्यांनीच टॅटो काढले आहेत, फक्त हिच एक बाकी होती म्हणून हिने हे उपद्व्याप केलेत असं म्हणते ती…

 4. ajayshripad says:

  ह्या किंबरली ला हिच्या बा नं मारलं नाही का…?

  एक लहाणपणीची आठवण सांगतो..
  मी लाहाण असताना एकदा शाळेतुन येत होतो. शाळेच्या जवळ एक लहानसं देविचं मंदीर होत, बरोबर आठवत नाही पण जत्रा होती त्या दिवशी. गोंदण (टॅटु) करणारा बसलेला होता तिथे.. मित्रांबरोबर मिही त्याच्याजवळ गेलो हातावर स्वतःच नाव लिहुन घेतल दोन मित्रांनी. मलाहि म्हणाले, घे हातावर नाव लिहुन. मि खाली बसलो तेवढ्यात पाठीवर असा काही जोरदार धपाटा बसला.. वळुन पाहीलं माझे बाबा होते, नंतर लक्षात आलं पोलिस बंदोबस्तात होते. रात्री बाबा घरी आल्यावर जो मार भेटला ना आजपर्यंत विसरलो नाही. टॅटु पाहीला तरी अंगावर काटा येतो. 🙂

  • अजय
   ती म्हणते तिच्या घरात सगळ्यांच्या अंगावर टॅटु आहे फक्त हिच्याच अंगावर नव्हता, म्हणुन तिने काढुन घेतला म्हणे…

 5. abhi says:

  this is very good article.

 6. गंमत म्हणून टॅटू काढणं ठीक आहे, पण काही लोकांना स्वतःच्या शरीराला नाना ठिकाणी छिद्र पाडण्यात किंवा जागा मिळेल तिथे खोदकाम करण्यात खूप रस असतो. इतर लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा हा बहुदा अट्टहास असावा. एक गंमत म्हणून यूट्यूबवर ‘most piercings in the world’ शोधा. त्या बाईच्या पूर्ण शरीरावर ४६२ पीअर्सिंग्ज आहेत! गिनिज बुकमध्ये नाव आहे तिचं.

 7. Gurunath says:

  माझा एक सिनियर आहे, त्याने ग्रॅज्युएट झाल्याची (रिझल्ट ची) तारीख, वगैरे अश्या त्याच्या आयुष्यातल्या इंपॉर्टंट ५-६ तारखा गोंदवल्या आहेत गॉथिक फ़ॉंट मधे अंगावर… सही कन्सेप्ट वाटली…..

  माझी पण फ़ॅण्टसी आहे बुआ. एक फ़िनिक्स काढुन घ्यायचाय मला कुठे तेच ठरले नाही!!!

  मुळात टॅटू साठी बॉडी “बिल्ड” पाहीजे तो पहीले अचिव्ह करावा लागेल, म्हणजे किंग फ़िशर बंद!!

  तुर्तास तरी हे जमेल असे वाटत नाही…. बघु पुढे!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s