इराण मधली खुनाची क्लिप.

मी अतिशय डिस्टर्ब झालोय हा व्हिडीओ पाहून. केवळ चाळीस सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप आहे. तिचा गळा दाबून मारतानाची . ओबामाने काल ज्या व्हीडिओ वर कॉमेंट केली होती तो हाच व्हिडीओ. तेहरानची गोष्ट आहे ही.

तिचं वय फक्त २७ वर्ष. फिलॉसॉफीची स्टूडंट.. जास्त लिहत नाही. लिंक दिलेली आहे ती वाचा..आणि तिथे पुर्ण आर्टीकल पण दिलेलं आहे. उगाच मराठीत भाषांतर करुन छापत नाही इथे. इंग्लिश मधेच वाचा.

पुन्हा एकदा सांगतोय.. जर मन दगड करुन पाहू  शकत असाल तरच ही क्लिप पहा अन्यथा नाही. फक्त आर्टीकल वाचून पुढे जा..

हे पोस्ट पण मला माझ्या ब्लॉग वर ठेवण्याची इच्छा नाही . उद्या संध्याकाळी डीलीट करुन टाकणार आहे हे पोस्ट मी.  आधी पोस्ट करतांनाच विचार केला होता, करावं की नाही ते. पण म्हंटलं, वाचकांच्या सदसदविवेक बुद्धीवर सोडू या क्लिप पहायची की नाही ते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , , . Bookmark the permalink.

7 Responses to इराण मधली खुनाची क्लिप.

 1. nimisha says:

  मकरंद,
  हॉरीबल आहे रे.तू वॉर्निंग दिली होतीस तरीही मी तो व्हिडीओ पाहिला आणि अंगावर सरकन काटा आला!
  माणसाचं मन इतकं विचित्र असतं नं,खर तर मी कधीच व्हॉयलन्स असलेले सिनेमे पहात नाही,इतकच काय पण क्रॉफर्ड मार्केटमध्ये जे सोलून,टांगून ठेवलेले बकरे असतात नं तेही मी तिथून जाताना डोळे बंद करून पहायचं टाळते.
  पण तरीही हा व्हिडिओ पाहून जगात ज्या काही भयानक घटना घडतायत त्याबद्द्ल्ची तीव्र घृणा आणि ज्यांच्या बाबतीत ह्या दुर्दैवी घटना घडल्या त्यांच्याबद्द्ल खुप सहानुभूती आणि…आपण त्या जागी असतो,तर आपलं काय झालं असतं या नुसत्या विचाराने येणारा भीतीचा काटा …आणि आज त्याच जगाच्या दुसर्या कोपर्यात निदान आत्ता तरी आपण किती सुरक्षीत आहोत,सुखात आहोत यामुळे मनाला मिळ्णारा दिलासा, अश्या सर्व भावनांचा कल्लोळ मनांत उसळलाय्…काय करू शकतो आपण तिच्यासाठी किंवा अशा अनेकांसाठी केवळ हळहळण्या व्यतिरिक्त्?

 2. nimisha says:

  सॉरी मी तुझ्या नावाची गडबड केली…त्या व्हिडिओचाच परीणाम असावा..

 3. CAtch says:

  महेन्द्रजी. तिला गळा दाबून मारण्यात आलेलं नाही. ते लोक गळ्यावर हात ठेवून तिला मदत करत आहेत. एक लोकशाही समर्थक रॅली पहात असताना तिच्यावर गोळी झाडण्यात आली होती. कोणाला मरताना पाहणं टेरिबल आहे.

 4. Yawning Dog says:

  Actually Neda la goli maralee hoti IRG/BSG yanee – Gala dabun anhee marale tila.

  Bajula ubhee asalelee mandalee tila vachavaycha prayatna karat hotee.

 5. Indian_lost_in_us says:

  Dear Friend
  This is a very good post.. please do not delete . There is no reason that you should feel ashamed for this post. This is a very good and informative post. Please do not delete.

 6. bhaanasa says:

  भयंकर…. बघवत नाही. सगळे जण तिला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत…तिची नजर…..

 7. तिला गळा दाबून मारलेलं नाही. तिच्या हृदयात गोळी झाडण्यात आली होती. रॅली बघताना ती फक्त थोड्या वेळासाठी गाडीतून बाहेर आली आणि खुन्याने आपलं काम साधलं. तिच्या गळ्यावर हात ठेवून ते लोक तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. पण ते लोक काही करू शकले नाहीत. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त एवढ्या वेगात बाहेर आलं की काही सेकंदांतच तिचं प्राणपाखरू उडून गेलं. 😦 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s