आमेन!

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगिच स्वतःला बरं वाटावं म्हणुन केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतारकार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते ह्या वयात तर खरी सुरुवात होते जीवनाची. थोडाफार सेटल झालेला असतो  माणुस आयुष्यात.. लग्न ( त्याची तर दोन झालेली होती) मुलं मोठी झालेली असतात , थोडा मोकळेपणा आलेला असतो – अर्थात हे तुम्हा आमच्या सारख्या मध्यम वर्गियांच्याबाबत लिहितोय.. मायकेल बद्दल नाही ,गैरसमज नकॊ.
म्हणुनच कदाचित असेल, की  सकाळिच पहिलं ट्विट पाहिलं आणि क्षण भर तर कळलंच नाही , काय वाटतंय ते. वाईट वाटतंय़?? की काहिच फिलिंग्ज नाहित?? मला वाटतं थोडं वाईट वाटलं असावं.. कारण एक मुर्तिमंत सळसळत्या एनर्जीचा अस्त झालेला ऐकल्यावर अजुन काय वाटू शकतं? पण खरं तर उगिच काही फारसं वाईट वाटलं नाही.. असंही असेल.. कारण एखाद्या फारशा भावनिक जवळीक नसलेल्या माणसाच्या मृत्यु बद्दल ऐकुन जसं वाटावं तसं पण वाटंत होतं..! व्हॉट अ कनफ्युजन.. काय वाटलं बरं मला तेंव्हा??
कारण नाट्य संगित आणि क्लासिकल गाणी ऐकायला आवडतात मला. इंग्रजी गाणी म्हणजे बॉनी एम , किंवा ऍबा..  कारण आमच्या वेळी तेच सगळे फेमस होते, तसे नाटकिंग कोल्स चे १९६० चे लव्ह सॉंग्ज पण ऐकायचो, आणि बिटल्स पण! पण मायकेल जॅक्सन .. छे! कधीच नाही.
कारण मायकेल जॅक्सन जेंव्हा अगदी फॉर्म मधे होता, तेंव्हा मला भिमण्णांनी  आणी तसंच वसंतराव देशपांडेंनी वेड लावलं होतं . तेंव्हा गाणी ऐकायची तर केवळ भिमण्णांची! माझ्या सेल फोन वर आजही वॉल पेपर भिमण्णांचाच आहे.
मायकेल जॅक्सन हा नेहेमी  कुठल्याना कुठल्या वादात अडकायचा.अगदी सुरुवाती ला काळ्याचा गोरा होण्यासाठी घेतलेली ट्रिटमेंट, चेहेऱ्यावर केलेल्या अनंत प्लास्टीक सर्जरीज , यामुळे नेहेमीच लाइम लाइट मधे राहिला होता मायकल. १९९४  मधे ’त्याच’ केस मधे २२ मिलियन डॉलर्स देउन सुटका करुन घेतली होती.२००५ दुसरी केस… नंतर मुलाला बाल्कनी मधुन खाली टाकल्यासारखं केल्यामुळे झालेला गोंधळ.. इस्लाम मधे कन्व्हर्शन.. !!!!!!!!
बिलियन्स डॉलर्स चं इनकम .. पण तेवढाच खर्च..  ( आणि कोर्ट सेटलमेंट) यामुळे मायकेल बॅंकरप्सी पर्यंत पोहोचला होता. बरिचशी प्रॉपर्टी  सोनी ला विकली होती. इतका मोठा गायक, पण शेवटची काही वर्ष याचा खर्च चालायचा तो स्वतःच्या गाण्यांच्या वर नव्हे तर बिटल्स्च्या गाण्यांवरच्या रॉयल्टीवर..
पण एक गोष्ट मात्र आहे , मायकेल जॅक्सन हा अनभिषिक्त राजा होता .. पॉप संगिताचा!!!!
मृतात्म्यास इश्वर शांती देवो…… आमेन!

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगाचच स्वतःला बरं वाटावं म्हणून केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतार कार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते ह्या वयात तर खरी सुरुवात होते जीवनाची. थोडाफार सेटल झालेला असतो  माणुस आयुष्यात.. लग्न ( त्याची तर दोन झालेली होती) मुलं मोठी झालेली असतात , थोडा मोकळेपणा आलेला असतो – अर्थात हे तुम्हा आमच्या सारख्या मध्यम वर्गियांच्याबाबत लिहितोय.. मायकेल बद्दल नाही ,गैरसमज नकॊ.

म्हणूनच कदाचित असेल, की  सकाळीच पहिलं ट्विट पाहिलं आणि क्षण भर तर कळलंच नाही , काय वाटतंय ते. वाईट वाटतय़?? की का्हीच फिलिंग्ज नाहीत?? मला वाटतं थोडं वाईट वाटलं असावं.. कारण एक मूर्तिमंत सळसळत्या एनर्जी चा अस्त झालेला ऐकल्यावर अजुन काय वाटू शकतं? पण खरं तर उगाच काही फारसं वाईट वाटलं नाही.. असंही असेल.. कारण एखाद्या फारशा भावनिक जवळीक नसलेल्या माणसाच्या मृत्यु बद्दल ऐकुन जसं वाटावं तसं पण वाटत होतं..! व्हॉट अ कनफ्युजन.. काय वाटलं बरं मला तेंव्हा??

कारण नाट्य संगित आणि क्लासिकल गाणी ऐकायला आवडतात मला. इंग्रजी गाणी म्हणजे बॉनी एम , किंवा ऍबा..  कारण आमच्या वेळी तेच सगळे फेमस होते, तसे नाटकिंग कोल्स चे १९६० चे लव्ह सॉंग्ज पण ऐकायचो, आणि बिटल्स पण! पण मायकेल जॅक्सन .. छे! कधीच नाही.

कारण मायकेल जॅक्सन जेंव्हा अगदी फॉर्म मधे होता, तेंव्हा मला भिमण्णांनी  आणि तसंच वसंतराव देशपांडेंनी वेड लावलं होतं . तेंव्हा गाणी ऐकायची तर केवळ भिमण्णांची! माझ्या सेल फोन वर आजही वॉल पेपर भिमण्णांचाच आहे.

मायकेल जॅक्सन हा नेहेमी  कुठल्या ना कुठल्या वादात अडकायचा.अगदी सुरुवाती ला काळ्या चा गोरा होण्यासाठी घेतलेली ट्रिटमेंट, चेहेऱ्यावर केलेल्या अनंत प्लास्टीक सर्जरीज , यामुळे नेहेमीच लाइम लाइट मधे राहिला होता मायकल. १९९४  मधे ’त्याच’ केस मधे २२ मिलियन डॉलर्स देउन सुटका करुन घेतली होती.२००५ दुसरी केस… नंतर मुलाला बाल्कनी मधून खाली टाकल्या सारखं केल्यामुळे झालेला गोंधळ.. इस्लाम मधे कन्व्हर्शन.. !!!!!!!!

बिलियन्स डॉलर्स चं इनकम .. पण तेवढाच खर्च..  ( आणि कोर्ट सेटलमेंट) यामुळे मायकेल बॅंकरप्सी पर्यंत पोहोचला होता. बरीचशी प्रॉपर्टी  सोनी ला विकली होती. इतका मोठा गायक, पण शेवटची काही वर्ष याचा खर्च चालायचा तो स्वतःच्या गाण्यांच्या वर नव्हे तर बिटल्स्च्या गाण्यांच्या वरच्या रॉयल्टीवर..

’तसल्या’ ( चाइल्ड सेक्स अब्युझ)  केसेस मधे अडकल्या मुळे एक माणुस म्हणून त्याच्या बद्दल कधीच आदर वाटला नाही. त्याच्या जाण्याचं दुःख पण फारसं झालं असावं असंही वाटत नाही. पर्सनली जो माणुस  चाइल्ड सेक्स अब्युझ च्या केसेस मधे अडकल्या नंतर जेंव्हा   बाहेर पडण्यासाठी काहीच मार्ग नाही हे लक्षात आल्यावर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट  २२ मिलियन् डॉलर्स देऊन करतो, आणि  त्यातुन बाहेर पडतो, त्याच्या बद्दल  आदर किंवा प्रेम  -एक माणुस म्हणून   कसा वाटू शकेल?

त्याचं पर्सनल आयुष्य कसंही असो.. पण संगीत क्षेत्राला त्याने दिलेले योगदान अमुल्य आहे असे म्हणावे लागेल. एक गोष्ट मात्र आहे , मायकेल जॅक्सन हा अनभिषिक्त राजा होता .. पॉप संगिताचा!!!

!हा माणुस राजा सारखा जगला आणि राजा सारखाच गेला..

मृतात्म्यास इश्वर शांती देवो…… आमेन!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला, मनोरंजन and tagged , . Bookmark the permalink.

12 Responses to आमेन!

 1. May his soul rest in peace.

  Well, NAt King Cole is my favorate too.

  “They tried to tell us “, “Pretend you are happy when you are blue ” and so many others.

 2. Nikhil says:

  Mala khup bara watala tumacha Post wachun. Aaj malahi hech feeling ala hota. Mi pan kadhich tyachi gani aikali nahit. Ani mi pan classical, Natya sangeet ani Marathi bhaav geetech aikato. Pan dhakka basala. Waaitahi watala, pan thodasach…

 3. हरेक्रिश्नजी, निखिल

  अभिप्रायाकरता आभार.

 4. Amol says:

  well he was sure a good singer and entertainer, I love some of his songs, specially “stranger in Moscow” you will be surprised that Michael Jackson could sing such a song. He was a real king in 1990 . I like most of his work. Man I hoped he will make a booming come back in London, but …..

 5. Amol says:


  here is the link for that song.

 6. …………. तसा आमचा आणि पॉप संगिताचा संबंध सावत्र पणाचाच!… पण आमच्या एका मित्रामुळे बर्‍याचदा जॅक्सनची गाणी ऐकायला मिळायची… तो मित्र मात्र जॅक्सनचा जबरदस्त फॅन आहे.. म्हणजे त्याच्या गाडीवरही त्याचे नाव
  रेडियमनी कोरले आहे!

  त्याचं पर्सनल आयुष्य कसंही असो.. पण संगित क्षेत्राला त्याने दिलेले योगदान अमुल्य आहे असेम्हणावे लागेल. एक गोष्ट मात्र आहे , मायकेल जॅक्सन हा अनभिषिक्त राजा होता .. पॉप संगिताचा!!!

  … अगदी संमत!

  असो – मृतात्म्यास इश्वर शांती देवो…… आमेन!

 7. दिपक
  प्रतिक्रियेकरता आभार. मी आधी लिहितांना विचार केला की चांगलं चांगलं लिहावं.. कारण आता तो या जगात नाही. पण खरोखर जेंव्हा लिहायला सुरुवात केली तेंव्हा काहितरी वेगळंच लिहिल्या गेलं.

 8. ngadre says:

  I strongly believe that all charges of child molestation were false..media created..
  There was a documentary on it..it is sick to link love towards kids to sexuality..

  He was strange..but media made him so..
  Each of his work is masterpiece..
  with him a part of my youth dies…

 9. नचिकेत
  कदाचित ते खोटंही असु शकेल, पण त्या केसमधे पुरावे १००टक्के त्याच्या अगेन्स्ट होते. आणि जर त्याने आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केलं नसतं तर.. कदाचित त्याला गजाआड जाउन मोठी शिक्षा झाली असती. म्हणुन मला वाटतं की त्या आरोपात काहितरी तथ्य असावं. काहिही असो… पण तो एक ग्रेट सिंगर होता हे मात्र खरं..

 10. Aparna says:

  ani kadchit tumhala mahit asel dokyawar more than 400 milion $ cha karja theu gela…mhanun bahutek July madhe motha show karanar hota…Ishawarecha dusara kai (nidan joparyant biopsy cha result yet nahi towar) aamen.

 11. अपर्णा,
  त्याची लाइफ स्टाइल, इनकम आणि इतर खर्च इतके होते की त्याच्यावर इतकं कर्ज होणं अगदी सहाजिकच आहे. आता नुकतिच होऊ घातलेला नवा पब्लिक परफॉर्मन्स त्याला या कर्जातुन बाहेर काढण्यासाठीच होता असे म्हणतात.
  सोनी कपनीला बरंच काही विकलंय त्यान.. इन्क्लुडिंग त्याचे रॅंच!!असं म्हणतात.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s