मुंबईचा पाउस

काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवून जातोय दोन दिवसापासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधीच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( अगदी पुर्वी पासून) की  आता त्यावर नवीन काही लिहायला उरलंच नाही.

गरिबाची झोपडी, किंवा, घरात पाणी शिरणं..हे सगळं नेहेमीप्रमाणेच सुरु आहे. आज सकाळी मालाड स्टेशन ला पोहोचलो. थोडा उशीराच निघालो आज सौ. पण सोबत होतीच. ( कधी तरी आमची दोघांची जायची वेळ एक होते) . आधी नेहेमी प्रमाणे रिक्षाच्या रांगेची वाट लागलेली होती. आम्ही पण संगीत खुर्ची च्या तालावर रिक्षा पकडायचा प्रयत्न करु लागलो. पावसाने पाठीवरची लॅप्टॉप ची बॅग ओली झालेली. म्हट्ल बंद पडतो का आता….! शेवटी स्टेशनला पोहोचलो तर इस्ट साइडला जवळपास १ फुट पाण्याचा ओहोळ वाहात होता. कसा तरी चुकवायचा प्रयत्न केला पण पाणी शिरलच बुटामधे. चरफडत प्लॅटफॉर्म ला पोहोचलो. ओले बुट, छत्री असुनही ओली झालेली पॅंट, डोकं आणि शर्टच्या बाह्या मुळे अजुन अनिझी होत होतं. ओले मोजे तर खूपच त्रास देत होते.

रेल्वेचे मोठमोठे दावे की यावर्षी गाड्यांवर पावसाचा काहीच परिणाम होणार नाही..  किती फोल आहे हे एकाच पावसाने दाखवून दिले. सगळ्या स्लो ट्रेन्स अनाउन्स होऊन कॅन्सल होत होत्या. दोन नंबरला १२ डबा स्लो लागेल म्हणून अनाउन्स केलं म्हणून मी आणि सौ. दोघंही मागे जाउन उभे राहिलो. अगदी ट्रेन येण्याच्या वेळी आज १२ डबा के बदले मे ९ डबा ट्रेन आएंगी अशी अनाउन्समेंट झाली. च्यायला… काय वैताग आहे !! सौ. म्हणाली मी जाते पुढ्च्या डब्यात आणि गाडी प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वीच दुसऱ्या फर्स्टच्या डब्याजवळ गेली, मला आला होता कंटाळा, मी म्हंटलं दुसऱ्या टेनेनी मी येतो, तू निघ!

नंतरची ट्रेन आली. ओला गच्च प्लॅटफॉर्म, पॉलिशवाली पोरं उगाचच इकडे तिकडे हुंदडत होती.एक भिका्रीण ( बहुतेक भाड्याचं असावं) एका मुलाला खाकोटीला मारुन भीक मागत होती. या सगळ्या गोंधळात गाडी आली आणि आम्ही सगळे मर्द मावळे अगदी कसंही करुन सिंहगड जिंकायचा… दोर कापलेले आहेत.. अशा आविर्भावात त्या मोगल सैन्यावर ( गाडीवर) तुटून पडलो. कसा तरी गाडीत शिरलो , लोकांच्या ओल्या छत्र्या, किंवा अंगात घातलेले ओले रेनकोट अजुन कपडे भिजवत होते. ट्रेन सुरु का होत नाही?? जवळपास दोन मिनिटं झाली, तशी लोकं अनिझी होऊ लागले. दोन मिनिटं ही लोकलच्या दृष्टीने खूप होतात. जर तुम्ही नेहेमी प्रवास करित असाल तर तुमच्या लक्षात येईल – खूप मोठा वेळ असतो तो. नॉर्मली तुम्ही आत शिरता ना शिरता तोच ट्रेन सुरु होते.. आज काय झाल?? अशा अनिश्चिततेच्या परिस्थिती मधे लोकांची भांडणं पण सुरु होती.

नेमका आज हाफ शर्ट घातला होता. शेजारच्या माणसाच्या उघड्या दंडाचा स्पर्श माझ्या स्किनला होत होता. अगदी किळसवाणं फिलिंग होतं.  थोडा स्पर्श झाला तर त्यात काय -असं म्हणू नका.. दुसऱ्या माणसाच्या स्किनचा स्पर्श किती इरीटेटींग असु शकतो याची कल्पना येत नाही, स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय.

दादरला उतरलो . बोरिवली साईडचा पहिला ब्रिज सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर जात  नाही म्हणून दुसरा ब्रिज घेतला, आणि कुर्ल्याला पोहोचलो. गाड्या अतिशय मंद गतिने सुरु होत्या. प्रशासनाचे दावे की पाणी तुंबणार नाही, ट्रेन्स वेळेवर चालतील हे किती खोटे होते ते लक्षात आलं.. आणि मानसिक तयारी पण झाली पुढे काय वाढून ठेवलंय त्याची…

इतक्या सगळ्या द्रविडी प्राणायम करुन कुर्ल्याला पोहोचलो तर डिलरचा फोन आला. साब जरा भिंडी बजार आ सकते है क्या? म्हंटलं दो बजे के बाद आयेंगा मै..आणि ऑफिसला पोहोचलो. तेंव्हा दुपारचे ११-३० झाले होते.

160620091535थोडी फार कामं आटोपून ३ वाजता मोहम्मद अली रोडला गेलो तर  फ्लाय ओव्हरचया खाली पार्क केलेल्या कारच्या शेजारी कोरड्या जागेत हा माणुस झोपलेला दिसला. इकडे धो धो पाउस पडत असतांना पण इतक्या शांतपणे झोपणाऱ्या त्या माणसाचे कौतुक वाटले. डिलरच्या ऑफिसच्या जुन्या बिल्डींग मधे शिरतांना एक कबुतर समोरच्या भिंतींवरच्या कोनाड्यात अंग चोरुन बसलेलं दिसलं त्याचा पण एक फोटो काढला.

पावसामुळे उडालेली मुलींची तारांबळ, त्यांच्या ओले त्या अंगांकडे आशाळभूतपणे पहाणारे आंबटशौकीन.. आणि त्यांच्या त्या वखवखलेल्या नजरा..अंगाला चिकटलेला कपडा दुर करण्याची त्या मुलिंची धडपड.. …  पावसाळा!!!!!!  –  हे सगळं पाहुन जरा विचित्र वाटलं. पुरुषांची त्या ओलेत्या मुलींच्या कडे पहाण्याची विखारी वासनेने बरबटलेली  नजर  माझ्या सारख्या पुरुषाच्या पण लक्षात आली. आणि मुलींची त्या नजरेपासून सुटण्याची केविलवाणी धडपड पण.. मला खरंच लाज वाटली.. समाजाची….!!  काय दिवस आले आहेत नाही??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , . Bookmark the permalink.

7 Responses to मुंबईचा पाउस

 1. bhaanasa says:

  नेमेची येतो पावसाळा अन नेमेची पडते आमची धमनी–ट्रेनहो… बंद. रेल्वे प्रशासन त्याच्या नेहमीच्या परिपाठाला जागले…चला, हो उगाच लोकांच्या आशा वाढायला नकोत. कसे?
  बाकी चिकटलेले कपडे अन त्याला चिकटलेल्या नजरांबद्दल…………..

 2. भाग्यश्री,
  प्रतिक्रियेबद्दल आभार. पण एकाच पावसाने अगदी पोल खोलली प्रशासनाच्या दाव्याची.

 3. nimisha says:

  बरोबरच आहे!मुम्बैच्या पावसाबद्द्ल तू तरी आणखी नविन ते काय लिहीणार?
  नेहेमीचीच महानगरपालिकेची अर्धवट सुरू असलेली कामं….वाईट रस्ते…ट्रॅफिक़ जॅम….इत्यादी…इत्यादी…
  पण त्या झोपलेल्या (सुखी) माणसाचा सदरा मात्र तु हळूच पळवायला हवा होतास……!

 4. ajayshripad says:

  मुंबईचा पाउस काय, ते मुंबईत राहणार्यालाच माहीत..!
  दोन वर्ष होतो मी शाहापुर ला, रोज दादर ला अप-डाउन करायचो..! एकदा अशाच एका आंबशौकीनाला असा काही चोप दिला होता ना ठाण्याच्या स्टेशन बाहेर, कदाचितच विसरला असेल मला….! जवळपास २० मिनिट मी त्याला बुकलत होतो, तेवढा वेळ पब्लिक माझ्याकडे बघत होती, शेवटी न राहाउन एक जण म्हणाला कंपनिचा माणुस दिसतोय…! 😀

 5. निमिषा,
  🙂 त्याचा सुखी माणसाचा सदरा घ्यायला हवा होता…. राहुन गेलं.

  अजय
  प्रतिक्रियेकरता आभार.

 6. mugdhamani says:

  सत्य परिस्थिती!!
  काय महेंद्रजी..एवढ्या दिवसांनी पाऊस आला एकदाचा त्याला वेलकम नं करता लगेच तक्रार करताय..
  पुन्हा दडी मारुन बसेल ना? (हलकेच घ्या ;))

  • Mahendra says:

   दडी मारली ना पावसाने.. दोन दिवस झाले, तोंडही दाखवलं नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s