कॉन गेम-अंधश्रध्दा

राइस पुलर- तामिळनाडू , केरळा मधे ह्या गोष्टींचं खूप वेड आहे. परवा एका तामिळ मित्रा बरोबर बसलो असतांना टीव्ही वर एक कार्यक्रम सुरु होता. होता अर्थात तामिळ मधे पण बरेचसे शब्द होते इंग्लिश मधे म्हणून बरंच कळत पण होतं. आणि जे काही कळत नव्हतं ते सांगायला आमचा मित्र होताच.

हल्ली तामिळनाडु, केरळ, बंगालात एक  नवीन फॅड आलंय. म्हणतात की काही सुपरनॅचरल गोष्टीं आहेत आणि त्यासाठी बरेच खरेदीदार आहेत अगदी वाट्टॆल ती किंमत देऊन विकत घ्यायला. उदाहरणार्थ राइस पुलर किंवा नाग मणी हे अगदी मोस्ट सॉट फॉर वस्तूमधे मोडतात.(या नागमण्याचे बरेच फोटो आहे गुगल सर्च करा फोटॊ सर्च..) या व्यतिरिक्त अशा गोष्टीं मधे अजूनही बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.या अशा गोष्टींसाठी खूप गिऱ्हाइकं वाट पहात आहेत, तेंव्हा तुम्हाला मिळत असेल तर सोडू नका.. अशी मानसिकता तयार केली जाते.

असंही सांगितलं जातं की ह्या गोष्टी साठी इंटर्नॅशनल मार्केट मधे करोडॊ रुपये मोजण्यासाठी लोकं तयार आहेत.कित्येक लोकं या ठग लोकांच्या नादी लागुन आपले पैसे आणि मनःस्वास्थ घालवुन बसलेले आहेत.

तुमच्या आता लक्षात आलं असेलच की हा एक मोठ्ठा कॉन गेम आहे. तुम्हाला अगदी हातोहात फसवले जाते, आणि तुम्हाला अगदी कळणार पण नाही कसं ते..!इतक्या प्रलोभनाच वलय तुमच्या भोवती निर्माण केलं जातं , की तुम्ही त्यात एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात किड्याने सापडावे तसे सापडता..तुम्हाला असं भासवल जातं की तुम्ही जो नागमणी विकत घेताय तो खरा आहे  आणि त्याची किंमत कमीत कमी १०० करोड रुपये आहे. आता १०० करोड कमवायला जर तुम्हाला३- ५ लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागत असतील तर त्यात काय हरकत आहे? तुम्ही हा मणी घेतला की लगेच इंटरनॅशनल बायर्स आहेत हा विकत घ्यायला. मुंबईला पण वसईचा एक व्यापारी यात फसला असे पेपरला आले होते.

या लोकांचा कारभार चालतो कसा? अगदी हाय टेक आहे. म्हणजे तुम्हाला सगळी माहिती नेट वर आहे..  खरेदी विक्री करणारे नेटवर संपर्क साधतात आपल्या सावजा बरोबर . आणि नेट वर माहिती आहे म्हणजे ती खरी आहेच असंही लोकांना वाटतं.

नाग मणी हा स्वयंप्रकाशी असतो, आणि त्याच्या टेस्ट कशा करायच्या ते पण दिलेल्या आहेत इंटरनेट वर. या टेस्ट देणारे पण एक्सपर्ट्स म्हणजे याचेच लोकं. वसईच्या एका सोनाराच्या नागमण्याने प्रकाश देणे बंद केले तेंव्हा लक्षात आली कॉन गेम, आणि त्याने पोलिस कम्प्लेंट केली.साइट पुढे दिलेली आहे.

२० नखांच्या कासवाची पण खूप डिमांड आहे, अशा कासवाची तुम्ही पुजा केली की मग सगळ्या पंचक्रोशितल धन तुमच्या घरात येतं. ( हसु नका) लोकं आहेत यावर विश्वास ठेवणारे..

इसवीसन १६१६चं  एक रुपयाचं कॉइन.. ह्यामधे राइस पुलिंग प्रॉपर्टिज आहेत असं म्हणतात. तसेच एक गॉगल जो घातला की  कपड्याच्या आतलं पण दिसतं .. त्याची पण चर्चा आहे, आणि त्या टीव्ही वर सांगितलंय की कित्येक लोकांना फसवलय त्या साठी.

सीडी देशमुखांची सही असलेली ५ रुपयांची नोट जिच्यावर मागे ५ हरणांचे चित्र आहे तिला पण खूप मागणी आहे. मी माझ्या कझिनला विचारले तर तो म्हणाला की भारत सरकारने ५ हरणांचे चित्र असलेली   नोट छापलीच नाही आज पर्यंत.केवळ चार हरिण असलेली नोटच छापलेली आहे.. आणि ती पण फार पुर्वी…

बरं इतकं सगळं झालं, पण राईस पुलर?? ही काय भानगड आहे? काही तांब्याच्या वस्तुच्या मधे एक प्रकारची पॉवर असते की ज्या मुळे त्या वस्तु कडे तांदुळ ओढला जातो मॅग्नेट प्रमाणे. इमारतीच्या वरच्या लाइटनिंग अरेस्टर मधे ही पॉवर असते असं म्हणतात. तसेच राइस रिपेलर.. हा फिनॉमिना पण असतो.बरं, जरी आपण मान्य केलं की अशी पॉवर असते, तरी पण या राइस पुलिंग पॉवर किंवा रिपेलंट पॉवरचा काय उपयोग आहे? अगदी काहीच  नाही…. पण तरीही या ( नसलेल्या) प्रॉपर्टीला खूप अनन्यसाधारण महत्व दिलं जातं.

आणि तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं, हे सांगितलं जातं की ईंटरनॅशनल बायर्स आहेत ह्या आयटम साठी. आणि तुम्हाला वेब साईट चा पत्ता पण दिला जातो, जिथे काही बायर्स नी राइस पुलर्स विकत घेण्यासाठी केलेल्या ऍडव्हर्टाइझ असतात.तुम्ही ह्या बायर्सना कॉंटॅक्ट केले,की तुम्हाला ते सांगतात की तुमच्या कडे असलेले राइस पुलर किंवा इतर एखादा आयटम विकत घेण्यास ते तयार आहेत .. काही कोटी रुपयांना..अशा प्रकारे लोकांची मानसिकता तयार केली जाते. मोठी गॅंग आहे या  लोकांची.

ह्या तर केवळ दोन तिन वस्तुंच्या बद्दल लिहिलंय मी.. अशा कित्येक वस्तु आहेत ज्यासाठी लोकं कितीही पैसे मोजायला तयार आहेत .. आणि इझी मनी म्हणुन.. मध्यमवर्गीय लोकं इंटरेस्टॆड आहेत. इथे त्या लोकांची वेब साइट दिलेली आहे .. चेक करा..

या अशा गोष्टींसाठी लोकं लाखो रुपये देतात.. आणि स्वतःला फसवून घेतात. एक मोठा कॉन गेम आहे हा. अगदी शिकले सवरलेले लोकं पण यात अडकून वहावत गेले आहेत, आणि स्वतःचे लाखो रुपये गमाउन बसले आहेत.

टीव्ही वरच्या कार्यक्रमामधे अशाच लोकांना एक्स्पोझ केलेलं होतं . तामिळांचे नरेंद्र दाभोळकर असावेत ते. बरं सगळ्यात शेवटी  पुन्हा एकदा हेच सांगायचंय की हे जे काही वर लिहिलंय ते खोटं आहे, माझ्या मते नागमणी, राइस पुलर वगैरे काही नसतं.. जस्ट करमणूक म्हणून वाचा आणि सोडून द्या..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to कॉन गेम-अंधश्रध्दा

 1. bhaanasa says:

  कसे लोक इतक्या भंपक गोष्टीच्या मागे लागतात? असं खरचं काही असतं तर विकणारा तुम्हाला कशाला विकेल स्वत:लाच ठेवेल ना…. इतकही लक्षात येत नाही म्हणजे कमाल झाली.

 2. Mahendra says:

  पैसा.. पैसा हे एकच उत्तर आहे. इझी मनी कोणालाही हवा असतो. मग त्या साठी बऱ्याच गोष्टींच्या कडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केलं जातं.

 3. श्रद्धा आणि अंधश्रद्धा -देव – दानव वगैरे वगैरे – फार जुना वाद आहे… टी.व्ही. वर येणार्‍या जाहिराती बघा – काही रंगाचे खडे… धातु… रुद्राक्ष – त्यातही एकमुखी – पाचमुखी – सुर्यमुखी – चंद्रमुखी .. अगदी खरा रुद्राक्ष भासेल असे नकली रुद्राक्षही बाजारात मिळतात आणि लोक त्याला फसतातही! चांगले जाने-माने लोक आणि टी.व्ही. स्टार्स त्यांची जाहिरात करतात.. उदा. अनुप जलोटा!

  नवस बोलणे – कौल लावणे या परंपरा आजही आहेतच ना!
  … माझेच उदाहरण सांगतो- आमच्या मातोश्री कोणतेतरी नवस बोलल्या होत्या – आणि त्याची फेड करण्यासाठी बोकड कापणे ठरले होते.. मात्र एकाच्या जागी पाच बोकड पाहुन मीही शौक्ड् झालो होतो.. नंतर कळाले – नवसच पाच बोकडांचा ठरला होता..! तेंव्हा पासुन मात्र मी आमच्या घरात असे नवस बोलणे वगैरे वर पुर्णत: बंदी केली… मी देव मानतो – तशी श्रद्धाही आहे – मात्र अंधश्रद्धा अजिबात नाही!

  • Mahendra says:

   श्रध्दा जरुर असावी, कारण श्रध्दा हीच तुमचे मानसिक बळ वाढवण्यासाठी उपयोगी ठरते, फक्त श्रध्देची अंध श्रध्दा होऊ देऊ नये.. एवढंच..
   बेजान दारुवालाचे तर अघोषित राज्य आहे या विषयावर. काळे कपडे घातलेला एक दाढीधारी माणुस पण असायचा शनीची पुजा करा सांगणारा.. असे तर बरेच लोकं आहे, श्री यंत्र, लक्ष्मी यंत्र वगैरे…
   प्रतिक्रियेकरता आभार..

 4. गुरुनाथ says:

  आमच्या शेतात शमीचे झाड होते, तिथे दरवर्षीची सीमोलंघनाची पुजा व्हायची, बाबा तलवार वगैरे पुजतात तिथे, त्याच्या खाली “गुप्तधन” असल्याचे त्यांना एकजण बोलला, आमचे फ़ादर पण मुलुखाचे मिष्किल, तो पठ्ठ्या म्हणाला “काढायला ४ लाख खर्च येईल पण घबाड कमीतकमी ३ कोटीचं आहे” तसे फ़ादर ताडकन म्हणाले “तु एक काम कर, तुच हा खर्च कर.ते वर काढ तुझे ४ काढुन घे. २.९६ मला दे!!!!”
  त्या बुआंनी जे तोंड फ़िरवले ते आजतागायत परत दिसलेच नाहीत!!!!!

Leave a Reply to Mahendra Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s