सी लिंक

sea link

हा फोटो आहे मला ई मेल ने आलेला!!!

हा फोटो आहे मला ई मेल ने आलेला. ५ तारखे पर्यंत हा ब्रिज फुकट आहे. म्हणजे कोणीही या ब्रिज वरुन टोल टॅक्स न भरता जाऊ शकेल.. काल तर काही जमलं नाही उद्घाटनाला जाणं!लेसर शो पहायला जाण्याची इच्छा होती, पण धाकट्या मुलीचा क्लास… वगैरे मुळे राहुन गेलं..! उद्या सकाळी गोव्याला जायचंय,  म्हणजे उद्या पण जाणं शक्य नाही. तेंव्हा बहुतेक शनिवारीच जाइन या सिलिंक वर भटकायला.

कधीचा तो ब्रिज पहातोय दुरुनच.. खुप इच्छा आहे.. अगदी एक्सप्रेस वे सुरु झाला होता ना, तेंव्हाच जे फिलिंग होतं तेच फिलिंग आज पण आहे.  पहिल्या वेळेस एक्सप्रेसवे ने पुण्याला गेलो होतो तेंव्हाचा आनंद “प्राइसलेस”!मुंबई ते पुणे.. म्हणजे माझं घर  मालाड ते पुणे इतकं अंतर मी केवळ २ तास २५ मिनिटात कापलं. पुण्याला पोहोचलो, आणि सौ. ला फोन केला.. तर तिला आश्चर्यच वाटलं.. आणि याचं आऊटकम म्हणजे तिने  माझं या हायवेवरचं ड्रायव्हिंग बरेच दिवस बंदच केलं होतं- खूप फास्ट चालवली कार म्हणून!पहिल्या प्रवासात-  खूप मज्जा आली होती, पण नंतर शेकडो वेळा जरी त्या रोडने गेलो असेल ,पण तशी मज्जा पुन्हा अनुभवता आली नाही.

एक मित्र आजच त्या रोडने जाउन आला, सांगत होता अगदी फुल्ल ट्रॅफिक जॅम आहे. सी लिंक क्रॉस करायला जवळपास ४५ मिनिटं लागलीत. आता या सिलिंक वरुन पण कधी एकदा प्रवास करिन असं झालंय.

पुन्हा एकदा तोच निर्भेळ आनंद अनुभवायचाय-पहिलेपणाचा, नवेपणाचा , पहिल्या प्रवासाचा!!

सावरकर सेतु की आंबेडकर सेतु की राजीव गांधी सेतु की इंदिरा गांधी सेतु….?? पवार पेटलाय. तसाच आता आठवले पण पेटला की झालं.. नुसता धुमाकुळ!याच नावाच्या राजकारणावर पुर्वी एक लेख लिहिला होता.  आता पुन्हा काय लिहायचं… कोळसा उगाळावा तितका काळाच!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

11 Responses to सी लिंक

 1. rohan says:

  ‘सी लिंक’ चे फायदे तितकेच तोटे सुद्धा आहेतच … !!! बाकी राजकारण बाजूला ठेवुया … तरी सुद्धा काम सुरु झाला तेंव्हा सावरकरांचे नाव द्यायचे ठरले असताना राजीव गांधी यांचे नाव कसे ठेवले गेले हे बाकी कोडेच आहे..

 2. nimisha says:

  तुला आत्ता जितकं तिकडे जावसं वाटतंय नं,तितकाच टॅफिक मध्ये अडकलास की कंटाळून जाशील…मी होते नं कालच्या हौशा,नवशा,गवशांमध्ये….पण अशी पकलेय ना की बस्…. आत्ता टोल नसल्याने सगळी मुंबई लोट्तेय…आणि ब्रिजचे कठडे जरा जास्तच ऊंच आहेत त्यामूळे लो कार्समधून तर धड समुद्रही नीट दिसत नाही;म्हणजे स्पीडचा आनंदही नाही ट्रॅफीकमुळे ,आणि सृष्टीसौंदर्याचा आस्वादही काही खास घेता येत नाही ऊंच कठड्यांमुळे…!

 3. Mahendra says:

  निमिषा
  अगदी मान्य. माझा मित्र पण हेच सांगत होता. पण पहिलटकरणिच्या वेदना अनुभवायच्या आहेतच. आता मी वाट पहाणार त्यावर टोल टॅक्स लागण्याची आणि नंतरच जाणार त्या ब्रिजवर.
  बेस्ट एक बस सुरु करणार म्हणे लंडन सारखी. डबल डेकर बस, वरचा भाग पुर्ण काचेचा.. कधी ते देव जाणे.पण जर ती बस केली तर मूंबई चं छान दर्शन घेता येइल सि लिंक वरुन.
  प्रतिक्रिये करता आभार..

 4. Nilesh says:

  हा ही पोस्ट फार छान आहे. मी तुमचे पोस्ट नेहमी वाचतो. मला ते आवडतात.

  निलेश जोगळेकर

 5. Aparna says:

  मलाही हा फ़ोटो आला आहे. अगदी अमेरिकेतल्या ब्रिजेस सारखा वाटतोय. बरय आपल्याइथेही अशी बांधकामं होताहेत हे. जाऊन आलात की कळवा. आणि हो एक्सप्रेस हायवेबाबत तुमचं म्हणणं अगदी खरयं. आम्ही एक सुमो भाड्याने घेऊन साताठ मित्र-मैत्रीणी गेलो होतो आणि सॉलिड धमाल केली होती पहिल्यांदा. नंतर ती फ़िलिंग आली नाही.

 6. inkblacknight says:

  ह्या पुलाच्या फायद्यानविषयी (?) मी एक विनोदी लिहायला घेतल होत, अपुरंच आहे अजुन …

 7. inkblacknight says:

  माझ्या फोटोवर किंवा नावावर क्लीक होत नाही, अस का होत असेल, कळत नाहीये … आणि ते एक कारण असाव की कुणीच माझ्या ब्लोगवर येत नाही …

  • Mahendra says:

   कुठल्याही ब्लॉग वर कॉमेंट टाकता तेंव्हा, नांव आणि तुमच्या ब्लॉगची आयडी जरुर देत जा. कॉमेंट टाकतांना तिन ऑप्शन्स दिसतिल. एक ) नांव आणि ब्लॉग दोन) तुमचे नांव तिन) ओपन आय डी. तुम्ही शक्यतोवर दुसरा ऑप्शन वापरा , ज्या मधे तुमच्या ब्लॉग ची लिंक पण दिलेली असते. नुसते नांव आणी इ मेल आय डी देउन तुमच्या ब्लॉगची लिंक तुम्ही टाकलेल्या कॉमेंटवर दिसणार नाही.

 8. inkblacknight says:

  I can’t see the 3 options you mentioned. However, now I have written my site URL…

  http://asachkahitari.wordpress.com/

Leave a Reply to Aparna Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s