गे……..?

’गे’ म्हणजे आनंदी.. लहानपणी घोकून पाठ केलं होतं. तर्खडकरांच्या पुस्तकात हा शब्द वाचून चांगला पाठ केला होता. या शब्दाचा ’दुसरा’ अर्थ मला कित्येक वर्ष माहिती नव्हता. ’त्या’ ज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी जरा मागासलेला होती. असं काही असू शकतं.. हे खरंच वाटु शकत नव्हतं.पण जसं जसं मोठं होत गेलो, तेंव्हा ही ग्रे शेड असते एखाद्याच्या आयुष्यात हे जाणवलं. अशोक राव कवी वगैरे मंडळींचे लेख वाचलेत. आणि जेंव्हा थोडा ब्रॉड माइंडेडली विचार केला तेंव्हा लक्षात आलं, की असंही असू शकतं!!

आता ईंटरनेट भारतामधे पॉप्युलर झालं.. साधारण १२ वर्षा पुर्वी. तो पर्यंत कोणी एखाद्याने प्ले बॉय आणलं, किंवा फार तर डेबोनिअर आणलं तर त्यातली चित्र पहायची एवढंच ज्ञान होतं या बाबतीतलं. मुलं अगदी जीव टाकायची प्ले बॉय वाचायला ( की पहायला?) पण इंटरनेट आल्या नंतर या गोष्टी अगदी सहज पणे बघायला मिळू लागल्या. एकदा  सेक्स टाइप केलं गुगल च्या सर्च मधे बस्स!! झालं..

अगदी बिटींग अराउंड द बुश न करता, अगदी सरळ लिहितोय, कालच्या पेपरला वाचतांना हे पण वाचलं की पतिपत्नी मधे सुध्दा ओरल  हा प्रकार अन नॅचरल सेक्स्युल ऍक्ट मधे मोडतो, आणि कायद्याने तो गुन्हा आहे.असा गुन्हा केल्यास तुम्हाला शिक्षा पण केली जाऊ शकते.   आता कोणी आपल्या बेडरुम मधे काय आणि कसं वागायचं तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे.  सरकारने कोणी कसं रहायचं हे  कसं काय ठरवू शकते?

’गे’  किंवा लेस्बियन सेक्स हा पण कायद्याने गुन्हा होता. तरी पण हल्लीच्या काळात मात्र, बरेच लोकं क्लोझेट मधून बाहेर आलेत. बरेच फॅशन इंडस्ट्रीवाले डिझायनर्स , हे तर अगदी सरळ लक्षात येण्यासारखे ’गे’ वागतात.अशोक राव कवी हा ’ए’ ऍक्टीव्हिस्ट तर खूपच जोमाने आणि नेटाने गे सेक्स लिगलाइझ करण्याचा प्रयत्न करित होता. माझ्या पूर्वीच्या एका पोस्ट मधे मी याला खूप शिव्या पण घातलेल्या आहेत!

’गे’ किंवा ’लेस्बो’ रिलेशन्स चांगले की वाईट किंवा हा कोर्टाचा निर्णय योग्य की नाही, हा प्रश्न नाही.. काही दिवसांच्या पुर्वी ठाण्याला काही तरुण मंडळी अशाच एका गॅदरिंग मधे पोलिसांनी पकडली होती. सगळी मुलं मध्यमवर्गीय घरातील होती. ईंटरनेटवर याहु ग्रुप मुंबई गे असा काही तरी स्थापन करुन त्यात मेसेजेस टाकुन ही मंडळी एकत्र भेटायची. सगळं काम चोरी छुपे चालायचं… आता  पोलिसांची भिती नाही.. सगळं ओपनली होईल..

समुद्राच्या कठड्यावर एखाद्या मित्रा बरोबर भुट्टा खात चकाट्या पिटत बसाल, तरी पण पोलीस येउन तुम्हाला हटकेल.. !काहो, तुमचा याराना कां? सिनेमा मधूनही हा विषय चघळला गेला. पण स्टॊरीची साइडलाइन म्हणुन.

गे लोकं मल्टीपल पार्टनर्स ठेवणार. कारण लग्नानंतरची  कमिटमेंट या लोकांच्या मधे नसते. तेंव्हा हा ग्रुप हा एच आय व्ही साठी हाय रिस्क ग्रुप ठरतो. हाच खरा महत्वाचा प्रश्न!

ह्या प्रकाराला पुर्वी कायद्याने मान्यता दिलेली नसली तरीही तो अस्तित्वात तर होताच. कायद्याने मान्यता दिल्यामुळे काही फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही. कायदेशीर झालं म्हणून कोणी सेक्स्युअल प्रिफरन्सेस चेंज करणार नाही. केवळ, जे लोकं ऑलरेडी यात आहेत त्यांच्या मागचा कायद्याचा ससेमिरा सुटेल. आणि सो कॉल्ड कायद्याच्या संरक्षकांकडुन दिला जाणार त्रास वाचेल, एवढंच काय ते या कायद्याचं फलित!

असे अजुन काही विचित्र कायदे  इतर देशात अजूनही आहेत… कदाचित वाचून खरं वाटणार नाही.  ………………

लेबनॉन मधे प्राण्यांच्या बरोबर सेक्स्युअल इंटरकोर्स करणं हा गुन्हा नाही.. जर तो प्राणी फिमेल असेल तर. पण जर तो प्राणी मेल असेल तर मात्र प्राण दंडाची शिक्षा आहे.

बहरिन मधे पुरुष डॉक्टर कायद्याने स्त्रीचे अंतर्गत अवयव तपासू शकतो, पण  त्यांच्या कडे डायरेक्ट पहाणं कायद्याने सम्मत  नाही. त्या अवयवांकडे तपासणीसाठी पहाण्या करता त्याला ’ त्या अवयवांच्या’ आरशातल्या प्रतिमांकडे  पाहून तपासावे लागते .

गुआम मधे बरेचसे पुरुष केवळ पैसे घेउन व्हर्जिन मुली डिफ्लॉवर करण्याचे काम करतात. आता हे असं का?? याचं कारण आहे की, गुआम मधे व्हर्जिन्स ना लग्नाचा अधिकार नाही.

ट्रॉपिकल फिश स्टोअर्स मधे लिव्हरपुल , इंग्लंड ला टॉपलेस सेल्स गर्ल्स लिगली अलाउड आहेत.

कॅली  ( Cali) कोलंबीया ला स्त्री जेंव्हा पहिल्यांदा तिच्या पती बरोबर समागम करेल तेंव्हा तिची आई समोर असणे आवश्यक आहे.

अमेरिकेत ओरल सेक्स इल्लिगल आहे ( अरीझोना इनक्लुडेड)
व्हर्जीनिया मधे लाइट्स सुरु ठेउन समागम करणे कायद्याने गुन्हा आहे.

ऑरिगोन, ला पतीने समागमाच्या वेळेस सेक्सी बोलणं कायद्याने गुन्हा आहे.

वॉशिंग्टन डीसी मधे  मिशिनरी पोझिशन मधे समागम करणे लिगली मान्य आहे. इतर सगळ्या पोझिशन्स इल्लिगल!

हॅरिस्बर्ग, पेनिसिल्व्हिया ला ट्रक ड्रायव्हर बरोबर टोल बुथ मधे समागम करणे गुन्हा आहे.

उटाह मधे फर्स्ट कझिन बरोबर लग्न करायचे असल्यास कायदेशिर वय आहे ६५!

जर प्राण्याचे वजन चाळिस पाउंडापेक्षा कमी असेल तर वॉशिंगटन डिसी मधे त्या प्राण्याबरोबरचा समागम अगदी कायदेशिर आहे.

दोहा , कतार मधे जर एखाद्या स्त्री ला आंघोळ करतांना एखाद्या परपुरुषाने पाहिले तर तिने आधी आपला चेहेरा झाकला पाहिजे असा कायदा आहे.

डेट्रॉइट ला कार मधे समागम करणे कायदेशीर नाही. फक्त कार स्वतःच्या मालकीच्या परिसरात असेल तर मात्र असा समागम कायदेशीर आहे.

असे हज्जारो कायदे आहेत, तुम्ही ईंटरेस्टेड असाल तर नेट वर सर्च करा. काही तर खूपच फनी आहेत.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

11 Responses to गे……..?

 1. somnath thakare says:

  शेवटी जग कितीही पुढे गेले तरी खालील ओळींप्रमाणे मुलामुलींची कुचंबना व्हायला नको

  मी आहे होमो आणि ती आहे लेस्बीन
  कसा व्हायचा आमचा व्यालेटांईन
  – कविराज ठाकरे

 2. rohan says:

  मला वाटतं हा प्रत्येकाचा खुपच वैयक्तिक प्रश्न किंवा विषय आहे… मी कसा असणार आहे हे ठरवण्याचा हक्क खरतर आपल्याला जन्मतः नाहीच आहे की…

  सामाजिक पातळीवर किंवा समाजाला जोपर्यंत ह्याचा त्रास होत नाही तोपर्यंत काहीच हरकत नसावी… 🙂

  • Mahendra says:

   रोहन
   हा कायदा तर काहिच नाही. मी नेट वर सर्च केलं तर असे हज्जारो कायदे आहेत प्रगत देशात सुध्दा, की जे बदलणं आता आवश्यक आहे.
   सर्च करा, मस्त इन्फर्मेशन आहे नेट वर. मी इथे फारच कमी पोस्ट केलेत, असे खुप कायदे आहेत.
   प्रतिक्रिये करता धन्यवाद..

 3. बर्‍याच लोकांनी हा कायदा होण्यासाठी जोमाचे प्रयत्न केले जसं – अशोक राव … सेलेना जेटली … वगैरे वगैरे..

  … हा प्रश्न / विषय जरी वैयक्तिक असला तरी त्याचा परिणाम सामाजिक नाही का? निसर्गाच्या विरुद्ध नाही का? अमानवीय नाही का?

  असो… त्यांना त्याचं काय – बने चाहे दुश्मन जमाना हमरा… सलामत रहे “दोस्ताना” हमारा ..हेच खरं!

  • Mahendra says:

   एका पेपर मधे बातमी होती… ३७७ स्क्रॅप्ड, मिल्ट्री हॅपी.. काय म्हणावं याला आता??

 4. Dipak says:

  प्रिय वाचक हो

  सर्व काही संस्कारावर अवलंबून असते. आपण सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशात लैंगिक शिक्षण हे मुलांना कशा पध्दतीने मिळते. माझ्या मता प्रमाणे मुलांच्या किंवा मुलींच्या समवय गटांच्या चर्चेतुन ही जिज्ञासा काही प्रमाणात पुर्ण होते. या गप्पांमधुन बहुतेक मुले मुलींकडे आकर्षित होतात. पण ज्या मुलांना अशा गटात गप्पांची संधी काही कारणांनी मिळत नाही किंवा ती मुले एकल कोंडे बनतात. त्यांचा मुलांचा संपर्क कमी होतो व त्यातुनच त्यांना मुलांविषयी सुरुवातीला थोडे आकर्षन व नंतर त्याचे पर्यवसन गे मानसिकतेत होत असावे असे मला वाटते. पण एकदा हि मानसिकता बनली की ती खुप खरी असते. मग अशा मानसिकतेला आपण चुक कसे म्हणता येईल?

  हे विचार करण्याकरिता आहे. आग्रह नाही.

 5. Catch says:

  परवालाच फिलाडेल्फिआ मध्ये दोन पुरुषांना एका फुटपाथावर एक मेकांना किस करताना पाहिले. अगदी विचित्र वाटले. ते दृश्य आपण पाहु पण शकत नाही.

  जे सपोर्ट करत आहेत. त्यांनी फक्त एवढं सांगावं तुमच्या मुलाने किंवा मुलीने तसं करायचं ठरवलं तर त्याला / तिला तुम्ही किती सपोर्ट कराल?

 6. Mahendra says:

  दिपक आणि कॅच
  प्रतिक्रियेकरता आभार..

 7. जतिन says:

  i think gay sex is best sex

  im gay

Leave a Reply to Catch Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s