मायकेल जॅक्सन मुन वॉक

मायकेल जॅक्सनची गाणी तो जिवंत असतांना मी कधीच ऐकली नव्हती किंवा पाहिली पण नव्हती. पण त्याच्या मृत्यु नंतर मात्र सगळे व्हिडिओ आवर्जून पाहिले. कधी कधी तर वाटतं.. की या माणसाला बोन्स आहेत की नाहीत? एखाद्याची बॉडी फ्लेक्झिबल असते … पण इतकी??

खरं सांगतो, त्याच्या काही डान्स मुव्हज फारच प्रोव्होकेटिव्ह नेचरच्या आणि ऑब्सेन  वाटल्या, पण काही मात्र अगदी मार्वलस!! नो वर्ड्स.. !! हॅटस ऑफ टु हीम.. !स्पेशिअली मुन वॉक आणि  ४५ डिग्री चा बेंड तर अगदी मस्तच.. त्याच्या पिले.. पिले.. या गाण्यावरचा डान्स पण खूपच आवडला..

मायकेल च्या बाबतीत बरंच लिहिलं गेलंय. तसेच त्याच्या बुटांच्या बद्दल पण! त्याच्या ऍंटी ग्रॅव्हीटी शूज मुळे तर अगदी सगळे आश्चर्य चकित झाले होते. त्याची ती फेमस पंचेचाळीस डिग्रीची समोर वाकण्याची मुव्हमेंट म्हणजे फिजिक्स चे बेसिक प्रिन्सिपल्स चुकीचे ठ्ररवायला पुरेशी आहे. या डीझाइनचं त्याने पेटंट पण घेतलं.

या बुटांच्या मधे एक सिस्टीम असते, जिच्यामुळे स्वतःच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा बाहेर जाउन  समोर वाकता येतं. या बुटांना एक हिल स्लॉट असते, जी केवळ पाय समोर स्लाईड करुन एंगेज करण्यात येते.आधी जेंव्हा त्याच्या स्मुथ क्रिमिनल चा पहिला शो झाला तेंव्हा त्याला लोकांनी  डोक्यावर घेतलं होतं.लोकांना आधी कळलंच नाही की इतका समोर वाकू कसा शकतो?याचं रहस्य लवकरच उघड झालं, जेंव्हा त्याने पेटंट घेतल्याचं समजलं तेंव्हा.

इथे एक व्हिडीओ दिलेला आहे यु ट्य़ुब चा त्या मधे ३.५३ च्या वेळेवर ( यु ट्य़ुब मधे खाली येणारी वेळ) मायकेल शूज च्या हिल्स ला स्लाईड करतांना दिसतो.

इथे त्याने घेतलेले बुटाचे पेटंट पोस्ट केले आहे.

michael-jackson-shoes

अमेरिकन मेटल आर्ट स्टूडीओ ने त्याच्या साठी एक सिल्व्हरचा शु तयार केलेला होता.   स्टर्लिंग सिल्व्हरचा हा बुट त्याने कधी घातला की नाही ते माहिती नाही.इथे त्याचा फोटॊ आहे..

silver shoes१९८३ मधे त्याने केलेल्या मुन वॉक च्या मुव्हने तर पब्लिक अक्षरशः वाइल्ड झालेली होती. त्या मुव्ह मुळे त्याच्या लोकप्रियतेमधे खुप वाढ झालीतो व्हिडीओ पाहिल्या नंतर त्याची ओरिजनॅलिटी लक्षात येते. नो डाऊट ही न्यु हिज जॉब वेल!.इतकी सोपी वाटणारी ही मुव्ह , ऍक्चुअली कॉपी करायला खुप कठिण आहे असं नाही, पण इतकी सोपी पण नाही..तो व्हिडिओ इथे आहे.

मुन वॉक कसा करायचा यावर बऱ्याच साइट्स आहेत. मायकेल जॅक्सन च्या रोबोट डान्स बद्दल लिहिल्याशिवाय हे पोस्ट पुर्ण होऊच शकत नाही.म्हणुन इथे त्या व्हिडीओ ची क्लिप पोस्ट करतोय.


त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल बरंच काही लिहिलं जातंय.. नविन नविन गोष्टी बाहेर येताहेत, पण त्याचं संगिताच्या क्षेत्रातलं योगदान अमुल्य आहे असे वाटते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

15 Responses to मायकेल जॅक्सन मुन वॉक

 1. Rohan says:

  माइकेल म्हटला की आठवते शाळेत असताना ऐकलेली आणि पाहिलेली त्याची गाणी … आणि त्या नंतर ‘जोनी लिवर’ने त्याच्यावर केलेला एक item … 🙂

  माणूस म्हणुन तो कसा होता ते माहीत नाही पण संगीत क्षेत्रात त्याचे योगदान नक्कीच उल्लेखनीय राहिल … !!!

 2. davbindu says:

  मी फार पूर्वी जैकोचे काही विडियो पाहिले होते.पण त्यापेक्षा जास्त विडियो आता तो गेल्यावर बघितले.खरच मला मध्येच अस वाटत होत की नक्की हा मनुष्य आहे की एखादा रोबोट आहे.
  काहीही असो त्याच्या कलेला लाख लाख सलाम ….!

 3. bhaanasa says:

  जिवंत असेतो स्वत:ची इमेज जपण्यासाठी जो इतका धडपडला आज मरणोत्तर त्याच इमेजचा अक्षरश: चक्काचूर होतोय. हे पाहून खरेच वाईट वाटतेय. पण शेवटी सत्य कितीही झाकले तरी कधीतरी उघडे पडतेच. असो. संगीत क्षेत्रातला एक दिग्गज मात्र नक्कीच गेलाय.
  लेख नेहमीप्रमाणेच उत्तम झाला आहे.

 4. Amol says:

  well have you seen his song “black or white”, there are lot of people doing their folk dance, and he dances with all of them, the best part of that is, his dance dosent look out of place with all those dancers from all around world.
  He also dances with indian girl doing bharatnatyam ( I am guessing) and he does simple beautifull. the song is also good.

 5. Amol says:

  another typical MJ thing is his music videos are longer than any other at that time. look at those times. Thriller video is about 10 minutes long.

  • Mahendra says:

   अमोल
   त्याचे बरेच व्हिडिओज पाहिलेत.. अगदी मनामधे काहिही पुर्वानुग्रह न ठेवता. आणि खरंच एंजॉय केलेत. त्याची गाणी तर फारशी कळली नाहित, पण डान्सच्या स्टेप्स अगदी माइंड्ब्लोइंग!!
   अजुनही बरिच गाणि ऐकायची आहेत. बहुतेक पुढच्या रविवारी.

   भाग्यश्री,
   त्याच्या फायनानशिअल सिचुएशन बद्दल वाचलं आणी वाईट वाटलं.. करोडो रुपयांचा स्वामी.. पण त्याची क्रेडीट लिमिट फक्त २० हजार रुपये होती असं वाचलंय. एका लहानशा व्हिडीओ करता ७५ करोड डॉलर्स खर्च करणारा माणुस हाच कां असा प्रश्न पडतो!

 6. supriya uday says:

  maheshji
  Apratim post.
  Keep writing , tumche lekh vachyala khup awadate.

 7. Aparna says:

  Lekh uttam…Tumhala tyache Black or white pan mahit navata?? that is one very good song and video..Tumchya mulina mahit aasel bahutek….Aata tyachya funeral chi tickets wikun bahutek tyacha krja fedtil asa watata…

  • Mahendra says:

   अपर्णा,
   मुलिंना पण इंग्लिश गाणी ऐकायची आवड नाही. सध्या तरी फक्त हिंदी सिनेमांचीच गाणि आणि मराठी ऐकतात. अभ्यास करतांना एफ एम रेडिओ सुरु असतो सारखा. 🙂

 8. bhagyashree says:

  tyachya dance moves jasha jabari ahet, tasach tyachya ganyanche lyrics..! tumhi lyrics shodhun tyachi hi gani aika.. Heal the World, Earthsong, Gone too soon, We are the world, keep the faith, black or white, they don’t care about us ani even beat it ani why you wanna trip on me.. Wonderful meaning his song has..

  amazing artist indeed! baki personal life che dhindavade nightayt te mi na baghnach pasant karte! 😦

  • Mahendra says:

   भाग्यश्री
   धन्यवाद. तुम्ही दिले आहेत त्या पैकी वि आर द वर्ल्ड आणि किप फेथ ऐकलं. खरं सांगायचं तर मला इंग्लिश गाण्यांची लिरिक्स समजुन घ्यायला खुप त्रास होतो. बरेचदा तर समजत पण नाहित. 😦 नेट वर शोधुन काढतो लिरिक्स आता. प्रतिक्रियेकरता आभार.

 9. Pradnya says:

  Hello!

  I get disturbed when people in India only praise about his dance moves.. He was an amazing singer and composer FIRST. and then a performer. He was a super talented person. I absolutely admire his music. As you mention about the song “PILE PILE”, it is NOT pile pile.. haha It is “BEAT IT.. BEAT IT”. Anyway.. Nice post.

 10. jivanika says:

  खूप उशिरा आहे हि comment पण खर सांगायचं तर वाईट वाटत जेव्हा सगळे म्हणतात कि त्याच्या personal life बद्दल काही घेण देण नाही. तो काही इतका वाईट नव्हता पण media ने त्याला वाईट बनवलं लोकांपुढे. मी सुद्धा कधी त्याची गाणी ऐकली नव्हती पण तो गेल्यावर ऐकली आणि खरं सांगू आता फक्त त्याचीच गाणी ऐकते .अप्रतिम lyrics.
  smile, childhood, will you be there, you are not alone, man in the mirror, आणि भरपूर आहेत.
  just listen the songs ‘One Day in Your Life’,’With The Child’s Heart’, ‘To Make My Father Proud’. मला वाटत सगळ्यांना नक्की आवडेल. मला तर खूप आवडत.आणि pls तो इतका वाईट नव्हता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s