३६० -रुबिक स्फिअर

प्राध्यापक एर्नॊ रुबिक.. रुबिक क्युबचा जनक.  या रुबिक क्युब ने मला एकेकाळी वेड लावलं होतं. अगदी सारखा क्युबशी खेळत बसायचो. बराच प्रयत्न करुनही एकदाही हा क्युब सॉल्व्ह करता आला नाही. माझे काही मित्र पण ट्राय करित होतेच. तेंव्हा इंटरनेट नव्हतं .. त्यामुळे फक्त पुस्तकांवरच सगळी मदार असायची. एक दिवस एका मित्राच्या मोठ्या भावाने इंग्लंडहुन  एक पुस्तक आणलं होतं की रुबिक क्युब कसा सोडवायचा ते. ते पुस्तक वाचुन  एकदाचा क्युब सोडवायला शिकलॊ रुबिज क्युब कसा सोडवायचा ते. साधारण पणे दोन मिनिटं लागायची, पुर्ण क्युब सोडवायला. हा क्युब कसा सोड्वायचा इथे दिलंय..

या क्युब मधे पण नंतर बऱ्याच व्हेरिएशन करुन चार बाय चार चे, किंवा ५बाय ५ , ६ बाय ६ चे क्युब्ज पण मार्केटला आलेत.  २००८ च्या वर्ल्ड रुबिज क्युब सॉल्व्हिंग कॉंपिटिशनमधे अवध्या ७.०८ सेकंदामधे क्युब सोड्वुन एरिक नावाच्या झेक नागरिकाने  पहिला नंबर पटकावला.
.
रुबिक क्युब हाताळलेला नाही असा माणुस विरळाच. तरी पण बराच प्रयत्न करुनही सोड्वता आला नाही की मग आलेलं फ्रस्ट्रेशन.. आणि चिड चिड.. ही प्रत्येकानेच अनुभवली असावी. नेटवर पण बरंच काही आहे या क्युबला सोड्वण्याबद्दल.

जगात अशीही काही लोकं आहेत , की एकदा क्युबचे सगळ्या रंगाची पोझिशन्स पाहिली की मग डॊळे बांधुन क्युब सोडवु शकतात. अशा बऱ्याच प्रकारच्या कॉंपिटीशन्स पण जगभर होतात. यात नंतर स्फिअर्स, कोन,  आणि बरेच प्रकार आलेत पण क्युब इतकी पॉप्युलरीटी कोणालाच मिळाली नाही.

Rubik Ball R rubiks

१९७५ साली हा क्युब लॉंच केला गेला आणि आज पर्यंत त्याच्या ऑथोराइझ्ड  ३५० मिलियन कॉपिज सेल झालाय.त्या नंतर मग ३३ वर्षांनी , वयाच्या चौसष्टाव्या वर्षीया हंगेरियन प्रोफेसरने हे नविन पझल ( म्हणण्यापेक्षा ऍप्रोप्रिएट वर्ड आहे ब्रेन टिझर )  डिझाइन केले आहे.  दोन दिवसात हा साधारणपणे त्याच तत्वावर आधारित ’३६०’ नावाचा एक नविन खेळ लॉंच करणार आहे.
rubik-360
हे ३६० म्हणजे एक प्लास्टीक बॉल असेल , की ज्या मधे सहा वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स असतिल प्लेअरने आतल्या स्फिअरच्या सरकम्फरन्सवरचे बॉल्स त्या रिस्पेक्टीव्ह त्याच रंगाच्या  खाचेत  घालायचे. यासाठी बॉल शेक करा, आणि असलेल्या दोन होल्स मधुन ते बॉल्स डिझायर्ड लोकेशन ला बसवायचे.. प्रिन्सिपल हे रुबीज क्युबचेच आहे. मला असं वाटतं याचं नावं काहिही जरी ठेवलं तरिही रुबिक स्फिअर हेच बहुतेक पॉप्युलर होइल. दिसायला अतिशय सोपा असलेला हा खेळ अतिशय कठिण आहे, पण एकदम मस्त आहे.  वाट पहातोय या नविन गेमची कधी लॉंच होतो ते…. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , . Bookmark the permalink.

9 Responses to ३६० -रुबिक स्फिअर

 1. देवेंद्र चुरी says:

  शाळेत असताना नेहमी खेळायचो आम्ही क्युबशी.कधी कधी चालू तासाला सुद्धा आम्ही हा पराक्रम करण्यात गुंग असायचो.

  • Mahendra says:

   देवेंद्र
   खरंच ते दिवस मस्त होते. लहान पण संपल्याची जाणिव होते असं काही वाचलं की. 🙂

 2. आल्हाद alias Alhad says:

  रुबिक क्युब पाहिला की फक्त तो न सोडवता आल्याचं फ्रस्टेशन आठवतं! 😦

  • Mahendra says:

   आता ट्राय करा. ईंटरनेटवर बरेच यु ट्य़ुब व्हिडीओज पण आहेत यावर. 🙂 जमेल!

 3. rohan says:

  अरे दादा … ह्या ‘रुबिक क्युब’मुळे मला घरी फटके आणि शाळेत शिक्षा झालेली आहे. आज ही पोस्ट वाचून एकदम जुने दिवस आठवले रे … 😀 सोडवायचो तेंव्हा माहीत पण नव्हते याला ‘रुबिक क्युब’ म्हणतात ते…

  बरं आपल्या मुंबई मध्ये एक लहान मुलगा आहे त्याने डोळे बंद करून ‘रुबिक क्युब’ काही सेकंदमध्ये सोडवायचा रिकॉर्ड केलेला आहे…

  • Mahendra says:

   रोहन
   इतके खेळ निघाले , पण ३५ वर्षांनंतर पण अजुनही आपली पॉप्य़ुलरिटी टीकवुन ठेवणारा हा एकच खेळ- पझल..
   मला जमायला ( अर्थात पुस्तकात वाचुन ) १५ दिवस लागले होते. 🙂

 4. inkblacknight says:

  खुपच छान माहिती आहे…

 5. bhaanasa says:

  एकदम मस्त टाईमपास आहे हा. सगळे रंग जमविणे अजूनही जमलेले नाही पण प्रयत्न सुरू आहेत…:)

 6. Mahendra says:

  नेट वर आहे ना युट्युब मधे पण आहे कसं सोडवायचं ते.. जमेल .. नक्कीच जमेल….Best Wishes… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s