डेस्परेट मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल मधलं भांडण म्हणजे कोक आणि पेप्सी मधलं भांडण या मधे थोडासा फरक आहे. कोक – पेप्सी ह्यांची पद्धत जरा निराळी असते. म्हणजे एखाद्या देशामधे ते गेले, की आधी लोकल एस्टॅब्लिश्ड प्लेअर्स बरोबर ते कॉम्पिट करुन त्यांना नामशेष  करतात,एकदा का लोकल प्लेअर्स नी या दोघांच्या पुढे लोटांगण घातलं की मग सगळ्या लोकल ब्रॅंडस बंद करुन सगळ्या शेल्फ वर फक्त पेप्सी किंवा कोक दिसे  पर्यंत या दोन्ही कंपन्या मित्र असतात… पण एकदा का लोकल लोकं नामशेष झाले की ह्या दोन्ही कंपन्या एकमेकांशी कॉंपिट करण्यासाठी तयार असतात..  ही स्ट्रॅटेजी अगदी जगभर वापरली जाते.

मायक्रोसॉफ्ट्चं आणी गुगल यांचं भांडण हे जगजाहीर असलं तरिही ते असे एकेमेकावर आरोप प्रत्यारोप करित नाहीत. गुगल चं एक आहे कुठलंही प्रॉडक्ट लॉंच करतांना आधी बीटा व्हर्जन लॉंच करते. म्हणजे प्रॉडक्ट अंडर डेव्हलपमेंट, या उलट मायक्रोसॉफ्ट कधीच बीटा व्हर्शन लॉंच करित नाही. ( विंडॊज याला अपवाद ) आणि मग मात्र दर ८-१० दिवसांनी एखादा पॅच रिलीज करतात. माझ्या लॅपटॉपवरचं आय ई ८ मी अपडेट केलं . पण तेंव्हापासुन जेंव्हा कधी ते वापरतो तेंव्हा पासून बरेचदा क्रॅश होतं . नाही… मी गुगल क्रोम वापरत नाही. मी फायरफॉक्स वापरतो आणि मला ते सगळ्यात जास्त आवडते. मी आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात घाणेरडी जाहिरात आहे ही. इतकी वाईट जाहिरात केली म्हणजे त्याची चर्चा होते आणि पुर्ण मायलेज मिळतं. नंतर पब्लिक आउट क्राय म्हणून जाहिरात मागे घ्यायची, हे नेहेमीचंच आहे.
माझ्या मते मायक्रोसॉफ्ट चं प्रिमियम प्रॉडक्ट म्हणजे एम एस ऑफिस.. आता गुगल लवकरच लिनक्स बेस्ड ऑफिस लॉंच करणार आहे. आज ऑफिस ओरिजनल लोड करतो म्हंटलं तर कमीतकमी तिन हजार आठशे रुपये लागतात. खरंच इतकं वर्थ आहे कां ते? जर मायक्रोसॉफ्ट ने प्रॉफिट रेंज कमी केली नाही तर अर्थातच बरेच लोक गुगलचं सॉफ्ट वेअर नक्कीच ट्राय करतिल ( मी इनक्लुडेड) 🙂

प्रत्येक कंपनीला आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण ती जाहिरात कशी असावी , यावर पण थोडा कंट्रोल असायला हवा.मायक्रोसॉफ्ट ने जेंव्हा हे आय ई ८ लॉंच केलं तेंव्हा एक जाहिरात रिलिझ केली होती. ती पाहुन हे लक्षात येतं की किती डेस्परेट आहे मायक्रोसॉफ्ट ह्या प्रॉडक्ट च्या बाबतित. इथे दिली आहे ती जाहिरात – ओ माय गॉड आय प्युक , मायक्रोसॉफ्ट ला ही टंग इन चिक जाहिरात वाटते.कदाचित ही जाहिरात लवकराच यु ट्य़ुब वरुन पण विथड्रॉ केल्या जाइल असे वाटते. अतिशय घाणेरडी जाहिरात आहे . स्वतःच्या रिस्क वर पहा.. 🙂

बर्गर किंग हे नेहेमीच अशा  क्रुकेड जाहिराती काढत असतं. आता सध्या सुरु असलेली लक्ष्मी चं चित्र असलेली बर्गर किंगच्या जाहिरातीच्या विरुध्द बऱ्याच हिंदु लोकांनी आवाज उठवलाय. पण अजुन तरी ही जाहिरात मागे घेतलेली नाही. बर्गरकिंगला लक्ष्मीचंच चित्र का वापरावं वाटलं? जिझस पवित्र नाही कां?जर असेल तर मग तिथे जिझस का दाखवला नाही??

अशा अनेक जाहिराती आहेत अजुनही अव्हेलेबल… पण….!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

12 Responses to डेस्परेट मायक्रोसॉफ्ट

 1. हमम..महेंद्रजी लेख छान जमला आहे पण तांत्रिकदष्ट्या तो योग्य वाटत नाही आहे! लेखाचे शीर्षक जर फ़कत embeded ads पुरतं मर्यादित असेल तर ठिक आहे पण नाहीतर चूकीचे वाटते..

  MSDN.com ह्या संकतेस्थळावर तसेच Microsoftच्या प्रत्येक product च्या blogs वर प्रत्येक product च्या development cycle बद्दल माहिती असते..

  काय वाट्टेल ते !

 2. बराच टेक्निकल मुद्दा आहे!
  आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर… मी गुगलचा अगदी हार्ड-कोर फॅन आहे… त्यातला त्या ओपन-सोर्स चा.
  आता या दोघांचा वापर म्हटलं तर असं बघा:

  १. ओ.एस – ऑफिसमध्ये एक्स-पी – प्रोफेशनल तर घरी – विन २००० प्रोफेशनल.. तसं मला लिन्क्स – युबन्टु इन्स्टाल करायची आहे – पण माझ्याव्यतिरिक्त घरी मशिन वापरणारे भरपुर लोक आहेत.. त्यांचा खोळंबा नको म्हणुन! आणि आता गुगलच्या क्रोम [ब्राउजर नव्हे!] या ओ.एस. ची वाट बघतोय 😉
  २. मायक्रोसॉफ्ट ऑफिस च्या बदल्यात गुगल डोक्युमेंटस किंवा ओपन ऑफिस
  ३. ब्राउजर: फायरफॉक्स च…[अगदी १.० रिलीज पासुन] ! आय.ई ६-७-८, ओपेरा, क्रोम, सफारी वगैरे – फक्त माझ्या वेब प्रोजेक्टच्या टेस्टिंगसाठी!
  ४. ब्लॉगिंगः गुगल – ब्लॉगर!
  ५. ई-मेलः गुगल जीमेल!
  ६. फोटो शेअरिंगः गुगल पिकासा!
  ७. चॅटः गुगल जीटौक!
  ८. कॅलेंडरः गुगल कॅलेंडर!
  ९. सर्चः गुगल र्सर्च च!
  ९. शिवायः
  गुगल नोटबुक, गुगल साइटस्, गुगल पेजेस, गुगल रीडर, गुगल कोड, गुगल वेबमास्टर टुल्स, गुगल ट्रान्सलेशन, गुगल ग्रुप्स, गुगल फायनान्स, गुगल मुव्हीज, गुगल एनलॅटिक्स…. हुश्श..!

  थोडक्यात काय? गुगल – फायरफॉक्स – ओपन सोर्स = जय हो!

 3. rohan says:

  मायक्रोसॉफ्टची जाहिरात तर तददन फालतू आहे रे दादा … बरेच दिवस मला आय ई ८ अपडेट साठी पॉप-अप येतोय. पण मी अजून अपडेट केलेले नाही. मोझिला फायरफॉक्स मला पण सगळ्यात जास्त आवडते.

  बरं त्या ‘बर्गर किंग’ने जाहिरात मागे घेतली आणि माफ़ी सुद्धा मागितली आहे. मी आज न्यूज़ वाचली रेडिफ डौट कोम वर … !!!

 4. Mahendra says:

  रोहन
  अगदी १०० ट्क्के खरं आहे.. आय ई ८ एक बकवास ब्राउझर आहे. काही साइट्स जसे डीटीई डॉट ओआर्जी फक्त आय ई मधेच दिसते म्हणुन कॉंप्युटरवर ठेवावं लागतं. बर्गर किंगचं हे नेहेमिचंच आहे. पुर्वी एक टेलिफोन बुथ मधली ’ती” जाहिरात आठवते कां? आता यु ट्युब वरुन पण काढुन टाकली आहे. असो..

  भुंगा
  तुमचं आमचं जमलं.. म्हणजे माझा चॉइस पण तुमच्या सारखाच आहे. सब कुछ गुगल..

  रोहित,
  मी जेंव्हा त्या जाहिरात पाहिली तेंव्हा मला तो एक डेस्परेट अटॆम्प्ट वाटला मायक्रोसॉफ्ट चा, लोकांच्या नजरेत भरायचा…अगदी पहिल्यांदा जे मनात आलं तेच शिर्शक घातलं लेखाला.

  रोहन, भुंगा, रोहित
  प्रतिक्रियेकरता आभार.

 5. Apik banget Mas…tulisannmu sampai sampai koyo ngene

 6. wtf says:

  free tithe me..ho ki nahi..?

  I am a die hard MS fan and never compromise on productivity, efficiency and useability.. when I pay 3k for tht product, i know that MS has invested billions of doller to bring that software to the home user like me and to the whole world enterprise..so there must be something about that product.

  though I never faced problem with my IE I still agree with you on browser selection thing.

  one thing I liked that at least you are talking about original.
  that was the best part of this post.

 7. laxmi says:

  khoop divsapasun tumcha blog vachte. chaan lihita tumhi.
  keep blogging.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s