एअर इंडीया

एअर इंडीयाची मुंबई – मंगलोर आय सी १७९ फ्लाइट. !.कालच बातमी वाचली-एअर इंडीयाच्या  विमानात एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स नेले.विमानात जागा नसतांना पण बोर्डींग पासेस इशु केलेत . मग अशा परिस्थिती मधे काय करावं, केबिन क्रू ने?  एक्स्टॉ पॅसेंजर्स ला बोर्डींग पास इशु केला गेला आणि मग बसायला जागा नव्हती म्हणून क्रेबिन कृ च्या सिटवर दोन पॅसेंजरला आणि पायलट शेजारी एका पॅसेंजरला बसवुन नेण्यात आले.

मला एक प्रश्न पडला की जर पॅसेंजर्स केबिन कृ च्या सिट वर बसुन नेले तर मग केबिन कृ काय स्टॅंडींग मधे कां? डोळ्यासमोर चित्र उभं करा दोन सिटच्या मधे लोकलमधल्या प्रमाणे हँडल्स लावलेले, त्याला लोंबकळणारे लोकं. दोन सिटच्या मधे पण घुसुन उभे राहिलेले लोकं,बिझिनेस क्लास मधे दोन सिटांच्या मधे जास्त  जागा त्यामुळे तिथे जागा पकडायची लोकांची धावपळ… !!

एअर इंडिया कडे जी विमानं आहेत त्यापैकी बरिचशी विमानं तर फारच जुनी आहेत. काही विमानं (जुनी बोइंग्ज) लॅंड करतांना अगदी खुळखुळ्या सारखा आवाज करतात.बरेचदा लॅंडींगच्या वेळेस तर चक्क भिती पण वाटते हा असा आवाज ऐकला की. अख्खं विमान डिसईंटिग्रेट होइल असं वाटतं.

पुर्वी एअर इंडीया   एअर होस्टेसला त्यांचं वय ३० झाल्यावर ग्राऊंड ड्युटी साठी वापरायचे पण, नंतर यांच्या युनियनने  कोर्टातुन आदेश आणला की यांना ऑन फ्लाइट ड्युटी करु द्या वयाच्या साठ वर्षा पर्यंत!!म्हणजे आता  दिवस फार दुर नाहीत की एअर इंडीयाच्या होस्टेसेस ६० वर्षांच्या खोकत  खोकत तुम्हाला सर्व्हिस देतील… 🙂

काही दिवसा्पूर्वी एरो ब्रिज काढायचा विसरल्यामुळे तो डॅमेज झाला होता. पायलट तर नेहेमी विचारतो ना कृ ला – चेक डोअर्स, आणि नंतरच विमान  पुढे नेतो. इथे एरो ब्रिज डॅमेज झाला म्हणजे पायलटने डोअर्स बंद झाले की नाही हे चेक न करताच विमान पुढे नेले.. त्या पायलटचे लायसन्स कॅन्सल करण्यात यावं असं मला वाटत..

यावर जॉनी लिव्हरचा एक जोक होता, तो आठवला एकदम. आता एअर लाइन्स म्हणे ज्या ग्राउंड स्टाफने ही चुक केली त्यांना नौकरी वरुन काढून टाकणार !एअरपोर्ट सिक्युरिटी तर नुसती बोंब आहे.त्यावर एक लेख लिहिला होता आधी.

ही बातमी ऐकली आणि मला अगदी एस्टी बसची आठवण झाली. ड्रायव्हर शेजारी इंजीनच्या बोनेटवर बसलेले लोकं आठवले. ड्रायव्हरशी जवळीक साधायला तंबाखू मळून ड्रायव्हरच्या समोर हात धरुन.. घ्या ना भाउ… म्हणणार… तसाच या पायलटशेजारच्या माणसाने पण केले असेल कां? :)भारतात इतर सगळ्या एअरलाइन्सकडे बोइंग्ज आहेत , पण इंडीयन एअर लाइन्सकडे फक्त एअर बसेस आहेत. त्यांचा आधिपासूनच असा प्लान असावा म्हणुन एअर ’बसेस’ घेतल्या असतील 🙂

अलायंस एअर वेज नावाची एक सिस्टर ऑर्ग सुरु केली होती. या कंपनीत सगळी स्क्रॅप ( कदाचीत हा शब्द योग्य होणार नाही) झालेली इंडीयन एअरलाइन्स्ची विमानं ट्रान्सफर करण्यात आली. एर इंडीयाच्या स्टाफ बद्दल काहीच न बोललेलं बरं.. हिरव्या पापण्य़ाच्या वरचा भाग, जांभळं नेल पेंट, भडक रंगाच्या लिप्स्टीक्स, आणि म्हाताऱ्या एअरहोस्टेसेस.. काही मागितलं, तर कशाला मागतोय हा असा चेहेऱ्यावर भाव आणणार त्या.. अगदी “प्रोफेशनल”( कूठला प्रोफेशन ते समजुन घ्या) बायकां सारख्या दिसतात या अशा भडक मेकप मुळे. बरेचदा तर खिडकीतल्या बायकांसारख्या पण वाटतात.. एअर इंडीयाची सर्व्हीस अगदी थर्ड रेट  आहे.

एखाद्या पॅसेंजर कडे पाहुन हसलं, तर आपलं मिलियन डॉलर स्माइल वाया जाइल अशा तर्हेचं वागणं..!!!जेंव्हा अगदी कुठलाही पर्याय नसतो तेंव्हा मी एअर इंडीयाने प्रवास करतो. यांचं मेक ओव्हर आवश्यक आहे, तरच तग धरेल ही एअरलाइन्स..

तसंही आपलं एस टी महामंडळ आहेच प्रवाशांच्या सेवे साठी, त्या मुळे त्यांनी असं काही केलं तर समजु शकतो.. पण एअर इंडीयापण लोकांच्या सुरक्षतेशी खेळ कसा काय करु शकते? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ केला तर फक्त २५० ते १००० रुपये दंड व्हायचा एअर लाइन्सला तो आता २००८ पासुन १० लाख करण्यात  आला आहे.१९३८ पासूनचा सिव्हिल एव्हिएशन चा नियम होता हा. इतकं स्वस्त आहे का मानवी जीवन? पुर्वी असलेली जास्तित जास्त एक महिन्यांची शिक्षा आत दोन वर्षं करण्यात आली आहे. हा नियमातला बदल रिसेंटली (२००८ पासुन) करण्यात आलेला आहे.

सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्स (सिएआर) हे नियम आहेत पॅसेंजर सेफ्टी, पॅसेंजर राइट्स
बद्दल. कुठल्याही प्रकारच्या व्हायोलेशनसाठी आता एअरलाइन्सला खुप पैसे मोजावे लागतिल असं पण वाचण्यात आलंय. इतके नियम तोडले जातात, आणि तेंव्हा डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं   ऑफिस काय झोपा काढतं काय-असा प्रशन पडतो मला …..

हे सगळं लिहुन झाल्यावर आजच्या एका पेपरला  (TOI ) बातमी  आहे की ते तिन एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स हे एका पायलटची बायकॊ आणि दोन मुलं होते. आता समजलं?? का नियम तोडला गेला ते!!!!एअर इंडीया म्हणजे तर यांची इन्सेस्टर्स प्रॉपर्टी आहे नां…..!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

10 Responses to एअर इंडीया

 1. bhaanasa says:

  पायलट शेजारी पॆसेंजरला बसवून नेले….. धन्य. अगदी तुम्ही लिहीलेत तसे, बॊनेट्वर बसलेला…तंबाखू मळणारा…. हा हा. काय करतील तेवढे थोडेच आहे. शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न जास्तच गंभीर वाटला. असे तर कोणीही काहीही करू शकेल. बाकी एअरहोस्टेस बद्दल काही न बोलणेच उत्तम. पण हा अनुभव बहुतांशी एअर लाईन्समध्ये येतोय आजकाल. फारच उर्मट, बेफिकीरी…..Sad.

 2. Mahendra says:

  भाग्यश्री..
  कालपासुन विचार करतोय यावर लिहायचा.. मेंदु कुरतडतोय कालपासुन… कसं झालं असेल असं?? ३०० लोकांच्या सेफ्टिचा प्रशन होता. आणि नियम मोडल्याची किंमत फक्त १० लाख?

 3. rohan says:

  आयला .. काय काय होते आपल्याकड़े .. मी अजून एयर-इंडिया मधून प्रवास केलेला नाही आणि आता हे वाचून कधी करेन असे वाटत नाही… 😀
  पॅसेंजर सेफ्टी, पॅसेंजर राइट्स बद्दल खरंतरं प्रवास केलेल्या कोण्या एका प्रवाशाने केस टाकली पाहिजे आणि त्या पायलटचा परवाना रद्द करायला हवा…

  • Mahendra says:

   रोहन,
   इथे वेळ कोणाला असतो ? आणि एअरलाइन्सकडे भरपुर वकिल वगैरे असतात, म्हणजे आधी जर सेशन कोर्टात वगैरे हारले तर हाय कोर्ट, सुप्रिम कोर्ट आहेच.. म्हणजे कमित कमी ५० वर्षं…. आणि म्हणतात ना , डिलेड डिसिजन इज डिनाइड डिसिजन!

 4. आल्हाद alias Alhad says:

  ” त्यांचा आधिपासुनच असा प्लान असावा म्हणुन एअर ’बसेस’ घेतल्या असतिल ”

  हाहा हा हा हा… खरंय!

 5. sahajach says:

  एकूणातच सगळ्याच एअर लाईन्सला सावळा गोंधळ आहे…. आणि एअर होस्टेसेस बद्दल न बोलणेच इष्ट. यावेळेस मला भारतात येताना आलेला अनुभव फारसा बरा नव्हता…..मुलांसाठी मागितलेले ब्लॅंकेट्स मुंबईला लॅंडिंगच्या पाच मिनिट आधी दिले आणि व्हेग फूड तर आमचा नंबर येइपर्यंत संपलेले होते, मी घरून मुलांसाठी नेलेला डबा त्यांनी खाल्ला…..बर याबद्द्ल स्टाफला ना खेद ना खंत……
  थोडक्यात काय तर जसा लोकलने प्रवास ही आपली गरज तसाच आता विमान प्रवास ही देखील आपली गरज म्हणुन हळु हळु सहनशक्ती वाढवायची!!!

 6. Rohini says:

  मी एकदाच एयर इंडीया ने प्रवास केला आहे… आणि आता परत करीन असे वाटत नाही 🙂 … लवकरच ही कंपनी बंद पडेल असं वाटतय. भानस ह्यांच्याशी सहमत… आजकाल सर्वच इंटरनॅशनल फ्लाइट्स वर अगदी मुजोर आणि नॉन को-ऑपरेटिव्ह स्टाफ असतो. बाकी पोस्ट नेहेमिप्रमाणेच छान झालं आहे.

 7. Mahendra says:

  तन्वी, रोहिणी,
  प्रतिक्रियेकरता आभार.

 8. nimisha says:

  अरे असं काय रे करतोस महेन्द्र्,आपण या अशा गोष्टी तर एन्जॉय केल्या पाहीजेत कारण त्यातच तर कित्ती कित्ती thrill आहे. आपले परदेशवासी भारतीय तर हे सगळं मिस करून हळहळतात्…कारण तिथे कुठे असे बिनधास्त पब्लिक प्रॉप्रर्टी आपलीच समजणारे नागरीक असतात? तिथे कसा लोकं आपपर भाव बाळगतात….पण आपण बाकी तसं नाही मानत ना…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s