युनायटेड ब्रोक माय गिटार्

विमानाने प्रवास करतांना बरेचदा बॅगमधलं काही सामान  चोरीला जातं, तर कधी तुमचं सामान डॅमेज पण होतं. जरी तुम्ही फ्रॅजाइल म्हणून टॅग लावला तरी पण तुमच्या कडुन एक सही घेतली जाते- टॅग वर की जर सामान डॅमेज झाले तरीपण त्यात एअरलाइन्सची काहिच जबाबदारी नाही.

एकदा सामान त्यांच्या ताब्यात दिलं, की मग आपली ५ हजाराची सॅम्सोनाइट्ची बॅग लोडर ज्या पध्दतीने बेल्ट वर फेकतो ते पाहिलं की मग जीव हळहळतो. तसेच बॅगेज क्लेमच्या वेळेस पण लोडर्स बॅग्ज अक्षरशः फेकतात कन्व्हेअर वर. मी स्वतः पाहिलं आहे फ्रॅजाइन टॅग असलेल्या बॅग्ज पण निष्काळजी पणे फेकल्या जातात. एकदा राजकोटहून येतांना केसर आंब्याची पेटी आणली होती, वर फ्रॅजाइल म्हणुन टॅग पण लावला होता पण मुंबईला पोहोचे पर्यंत सगळी पेटी तुटलेली होती आणि अर्धे आंबे नरम पडले होते:(

एकदा एका म्युझिक ग्रुप (सन्स ऑफ मॅक्स वेल) हे २००८ साली युनायटेड एअर लाइन्सने एका आठवड्याच्या टुर साठी प्रवासाला  नेब्रास्का ला गेले होते. ३५०० डॉलर्स ची टेयलर गिटार ह्या लोकांनी बॅगेज  मधे बुक केली होती. शिकागो एअरपोर्ट ला लोडर्सने  गिटार फेकल्यामुळे ही साडेतिन हजाराची गिटार तुटली . युनायटेड कडे या लोकांनी नुकसान भरपाई मागितली असता त्यांनी काहीही देण्यास नकार दिला. आता यावर या म्युझिक गृपने तिन व्हिडॊज बनवले, की ज्या मधे या संपुर्ण घटना क्रमाला गुंफले होते, आणि यु ट्युब वर प्रसिद्ध केले. हा व्हिडीओ एक लाख सत्तेचाळीस हजार लोकांनी पाहिला.

आणि या गोष्टीला नॅशनल न्युज वर पण प्रसिध्दी मिळाली.

मग जेंव्हा युनायटेड एअरलाइन्सच्या लक्षात आलं की या मधे आपली बदनामी होत आहे तेंव्हा त्यांनी माफी मागितली आणि गिटारच्या बद्दल कॉंपेन्सेशन देणे मान्य केले .
नंतरचा हा व्हिडीओ बघा, या मधे युनायटॆड एअरवेजने कॉंपेन्सेशन देण्याचे मान्य केल्यानंतरच हे स्टेटमेंट आहे.


एखादा इंडीव्हिज्युअल माणुस पण प्रथितयश कंपनीला कशा प्रकारे जेरीस आणू शकतो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , . Bookmark the permalink.

7 Responses to युनायटेड ब्रोक माय गिटार्

 1. Rohan says:

  मागच्याच विकमध्ये मी हा विडियो पहिला होता… माझ्या सोबत इकडे काम करणारा एकजण गिटारिस्ट आहे. त्यांने ह्याबद्दल आम्हा सर्वांना सांगितले होते.

  खरोखर … एखादा इंडीव्हिज्युअल माणुस पण प्रतिथयश कंपनीला कशा प्रकारे जेरिस आणु शकतो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे… !!!

 2. nimisha says:

  सॉलीड मस्त आहे रे…क्या आयडीया है सरजी….अरे काय बिशाद युनायटेडची की ते याकडे दुर्लक्ष करतील?
  ह्या music groupच काय नशिब आहे बघ नं….नुकसान भरपाई तर मिळालीच आणि वर सुपर डुपर प्रसिद्धीही मिळाली. अर्थात् त्यांनीही स्वतःचं डोकं एकदम सही वापरलं…सत्याग्रहच केला रे त्यांनी आपल्या गाण्यांतून, आणि युनायटेडला झुकायला लावलंच शेवटी!

  • Mahendra says:

   रोहन
   कालच्या न्युज मधे पण ही बातमी होती. ती बघुनच नेटवर शोध घेतला याचा.
   निमिषा
   हो ना मी पण आता बघतोय असंच काहितरी करुन आपल्या पदरी काही पाडुन घेता येतं का ते.. खरंच अगदी अपिल झाली आयडीया.. आणि ते गाणं तर एकदम मस्त..मला खुप आवडलं. कुठला तरी मिडिऑकर ग्रुप एकदम फेमस झाला पहा वल्र्ड वाइड..

 3. nimisha says:

  अरे मी पण हाच विचार आत्ता करत होते…आपल्याला पण सुचली पाहीजे अशी काही तरी भन्नाट आयडीया…इंग्लीशमध्ये एक म्हण आहे नं ‘there is gap betwen the cup and the lip ‘ही उलट अर्थाने इथे खरी झालीय् . इथे या गायकाच्या एका छोट्याशा डोकेबाज कल्पनेमुळे त्याच्या नशिबाला मस्त कलाटणी मिळाली.काय रे रिलायन्सच्या दरवाढ़ीबद्द्ल काही करता येईल का ?>:

  • Mahendra says:

   खरंच करता आलं तर किती बरं होइल नाही. चक्क उन्हाळ्यात संपुर्ण रात्र भर एसी वापरण्याची चैन करता येइल ! कित्ती छान… ! असं ऐकतो आहे की आता आपल्याला चॉइस देणार आहेत तुम्हाला टाटा हवं की रिलायन्स? कधी ते बघायचं! माझ्या वॉशिंग मशिनच्या दुरुस्तिची पोस्ट लिहिलि आहे बघ. मस्त एक्सपिरिअन्स होता..

 4. bhaanasa says:

  एकदम मस्त. या लोकांना चोहोबाजूने जेरीस आणल्याशिवाय वटणीवर येतच नाहीत. आम्हाला डेल्टावाल्यांनी गेल्या वर्षी असाच फार त्रास दिला होता.:( बरीच पत्रापत्री होऊन शेवटी त्यांनी कूपन्स दिली खरी पण त्यासाठी पुन्हा प्रवास करणे आले.

  • Mahendra says:

   इथे पण हाच नियम आहे. तुमचं तिकिट तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला क्रेडीट नोट दिली जाते जी तुम्ही सहा महिन्यात वापरणं बंधनकारक आहे. पुर्वी एकदा एअर डेक्कनचा ( आताचं किंगफिशर रेडचा) असाच अनुभव आला होता.तुम्ही त्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांना तुमची न्युसेन्स व्हॅल्यु समजली की मग मात्र ते लोकं सुतासारखे सरळ येतात.

Leave a Reply to Mahendra Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s