वॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर…

Samsung_WA85HAGअहो…………… खूप मोठा पॉज. अरे ऐकतोयस नां… त्या वॉशिंग मशिनचं बघ काहीतरी.. आमच्या कडे आजपर्यंत गेल्या १५ वर्षात ३ वॉशिंग मशिन्स बदलून झाल्या . अगदी पुर्वी म्हणजे सुरुवातीला जेंव्हा व्हिडीओकॉन चं युग होतं, तेंव्हा आम्ही एक व्हीडीओकॉन वॉशिंग मशिन घेतली होती ट्विन टब. तिने आपली अगदी इमाने इत बारे ७-८ वर्ष सेवा दिली. नंतर एकदा ती बिघडली !

आणि नेमकं त्याच दिवशी व्हर्लपुलची जाहिरात होती.. हाथो जैसी धुलाईके लिए.. व्हर्लपुल व्हर्लपुल… अशी जाहिरात  बघून सौ.च्या मनावर खूपच परिणाम झालेला होता. आणि आपण आता तीच घेउन टाकू या, कारण ही असलेली मशिन पुन्हा दुरुस्त करण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा नवीन घेतली तर बरं असं आमचं दोघांचही (कधी नव्हे ते) एक  मत झालं.

तर मग व्हर्ल पुल ची मशिन घरी आली. अगदी काही दिवसातच ( म्हणजे दिड वर्षानंतर) तिचे वरचे झाकण तुटले .तो पर्यंत आम्ही मुंबईला आलो होतो. इथे आल्यावर कपडे वाळत ( की सुकत??) घालायला बाल्कनी आहे पण त्या बाल्कनीत पण पावसाचं पाणी येतं आणि सुकलेले कपडे ओले होतात,आणि कामवाली बाई व्यवस्थित कपडे पिळत नाही म्हणून कपडे रोज सुकत नाहीत, हा शोध लागल्या मुळे आता पुन्हा मशिन (दुरुस्त) ऑपरेटीव्ह करावी  लागणार म्हणजेच बदलावी लागणार  हे लक्षात आलं .

वॉशिंग मशिन मधे कपडे स्वच्छ धुतले जरी जात नसले तरी चांगले पिळले जातात हे मात्र अगदी खरं.त्यामूळे मुंबईला हे यंत्र अतिशय उपयोगाचं आहे .कपडे धूणारी बाई बरोबर कपडे पिळत नाही त्यामुळे कपडे निट सुकत नाहीत … सो , द मशिन इज मस्ट!!!हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकुन पाठ   झालं होतं माझं.

वॉशिंग मशिन मधे धुतलेले कपडे कधीच चांगले निघत नाहीत. कपड्यावरचा सगळा  मळ ( कफ्स ऍंड कॉलर्स वरचा) सगळीकडे समप्रमाणात पसरवला जातो  (मला वाटतं ही गोष्ट तुम्ही सगळेच मान्य कराल.) म्हणून कपडे धुवायला बाई, आणि पिळायला मशिन हे कॉंबीनेशन आम्ही गेली कित्येक वर्ष वापरतोय. . हाताने आपटून  धुतल्यावर जे कपडे स्वच्छ होतात तसे कशानेच होत नाहीत..

असो.. तर आता पुन्हा मशिन बदलायची वेळ झाली.व्हर्लपुलची मशिन खूपच खराब क्वॉलिटीची होती. ती बदलणे भाग होते.   आत कुठली मशिन घ्यायची बरं? सॅमसंगचा फ्रिझ ३१० लिटरचा घेतला होता ४ वर्षा पूर्वी, आणि मायक्रोवेव्ह पण सॅमसंगचाच, तो पण बरा चालला, म्हणून सॅमसंगचीच मशिन घ्यायची असं ठरलं.

विजय सेल्स मधे जाउन एकदाची फुल्ल ली ऍटोमॅटिक मशिन घेतली. ती पण मशिन ४-५ वर्ष बरी चालली, पण नंतर दैवाला आमचं सुख पहावलं नाही. आणि एक दिवस त्या मशीनने राम म्हंटलं. त्याचा इलेक्ट्रॉनिक पॅनल बंद पडला , म्हणजे प्लग लाउन बटन सुरु केलं तरीही मशीनवरचा दिवा लागत नव्हता. सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरला फोन केला, आणि सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे ते. त्यांनी कर्टली सांगितलं की आमचा माणुस येइल बघायला त्याचे चार्जेस ३५० रुपये द्यावे लागतील. म्हंटलं.. ठीक आहे.. तर तो माणुस आला एक दिवस रात्री ८ वाजता..

त्याने आपल्या हाताने प्लग काढून पुन्हा बसवला, पण मशिन काही सुरु होत नव्हती. तेंव्हा त्याने डिक्लिअर केलं की याचं पॅनल खराब झालंय आणि बदलायला ३ हजार रुपये लागतील. तो हळूच असंही म्हणाला, की जर कंपनीला सांगणार नसाल तर मात्र मी इथेच दुरुस्त करुन देईन, मला तुम्ही १ हजार रुपये द्या.. मी त्याला म्हंटलं की अरे बाबा, हे हार्डवेअर ठीक आहे , फक्त सॉफ्ट वेअर अपडेट कर, झालं… पण त्यावरचं त्याचं उत्तर होतं, की कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी अलाउ करत नाही.. मग माझं वर्स्ट नाइटमेअर सुरु झालं.

मी स्वतः कस्टमर सर्व्हिस मधे आहे आणि आज मला चान्स मिळाला होता कस्टमर म्हणून कोणा कडून तरी काम करून घ्यायचा. नेट वर सर्च मारला, तर सॅमसंगच्या साइटवर एकाचेही नांव नाही,किंवा फोन नंबर पण नाही . एकच फोन नंबर जो दिलाय तो आहे कॉल सेंटरचा. मोठ्या मुश्किलने त्यांच्या एम डी चं नांव शोधुन काढलं, आणि त्याला इ मेल केला, नक्की इमेल आयडी माहित नव्हता, त्यामुळे रविन्दर.झुत्सी @सॅमसंग.कॉम, आर.झुत्सी @सॅमसंग.कॉम, आरजे @सॅमसंग.कॉम असे वेगवेगळे कॉंबीनेशन्स वापरले. यापैकी पहिला लीहिलेलाच आय्डी बरोबर आहे हे नंतर कळलं)  अगदी सगळा एपिसोड लिहिला त्यांना पण नो रिस्पॉन्स!

अहो भाग्यम!! त्यांच्या इंजिनिअरचा फोन आला, आणि मला त्याने हजार रुपये डिस्काउंट देतो असं सांगितलं . मशिन आउट ऑफ वॉरंटी म्हणुन मान्य करावं कां? असा विचार आला, पण त्याला म्हंटलं की जर तुझा टेक्निशिअन जर हजार रुपयात काम करु शकतो तर तु का नाही? त्यांच्या एम डी ला पुन्हा एक इ मेल टाकला, त्यात लिहिलं की तुमचे टेक्निशिअन हजार रुपयात मशिन दुरुस्त कशी करायची यात एक्सपर्ट आहेत तेंव्हा तुम्ही तुमचे इंजिनिअर्स त्या टेक्निशिअन कडे पाठवा ट्रेनिंग करता… आणि पुन्हा दररोज दहा रिमाइंडर्स.. त्यांच्या एम डी ला सुरु ठेवले. या सगळ्या प्रकरणात जवळपास चार दिवस गेले. सौ. चा पेशन्स संपत आला होता. काहीही करा पण लवकर सुरु करुन द्या मशिन.. असा घोष सुरु केला.

दुसऱ्या दिवशी ठरवलं, की जर त्यांच्या एम्डी ला पुन्हा एक मेल केला, विथ फायनल वॉर्निंग, की जर त्याने लवकर काही ऍक्शन घेतली नाही तर माझ्या घरी असलेली वॉशिंग मशिन आमच्या कॉम्प्लेक्स मधे कॉमन प्लेस मधे आणून पेटुवून देइन.. आणि सगळ्या न्युज चॅनल्सला पण ही बातमी येइल अशी व्यवस्था करिन.. तेंव्हा कुठे हे लोकं जागे झाले आणि माझी मशिन दुरुस्त  करून देउ ( १ हजारात) असा मेल आला, आणि अगदी सेम डे ला रात्री दुरुस्त करुन दिली त्यांनी..

तर मंडळी भांडत रहा. बस्स… आणि हॅव पेशन्स.. एव्हरिथिंग विल गो इन युवर वे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

8 Responses to वॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर…

 1. अभिनंदन महेंद्रजी,
  अखेर गांधीगिरी कामी आली तर? माझाही असाच एक किस्सा आहे… अर्धा ड्राफ्ट करुन ठेवलाय, उद्या परवा पोस्ट करीन 😉
  हां, एक मात्र नक्की… अशा मार्गाने .. थोडं उशिरा का होइना, पण तुमचं काम होतं हे खरं, बस्स जरा पेशंस हवेत!!

 2. nimisha says:

  मानलं तुला दोस्ता! तु पण चालवलंस ना डोकं त्या गिटारवाल्यासारखं…आणि तु तर फक्त धमकीवरच त्यांना सरळ केलंस….चला म्हणजे वेळ आली की आपणही अशी युक्ती वापरू शकतो तर. म्हणजे लक्ष्मणच्या कार्टुनमधला कॉमन मॅनने देखिल अगदीच काही गरीब बिच्चारं,सहनशील असण्याची गरज नाहीय आता ! हो नं?

 3. Mahendra says:

  दिपक, निमिषा,
  प्रतिक्रिये करता आभार.
  खरं म्हणजे मी नेहेमी रिसिव्हिंग एंड ला असतो-माझा पोर्टफोलिओ कस्टमर सर्व्हिस आहे.!!
  . इथे खरं सांगायचं तर मी अगदी होप सोडली होती, जर त्या कंपनिने एकाद्या दिवसात मशिन रिपेअर केली नसती तर मग मात्र मला होम फ्रंट सांभाळणं कठिण गेलं असतं, आणि मग नविन मशिन घ्याविच लागली असती, पण नशिब बलवत्तर होतं, म्हणुन बरं!
  अगदी लास्ट मोमेंटला जिंकलो ! नाहितर बायको मागे लागली होती, भांडणं पुरे!! नविन मशिन आणु या आता म्हणुन!

  गोदरेजचं कपाट घेतलं होतं, त्यांची पण सर्विस खुपच वाईट आहे. त्यांच्या ऑफिसला फोन केला, सांगितलं की मी एका (नांव लिहित नाही) कंपनिच्या एमडी चा पी ए आहे, आणि मला जे एन गोदरेज ला इन्व्हाइट पाठवायचंय पार्टीचं, म्हणुन इ मेल ऍड्रेस हवाय.. आणि गेस व्हॉट –मला दिला त्या ऑपरेटरने.. आणि पुढे मग- जस्ट एक इ मेल.. जे एन गोदरेज ला, आणि इट्स अगेन अ सक्सेस स्टॊरी.. 🙂 वॉर्डरोब रिप्लेस्ड!
  दिपक, पोस्टची वाट पहातोय!

 4. bhaanasa says:

  परफेक्ट. पण यासाठी प्रचंड पेशन्स मात्र हवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे. अभिनंदन.:)आता किमान काही वर्षे तरी मशिन दगा देणार नाही ही आशा ठेवूयात.

  • Mahendra says:

   इथे पैशाचा प्रश्न नव्हता, पण मला एक फिलिंग आलं होतं की ही कंपनी मला ग्रुहित धरुन चालली आहे म्हणुन ( टेकिंग फॉर राइड) म्हणुन इतका पुढे गेलो .एकदा कोणी आपल्याला चिट करतंय असं लक्षात आलं की मग जीवाचा संताप होतो, म्हणतात नां, कोपऱ्यात सापडलेलं मांजर पण वाघाप्रमाने लढते… :)तशीच अवस्था होती. विचार केला, म्हंटलं फारतर काय मशिन दुरुस्त करायला पुर्ण पैसे द्यावे लागतिल… बस्स!!
   पेशन्स मात्र हवाच… !

 5. महेंद्रजी,
  मी माझा किस्सा टाकलाय, ब्लौग वरती!

 6. sonal says:

  Mahendraji, agadi yach waait anubhawatun mi geli 2-3 mahine jaat aahe. Majh Machine IFB ch aahe. belt, drum sagal badlun machine chalu jhali aani punha daha divsat band jhaliye. aata last attempt maarnaar aahe nahitar navin ghein mhante. LG chi customer service kashi aahe? kahi idea? mi LG aani samsung chi models pan shortlist karun thevali aahet.
  Sonal

  • Mahendra says:

   सॅमसंगचं प्रॉडक्ट खरंच चांगलं आहे. वॉरंटी पिरियडमधे सर्व्हीस पण चांगली आहे. पण एकदा वॉरंटी संपली की मग मात्र ते खुप पैसे चार्ज करतात- अगदी सॅंट्रो कार सारखं. माझा सॅंट्रो चा अनुभव पण असाच आहे. सॅमसंग घ्यायला हरकत नाही. माझ्या कडे एल सी डी टिव्ही पॅनल, फ्रिझ (८वर्षं), वॉशिंग मशिन( ४ वर्षं), आणि मायक्रोवेव्ह( ७ वर्षं वापरतोय) सॅमसंगचंच आहे. क्वॉलिटी खरंच चांगली आहे. फक्त वॉशिंग मशिनमधे सोडलं तर इतर कुठल्याही प्रॉडक्ट मधे प्रॉब्लेम आलेला नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s