धाकटी मुलगी कधीची मागे लागली होती, बाबा, क्लासमधली सगळी मुलं जाउन आले आहेत, फक्त मीच अजुन बघितला नाही सी लिंक.. म्हणून भूण भूण मागे लावली होती. अर्थात नुसतं तिच्या मुळेच गेलो असे नाही, माझी पण इच्छा होतीच! रविवारी बांद्रा – वरळी सी लिंकने प्रवास करून आलो. आत फ्री राईड बंद केल्यामुळे गर्दी बरीच ओसरली आहे. मालाड हून एक्स्प्रेस हायवे ने निघालो आणि समुद्राकाठचा तो सुंदर “फेमस” कठडा दिसु लागला. आज तशी गर्दी कमी दिसली तिथे.. मी काढलेले सी लिंकचे फोटॊ पोस्ट करतोय..प्रवास करतांना सारखं हा फ्लाय ओव्हर बनवण्यासाठी किती त्रास किंवा कष्ट झाले असतील हाच विचार मनात येत होता. शेजारच्या ब्रिज गार्डसच्या फटीमधून जेवढा दिसेल तेवढा समुद्र नजरेने पिऊन टाकायचा प्रयत्न करित होतो. जातांना समुद्राचे काळे पाणि (कर्ट्सी माहिम क्रिक) जाणवत होते
हे असे कठडे आहेत. त्यामधल्या रिकाम्या जागेतुन दिसेल तेवढा समुद्र पहायचा.
केवळ अर्धाच ब्रिज सुरु झालाय, अजुनही भल्यामोठ्या क्रेन्स शेजारिच काम करतांना पण दिसतात.
जस्ट ब्रिज वर एंटर करतोय. इथुन फारसं काही जाणवत नाही. नॉर्मल फ्लाय ओव्हरचं फिलिंग आहे. झालं.
दुरुन बारीक दिसणाऱ्या या वायर्स इतक्या जाड असतील असं वाटलं नव्हतं ! चांगल्या मनगटाएवढ्या जाड आहेत या.
हा मधला वायर्स सपोर्टेड पोर्शन.
आणि हा वरळी साईडचा एक्झीट!
photo chan aahet…mi mage kadhi tari dadar shivaji park la lambun yachech bandha kaam pahile hote ka? ki to wegla?
Shvaji park varun disanara bridge – toch ahe ha..
चांगला बांधलाय असे पाहून तरी नक्कीच वाटतेय…:) आता आले की जायला हवेच. फोटो छान आलेत.
लाइव्ह फोटोज – पाहुन ब्रिजवर उभारलल्या सारखं वाटलं 😉
मुंबईच्या ट्रीप मध्ये हा ब्रिज बघणे – चेक लिस्टवर टाकले आहे!
Wah,
Cochin madhe basun Mumbai cha Sea Link agdai pratyaksha pahilysarakha vatatoy.
Definately will visit once i come to Maharashtra.
Thank You, Maheshji.
सुप्रिया,
नक्कीच.. हा ब्रिज बघायलाच हवा मुंबईला आल्यावर.. जर नुस्तं ब्रिजवर चक्करमारण्यासाठी डबलडेकर बस.. ( वरच मजला पुर्ण उघडा ) सुरु केली तर काय धम्माल येइल नां?
KHARACH, IDEA CHAN AAHE
Nakki pahin jevha mumbait yein teva. Thanks for the detailed information. Had not seen how it actually looks on the bridge earlier