एच१ एन१ भारतामधे

कसं मस्त वाटत ना, लोकल ट्रेनने प्रवास करून अगदी घामाने  भरल्या अंगाने ऑफिसचे दार उघडले की गार गार हवेचा एसी चा झोत अंगावर घ्यायला? आजकाल सगळी कडे सेंट्रलाइझ्ड एसी असतात. जर सेंट्रलाइझ्ड एसी नसेल तर   मोठ्या क्षमतेचे स्प्लिट एसी तरी लावलेले असतातच. सगळा प्रवासाचा शीण निघून जातो एकदम.पाच मिनिटं बसलो आणि एक कप कॉफी आणली व्हेंडीग मशीनवरुन की कामाला तय्यार!

आता तुम्ही म्हणाल एच१ एन१ आणि एसी चा काय संबंध?? सांगतो…

पूर्वीच्या काळी ऑफिसेस मधे फक्त मॅनेजर्सला एसी केबिन असायची इतर ऑफिस मधे फक्त पंखे असायचे. अजूनही हाच प्रकार तुम्हाला शासकीय ऑफिसेस मधे दिसून येतो. पण नंतरच्या काळात केबिन कल्चर जाउन त्याजागी क्युबिकल्स चं कल्चर आलं.एका मोठ्या हॉल मधे कोंबडीच्या खुराड्या प्रमाणे लहान लहान क्युबिकल्स तयार करून तिथे सगळ्यांनाच बसवले जाते. आता मॅनेजर्सला बाहेर आणल्यावर सगळा हॉल एसी करणे ओघा ओघाने आलेच. म्हणून मग एसी हॉलच्या कल्चरने केंव्हा आणि कधी प्रवेश केला ते समजलेच नाही. आणि आजकाल ऑफिस म्हणजे क्युबिकल्स असलेला हॉल अशीच प्रतिमा डॊळ्या समोर   येते.

एक महत्वाची बातमी अगदी एका कोपऱ्यात वाचली काल.  गुगलचे देशी ऑफिस ( हैद्राबाद मधलं) आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी, कारण ७ लोकांना एच१एन१ व्हायरसने इन्फेक्ट केलंय. अगदी अशीच बातमी विप्रोच्या संदर्भातही वाचली आणि या बातमीवर विचार करण्यास उद्युक्त केले. इथे विप्रो मधे किंवा गुगल मधला व्हायरस हा त्यांच्या एखाद्या एम्प्लॉइने किंवा ओव्हरसिज व्हिजिटर ने आणला असण्याची शक्यता आहे. व्हायरसचा चंचू प्रवेश कसा झाला हे पण इंटरेस्टींग आहे.

२-३ आठवड्यापूर्वी सौ.चा भाउ यु एस मधुन परत आला. आणि काका पण युरोप टूर करून आले. इथे परत आल्यावर एच१एन१ च्या इन्फेक्शन ची टेस्ट करणे हे एअर्पोर्ट वर अपेक्षित होते, पण फक्त एक फॉर्म भरुन घेउन सोडुन दिल्या गेलं. हे कितपत योग्य आहे? जर प्रिअकॉशन घेतली गेली तर व्हायरस स्प्रेड होणार नाही. नेमकं इथेच चुकलं…

एका फॅमिलीला सिंगापुरहुन सुटी नंतर परत आल्यावर स्वाइन फ्लु झाला अशीही बातमी आजच वाचली. मला वाटतं , हा व्हायरस डब्ल्यु एच ओ च्या म्हणण्याप्रमाणे अन स्टॉपेबल आहे..फक्त लवकर यावरचं व्हॅसिन शोधलं गेलं तरच काहीतरी कंट्रोल होईल.

बरं तर एसी… हं..! तर काय लिहित होतो.. सेंट्रलाइझ्ड एसी ऑफिसेस मधे व्हायरस मग तो एच१एन१ असो, किंवा साधा एपिडीमीक खोकला सर्दी व्हायरस असो, तो बंदिस्त वातावरणामुळे जास्त पसरू शकतो. नेमकं हेच झालं असावं.. विप्रो आणि गुगल च्या देशी ऑफिस मधे असं मला वाटतं.  कल्पना करा, जर तुमच्या ऑफिसमधल्या एखाद्या माणसाला टिबी असेल तर तो किती सहजतेने पसरू शकेल?? अर्थात मी काही या विषयातला तज्ञ नाही. पण अगदी जे काही मला वाटलं ते लिहिलंय! करेक्शन्स इफ एनी..मोस्ट वेलकम!

निसर्गा पासून आपण जितकं दुए जातोय तितकीच आपली प्रतीकारक शक्ती पण कमी होते. ऍक्वा गार्ड चं पाणी पिण्याची सवय लागली की मग इतर कुठलंही पाणी प्यायलं तरीही पोटाचे विकार सुरू होतात. लहान पणापासून ज्या परसदारातल्या विहीरीचे पाणी पिऊन आपण मोठं होतो, गांवी गेल्यावर त्याच पाण्याने त्रास का व्हावा? कारण आतड्यांची बॅक्टेरियांना प्रतिकार शक्ती आपण पुर्णपणे संपवून टाकली आहे.

मी लहान असतांना मुलींना कधीच  पावसात जायला आणि भिजायला, मातीमधे खेळायला, किंवा अनवाणी कॉम्प्लेक्स मधे खेळायला जायला बंधनं घातली नाहीत. एकच इच्छा होती, मुलींच मातीशी असलेलं नातं मजबूत रहावं… बस्स्स!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to एच१ एन१ भारतामधे

 1. …. परत आल्यावर एच१एन१ च्या इन्फेक्शन ची टेस्ट करणे हे एअर्पोर्ट वर अपेक्षित होते

  अगदी रास्त….!
  एच१एन१ ची बोंबाबोंब गेले ३-४ महिने [अंदाजे?] चालु आहे… मी परतलो तेंव्हाही आमची सर्वांची – एच१एन१ ची टेस्ट व्हावी – अशीच इच्छा होती… मात्र फक्त फॉर्म भरुन घेऊन सोडुन दिले!!

  • Mahendra says:

   आणि अगदी हेच कारण आहे एच१एन१ भारतामधे पसरायचे!
   आता यावर कंट्रोल करणं कठिण आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्ग म्हणते..! पुढे काय वाढुन ठेवलंय कोणास ठाउक!

 2. Pingback: स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल? « काय वाटेल ते….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s