अभिनंदन..(पुलं चं नांव दिल्या बद्दल)

परवा पुण्याला जाउन आलो. रात्रभर पावसाने नुसता धिंगाणा घातला होता. आदल्या दिवशीचा  सेंट्रल आणि हार्बर लाईनच्या लोकल्स बंद पडण्याचा अनुभव गाठीशी होताच. म्हणून सकाळी उठून सरळ टिव्ही समोर बसलो. टीव्हीवर पण सगळ्या शिळ्या बातम्या( अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या) पुन्हा पुन्हा दाखवत होत्या. आदल्या दिवशी काय झालं , ह्या पेक्षा आजची परिस्थिती कशी आहे यात मला जास्त इंटरेस्ट होता.

टॅक्सी मधे ड्रायव्हरने  गणपती, जिझस, आणी इतर देवांच्या मुर्त्या लावल्या होत्या. अगदी पुलं चा पानवाला आठवला. मधे आरशाला एक क्रॉस लटकत होता. म्हंटलं, चला, कमित कमी देव तरी आहे आपल्या बरोबर..

कुठेच काहीच दिसत नव्हतं, फक्त पुन्हा पुन्हा एकच सांगितलं जात होतं की मिलन सबवे आणि खार सबवे बंद आहेत..! मला आधी सांताक्रुझ ला जाउन एका मित्राला वेस्ट वरुन घ्यायचं होतं. म्हणून व्हाया दिंडॊशी लिंकींग रोड करत निघालो. लक फॅक्टर इतकं वाइट होतं, की ह्या रस्त्यावर पण अगदी तुडूंब गर्दी!!! पाउण तास तर लिंकींग रोडला पोहोचायला लागला. बरं.. खरं तर रस्ता जाम व्हायचं कारण म्हणजे रस्त्यावर साचलेलं पाणी.. इथे फोटॊ पहा, दोन लेन्स पाण्याखाली असल्यामुळे सगळे लोकं एकाच लेनमधे चालत होते.

150720091655

घरुन ८ वाजता निघालो आणि सांताक्रुझ ला साडे नऊ वाजता पोहोचलो. टॅक्सी ड्रायव्हर आत्ताच कंटाळल्यासारखे वाटत होता. तिथुन पुढे सायन ट्रॉम्बे रोडने पुण्याचा एक्सप्रेसवे पकडला. पाउस थोडा थांबल्या सारखा वाटत होता. रस्ता पण जरा मोकळाच होता. लवकरच एक्सप्रेस वे ला लागलो. फुडमॉल ला स्टॉप घेतला , ऍज युजवल, आणि तिथुन पुढे निघालो तर व्हिजिब्लिटी अक्षरशः १०फुट पण नव्हती. समोरचं काहीच दिसत नव्हतं. कारला फॉग लॅम्प्स नव्हते. अगदी ढगातून चालतोय असं वाटत होतं.

150720091658

हा पण एक  फोटॊ बघा, म्हणजे कल्पना येइल कसं मस्त वातावरण होतं याची.

150720091659

आणि हा पण एक फोटो..

लोणावळ्याला एका कॉन्फरन्स साठी हॉटेल बघायचं होतं, म्हणून लोणावळा एक्झिट वर एक मोठा ऍक्सिडेंट झालेला दिसला. खाली उतरुन चेक केलं, की त्या गाडीत कुणी आहे का ते.. पण कोणीच नव्हतं, बहुतेक ऍक्सिडेंट बराच आधी झालेला असावा!

150720091662

लोणावळ्याच्या काही हॉटेल्सला जाउन त्यांची कोटेशन्स घेतली आणि सरळ पुण्याला गेलो. लोणावळा पावसाळ्यात खूपच रमणीय असतं. मजा आली.जुने दिवस आठवले.एखाद्या टपरिवर थांबुन खेकडा भजी सोबत, मस्त पैकी आल्याचा चहा प्यायची इच्छा होत होती , पण वेळेच्या अभावी टाळलं.. पण इथे काही हॉटेल्सच्या प्रॉपर्टीचे फोटो पोस्ट करतोय. बघा..

150720091668पुणं जवळ आलं तसं धुकं पण कमी झालं. थोड्या थोड्या अंतरावर डॊंगरावरून खाली खळखळत पाणि वाहात होतं. पावसाळ्यात लोणावळा म्हणजे एकदम मस्त..  पूर्वी आम्ही नेहेमी जायचो पण आजकाल वेळ नसतो 😦

lonavala1

जे सरकारने काम करायचं ते या शिवसैनिकांनी करून ठेवलंय, म्हणून त्यांचं अभिनंदन  करायला हवं. पण याच सोबत एका कटु गोष्टीची पण आठवण येते, ती म्हणजे युती सरकार असतांना बाळासाहेबांवर (ठोकशाही बद्दल) पु ल देशपांड्यांनी  टीका केली म्हणून “यांना पुरस्कृत करून आम्ही झक मारली” हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट उगाच आठवून वाईट पण वाटलं.. असो… मला हे निश्चित माहिती आहे की जे काही झालं ते इन द हिट ऑफ डिस्कशन्स.. आणि बाळासाहेबांचं पण पुलंच्यावर तुमच्या आमच्या इतकंच प्रेम आहे म्हणून तर त्यांना एक्सप्रेसवेला नांव देतांना पुलंच आठवले.. 🙂

पुनःश्च अभिनंदन…

expressway

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात..., Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

18 Responses to अभिनंदन..(पुलं चं नांव दिल्या बद्दल)

 1. mugdhamani says:

  abhinandan!
  aananda jhala..
  shevatacha para manala bhidla..

  • Mahendra says:

   तुमची आमची सगळ्यांचीच इच्छा … लवकर सरकार तर्फे पण पुर्ण झाली , आणि ऑफिशिअली हे नांव दिलं गेलं तर खरंच आनंद होईल..

 2. महेंद्रजी,
  तुम्हीही काही प्रमाणात “पाऊस” अनुभवला तर!.. एक्सप्रेसवे – पु. ल. देशपांडे मार्गावरुन पावसाळ्यात सुसाट जाणर्‍या आणि पाण्याचे फव्वारे उडवणार्‍या गाड्या बघायला आपल्याला जाम आवडते!

  चला… एक्सप्रेसवे ला किमान पु. लं. च नांव तरी – अधिक गाजा – वाजा न करता दिलं….!

  इतरांचं म्हणनं काहीही असो – सेनेसाठी या आणि अशाच काही इतर कामांसाठी मनात एक खास जागा आहे! .. अभिनंदन!

  • Mahendra says:

   दिपक, हे नांव दिलंय शिवसेनेने. सरकार म्हणतंय की शंकरराव चव्हाणांचं नांव द्यायचं… बघु या काय होतं ते !
   शिवसेनेने हा प्रशन मार्गी लागे पर्यंत लावुन धरला तरंच शक्य आहे..

 3. nimisha says:

  ‘पु.लं’च नाव दिलं त्यामुळे आनंद होणं वगैरे ठीक आहे…पण मुळात या पुलांना, एय्ररपोर्टसना,नांव देणे आणि ठिकठिकाणी पुतळे उभारुन त्याचे सतत राजकारण करत राहणे आणि त्यावर वाद घालत टाईमपास करणे हाच खरं तर आपला खास आवडीचा विषय आहे….आणि तीच आपली शोकांतिका आहे.

  • Mahendra says:

   निमिषा
   अगदी खरं… पण तिथे एक्स्प्रेस वे चं नाव बघुन मला पण अगदी खरोखरंच बरं वाटलं.नेहेमी नांवं ठेवण्याच्या मानसिकतेला विरोध करणारा मी.. असं कां व्हावं? विचार करायलाच हवा मला पण.
   कदाचित एका राजकिय नेत्याने शंकरराव चव्हाणांचं नाव द्या असं म्हंटलं म्हणुन असेल कदाचित..
   प्रतिक्रियेकरता आभार..

 4. nimisha says:

  ए तु ‘प्रतिक्रियेबद्द्ल आभार’ वगैरे मानणार असलास तर मी प्रतिक्रिया देणारच नाही,कारण तु जे लिहीतोस ते मला आवडतं आणि म्हणुनच मी ऊत्साहाने त्यावर मला काय वाटतं ते लिहीते.माझ्यासाठीही हे आनंदाचच् आहेः कळलं का?

  • Mahendra says:

   रोहन
   काम होतं ना पुण्याला. अरे लोणावळ्यापर्यंत पोहोचायलाच खुप वेळ गेला , व्हिजिब्लिटी कमी असल्यामुळे . आणि रात्री पुन्हा परत यायचं होतं, पुण्याची मीटींग पण शेडुल्ड ( स्केड्युल म्हणतात हल्ली लोकं – नविन ट्रेन्ड) तेंव्हा लवकर आवरायला लागलं, राजमाची वर आणि टायगर्स लिप वर पुर्वि नेहेमी जाणंव्हायचं. जसं वय वाढायला लागतं तसं आपण लहान लहान गोष्टीतला आनंद मिस करायला लागतो हे जाणवलं बघ !
   खरं सांगतो, इतकं सुंदर वातावरण होतं नां, ते शब्दबध्दच करता येणं शक्य नाही.

   निमिषा
   🙂 आता धन्यवाद पण म्हणत नाही..

 5. rohan says:

  अरे मस्त आहेत रे फोटो … जाउन आलास हा… 🙂 खंडाळ्याला थांबून भजी खायची ना रे … 😀 हा.. हा..

  तिकडे उजव्या हाताला राजमाची दिसला का.. पुढे मळवली लागल की उजव्या बाजूला लोहगड आणि विसापूर किल्ले पण दिसतात… 🙂

  बाकी हायवेच नाव पु. ल. देशपांडे हेच असायला हवे. आघाडी सरकारचा निषेध … !

 6. Rohan says:

  अरे टायगर्स लिप वर ‘कोर्न भजी’ कसली सही मिळते… 😀 … आता आलो की एकदा मोर्चा न्यायलाच हवा तिकडे. 😀

  • Mahendra says:

   मंगळावारी पुन्हा जायचंय.. तेंव्हा जातांना व्ह्याया टायगर्सलिप ला नक्की जाणार ठरलं!! अगदी १०० टक्के. मोर्चाचा पहिला मेंबर म्हणुन मी जाउन येतो तिथे. 🙂

 7. inkblacknight says:

  I loved the snaps very much. True, Lonavla has its own charm and many among us have some or the other memory attached to it. Yes, I feel happy too that the expressway is named after P. L. Deshpande, thanks for the information.

 8. laxmi says:

  very happy to see that the expressway is named P.L.Deshpande.But not only this one,bandra-varli sea link also has to give d name of Veer Savrkar.

  Hope so this will really happen!!!

 9. ramesh jadhav says:

  एक्सप्रेस वे ला शंकरराव चव्हाणांचं नव्हे तर यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जरा फॅक्टस तपासून घेत जा.

 10. supriya uday says:

  Mahendraji,
  lekh mast zalay.
  KAdhiadhi ase rokthok rajkaran chan vatate,nahi?
  (Mangane se nahi milata to chin ke le lo)

  Tumachya dusarya photot Dhukyabarobar car madhil devdevatahi disat aahet aani Aarashyavar latakaleli Croosshi.

  Lonavalyala pavasalyat Canian valleytahi dhanmal yete.

  • Mahendra says:

   सुप्रिया
   त्या दिवशी खुपच मस्त वातावरण होतं. खुप मस्त वाटंत होतं. एकदा सुटीच्या दिवशी जायचंय, पण नेमकं त्याच दिवशी मुलिंचे क्लासेस वगैरे असतात ,त्यामुळे जमत नाह
   मांगनेसे कुछ नहीं मिलता.. हे वाक्य छान आहे…

 11. Pingback: ’कलगी तुरा’ « काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s