कांदे नवमी

 

 

माझं लहानपण अगदी बाळबोध आणि कुळ कुळाचार पाळणाऱ्या घरात गेलं. वाड्यामधे शेजारी पण सगळे आमच्या सारखेच होते. जवळपासच्या पंचक्रोशित, नॉनव्हेज खाणा कोणीही नव्हतं, कदाचित तुम्हाला खोटं वाटेल , मी अगदी २२ वर्षाचा असे पर्यंत अगदी अंडं पण खाणं दुर पण अंड्या

चा कुठलाच पदार्थ पाहिला पण नव्हता.

माझ्या घरी – मी वगळता, अजूनही  कोणीच नॉनव्हेज खात नाही..अंडं इन्क्लुडेड! सगळी भट लोकांचा वाडा होता तो. वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद असायचं. आई नेहेमी म्हणायची पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे(अर्थात मला ते कधीच पटलं नाही) तसेच श्रावणात वांगी पण खाणं बंद असायचं. म्हणजे आवडत्या गोष्टी बंद.. भरली वांगी तर माझ जीव की प्राण.. अजुनही भरली वांगी आणि शेवग्याच्या शेंगांचं कॉंबीनेशन खुप आवडतं..!

आमच्या घरी गोंदवलेकर महाराजांची गादी होती. म्हणजे दर शनिवारी नामःस्मरणाचा कार्यक्रम व्हायचा.अगदी बाळबोध वातावरणात वाढलोय मी.कदाचित त्या दिवसांबद्दल सांगितलं तर खोटं वाटेल, म्हणून जास्त काही लिहित नाही.

 

श्रावण महिन्याच्या आदल्या नवमीला कांदे नवमी चा दिवस म्हणायचे.  मग कांदा भजी, कांद्याचं थालिपीठ, आणि इतर सगळे शक्य असलेले पदार्थ करून कांदे नवमी सिलेब्रेट केली जायची. एकादशीला कांद्यचा ढेकर पण येउ नये म्हणून नवमी नंतर कांदे -लसुन खाणं बंद केलं जायचं.मग दुसऱया दिवशी.. काय रे काल झाली का कांदे नवमी? असे प्रश्न पण विचारले जायचे.

आमच्या सारख्या मुलांना तर तसा काहीच फरक पडत नव्हता. फक्त दुपारच्या वेळी जे घट्टं वरण, चिरलेला कांदा, तेल, आणि आइने केलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि रस्सा घालुन एकत्र कालवलेल्या वरणाला मात्र मी खूप मिस करायचो.कधी तरी थोडासा काळा (गोडा मसाला आईच्या हातचा) आणि दाण्याचं तेलं.. घातलं की माझं दुपारचं  खाणं कालवलेलं घट्ट वरण आणि पोळी बरोबर व्हायचं.    आजकाल प्रमाणे, आई , दुपारी काय खाउ?? असा प्रश्न कधीच नसायचा.स्वयंपाक घरात जायचं आणि वरणाचा गोळा वरच्या प्रमाणे कालवला , की झालं..!

आजकाल प्रमाणे खाउ चे डबे नेहेमी भरलेले नसायचे, चिवडा वगैरे पदार्थ फक्त दिवाळी किंवा इतर काही कारणानेच केले जायचे. विकतचा फरसाण, किंवा इतर गोष्टी आणून डबे भरुन ठेवण्याची पध्दत कधीच नव्हती. मुलांना ब्रेड खाउ घालणं, किंवा विकतच्या गोष्टी खाउ घालणं  ,हे घरच्या गृहिणीला कमी पणाच वाटायचं..

त्यामूळे ब्रेड वगैरे कधीच आणली जात नव्हती.. सकाळी  ६वाजता- पाव, ब्रेड ,जिरा बटर टोस्ट…….. अशी आरोळी ऐकू आली की आईच्या मागे लागायचो. तो एक मुल्ला सायकलला पत्र्याचा डबा लावलेला हे घेउन विकायचा. मग आज वार कुठला?? मंगळवार तर नाहीं ना?? मग ठिक आहे.. असं म्हणून कधी तरी ( नेहेमी नाही) परमिशन मिळायची आणि मग पाव बटर विकत घेतलं जायचं.

चातुर्मास म्हणजे वडिलांचा एकादश्णीचा कार्यक्रम बहुतेक दर सोमवारी असायचा. एका शेवटल्या सोमवारी मग वडिलांचे काही मित्र एकत्र घरी येउन लघु रुद्र करायचे.. आजही ते तालबध्द आवाज डोक्यात घुमतात. श्रावण मधिन्यातल्या चतुर्थीला सहस्त्रावर्तन पण केलं जायचं. त्या दिवशी मला पण सोवळं नेसुन बसावं लागयचद- जे मला कधीच आवडायचं नाही.

श्रावण महिन्यात माझ्या वडिलांचे मित्र होते, ( आणि माझे हेड मास्तर कुर्हेकर सर) त्यांच्या घरी श्रावणी चा कार्यक्रम असायचा. मग सकाळी उठून त्यांच्याकडे जाउन श्रावणी चा कार्यक्रम झाला, की मग नवीन जानवं बदलणे हा कार्यक्रम व्हायचा. त्यांच्या कडे बरेच लोकं जमायचे, आणि मग नंतर तिथेच सगळ्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम झाला की आम्ही घरी परतायचो. श्रावणीच्या दिवशी दिलं जाणारं “पंचगव्य” ( ज्यामधे गाइचं, दुध, तुप, दहि, गोमुत्र, थोडंशेण) थोडंसं हातावर घेउन तिर्था प्रमाणे प्यावं लागायचं. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते .तुमच्या कपाळावरच्या आठ्या मी इथूनही पाहू शकतो.. 🙂  पण तेंव्हा शुध्दीकरणासाठी ते करावं लागयच.  मोठ्या माणसांनी काही करायला सांगितलं तर त्याला नाही म्हणायची प्राज्ञा कोणाचीच नव्हती. तेंव्हा निमुटपणे ते तीर्थ हातावर घेउन जीभ लावल्या सारखं करायचं आणि उरलेलं डॊक्याला हात पुसून टाकायचा.  एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी मिळून खाल्लं तर श्रावणी… ही म्हण इथूनच सुरु झाली असावी.

श्रावण महिना लागला, की मग घराजवळच्या महादेवाच्या मंदीरामधे कसले ना कसले प्रोग्राम असायचे. सकाळच्या वेळी चिकण मातीचे लिंग बनवायला लोकं मंदिरात जमायचे. सहस्त्र लिंग तयार झाले की त्याच्या पुजा आणि रात्री आरास केली जायची.कधी तरी रात्री खेळता खेळता मंदिरात जाउन किर्तन पण ऐकायचो. टीव्ही नसल्यामुळे संध्याकाळ म्हणजे शाखेत जायचं, आणि मग रात्री घरी आलं की मग रामरक्षा, पाढे, झाले की मग जेवण ! जवळपास १६ वर्ष रोज सकाळी ऊठल्यावर संध्या करित होतो. पण नंतर नोकरी निमित्य पुण्याला आल्यावर सगळं बंद झालं. काही गोष्टी केवळ, वडिलांना आवडतात म्हणून केल्या जातात, त्या पैकी एक म्हणजे संध्या करणे, आणि चतुर्थी चा उपवास करणे.. कालांतराने मग सगळं सुटलं..

हे सगळं आठवलं देवेंद्रची गटारी ची पोस्ट बघुन.आजकाल तर बाराही महिने कांदे वगैरे खातो, त्यामुळे त्या कांदेनवमीला खरंच मिस करतोय..  🙂

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

32 Responses to कांदे नवमी

 1. Rohini says:

  thalipeeth ani bhajyancha nusata photo baghun tyancha vaas nakat bharala ani tondala pani sutale. Baki post nehemipramane khamang ani churchurit jhale ahe
  🙂

 2. Aparna says:

  chan zalay lekh…mi kande navami baddal fakt aikun aahe..pan gatari matra ekdam jorat…mutton poori, mase je kai asel te sarva…ani mag shravanat mazi ek maushi (tila kai non veg sihway chalat nase) tikcyakade mase aanale ki mala haluch bolawane pathawi…mhanje gatari la pan kha ani shrawanat pan madhunach chav ghya…ithe mumbai sarkhe mase milat nahit matra….

 3. Mahendra says:

  रोहिणी
  आता वजन खुप वाढतंय म्हणुन नुसता फोटॊ बघुनच समाधान मानावं लागतं. 🙂

  अपर्णा,
  माझा एक मित्र आहे पायआंगले म्हणुन गोव्याचा त्याच्या घरी श्रावणात पुर्ण शिवराक जेवण( व्हेज) असतं.मग मासे असल्याशिवाय तर या गोवनिज लोकांच्या घशाखाली घास पण उतरत नाही. त्याचे वडिल मग पुर्वी शेगडीवर सुकट भाजायचे, आणि त्या सुगंधात सगळ्यांची जेवणं व्हायची.

 4. सुधीर says:

  लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

 5. Mahendra says:

  सुधिर
  ते दिवस मस्त होते ! .. यजोपवितम परमम पवित्रम, प्रजापतयः सहजम पुरस्त्रात.. वगैरे बरेचसे श्लोक आजही आठवतात.
  प्रतिक्रिये करता आभार. बरेचदा एकटा बसलेला असलो की मनातल्या मनात उजळणी केली जाते.

 6. महेंद्रजी,
  मस्त आठवणी आहेत तुमच्या… ! विशेषतः “कांदा भजी, कांद्याचं थालिपिठ, भरली वांगी, शेवग्याच्या शेंगा…!!!” यांनी तोंडाला पाणी सुटलंय 😉

 7. Mahendra says:

  दिपक
  लहान पण एकदम वेगळ्याच वातावरणात गेलंय.. पण त्यातही वेगळीच गम्मत होती..

 8. sonalw says:

  sunder jhalay aajcha lekh. baryach pratha aaj jari junat aani bhakad watat aslya tari tyamage aaplya purwajanche kahi uddesh hote. pratikatmak asayche barech kahi pan tyamage ek shastr hot. tya gosti jari bandhan kaarak kinva andhshraddha waatat aslya tari nit abhyas kelyawar lakshat yet ki ya saglya goshtinmule nisargacha balance tikun hota. mansik aani sharirik swasthya suddha changle raahawe, ritucharye pramane aahar vihar asawa he apekshit hot.
  baalbodh mhanun tyachi thatta karne mala tari patat naahi.
  aaj wyakti swatantryacha sfot aani paishachi aawak ya don mukhy karananmule bandhan konalach nako astaat. ‘sanyam’ki goshtach tyamule harwat chalali aahe. tyachach pratibimb, sagalikade agdi samajik aani jaagtik starawar suddha distach aahe.

  • Mahendra says:

   सोनल
   धन्यवाद.. अगदी मनापासुन दिलेली दाद पोहोचली. बरं वाटलं..

   • sonalw says:

    yawar tumhi ek lekh lihach. majhi farmaish samaja. karan tumhi research chaan karta ekhadya wishayawarti. e.g. shrawanat mase khat nahit karan ha mashancha breeding season asto. tevha tyana maral tar tyamule tyanchi sankhya kami hot jate aani food chain disturb hote. ha tyamagcha shastriy wichar. ase kaay kaay barech aahe, asel. tyawar ek lekh lihita aala tar maja yeil.

 9. inkblacknight says:

  फार पूर्वी मुम्बैत सुध्हा अशा काही प्रथा होत्या. नंतर मात्र त्या एकेक करून बंद झाल्या. फोटोज मस्तच आहेत, विशेषतः कांदे भज्यांचा …

  http://asachkahitari.wordpress.com/

 10. mugdhamani says:

  हे सगळं माझी आईही पाळायची आणि आम्हीही..ज्या वेळी कांदे ४० रु किलो होते तेंव्हा चातुर्मास होता..आम्हाला झळ लागली नाही..;)
  काल परवाच माहेरी भजे करुन कांदे नवमी झाली…:)
  घट्टं वरण, चिरलेला कांदा, तेल, आणि आइने केलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि रस्सा घालुन एकत्र कालवलेलं वरण>> धन्यवाद एवढा छान पदार्थ आठवून दिल्या बद्दल..आता नक्की करुन खाईन एक दिवस..
  मुलांना ब्रेड खाउ घालणं, किंवा विकतच्या गोष्टी खाउ घालणं ,हे घरच्या गृहिणीला कमी पणाचं वाटायचं.>> अगदी खरंय..मला अजुनही असंच वाटतं..पण वेळेअभावी काही पर्याय नसतो..
  मस्तं जमलाय लेख..खूप छान..:)

  • Mahendra says:

   बऱ्याचशा लहानपणी आवडणाऱ्या गोष्टी आपण मोठं झालॊ की विसरतो. त्यातलिच ही एक. खुप गोष्टी आहेत लहानपणच्या कार्तिक महिन्यात आईचं कार्तिक स्नान, आणि काकड आरती ( अजुनही आई करते वय ७५ च्या वर झालं तरिही) नक्ताचे उपवास, आणि बरंच काही…

 11. देवेंद्र चुरी says:

  पावसाळ्यात गरमागरम कांदेभजी…यम्मी …

  • Mahendra says:

   देवेंद्र
   होऊन जाउ द्या आज!!!! पावसाळ्यात कांदा भजी किंवा बटाटा भजी (कींवा कुठलेही भजी) यांना पर्यायच नाही… हे मात्र त्रिकालबाधित सत्य!

 12. Anjali says:

  Hi Mahendra

  Mala jara hi vatle navhte ki tumhi Maharajanche manoos ahat!

  Shree Ram.

  • Mahendra says:

   कित्येक वर्ष आमच्या घरी उपासना चालायची. मागच्याच वर्षी महिनाभर पादुका घरी होत्या- नागपुरला वडिलांकडे. नागपुरला बहुतेक सगळे लोकं ओळखतात त्यांना…
   श्री राम!

 13. Sandeep says:

  Nice post sir..

  Tumcha lekh vachata vachata lakshyaat aala ki bahutek Shravan chalu zalela distoy..ani mag mann 90 chya speed ne bhootkalat mhanje 18-20 varshapurvishchya divsaat gela… tenvha me aani sagala mitra parivaar bahutek chavthi kinva paachvila hoto..shravnaat pratyek divshi bhalya pahate mhanje sakali 4 vaajta aamhi sagle jan vihirivar jaaun thanda paanyane anghol karayacho aani bharalelya panyacha taambya gheum olya kapdyasahit laamb asnaarya mahadevachya devlat jaaun paani ghalun yayacho…purna mahinabhar ..na visarta..
  deva kada kaay magayacha asta yaachi akkal nastana suddha sagli pathya palayacho..

  aani aajkal kaay..tar ha day to day..pizza chinese 1000 channels..hollywood..computer internet mobile..

  kaadhi kadhi vaatata ki jaasta shikun ugich zak maarli aani citi madhe aalo…shaletach naapas zalo asto ta bhara zala asta 🙂

  keep writing..

 14. Mahendra says:

  संदिप,
  अगदी १०० टक्के सहमत!! उगिच आलो इथे या कॉंक्रिट जंगलात असं वाटतं कधी कधी.. !
  महादेवाला पाणी घालणं आम्ही पण श्रावण सोमवारी करायचो.. १०८ बेलाचीपानं वहाणं., किंवा गणपतीला २१ जुड्यांचा हार…अशा अनेक आठवणी आहेत…प्रतिक्रियेकरता आभार..

 15. आरती says:

  आपल्या विदर्भात अमरावती-अकोल्याकडे या प्रथा अजूनही कमी जास्त का होईना पण पाळल्या जातात. आमच्या कडे (आता पुण्यात असूनही) कांदे वांगे बंद, सोमवारचा अभिषेक, नागपंचमी चे उकडीव दिंडं, शुक्रवार, महालक्ष्म्या, नवरात्र अगदी साग्र संगीत केल्या जातं…पण एकूणात हे सगळे सणवार फार त्रासदायक आहेत असं माझं वैयक्तीक मत आहे! मुलांच्या व्ह्यू ने बघीतलं तर ठीक आहे पण घरातील बाईला मात्र फार त्रास होतो शारिरीक आणि मानसिक!

  • Mahendra says:

   आरती
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पण कर्म कांड जितक्या प्रमाणात विदर्भात पाळले जातात तितक्या प्रमाणात इथे पाळणं शक्य होत नाही. मुंबईची लग्नं सकाळी ६ वाजता हॉल घेतला की सुरु होतात आणि १० वाजेपर्यंत सिमांत पुजन ते सुनमुख वगैरे सगळं काही आटोपतं.. विदर्भात हाच सोहोळा सन्ध्याकाळ पर्यंत चालतो.
   मला लहान असतांना आईला स्वयंपाकात सोवळं नेसुन केलेली मदत पण आठवते. अगदी रेग्युलरली प्रत्येक सणाला, किंवा कूळाचाराला, चटण्या वाटुन देणे वगैरे प्रकारची मदत करायचॊ. पण नंतर बहिण मोठि झाल्यावर बंद झालं..रामकृषण परमहंसांचं गॉस्पेल वाचल्यावर बरेचदा हा प्रकार नकोसा वाटायला लागला. पण अजुनही द्विधा मनःस्थिती मधेच जगतोय.. 🙂

 16. Nilesh says:

  महेन्द्रजी,

  लेख फार छान आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वाचताना मजा आली.

  निलेश जोगळेकर

 17. पाऊस आणि कांदा भाजी एक अतूट नाते ..

  • अगदी खरं, पण हल्ली कांदा भजी च्या प्लेट कडे आणि आपल्या वाढलेल्या पोटाकडे बघत हात आवरतो 🙂 ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.

 18. shriram sinde says:

  liked it very much.. but one of your icons ‘archives’ reads a wrong prounciation of the word. it reads archives as in archies.. it should read archives as in arkives…

 19. vaishali choudhari says:

  mi aaj pahilyandach ha lekh vachala mst vatala.sir mi aaplyala odkhat nahi pn mazya ayushyatil khup aathawani jagya zalya dhanyawad. manpurvak shubheksha.

  • वैशाली,
   प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.. बरेच दिवस नेट वर नसल्याने उत्तरास उशीर होतोय..

 20. Nitesh wath says:

  मी तर एवढच सांगू शकेल की मला ही गोष्ट खुप आवडली . मला काही लेख लिहिता येत नाही पण मी खर सांगतो मला ही गोष्ट एकून माझ्या अंगावर काटाच आला . वाचून छान वाटल .
  Tys- Nitesh wath

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s