अभिरुची

पुन्हा पुन्हा पुण्याला जावं लागतंय. या आठवड्यात पुण्याला दुसऱ्यांदा जावं लागलं. अगदी कंटाळलो होतो. पण जाणं भाग होतं. एखादा दिवस वाईट निघाला की प्रत्येक गोष्ट मनाच्या विरुध्दच होते – तसा दिवस होता कालचा. सकाळी ७ वाजता बोलावलेला टॅक्सी वाला चक्क ९-३० वाजता आला. नेहेमी प्रमाणे गाडी खराब हो गई थी, म्हणून लेट हो गया..वगैरे वगैरे झालं.

लवकर चल रे बाबा, म्हणून सरळ, माटुंग्याला मित्राकडे गेलो, आणि त्याला घेउन पुण्याला निघालो. रस्त्यावर मागच्या आठवड्या प्रमाणेच निसर्ग सौंदर्य होतं, पण मागच्या वेळ प्रमाणे ते आज मला मोहवत नव्हतं..माझ्यातला एखाद्या गोष्टीतला आनंद घ्यायची शक्ती कमी तर होत नाही नां?म्हणजे नजर मरते म्हणतात नां.. तसं काहिसं आहे हे.. नजर मेल्यासारखी झालेली आहे निसर्गसौंदर्य बघून सुद्धा!

पण नाही..अगदी खरं सांगू का आमचा एक जवळचा मित्र नेहेमी असे काही तरी भन्नाट डायलॉग्ज मारत असतो, आणि ते एकदम कधीतरी आठवून हसू येतं..कधी तरी कुठल्यातरी इरिलिव्हंट संदर्भातही त्याचे डायलॉगज अगदी चपखल बसतात.. त्यातलाच हा एक..,सुंदर मैत्रीण असेल तर तिची जादू लग्न होऊन ती बायकॊ होई पर्यंत टिकते,  तसं आहे हे! 🙂 काही दिवसांतच नजर इकडे तिकडे घसरते..   तो नेहेमी म्हणतो..,  की कुठल्याही सुंदर स्त्री कडे न पहाणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. आणि बिइंग अ जंटलमन मी कधीच कुठल्याही स्त्रीचा अपमान करित नाही.. !! ही सगळी चेष्टा- मस्करी आहे बरं कां.. नथींग  सिरियस अबाउट इट!!!!!!!  🙂 🙂

हा असला की पार्टी मधे एकदम जान येते. काहितरी विचित्र बोलून लोकांना हसवत ठेवण्याचं याचं कसब वाखाणण्यासारखा आहे..

आता एका आठवड्यात दोन वेळा लोणावळा एंजॉय करण शक्य नाही हे एक सत्य आहे – हे लक्षात आलं. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यावर सारखं वाट्तं की इथे अजुन थोडं रहाता आलं तर काय मज्जा येइल नां? पण खरंच रहायची वेळ आली तर मात्र कंटाळा येतो, हे मी बरेचदा अनुभवलं आहे.कदाचित म्हणुन असेल गाडित बसुन डोळे बंद करुन विचार करु लागलो, की राहिलेल्या दिवसात कसं काय सगळं काम करायचं ते!!

सिंहगड रोडवर एका मित्र कम डीलरकडे जायचं होतं, तिथे पोहोचायलाच १ वाजला.  त्याला आधी फोन केला टोल बुथ पासुन तर तो म्हणाला तुम्ही सरळ सिंहगड रोडवरच्या, अभिरुची हॉटेलमधेच या, तिथे जेवण करुन मग नंतर ऑफिसला जाउ…

त्याने सांगितलेल्या हॉटेल समोर गाडी लावली.. मस्त !!! गेटजवळ खास पुणेरी पध्दती प्रमाणे एक काउंटर होतं.निरनिराळ्या सूचना पण तिथे लिहिल्या होत्या.. इथेच प्रिपेड कुपन्स घेउन आत जा, असं तो काउंटरवरचा माणुस म्हणाला. तिथेच भिंतीवर एक बोर्ड लागलेला होता. बघा इथे…माफ करा, तो फोटो निट आलेला नाही. इथे कोरफड, गवती चहा आणि अशा अनेक वस्तू मिळतील असा बोर्ड होता तो.

Pune

आज शिरल्या बरोबर मस्त हिरव्या गार शेतामधे आल्यासारखं वाटलं. सुंदर हिरवं लॉन असूनही लॉन सारखं न वाटणारं लॉन.. मला काय म्हणायचंय ते समजेल  अशी अपेक्षा आहे.

230720091690

त्यावर फिरणारे बदकं.. डाव्या हाताला, लहान मुलांना खेळायला खेळणी, दोन झाडांच्या खोडांना बांधलेला झोपायचा पाळणा.. आणि बरंच काही.

230720091695

एकदम अहमदाबादच्या हॉटेल विशाला, आणि इंदुरच्या, किंवा राजकोटच्या चोखी ढाणी ची आठवण झाली. नाही…. तसं नाही. हे अगदी वेगळं हॉटेल आहे, चक्क एखाद्या खेड्य़ासारखं वसवलेलं अगदी भर वस्तीतलं हे हॉटेल. इथेच पिकवलेल्या भाज्या वगैरे इथे वापरल्या जातात. मस्त वातावरण होतं. पुणेकरांना निश्चितच माहिती असणार हे सिंहगड रोडवरचं हॉटेल.

इथे आत जाउन बसलो, तर नम्रपणे तो हॉटेलमधला माणुस म्हणाला, साहेब बुट बाहेर काढून ठेवा, बुट बाहेर काढले आणि आत जाउन बसलो. मस्त पैकी थंड गार हवा सुटलेली होती. थोडा थोडा रिमझिम पाउस सुरु होता.अशा वातावरणात त्याने समोर मिरगुंडाचं ताट आणुन ठेवलं.. आम्ही पाचही जण तुटून पडलो.. त्या मिरगुंडावर.हा पापड सदृष्य पदार्थ मुंबईला आल्या नंतरच खाण्यात आला.मिरगुंड म्हणजे दहीभाता बरोबर खायचा पदार्थ नाही.. नुसता पण चांगला लागतो.. याची  जाणिव झाली.. इथून पुढे जास्त लिहित नाही फक्त पोस्ट करतो ते फोटॊ..

230720091696बॅगराउंडला ज्या लहान लहान झोपड्या दिसतात, तिथे बसून पण जेवता येतं.गवताने शाकारलेल्या झोपड्य़ा हिरव्या बॅगराउंडवर मस्त दिसतात..

230720091697जेवण सुरु करण्यापूर्वी फोटॊ काढायचं विसरलो. म्हणून आता अर्धं झाल्यावर काढलाय फोटो. जेवण सुरु झालं आणि मस्त पैकी गरम गरम कांदा भजी ( खेकडे नाही.. घरच्या सारखी 🙂 ) समोर आणून ठेवली. आणि म्हणता म्हणता भज्याचं ताट रिकामं!

सोबत झुणका, चटणी, सॅलड, कोशिंबिरी , तोंडली भात होताच.. अजूनही काही भाज्या होत्या ज्या मी घेतल्या नाहीत. तुमच्या समोर सरळ भांडच आणून ठेवतो तो भाजीची…. 🙂

230720091700या मावशींना बघा, मस्त पैकी चुलीवर गरम गरम , बाजरी, मका, ज्वारीच्या भाकरी करुन वाढताहेत.

230720091698 जेवण झाल्यावर स्विट डीश..इतकं जेवलोय की आज रात्रीचं जेवण वर्ज्य!!!! 🙂

230720091711

जेवण झाल्यावर इथे मुलांसाठी काही खास राईड्स पण आहेत. इथे बघा कुठल्या आहेत त्या.. आणि त्याला किती खर्च आहे ते..

230720091703मुलांना मातीमधे खेळायला आवडतं.. म्हणून इथे कुंभारकला ( शब्द बरोबर असेलच ) शिकवण्याची पण सोय आहे.

230720091706आणि ही डायनॉसॉरची घसरगुंडी खुपच आवडेल मुलांना.. ही जागा तुमच्या द प्लेसेस टू बी व्हिजिटेड ड्युरिंग पुणे.. लिस्ट मधे ऍड करा. मी तर खुपच एंजॉय केलं इथे… अ गुड प्लेस टु हॅंग अराउंड!! आणि हो जेवणाचे फक्त १५० रुपये.. !!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , . Bookmark the permalink.

19 Responses to अभिरुची

 1. महेंद्रजी,
  ….सिद्धार्थ काक – रेणुका शहाणे च्या “सुरभि” या शो मध्येही हे दाखविण्यात आलं होतं. याच ठीकाणी पिकवलेलं गहु-तांदुळ – जेवणासाठी वापरले जातात! आंब्याचं लोणचं हेही इथली एक खासियत आहे!

  मला ह्या विकेन्डसाठी फॅमिली लोकेशन सुचविल्याबद्दल अनेक धन्यवाद. अगदी मनात असुनही – लक्षात न राहिलेलं हे अभिरुची..!

  • Mahendra says:

   दिपक

   मस्त जागा आहे. जरुर जा.. मी तर अगदी प्रेमातंच पडलोय या जागेच्या. पुढल्या भेटित पण निश्चितच जाणार इथे..जेवणं अगदी चवदार आणि घरच्या सारखं.. रहाण्याची पण सोय आहे ६०० रुपयात इथे.. छान एसी रुम्स आहेत..

 2. bhagyashree says:

  oh.. my most fav place in pune ! lahan pana pasun 50da tari gele asin.. atishay awdta.. 🙂 atta javasa vattay photo pahun! 😦

  btw, aamrai madhe gela nahit ka? tyache nahi disle snaps.. pudhachya tya aamrai madhe mast zadanvarchi ghara, zadanna latkvlele hammocks, tithle kokam che sarbat! jaude! 🙂

 3. आल्हाद alias Alhad says:

  मुंबईहून कारनं जाण्यासाठी जरा डिटेल रस्ता सांगा…

 4. Mahendra says:

  alhad . Its ön sinhagarh rd. Vry famous place.

 5. @आल्हाद

  Abhiruchi
  Farm and Cottage Restaurant
  Bhide Baug,
  Sinhagad Road,
  Wadgaon-Budruk,
  Pune 411 041.
  Maharashtra, India.
  Ph. 020-24392483
  Telefax : 020-24392588
  (Near Mumbai-Bangalore Diversion Highway Overbridge)

 6. Mahendra says:

  भाग्यश्री
  अगदी घाईगर्दीत एक जनरल राउंड मारला. तिकडे फार चिखल होता..आणि कामं पण बरिच होती, म्हणुन एक लहानशी चक्कर मारली आणि परत गेलो. पण नेक्स्ट टाइम.. नक्कीच पुर्ण पहाणार ही जागा!तुम्ही ५०च्या वर जास्त वेळ गेला आहात, अर्थातंच, ती जागा आहेच वर्थ !
  दिपक
  धन्यवाद.इतका करेक्ट पत्ता मला पण देता आला नसता.

 7. bhagyashree says:

  hehe 50 was a bit exaggeration ! 😀 pan 20 vela nakki.. 🙂

  • Mahendra says:

   ५० काय किंवा २० काय… ’वारंवारिता’ महत्वाची ! पण गर्दी अगदी कमी होती. पुर्ण हॉटेलमधे फक्त दहा बारा लोकं होती..जाहिरात कमी पडते बहुतेक..बऱ्याच पुण्याच्या लोकांना पण माहित नाही ही जागा..

 8. rohan says:

  अरे वा दादा … काल पोस्ट पाहिली नव्हती मी.. आज बघतोय … सही आहे रे. कांदाभज्या.. गुलाबजाम आणि खरवस आहे का रे तो ??? पत्ता दिलेलाच आहेस वरती. ह्यावेळी पुण्याला आलो की एकडे नक्की जाणार. 😀

  • Mahendra says:

   रोहन,
   अरे खरवस संपला होता, म्हणुन श्रीखंड दिलं होतं. तिथल्याच गाइंच्या दुधापासुन बनवलेलं होतं ते.. अरे खुपंच मस्त आहे हॉटेल.. मस्ट गो…

 9. bhagyashree says:

  mahendra, i don’t think its advertisement issue.. pavasat generally nahi jat loka.. mi ekdach gele..punyachya lokanna nakkich mahit asta ho he.. 🙂 abhiruchi,ghatge garden,sanskruti,chokhi dhani… punekar padeek! 😀

  • Mahendra says:

   भाग्यश्री
   चोखी ढाणी वगैरे पेक्षा नक्कीच दहा पट सरस वाटली ही जागा मला. हा ट्रेंड गुजराथ मधे खुप आहे, पण इथेच पिकवलेल्या वस्तुंपासुन स्वयंपाक करुन वाढण्याचा हा उपक्रम जरा वेगळाच आहे..
   आणि सगळ्या पुणेकरांना ठाउक नाहीये.. मला बऱ्याच मित्रांनी धन्यवाद म्हणुन फोन केलेत… 🙂 नविन जागा सांगितली म्हणुन. ऐकुन बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण अजुनही गेलेले नाहित लोकं इथे..

   आणि पुणेकरांना काय हॉटेल मधे जायला कधिही चालतं. मागच्या आठवड्यात पुना गार्डन ला थांबलो होतो, जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर, तिथे पण खुप गर्दी होती..

 10. Aparna says:

  aamchya pudhachya bharat trip madhe nakki cousins cha get together ithech karawa mhanate…post chaaaaaaaaaaanach aahe

 11. Gurunath says:

  माझ्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरच आहे हे

  • बंद झालेलं दिसलं . मध्यंतरी एकदा गेलो होतो तेंव्हा तिथे पाटी लावलेली दिसली – बंद करण्यात आलेलं आहे म्हणून.

Leave a Reply to भुंगा Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s