कॉंट्रासेप्टीव्ह्ज

जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशीच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभीर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सूचक आहे की मुली सोबत टिव्ही वर पहातांना पण  लाजिरवाणे होतं.

ह्या जाहिरातीत म्हटलंय की २४ तास ते ७२ तासात अन प्रोटेक्टेड सेक्स च्या नंतर जर ही गोळी घेतली तर प्रेग्नन्सी थांबवता येते. पण याच कंपनीच्या एका लिफलेट मधे दिलंय की या गोळी चा इफेक्टीव्ह नेस २४ तासात ९५ टक्के, २५ ते ४८ तासात ८५ टक्के आणि ४९ ते ७२ तासात फक्त ५८ टक्के असतो. पण जाहिरात मात्र अशी केली जाते की …….मुलींना हे सगळं प्रकरण एकदम सोप्पं वाटावं.. म्हणजे काय एक गोळी घ्या आणि विसरुन जा..

ही गोष्ट म्हणजे  जाहिरातीतली फाइन प्रिंट न वाचल्यामुळे जर मुलींनी ह्या कडे एक कॉंट्रासेप्टिव्ह म्हणून पहाणं सुरु केलंय की जे अगदी चुकीचं आहे. हे कॉंट्रासेप्टीव्ह नाही ही गोष्ट जी अगदी ओरडून सांगायला पाहिजे ती मात्र अगदी बारीक अक्षरात लिहुन ठेवलेली असते.. या वर कोणाचाच धरबंद नाही का?

आय पिल च्या वरचे  फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स इथे आहेत..

ती एक नवीन जाहिरात आजकाल खूप पॉप्युलर झालेली आहे.. आय पिल ची.. अनचाही प्रेग्नन्सी रोकनेके लिये.. खूप  प्रोव्होकेटीव्ह नेचरची जाहिरात आहे ती. अगदी मारुच्या टॅक्सी पासून तर लोकल पर्यंत … अगदी सगळ्या ठिकाणी ही जाहिरात दिसते.

हीच जाहिरात टीव्ही वर पण दाखवली जाते. एक चिंताग्रस्त स्त्री, आणि काही सूचक डायलॉग्ज , जे कुटूंबा सोबत बसून  फॅमिली पहातांना लाज वाटावी असे.ही एक लग्न न झालेली तरुणी आणि .. लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वतःच का बघत नाही इथे? या व्यतिरिक्त अजुन दोन जाहिराती आहेत…

कंपनी ने केलेल्या जाहिरातीचा हा परिणाम म्हणजे आता मुलांना असं वाटतंय की अन प्रोटेक्टीव्ह सेक्स नंतर एक आय पिल घ्या.. बस्स~! झालं.. पण खरंच कां इतकं हे सोपं आहे?  आणि सक्सेस रेट जरी ८५ % असला (इफ ऍट ऑल यु टेक पिल इन २४ अवर्स) तरीही जर तुम्ही उरलेल्या १५ टक्क्यांमधले असाल तर?

हा व्हिडीओ अगदी ओपनली सेक्स्युअलिटी बद्दल बोलतो.  आजकालचे टीन्स या गोष्टी कडे कसे पहातात ते बघा..

सारखं सांगितलं जातं की ७२ तासात तुम्ही पिल घेतली तर तुमची प्रेग्नन्सी थांबवू शकता-सक्सेस रेट ५८ टक्के हे लपवुन ठेवलं जातं –असं म्हणण्यापेक्षा सांगितलं जात नाही ओरडून सगळ्यांना. आधी हे सांगायला हवं.. आय पिल बद्दल जाहिराती मधे..

हो.. अगदी माझ्या मनातले च विचार तुमच्या पण मनात आले आहेत , तुम्हाला पण त्या व्हिस्परची सॅनिटरी नॅपकिन्स ची जाहिरात घरच्या स्त्रियासोबत टिव्ही वर पहाण्यास लाज  वाटते हे मला माहिती आहे. पण बऱ्याच गोष्टी आपण ऍक्सेप्ट करतो पण ही गोष्ट जरा जास्तच होते ! नाही का?…

काही दिवसापूर्वी एड्स अवेअरनेसच्या जाहिराती खूप ठिकाणी लावल्या होत्या. कंडोम कब कब..यौन संबंध जब जब.. अगदी उघडपणे यांचं म्हणणं होतं, की कंडोम वापरा आणि एड्स टाळा!! अरे काय हे… सरळ सरळ आपल्या संस्कृतीच्या वर हल्ला आहे हा.. ऍडल्ट्री करता तुम्हाला पोव्होक करताहेत अशा जाहीरात च्या माध्यमातून..या एनजीओ ना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे आता.

हा विषय तसा नाजूक, म्हणून तुम्ही इथे कॉमेंट्स टाकल्या नाहीत तरीही चालेल, पण स्त्री असाल, तर कृपया सगळे व्हिडीओज वर दिलेले स्पेशिअली टिन्स चे आवर्जून बघा…

पूर्वी  काळी पर्ल सेंटर – केवल ८० रुपये मे छूटकारा अशी एक जाहिरात पण लावलेली असायची लोकल मधे- तिची आठवण झाली..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व, मेडिकल सायंस and tagged , , , . Bookmark the permalink.

18 Responses to कॉंट्रासेप्टीव्ह्ज

 1. Deepak Parulekar says:

  जगात कोणती गोष्ट एकदम १०० % सुरक्षित आहे ? अगदी पुरुषांसाठी असलेले काँडम्स तरी कुठे १००% हमी देतात? माफ करा. पण तुमचे “विथ फॅमिली बघताना लाज वाटते” हे वाक्य फारच टोचते. आजकाल सगळ्याच गोष्टींची जाहिरात केली जाते त्याशिवाय सॅनिटरी नॅपकिन, काँडम्स हे सर्व आपाल्याला कळले तरी असते का?. आणि जाहिराती आपल्या संस्कृतीवर हल्ला कसा कय चढवतात ? ह्या सर्व जाहिराती सर्व सामन्यांना कळाव्यात म्हणूनच अशा लँग्वेजेस मधून बनवल्या जातात.

  • Mahendra says:

   दिपक
   प्रतिक्रिये करता आभार. पण या जाहिराती चुकिच्या गोष्टी ऍड्व्होकेट करताहेत. जसे, आय पिल घ्या म्हणजे गर्भ रहाणार नाही. सक्सेस रेट हा ५४ ट्क्के आहे ७२ तासात घेतली तर, पण नेमकं हेच सांगितलं जात नाही. त्यामुळे मुलिंना असं वाटतं की हे एक कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे .. आणि अनप्रोटेक्टेड सेक्स नंतर ही गोळी घेतली की झालं..
   बऱ्याचशा गोष्टी या आपोआप कळतात. त्या शिकायची गरज नसते. अर्थात उत्सुकता असतेच.. पण वेळ आली की सगळं आपोआप शिकलं जातं. त्याच्या जाहिरातींची गरज नाही.. असं मला वाटतं..
   या जाहिरातीतुन हेच सांगितलं जातंय की तुम्ही काहिही करा आणि आय पिल घ्या, नो प्रेग्नन्सी.. जे अगदी खोटं आहे.. आपल्या संस्कृतित प्रि मॅरिशिअल सेक्स सर्व सम्मत नाही.. म्हणुन तो ऍडव्होकेट करणाऱ्या गोष्टींना संस्कृतीच्या विरुध्द आहेत असे वाटले म्हणुन तसं लिहिलंय..
   आणि जर जाहिराती करायच्याच असतिल तर फाइन प्रिंट जरा मोठ्या अक्षरात अधोरेखांकित करुन छापाव्या…

  • swapna says:

   deepak,
   1. hya jahirati pahtana family sobat, laj vatate he barobar aahe. karan aaj kal yenarya condoms chya add pahilyat tar tumhalahi he patel. hi add lagali ki kiti jan makhha pane tv kade pahat basu shktat(family sobat astana?)…
   2. hya adds sanskrutivar ghav ghaltat. he hi kharay karan jar tumhi pune mirror sarkhya paper madhye yenare sex-expert che prashna pahile ki tumhala kalel, 50% questions hya arthache astat ki “maze vay 17 aahe, maze sambandh aale 20 varshachya mulashi. pan me i-pill ghetali. tari ajun periods aale nahiyet. aani me jar eka divasat 3 da sambandh thevale tar 3 da i-pill gheu ka??”
   me he vachalay… ata sanga, ji bhiti hoti, lagna aadhi sambandh thevanyachi, ti i-pill ni ghalvali nahi ka? aani samja nahi rahili mulagi preganant tari tichya shariravar hyache kai parinam hot astil? he tari add sangate ka?
   aani 30 secandat adds sangu shakat nahit mhanun tar kaka sangataet na aaplyala…

   • धन्यवाद.. स्वप्ना..
    अगदी प्रत्येक मुलीने वाचली पाहिजे अशी पोस्ट आहे ही. पण पुर्वी फार कमी लोकं ब्लॉग वाचायचे , म्हणून दुर्लक्षित राहिली ही पोस्ट.

 2. mugdhamani says:

  तुमचं म्हणणं पटतंय़ महेन्द्रजी..(आय पिलसारख्या) जाहिरातींमुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते.
  टि.व्ही वर सततच अश्या जाहिरातींचा मारा होत असतो..जाहीरातींना सुद्धा सेंसोर लागु करावं असं माझं मत आहे. तेव्हाच त्या कुटूंबासोबत पाहण्यालायक होऊ शकतील..
  व्हिस्परची सॅनिटरी नॅपकिन्स ची जाहिरात घरच्या स्त्रियांसोबत टिव्ही वर पहाण्यास लाज वाटते हे मला माहिती आहे.>> या जाहिरातीकडे एखाद्या औषधाची जाहिरात आहे म्हणुन बघायला काय हरकत आहे? माझा आक्षेप आहे तो नको त्या गोष्टी दाखवण्यावर…
  जाहिरात बनवतांना लोकांना होणार्या embarrassment कडे जाहीरात कंपन्यांनी लक्ष द्यायला हवे.

 3. Mahendra says:

  मुग्धा
  मान्य आहे, कदाचित एकवेळ नॅपकिन्स ची जाहिरात पार्डनेबल आहे, कारण त्यात काहिच अतिशयोक्ती नाही. आणि केवळ माहिती पुर्ण आहे. पण आय पिल सारख्यांना आता थांबवायला हवं, कींवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सेन्सॉरशिप लावायलाच पाहिजे..

 4. rohan says:

  ह्या आणि अश्या अनेक हटके विषयांवर लिहिण्यामध्ये तुझा हातखंडा आहे दादा … 😀 ‘मानबिंदु’ आणि ‘मुक्तपिठ’वर हल्लीच तुझी आठवण काढत होते रे सगळे … !!!

  • Mahendra says:

   रोहन
   एखादी गोष्ट मेंदुला कुरतडायला लागली की त्यावर लिहुन काढल्याशिवाय समाधान होत नाही. आणि शांतता पण मिळत नाही. मानबिंदु आणि मुपी मी पण मिस करतो.. पण चालायचंच.. एव्हरी गुड थिंग शुड कम टु ऍन एंड..
   या जाहिरातीचा मारा इतका जास्त प्रमाणात केला जातोय की त्यांच्या कडे तुम्ही दुर्लक्षच करु शकत नाही..मार्केटिंग मधे हे सगळं गिमिक चालतंच पण औषधाच्या बाबतित हे नसावं.. असं वाट्तं..

 5. Girish says:

  MBK,
  With very costly time slots on TV media manufacturers are bound to squeeze the advertisement and showcase only plus points. However, i guess they should just mention “conditions apply”, rather it should be made compulsory by health ministry for at least products related to health and hygiene.

 6. Pravin says:

  पूर्ण माहिती द्यायला हवी हे खरच आहे परंतु कुठल्याही जाहिरातीचा हेतू हा 30 सेकंदात फक्त प्रॉडक्ट च्या पॉज़िटिव बाजू दाखविणे इतकाच असतो. ग्राहकाने जागरूकतेने * मध्ये अधिक काय काय अटी आणि माहिती लिहील्यात ते पाहायला हवे. * conditions apply हे टीवी वर दाखवण्यात येणार्‍या जवळपास सर्व जाहिरातींसाठी लागू होते. राहता राहिला प्रश्न असल्या जाहिराती सहकुटुंब पाहण्याचा तर 21 व्या शतकात आपली मानसिकता थोडी बदलावयास हवी. आपल्या पिढीच्या दृष्टीने जे चुकीचे आहे ते पुढच्या पिढीच्या दृष्टीने चुकीचे नसेल (उदा. gay marriages, live-in relationships, sex b4 marriage). त्यातून निर्माण होणार्‍या धोक्यापासून वाचवणारी i-pill सारखी प्रॉडक्ट्स त्यांच्यासाठी उपलब्ध असतील तर त्यांची माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि त्याच हेतू मधून ही जाहिरात आलीय. आता जाहिरातीमधून कुठला भाग घ्यायचा हे ठरविण्याइतके शहाणे तर आपण नक्कीच आहोत. आणि तरीही ती जाहिरात नकोच असेल तर आपल्या हातात रिमोट आहेच की

  • Mahendra says:

   प्रविण
   शेवटचं वाक्य खुप आवडलं. रिमोट असतो ना आपल्या हातात…!
   अहो, आजकालची जनरेशन ऍड्व्हर्टाइझमेंट्स ड्रिव्हन आहे. बरेचसे निर्णय जाहिराती पाहुनच घेतले जातात. या पोस्ट मधले व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येइल मुलांचा व्हु या प्रॉडक्ट कडे पहाण्याचा! त्यांना चक्कं हे कॉंट्रासेप्टीव्ह वाटतंय!

 7. princess says:

  mahendra,

  agadee barobar lihilay tumhee. family sobat baghayala kharokhar laj vatate asalya ads pahayala.

  agadee char pach varshachee mule suddha ya ads baghun prashn vicharatat. sagalyanach ya goshteeche dnyan milayala havech , pan jara yogya vayat.

 8. Vinay says:

  काका,

  शेवटी आपली संस्कृती काय आहे? ज्यात मुला-मुलींची लग्न दहाव्या वर्षी लावली जायची? शिवाजी महाराजांचं लग्न त्यांच्या दहाव्या वर्षीच लावलं होतं. अगदी लोकमान्य टिळकांनी सुद्धा आपल्या कन्येचं लग्न तिच्या सोळाव्या वर्षी लावलं होतं. आज आपण लावतो का एवढ्या कमी वयात मुला-मुलींची लग्न? मग, ह्या बाबती आपण संस्कृतीच्या विरोधात नाही जात का?

  आणि ती संस्कृती ज्यात संभाजी महाराजांना कलावंतिणींचा नाद होता, पुण्यात पेशवाईतील अनेक ब्राम्हण बावनखणीच्या किती खेपा घालायचे? अगदी १८५७ च्या युद्धाचे नायक (हिरो) नाना साहेब पेशवे सुद्धा जनान खाना बाळगून होते. कोल्हापुरच्या शाहू महाराजां बद्दलही दब्या आवाजात हेच बोललं जातं. इतिहासातच अशी अडल्ट्रीची अनेक उदाहरणं आहेत.

  त्यामुळे ह्या जाहिराती आपल्या संस्कृतीवर घाव घालत आहेत, हे म्हणणं चुकीचं आहे. पण ह्या जाहिरातीतून पाहिजे तो संदेश पोहचत नाहीये, ह्याची खंत बाळगणे अगदी बरोबर आहे. “सेफ सेक्स” बद्दल जागरुकता निर्माण करण्या ऐवजी ह्या जाहिराती “सेक्स” प्रोमोट करतात, हे म्हणायला हरकत नाही. कारण मुला-मुलींना वाटतं की i-pill आहे ना, मग काळजी कसली. ह्या गोळ्या शरीरात प्रचंड प्रमाणात हार्मोन्स रिलीज करतात, त्यामुळे अनेक साईड-इफेक्ट्स होऊ शकतात हे कळतच नाही.

  जागरुकता निर्माण करणे हे उत्पादकाचं (high priority) काम नाहीये. ते समाजचं आहे, आणि समाजाने ते अधिक जवाबदारीने पार पाडलं पाहिजे.

  • विनायक,
   दहा वर्षाच्या मुला मुलींची लग्न लावणं ही पण संस्कृती नाही. ती पूर्वीच्या काळची परंपरा होती. जरी लग्न लावलं, तरीही वयात येई पर्यंत मुलगी आपल्या आई वडीलांच्या कडेच रहात असे. संबंध वगैरे ठेवले जात नसते.

   बाहेरख्याली पणा ही आपली संस्कृती कधीच नव्हती तर माझ्या मते ती विकृती होती. प्रत्येक समाजात विकृत माणसं असतातच. बहुसंख्य लोकं जरी विकृती कडे झुकणारे वर्तन करू लागले , तर त्याला संस्कृती म्हणता येणार नाही.

 9. SV says:

  I agree to all this that you all have commented…
  i would like to share one more important thing about I-pill…

  I work in a Hospital and hence i know a few hidden / untold things…you may say so…

  First, I pill is not a Contraceptive Pill. It is a pill that stops the Conception from taking place. Its mentioned in the small booklet inside the pack.I-pill is safe if taken only in case of an emergency e.g : faulty condom, forgot to continue with the birth control pill, Unsafe Sex but wrong timing etc.
  I have seen, known, heard of girls / women who believe in having I-pill every time they have sex.
  One known case – Total pills taken 120 in 9 months. Today her periods are irregular, problematic, painful and troublesome. And the worst, she might not be able to conceive ever… Because her body is now used to I-PILL…..

  Horrible ….. but its a reality!!!!
  Friends…. please tell everyone (specially girls / women) don’t believe in something so much that you realize that you have lost everything just for that 1 minute of togetherness….

  Thanks & Regards,
  SV

 10. ruchira2702 says:

  kaka post aavdala… actually u have greatly handled this sensetive topic… i totally agree with ur thoughts…

  • रुचिरा,
   ती जाहीरात खरंच माझ्या डोक्यात जायची. अर्धवट काही तरी माहिती प्रसारीत करणे योग्य नाही. ब्लॉग वर स्वागत आणि आभार.

Leave a Reply to Girish Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s