एअर सेल..

पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या  व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात.   अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग  न्यूज देतो याची वाट पहात तिथे उभे असतात. त्या भागात रहाणारे लोकं सबवे बंद होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात, आणि हे लोकं कधी सबवे बंद होतो   याची वाट पहात असतात…………! असो…

जाहिरातींचे विश्व मला नेहेमीच खुणावत असतं.जर मी इंजिनिअरींग च्या फिल्ड मधे नसतो तर नक्कीच ऍडव्हर्टायझिंग हे फिल्ड सिलेक्ट केलं असतं. पण खरं म्हणजे माझ्यामध्ये हिम्मत नव्हती आपल्या आवडीच्या फिल्ड मधे जायची नाहितर माझ्या एका मित्रा प्रमाणे मी पण ऍड्व्हर्टायझिंग एजन्सी सुरु केली असती.माझा एक जवळचा मित्र आहे, त्याने इंजिनिअर होऊन चक्क ऍडव्हर्टाइझ एजन्सी सुरु केली. आणि ती एजन्सी तो यशस्वीपणे चालवतोय!.. असो… मॊस्ट फॅसिनेटिंग फिल्ड..

एखाद्या वस्तूची जाहिरात करायची तर त्या वस्तूची व्हिजिब्लिटी वाढवावी लागते. नुसता ऑडिओ व्हिडीओ ऍड्सचा मारा करूनही बरेचदा ऍड कसली आहे तेच लक्षात रहात नाही..

एअरसेल सेल कंपनीने मात्र  अगदी  थोडे पैसे खर्च  करुन खूप मायलेज मिळवलं. आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात अगदी मटा सारख्या , आणि टाइम्स किंवा मुंबई मिरर च्या फ्रंट पेजला एक कपर्दीकही खर्च न करता छापून आणली…..

त्यांनी काय केलं , मिलन सबवे जवळ एक मोठं होर्डींग लावलं होतं-एअरसेलच्या जाहिरातीचं. हे होर्डींग पावसाळा सुरु होतांना -किंबहुना पावसाळ्याच्या आधीच लावलं होतं, त्यावर एक  इन्फ्लेटेड नाव बांधलेली  आहे बघा..

. फक्त एकच सांगायचंय की पहिला फोटो हा पावसाळ्याच्या खूप पूर्वीचा आहे.. अगदी पाउस सुरु होण्या पूर्वी एक महिना आधीचा!

.इथे खाली  एक  फोटो सिक्वेन्स दिलाय.. तो बघा…

milan subway 0.पाउस जस्ट सुरु झालाय.. ते होर्डींग अजूनही लक्ष वेधून घेत नाही.milan subway 1 पाउस वगैरे काहीच नसतांना त्या नावेकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं.बरेच दिवस अगदी अन नोटीस्ड गेलं ते होर्डींग! पण नेहेमी प्रमाणे पाउस आला, मुंबईला मिठी नदीचं पाणी वाढलं..सबवेला पाणी भरलंय..

milan subway 2

हे फोटोग्राफ्स बरेचदा पाहिले असतील टिव्ही वर.. मिलन सबवेचे..

milan subway 3अरे… होर्डींगवरची बोट कुठे गेली??तिथे लिहिलं होतं, इन केस ऑफ इमर्जन्सी, कट द रोप….कोणीतरी रोप तोडला वाटतं..

milan subway 4होर्डींग वरची बोट खाली काढलेली दिसते आहे   लोकांनी..

milan subway 5आणि त्या बोटीने सबवे क्रॉस करण्यासाठी मदत करताहेत.. लोकांना..milan subway 6आयडीया वाले, नुसतं व्हॉट ऍन आयडीया सरजी, करित राहिले, खरी आयडीया तर एअरसेलचीच!

milan subway 7milan subway 810119वर दिलेले फोटोग्राफ्स मी काढलेले नाहित!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , . Bookmark the permalink.

20 Responses to एअर सेल..

 1. मदतीचा हात अन् जाहिरातही..वा!.. हीच खरी आयडिया, सरजी!

 2. आल्हाद alias Alhad says:

  In the village of mother,
  saali kaay idea ladhavali ahe!

 3. Mahendra says:

  दिपक, अल्हाद
  प्रतिक्रियेकरता आभार..

 4. Abhishek says:

  आजच्या युगात काय होयील काही खर नाही !!

 5. Chetan says:

  तू सुद्धा ऍडव्हर्टायझिंग फिल्ड मधे एंट्री मारून बघ जरा , तू सुद्धा असच काही करशील. 🙂
  काही बोल यार , Aircel नी माहोल केला आहे पुण्यात.

 6. Extremely !! Their Idea is great sirji 😀
  Even MANAPA would feel embarrassed with their efforts 😀
  Aircel ki Idea kaam kargayi

 7. आईशपथ! खरंच चांगली आयडीया आहे.

  • Mahendra says:

   आदिती,
   प्रतिक्रियेकरता आभार. तुमचा पण ब्लॉग कळला, या प्रतिक्रियेमुळे. छान आहे आता वाचुन काढ्तो सगळा.. 🙂

 8. Ckt says:

  sahee.. masta Doka lavala ahe!!!

  lokanchya lakshaat rahila pahije ayushyabhar. that’s the most powerful AD.

 9. Mahendra says:

  Ckt
  Thanks.. for the comments.. this is the best ad campaign i have ever seen.. However, they could have managed media in a better way to get exclusive coverage- which was obviously not done.

 10. देवेंद्र चुरी says:

  waht an idea AIRCEL ji …

  eka dagdat don pakshi …jahirat aani samajhit..wah wah
  itar utpadakanihi yapasun kahi dhada ghyava.jahiratisathi
  stars var paisa udhalyanyapeksha as kahitari kelel changalach…

 11. Gurunath says:

  कॉर्पोरेट वॉर्स अन जाहिरात तंत्र खरेच काय काय करवु शकते ह्याचा उत्तम मासला आहे हा, फ़ारच उत्तम ऑब्झर्व्हेशन काढलेत दादा, असेच ब्रॅंडींग दुस~या विश्वयुद्धाच्या वेळी “द कोकाकोला कंपनी” ने केले होते अमेरीकेत, “कोक म्हणजे देशभक्ती” “जो कोक पितो तोच अमेरिकन” हे ठसवले लोकांवर, अमेरिकन सैनिकांनी एकदा पॅसिफ़िक मधे एक अतिशय अवघड बेट फ़क्त “जपान्यांनी आपला कोक चा बॅरल फ़ोडला” म्हणुन सुड उगवायचा म्हणुन जिंकले होते!!!!!!, १८६९ मधे कॅफ़िन घातलेलं हे गोड सिरप जॉन पेंबरटन नावाच्या वैदुने डोकेदुखीवर म्हणुन काढले होते ते सोड्यात मिसळले अन कोक झाले, “कोक चा नेहमीचा जो लोगो आपण पाहतो तो तेव्हा पासुन बदललेला नाही!!!!!!!!” (कर्सिव्ह रायटींग मधे कोका कोला लिहिलेला) १९७६ च्या दरम्यान जेव्हा कोक ने लोगो बदलायचा मानस जाहीर केला तेव्हा पुर्ण देशात कोक वर “सेडीशन” म्हणजे “देशद्रोहाचे” खटले भरण्यात आले होते व “अमेरिकन जनतेच्या भावनांचा आदर म्हणुन” त्यांनी लोगो बदलण्याची आयडीया स्किप केली होती आता बोला!!!!!!, अगदी हिट्लर सुद्धा सार्वजनिक सभांमधे अमेरिकेचा उल्लेख “कोकाकोलाचा देश” असा करत असे.

  संदर्भ :- बोर्डरुम
  लेखक:- अच्युत गोडबोले
  प्रकाशक :- (बहुदा) राजहंस प्रकाशन…… कधी मिळाले तर वाचा!!!! बेस्ट आहे हे पुस्तक, अमेरिकन मॅनेजमेंट, जपानी कायझेन, सी.के.प्रल्हाद वगैरे भारी भारी माहिती आहे महाराजा!!!!!

 12. अतिशर सुंदर निरीक्षण काका

 13. Ashwini says:

  Mazhi asach kahis aahe…..lok programmes baghtat mala ad pahayla avdatat….

 14. Ashwini says:

  By d way…ad banvnaryawar paishacha paus padla asel……….bhannaat

 15. s.k. says:

  vatla navta ashihi marketing kartat manhun… ek different experience share kelya baddal thanks kaka…. 🙂

 16. rohit says:

  nice sir.
  good one aircel

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s