ब्रॅंडा जॉयस

joyce-brenda
टारझन द एप मॅन ह्या पुस्तकाने गारुड केलं होतं लहान असतांना, आणि हे पुस्तक न वाचलेला अर्थात माझ्या वयाचा माणुस  विरळाच!आमच्या काळात या पुस्तकांच्या बरोबर वीरधवल, आणि गुलबकावली पण तेवढ्याच प्रेमाने वाचले जायचे. मी   जे पुस्तक वाचलं होतं, ते मराठी भाषांतर होतं .कित्येकदा पारायणं केली असतील या पुस्तकाची.  ह्याच नावाच एक चित्रपट पण होता ,१९४० मधे!

टारझन म्हंटलं की मग मात्र जेन पण आठवते.जेन म्हणजे डोळ्यापुढे येते ती  ब्रेंडा जॉयस! ब्रॅंडा जॉयस -मुर्तिमंत सौंदर्याचा नमुना.तिच्या शिवाय इतर कोणी जेन म्हणून ऍक्सेप्ट केले जाउच शकत नाही.  तिने टारझन या चित्रपटात काम केले होते- एकदा नव्हे तर चार वेळा हा तिने निरनिराळ्या चित्रपटात काम केले होते. आमच्या लहानपणी टारझन आणि किंगकॉंग हे दोन्ही सिनेमे नेहेमी लागायचे आणि हमखास हाउसफुल्ल असायचे.मी पण हे चित्रपट किती वेळा पाहिले ते सांगता येत नाही. दोन वेगवेगळ्या टारझन बरोबर जेन म्हणुन काम करणारी ही एकमेव अभिनेत्री!

सिनेमात कामं करणं बंद केल्यानंतर ब्रँडाने इमिग्रेशन डीपार्टेमेंट मधे काम करुन , इमिग्रंट्स ना कामं शोधायला मदत करणॆ सुरु केले. सोशल बिलॉंगिंग्ज आणि बाइंडींग्ज तिच्या अगदी रक्ता मधे भिनलेली होती.  आजची न्यूज वाचली की ब्रॅंडा जॉयस चं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. लेट हर सोल रेस्ट इन पिस! आमेन.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , . Bookmark the permalink.

6 Responses to ब्रॅंडा जॉयस

 1. मी टारझनचा फॅन आहे. लहानपणी टारझनच्या (मराठी) पुस्तकाचे पारायण करायचो.

  या लेखाने पुन्हा लहानपणाची आठवण करुन दीली. धन्यवाद.

 2. rajeev ratnalikar says:

  ओए….ओए..ओ ओ ओ ओ ..
  टारझन.. जेन..कर्चाक..काला… फ़ार आठ्वण झाली….
  हेमन्त बिर्जेचा टारझन …he…he.. hee….

  • Mahendra says:

   राजु
   अरे तुला पण काय हेमंत बिर्जेच आठवला?? ती जेन नाही आठवली? अरे काय तुझा चॉइस… लई खास..’गे’ला कामातुन! हा हा हा…. 🙂

 3. rajeev ratnalikar says:

  असे कसे झाले ?
  आले कुठे गेले ?
  आले होते लेले,
  ते घेउन का गेले ?
  वात्रट मेले !!
  त्याना देते शाप,
  होतील पुढील जन्मात
  होतील ते ’गे’ ले…
  म्हण्तात सुनबाइ ह्सुन,
  सोलताना लसूण
  हा कुठला मेला शाप ?
  आता नर होणार आई
  आणी माद्या होणार बाप,
  अमीबा सारखे जन्तू आपले खरे पुर्वज,
  डार्वीन तोन्डावर आपटला साफ़ !!!!!!!!

 4. YD says:

  Me pan marathimadhale Tarzen asankhya vela vachale ahe 😀
  Athvan zalee parat, thanks 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s