राष्ट्रपतिंचा अपमान?

अब्दुल कलाम , यांची शारीरिक तपासणी केली म्हणून आपण इतकं चिडलो. अगदी लोकसभे पर्यंत प्रश्न उचलला गेला.  अर्थात, हा प्रश्न इतक्या लेव्हलला जाउन फ्लेअर अप व्हायलाच हवा होता. पण आपल्याच देशाच्या एका टिव्ही चॅनलने त्यांचा आणि विद्यमान राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटिल यांचा अपमान करण्यासाठी आपल्या वेब साईटवर सोय केलेली आहे. खोटं वाटतंय?? पुढे वाचा!! कधी कधी शंका येते, की हे चॅनल भारतीय आहे की अजुन कुठल्या देशाचे आहे??

आयबीएन टिव्ही १८ ची   एक वेब साईट आहे  . त्या साईटवर जाउन बरेच लोकं   बातम्या वाचतात.युजवली मी यांच्या बेबसाईटला कधिच जात नाही पण, एका मित्राने एक लिंक पाठवली म्हणून आयबिएन च्या साईट वर पोहोचलो.

लिंक उघडल्यावर ते आर्टीकल वाचता वाचता सहज लक्ष गेलं ते  एका  लहानशा बॉक्स कडे ,त्यावर लिहिलं होतं व्हॉट्स युवर ओपिनियन म्हणुन-आणी शेजारी एका पॉलिटीशिअन चं चित्र होतं.. टु माय सरप्राइझ, ते चित्र होतं प्रतिभा ताई पाटील यांचं. त्यावर व्होट अप, किंवा व्होट डाउन असं काहीतरी व्हॊट करा असं म्हंटलं होतं..

व्होट अप, म्हणून त्यावर क्लिक केलं तर एक नवीन पेज उघडलं. त्यामधे प्रतीभाताइंचा  प्रोफाइल उघडतो. त्यामधे बरेच ऑप्शन्स आहेत, रोझ द्या, किंवा टाळ्या वाजवा, किंवा पिचकारीने रंग उडवा, किंवा टोमॅटॊ फेकुन मारा (????????)..

राष्ट्रपतींचा पण फोटॊ तिथे अपमान करायला , टॊमॅटो फेकून मारायला का लावलाय हेच मला कळत नाही. इथे पहा तो फोटो.असे बऱ्याच पॉलिटिशिअन्स चे फोटो आहेत इन्क्लुडींग अवर प्राइम मिनिस्टर.

हे तर काहीच नाही इथे जवाहरलाल नेहेरुंच, गांधिजींचा पण फोटोआहे ,नशिब आमचं की त्यावर तरी टॊमॅटॊ फेकून मारण्याची सोय केलेली नाही.. बाळासाहेब ठाकरे यांचा पण फोटो आहे, आणि त्यावर पण टोमॅटॊ फेकून मारण्याची सोय केलेली आहे.. काय बोलणार? कप्पाळ!! मुर्खांचा बाजार आहे नुसता.

हे चॅनल १८ वाले लोकं वेडे झालेले आहेत क अशी शंका येते हे सगळे थेरं पाहिले की?  ह्या साईटबद्दल कोणाला लिहावं किंवा कम्प्लेंट करावी ते समजत नाही…

अब्दुल कलामांची केवळ तपासणी केली म्हणुन भारत सरकार इतकं खवळलय, इथे सहाव्या क्रमांकावर त्यांचा पण फोटो आहे आणि    त्यांच्या फोटॊवर पण टोमॅटो फेकून मारता येतात. एपिजे कलामांचा फोटो जो इनसल्ट करण्यासाठी लावलाय तो इथे आहे..ज्या वृत्तवाहिनीला राष्ट्रपतींचा अपमान करायची लाज वाटंत नाही त्या चॅनल बद्दल काय बोलणार?

या साईटवर अब्दुल कलामांचा फॅन क्लब आणि हेट क्लब पण आहे.. सरप्राइझ्ड?? चेक आउट!!
या व्यतिरिक्त इथे सगळ्याच नेत्यांचे फोटो आहेत अपमान करण्यासाठी इन्क्लुडींग सोनिया गांधी, अटल बिहारी , अडवाणी आणि इतर सगळे नेते… ल्फाबेटिकल लिस्ट इथे आहे.

मला खात्री आहे की काही लोकं यामधे पण ह्युमर शोधण्याचा प्रयत्न करतील पण माझं मत असं आहे की ह्युमर आणि अपमान यामधे एक थिन लाइन आहे, ती क्रॉस होऊ नये.

इतकं खालच्या पातळीवर जाउन राष्ट्रपतीची जाहीर बेअदबी करणाऱ्या या चॅनल ची तक्रार कुठे करायची? मी आता राष्ट्रपतींच्या वेब साईटवर जाउन कम्प्लेंट लिहितोय.. लेट्स एक्स्पेक्ट सम ऍक्शन!

Complaint Registered with President's Office.

Complaint Registered with President's Office.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

15 Responses to राष्ट्रपतिंचा अपमान?

 1. हे मात्र लिमिट झालं.. राष्ट्राच्या माननीय नेत्यांची अशी निंदा खपवुन घेणे म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेण्यासारखे आहे. भलेही लोकशाही आहे, अरे, म्हणुन काय असे शेण खायचे काय?

  आय.बी.एन आणि इन्. कॉमचा जाहिर धिक्कार!! जाहिर धिक्कार!!!

  सर्वानी मिळुन या साइटवरुन राष्टपतींना कळवा ही विनंती.

 2. rohan says:

  अरे काय काय करतात हे … :O

  तू बरोबर केलास तक्रार करून.. शिवाय आपण ‘सायबर क्राइम’ ब्रांच कड़े कम्प्लेंट करू शकतो का ???

  राष्ट्रपतींच्या वेब साईटवर जाउन कम्प्लेंट लिहितो मी पण … मला पण लिंक दे … !

 3. आल्हाद alias Alhad says:

  फक्त एवढंच नाही तर या साईटीवर जवळजवळ सगळ्याच पब्लिक फिगर्स आहेत. अगदी सारेगमपवाले ह्रषिकेश रानडे वगैरे सुद्धा!

 4. Mahendra says:

  आल्हाद, रोहन, दिपक,
  तुम्ही पण कम्प्लेंट करु शकता वर दिलेल्या साइट्वर..
  इथे लिंक दिलेली आहे..

  http://helpline.rb.nic.in/

 5. महेंद्रजी,
  मी कालच, तुमचे पोस्ट वाचल्या – वाचल्या कम्प्लेंट केली आहे. [PRSEC/E/2009/02040]

  सर्वांना विनंती – कॄपया आपणही आपले मत या वेबसाइटवर जाऊन नोंदवा!

 6. laxmi says:

  Department of Information Technology च्या साइटवर देखील कंप्लेंट करू शकतो.
  http://www.mit.gov.in/

  मी येथे http://www.mit.gov.in/contactus.aspx कंप्लेंट केली आहे..

 7. Aparna says:

  हाही एक प्रकारचा अतिरेकच झाला ना?? तीव्र निषेध आणि तावडतोब कारवाई यांची गरज आहे. हे तुम्ही शोधुन काढुन मांडल्याबद्द्ल आभार.

 8. ashish Damle says:

  मीही आत्ताच तक्रार नोंदवली. राष्ट्रीय नेत्यांचा अपमान असा जगभर करणे, ही अत्य़ंत हीन आणि घ्रुणास्पद गोष्ट आहे. या वेबसाईट्चा धिक्कार असो!

 9. Mahendra says:

  Aparna, Ashish
  Thanks for the comments..

 10. Ajinkya Bharat says:

  This is what the CNN-IBN proclaims about it’s idiot Editor-in-Chief.

  “The 24-hour, English-language news channel is spearheaded by renowned television journalist Rajdeep Sardesai as the Editor-in-Chief. ”

  Those who are aware of media know very well how perverted this journalist – Rajdeep Sardesai – is. Son of India’s former Cricket Player, the veteran Deelip Sardesai, who was proud about his country. The Son is an antinational element and this he has shown umpteen number of times in the past, in his articles as well as the shows conducted by him.

  He is a Big Black Spot on all Maharashtrians. we should condemn him and the channel.

  Yet another interesting thing. The famous Marathi Newspaper “Lokmat” has a joint venture with this perverted journalist. It’s IBN Lokmat. Now Lokmat is owned by one MP, Mr Vijay Darda and one MLA, Mr Rajendra Darda. Do they have te right to sit in the august houses – Parliament of India and Maharashtra Assembly?

 11. nimisha says:

  महेद्र,
  कुठलीही राजकारणी व्यक्ती…जीच्यावर देशाचा कारभार , राज्याचा कारभार चालवण्याची जबाबदारी आहे.. अश्या व्यक्तीबद्द्लचं,तिच्या कामगिरीवरुन बरं/वाईट ,मवाळ/जहाल मत व्यक्त करणं म्हणजे काही गुन्हा आहे असं मला वाटत नाही…उलट नागरीकांनी अश्या रीतीने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्यामुळे हे राजकारणी निदान मनाची नव्हे तर जनाची तरी लाज बाळगून आपली जबाबदारी नीट पार पाडायला शिकतील.
  आणि अगदी कुणिही झाला अगदी “महान नेते” म्हण कींवा राष्ट्रपती म्हण तेही काही परमेश्वर नाहित्..त्यांच्याहि काही चुका होऊ शकतातच…आपली या सर्वाना डोक्यावर घेऊन नाचायची जी मानसिकता आहे ती नक्किच देशहीतासाठी घातक आहे…जे उत्तम काम करतायत त्यांना आपण ‘रोझ’च अर्पण करणार..आणि जे करप्ट आहेत त्यांच्यावर टोमॅटो फेकणार…भले मग तो कुणिही असो…केवळ पिचकारी कींवा टोमॅटोचा पर्याय आहे म्हणुन लगेच त्यांचा अपमान झाला हे मानणं आणि त्यावर इतक़ं भावनीक होणं म्हणजे वैचारीक अपरिपक्व्ता आहे असं मला वाटतं…!

  • Mahendra says:

   अजिंक्य,
   धन्यवाद .. माहिती करिता.. एक इ मेल पण आला होता, भारतात मिडिया कोणाच्या हातात आहे त्याबद्दल होता तो..

   सर्किट ,
   प्रतिक्रियेकरता आभार..

   निमिषा
   अब्दुल कलामांना पण टोमॅटो फेकुन मारण्याचा उद्देश कळला नाही.त्यांच्या फोटोवर पण टॊमॅटो फेकणारे लोकं आहेतंच. बरं जर हे असं असेल तर मग त्या साईटवर विजय दर्डाचा फोटॊ का नाही?? कारण आयबिएन ही लोकमत ची साईट आहे. राजेंद्र दर्डा पण मिसिंग आहेत. मला असं वाटतं की राष्ट्रपती हा फेस ऑफ द नेशन असतो, तेंव्हा त्याचा असा जाहिर अपमान होणं संयुक्तिक वाटंत नाही. बरं आज एका साईटने टॉमॅटो फेकायचे ठरवले आहे उद्या दुसरी साईट चप्पल फेकायची तयारी करेल .. वैचारिक मतभेद हे वैचारिक पातळीवरंच बरे वाटतात.

   बरं असे व्हर्चूअल टोमॅटो फेकुन समाधान होत नाही, म्हणुन तिथे बंदुक ठेउन गोळ्याघालण्याची सोय पण केली जाउ शकते.. ही मनोवृत्ती मला योग्य वाटंत नाही.

   एखाद्या पुतळ्याला चपलेचा हार घातला किंवा नुसतं शेण जरी फेकलं तरिही दंगल उसळते.. !!! तसंच आहे हे..!!!

  • JEETENDRA says:

   it seems that you are either inosant or pretending to be the so called modernists! emotion is virtue for a sensible human being. these value is given to us by nature and that differentiate us from all other animals.one must keep at least some places and persons from being tarnished.i think by pelting tommatoes one surely not going to do anything constructive
   as far as IBN is concerned, it well known that everybody is naked in water closet but nobody strips in the streets! so lets be sensible and keep some social ethics intact and not support what is really really WRONG!

 12. swapna says:

  aaj 1 varshanantar sudhha hi site tashich aahe. hyavar kai karta yeil? parat ekhada lekh lihaal ka? kinva mail karaycahi ka hi link sagalikade..?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s