पत्रकारिता???

एका माणसाने नाशिक शहरात स्वतःला जिवंत  पेटवून घेतलं. एका पत्रकाराने त्याचे जळतानाचे फोटो काढून पोस्ट केलेत सकाळ मधे, आणि एक लेख पण आहे सोबत. .

ते फोटो पहाण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा..आणि नंतर पुढचं वाचा, म्हणजे मला काय म्हणायचंय ते कळेल.

इर्विंग वॅलेसच्या ऑलमायटी ची आठवण झाली.   माणसाला वाचण्यापेक्षा बातमी कव्हर करणं जास्त जरुरीचं   वाटतं पत्रकारांना… त्या फोटो  ( फोटो नंबर :- वरून दुसरा आणि तिसरा- डाव्या साइडला आहे.) मधे बघा एका फोटोमधे जस्ट आग लागलेली आहे, आणि नंतर तो माणुस पुर्ण पेटलेला आहे.

जर त्याला अगदी पहिल्याच वेळेस म्हणजे तो जेंव्हा पेटला होता तेंव्हाच वाचवायचा प्रयत्न केला असता तर कदाचित तो माणुस वाचला असता.पण तसे होणे नव्हते. दुर्दैवाने तो माणुस तिन दिवसानंतर मृत्युमुखी पावला.

पत्रकारिता इतक्या नीच पातळिवर गेलेली पाहुन खरंच वाईट वाटतं. माणसातली माणुसकी इतकी संपली आहे कां? की एक माणुस तुमच्या डॊळ्य़ापुढे पेटतोय, जळतोय, आणि तुम्ही ,वाचवण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी  -निर्विकारपणे फोटॊ काढताय? या फोटो पेक्षा त्या माणसाला कसे वाचवले हे लिहिले गेले असते तर वाचायला जास्त आवडले असते.

असाच प्रकार टीव्ही पत्रकारिते मधे पण बरेचदा पहायला मिळतो, हे टीव्ही चे फोटोग्राफर्स कॅमेरा घेउन जिथे घटना घडणार आहे तिथे पोहोचतात, पण पोलिसांना सांगत नाहीत.मुंबईला डॉक्टरला केल्या गेलेली मारहाण, इंदोरला प्राध्यापकाला केली गेलेली मारहाण, तोंडाला काळं फासण वगैरे घटना लाइव्ह दाखवल्या गेल्या टिव्ही वर.. कारण जर पोलिसांना कळवले तर घटना होणार नाही आणि ब्रेकिंग ्न्यूज मिळणार नाही..

ते फोटो पाहिले आणि इतकं वाईट वाटलं की हे पोस्ट  खूपच पर्सनल झालं होतं म्हणून बराचसा भाग पुर्ण झाल्यानंतर डीलीट केलाय.

असो…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

12 Responses to पत्रकारिता???

 1. mipunekar says:

  यामुळे तर न्यूज चेनेल / साईट ची टी आर पी वाढते. आज ई-सकाळ मध्ये अशीच १ न्यूज आहे. हत्तीचा हल्ला अभिषेक ऐश्वर्या वाचले माहूत ठार. म्हणजे त्यांना महत्व कशाला द्यायचं तेच कळत नाही.

 2. prasad says:

  Phakat tumchya mahitisathi. taych photograprne tayla wachwinycha prayatn kela hota

 3. bhaanasa says:

  प्रसिध्दी, पैसा व हव्यास याने पछाडलेली आजची मने आहेत झालं. दुर्देवी घटना.

 4. abhijit says:

  सकाळ्ने बातमी तर मोठ्या अभिमानाने दिली आहे. वाचा फोडली वगैरे वगैरे.
  तुमच्या मताशी सहमत आहे. यांना फक्त बातमी पाहिजे.

 5. Pravin says:

  खरच पत्रकारिता का करिता म्हणून विचारावेसे वाटते या लोकांना. हा प्रसंग किंवा 26/11 चा थरार, अगदीच अक्षम्य आहेत. सबसे पहले आणि सबसे तेज ही वृत्ती मीडियाला अजुन कुठल्या थराला घेऊन जाणार आहे काय माहीत.

 6. Ckt says:

  :-(( farach vaaeeT pravrutti aahe hee..

 7. ती ” महान वेबसाईट ” पुन्हा बंद आहे, मात्र पत्रकारितेचा असा घाणेरडा प्रकार पाहुन ख़रच किळस आली !

 8. inkblacknight says:

  Shri Kokre had enough time to click snaps, not enough time to save that man? Shocking!

 9. देवेंद्र चुरी says:

  खरच हे ब्रेकिंग न्यूज़ साठी काय करतील याचा काही ठाव नाही. शेम ….

 10. sudarshan s. pawar says:

  my hobys

 11. मी नुकतीच ‘सकाळ’ची वेबसाईट बघितली. बर्‍याच वाचकांचं हेच म्हणणं होतं की, ‘छायाचित्रकाराने थोडे प्रयत्न केले असते तर त्या माणसाचा जीव वाचू शकला असता.’ या छायाचित्रकार महोदयांनी वाचकांच्या प्रश्नाला एक सामायिक उत्तर दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की, ‘त्या माणसाला वाचवण्याएवढा वेळच माझ्याकडे नव्हता. ते दृश्य बघून माझ्या हातातली छत्री गळून पडली आणि मी भरभर छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. ती छायाचित्रे नीट येत होती की नाही हे पाहण्याएवढाही वेळ नव्हता माझ्याकडे! आणि त्या माणसाला मी वाचवण्याआधीच पोलिसांनी धाव घेतली होती. मी काही करण्याआधीच पोलिस त्याला घेऊन गेले होते. त्यावेळी तिथे इतर लोकही हजर होते, पण त्यांनीही काही केलं नाही. त्यावेळी तिथे कोणत्याही माध्यमाचा कोणताही प्रतिनिधी नव्हता. मी हजर होतो आणि फोटो काढले म्हणून या प्रकरणाला वाचा फुटली. नाहीतर इतर अनेक प्रकरणांसारखं हेही प्रकरण दडपण्यात आलं असतं.’ आता बोला!!!

  • संकेत
   मला अजूनही पटत नाही.. की पोलीस समोर होते. कारण तो पुर्ण जळेपर्यंत फोटो काढण्यापेक्षा वाचवण्याचा प्रयत्न करणे कधीही जास्त योग्य ठरले असते. कसे ते सांगता येत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s