हॅपी टु हेल्प


Everyday I want to fly, stay by my side
Everyday I want to dream, stay by my side
Every morning I wish I could just play
Wish the mornings would just stay…..

you and I

परवा टिव्ही वर तो चीर परिचित आवाज आणि म्युझिक सुरु झालं.. आणि तो पग आणि मुलगी पुन्हा टीव्ही वर दिसली आणि एकदम छान वाटलं. जसं कोण एखादा जुना मित्र भेटल्यावर वाटावं तस्सं वाटलं अगदी. नाही.. मी इंग्रजीत ब्लॉगिंग सुरु करणार नाही. 🙂 फक्त हे गाणं इथे पोस्ट केलंय..

व्होडाफोनच्या जाहीरातीमधुन त्या पग ला काढुन टाकलं आणि त्या ऐवजी ते झु झु कॅंपेन सुरु केलं म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं.पण त्या झु झु ऍड कॅंपेन ला पेटाचं  ( पिपल फ़ॉर एथिकल ट्रिटमेंट टु ऍनिमल्स) बक्षिस मिळालं होतं हे किती जणांना माहिती आहे?  या जाहिरातीमधे प्राण्यांचा वापर न करुन सुध्दा इतक्या चांगल्या पद्धतिने मेसेज कन्व्हे केला म्हणून हे बक्षिस देण्यात आलं होतं..

व्हॊडाफोनची  ऍड आल्यावर -जेंव्हा ही ऍड खुप हिट झाली होती तेंव्हा या पग ची फॅशनंच आली होती. आर्टीफिशिअल ब्रिडींग करुन बरेच पग विकले गेले.ज्यांच्याकडे कालांतराने खूप दुर्लक्ष केलं त्यांच्या मालकांनी… (असं पेटाला वाट्तं)आणि केवळ याच कारणासाठी पेटाचा या जाहिरातींना विरोध ( म्हणण्यापेक्षा प्राण्यांना जाहिरातीत वापरण्यावर विरोध होता)

ते कुत्र्याचं पिलु मला इतकं आवडायचं ,की अगदी आपलं स्वतःच्या मालकीचं असल्यासारखं वाटायचं. ती जाहिरात सुरु झाल्यावर   मी कधीच चॅनल बदललं नाही. कितीही वेळा ती ऍड आली तरीही सर्फिंग न करता पुर्ण पहायला मला आवडायची.या जाहिरातीतल्या त्या सिंपल चार ओळी, सुंदर अगदी मेलोडियस म्युझिक आणि फेशनेस… इतका की कधीही पहा , ऍड फ्रेश वाटेल असा..म्हणून मला वाटतं, ती जाहिरात न आवडणारा माणुस  क्वचितच सापडेल.

अशा परिस्थितीत ती झु झु ची ऍड लॉंच केली गेली – जी मला कधीच आवडली नव्हती.कारण त्या  मधे अजिबात ह्युमन टच नव्हता. त्यामुळे   एकदा पाहिली जायची .पण परत तिच पुन्हा दाखवली की मग मात्र   इरिटेटींग व्हायचं. पण ती जाहिरात पण आपला मेसेज कन्व्हे करण्यात यशस्वी ठरली. कालांतराने फॅड ओसरल्यावर मात्र व्ह्युअर्स पण कंटाळले , आणि हेच लक्षात आलं म्हणून कदाचित पुन्हा ते जुनाच कॅंपेन ( जे २००८ पासून सुरु आहे ते) पुन्हा सुरु केलंय व्होडाफोननी.

ते पग म्हणजे व्होडाफोन- हे समिकरण इतकं डोक्यात बसलंय लोकांच्या, की अगदी रस्त्याने जातांना जरी एखादा तसा पग दिसला तर.. सहजच म्हंटलं जातं.. तो बघ व्होडाफोनचा कुत्रा….  🙂 एखाद्या गोष्टीला एखाद्या प्रॉडक्ट शी कोरिलेट करुन ओळखलं जाणं हेच त्या ऍड चं सक्सेस आहे.

एका लहान मुलीला तो पग प्रत्येक गोष्टीत मदत करतो. ती जिथे कुठे जाईल तिथे तिला फॉलो करतो.तिचे सॉक्स , तिला आणून देतो.. वगैरे वगैरे .. मला सगळ्यात जास्त आवडली होती जाहिरात, ती- ज्या मधे ती मुलगी पोस्टाची तिकिटं चिकटवते, आणि हा पग आपली जीभ बाहेर काढून तिला चिकटवायला मदत करतो.

आता या जुन्या जाहिरातींसोबतंच नवीन जाहिराती बघायला मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पग परत आला… मला खूप आनंद झाला….. !

या व्यतिरिक्त पण खूप जाहिराती आहे यु ट्य़ुबवर.. जवळपास सगळ्याच…. जरुर पहा.. जर डाउन लोड करुन संग्रह करायचा असेल तर इथे क्लिक करा.. या ठिकाणी व्होडाफोनच्या सगळ्य़ा जाहिराती.. इन्क्लुडींग झु झु आहेत…

पण एक सांगावंसं वाटतं , की हच च्या जाहिराती या व्होडाफोनपेक्षा जास्त चांगल्या वाटायच्या… अर्थात  पग च्या म्हणतोय मी..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , . Bookmark the permalink.

9 Responses to हॅपी टु हेल्प

 1. mugdhamani says:

  hostel cha warden phirat asato tevha ha pug tila bahulichi gundi wajavun sangto ki warden yet aahe light banda kar hi ad tar bhannat aahe…
  i love that pug…
  tyavar ek akhkhaa lekhach lihilyabaddal dhanyawad….

  • Mahendra says:

   मुग्धा
   ती ऍड सापडली नाही कुठे…होस्टेलची. जर तुम्हाला सापडली तर जरुर लिंक द्या…प्रतिक्रियेकरता आभार..

 2. प्रशांत says:

  मला सुद्धा ह्या ओळी खुप छान वाटतात. आणि यांच्या जाहिराती चांगल्या असता इतर धोपटीच्या अ‍ॅड्सपेक्षा.

  ती मुलगीही खुप गोड आहे, आणि नविन झु झु पण गमतीदार आहेत. मला तरी बोर नाही वाटत.
  हां कुठलीही अ‍ॅड नेहमीच पाहण्याइतपत नाही जमत बॉ. कंटाळा येतोच.

  पण छान आहे लेख.

 3. प्रशांत says:

  महेंद्र,

  मराठी अ‍ॅ लिहिता येतो. तुम्ही जुन्या प्रकारेच ऍ लिहिलाय. जमल्यास दुरुस्त करा. मराठीत लिहिल्याबद्दल विषेश आभार.

  अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=90016191

  इच्छा असल्यास सामील व्हा.

  • Mahendra says:

   प्रशांत
   माझं ऑर्कुटवरचं वास्तव्य संपलंय.. अकाऊंट डीलिट केलाय माझा. तेंव्हा तुमची लिंक पण मला उघडून पहाणं शक्य होत नाही.प्रतिक्रिये करता आभार..

 4. Pravin says:

  गेली 3 वर्षे अमेरिकेत देसी चॅनेल नसल्यामुळे या जाहिराती पाहता आल्या नव्हत्या. आता डिश लावलीय. मजा येतेय. खर तर प्रोग्रॅम पेक्षा जाहिराती बघायला जास्त मजा येते 🙂

 5. bhaanasa says:

  महेंद्र, ह्या छोट्या गोड पोरीची आणि सदैव तिला साथ देणारे भूभू …मला ही जाहिरात आवडत असे. विश्वास, बॉन्ड जाणवत असे त्यातून. ( प्रॊडक्ट तितके खास होते का? ) आपल्याकडच्या काही जाहिराती मला मनापासून आवडत.

 6. laxmi says:

  ह्या ad मधले दोघेही खूप गोड आणि निरागस आहेत. त्यामुळेच सर्वाना ही ad आवडते.

 7. वोडाफोनची ती भु-भू ची जाहिरात ही माझ्या आवडत्या जाहिरांतीपैकी एक…. तसं आजकाल ते “मीठा है खाना.. आज पहली तारीख है” .. हे गाणंही चांगलच तोंडात बसलयं.

  पाठीमागे तुम्ही एकदा म्हटला होता… एखादी ना आवडती अ‍ॅडही तुम्ही वारंवार बघितली की तिचे शब्द – ट्युन मनात बराच वेळ राहते… – टु हेट समथिंग – यु नीड तो रेमेंबर इट.. असंच काहीतरी!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s