कपी केक सॉंग

कपी केक सॉंग ऐकलंय नां? जर तुम्ही इंटरनेट सॅव्ही असाल तर नक्कीच ऐकलं असेल. कारण यु ट्य़ुब वर हे गाणं ८९ लक्ष पेक्षा जास्त वेळा ऐकल्या गेलंय. त्यापैकी एक नक्कीच तुम्ही असाल.

याचं ओरिजिनल व्हर्जन खाली पेस्ट केलंय.. गाणं म्हणताना ऍमी (ऍमी कॅसल) इतकी गोड दिसते की पटकन तिला उचलून घ्यावंसं वाटतं. मला वाटतं की तिचा निरागस पणा आणि साधेपणामुळे हे गाणं इतकं हिट झालंय नेट वर.जवळपास ४ हजाराच्या वर व्हिडिओज आहेत यु ट्य़ुब वर हे गाणं वापरुन केलेले.हे गाणं जेंव्हा म्हंटलं तेंव्हा ऍमी फक्त ३ वर्ष १० महिन्यांची होती. तेंव्हा असं कधीच वाटलं नव्हतं की हे गाणं इतकं पॉप्युलर होईल म्हणून.ओरिजिनल व्हिडीओ १९९४ सालचा आहे.

कपी केक सॉंग, एका लठठ मुलाने म्हटलंय.. आणि ते पण जवळ पास ८९ लक्ष वेळा ऐकलं गेलंय.. बाय द वे ह्या मुलाचा लठठ पणा हा खाण्यामुळे नसून एका कुठल्या तरी रोगामुळे होता. पहिला ऍपिअरन्स हा डॉक्टरच्या कडे झालेला आहे आणि दिलेला व्हिडिओ तिथलाच आहे.ह्या व्हिडिओ च्या शेवटी त्याच्या भुवया उडवण्याची स्टाइल बघा ,मस्त आहे…

सॅम ( तो लठ्ठ मुलगा) आणि ऍमी दोघं मोठी झाल्यानंतर त्या दोघांनी हेच गाणं एकत्र म्हंटलं आणि तो व्हिडीओ इथे आहे…

कदाचित हे वरचं पोस्ट वाचल्यानंतर म्हणाल, की काय आवड आहे या माणसाची. अशी लहान मुलांची गाणी आणि त्यावर काय पोस्ट करतोय हा?पण मला मात्र हे गाणं मनापासून आवडतं..माझी आवड इथे पोस्ट केली आहे, तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा आहे.. जर हे गाणं आधी ऐकलं नसेल तर तुम्ही नक्कीच एंजॉय कराल.

You’re my Honeybunch,

Sugarplum Pumpy-umpy-umpkin,

You’re my Sweetie Pie,

You’re my Cuppycake,

Gumdrop Snoogums-Boogums,

You’re the Apple of my Eye

And I love you so and,

I want you to know That

I’ll always be right here

,And I love to sing sweet

songs to you Because ,

you are so dear!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , . Bookmark the permalink.

6 Responses to कपी केक सॉंग

  1. bhaanasa says:

    महेंद्र, या दोघांचे एकत्रित गायलेलं गाणे मी ऐकले नव्हते. लिंक बद्दल आभार. चांगले आहे.

  2. देवेंद्र चुरी says:

    मी पहिला कधीही पाहिले न्वहते हे विडियो …क्यूट आहेत..
    दुसरया विडियोमध्ये त्याने ज्याप्रकारे भुवया उड़वल्या आहेत ते पाहून आपल्या कर्तिकिची आठवण झाली.तिनेही ‘घाघर घेउन निघाली पाण्या गवळण’ हे गाणे गाताना अश्याच मस्त भुवया उड़वल्या होत्या.

    • Mahendra says:

      भाग्यश्री
      गाण्याला भाषा नसते हे मला तरी पटतं अशी गाणि ऐकली की. साउंड ऑफ म्युझिक ची गाणि ऐकलिस? खुपंच सुंदर आहेत, नेट वर आहेत..

      देवेंद्र
      त्या गाण्याचं लिरिक्स कित्येक दिवस कळंत नव्हतं.. ती मुलगी जे तोंडातल्या तोंडात बोलते ते बरेच दिवस कळंत नव्हतं. नंतर एका मित्राने मेल ने पाठवले. खुपंच मस्त आहेत सगळे व्हिडीओज. ऍमी ची इतर गाणि पण आहेत नेटवर डाउन लोड करायला.

  3. swati says:

    he gaane mazya vismaranat gele hote. tyache wordings aani videos post kelya baddal khup khup aabhar 🙂

  4. tejali says:

    wow..soooosweet..me he videos kadhich baghitale nawate ..ekdum chaan watala mood ekdum fresh zaala..:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s