दादा ,भाई ,नौरोजीं …

rakshabandhan

राखी !!!

मला राखी

अगदी खूप खूप

मनापासून आवडते!!

.. काय झालं?? धक्का बसला का??नाही.. तुम्हाला अजिबात धक्का बसणार नाही हे वा्चून याची मला पुर्ण खात्री आहे. कारण तुम्ही खुप हुशार आहात हे मी चांगलं ओळखून आहे….  … तुम्ही अगदी बरोब्बर ओळखलं मी कुठली राखी म्हणतोय ते… अहो… आपली सावंतांची  राखी म्हणतोय मी….

पण एक राखी अशी पण आहे की  जी सगळ्याच तरुणांना, कुठल्या का कारणाने होईना, आवडते. दुसरी राखी पौर्णिमा मात्र सगळ्यांना घाम फुटवते आणि  मुलांच्या  हदयात धडकी भरवते. कधी कोण कुठुन येइल आणि  हातामधे राखी बांधेल ह्याचा नेम नसतो.  एखादीवर वर्ष भर गळ टाकुन बसावं, आणि नेमकं तिनेच राखी घेउन समोर उभं रहावं … आणि तिला कांही सांगायचा प्रयत्न केला तर मात्र “मी तुझ्या कडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही रे…” ( मनातल्या मनात म्हणायचं अगं बघ ना गधडे मग.. इतके मोठे मोठे डोळे आहेत तरी कशाला तुझ्या चेहेऱ्यावर..? एवढा मोठ पाच फुट ११ इंचाचा देह समोर असतांना तू कधी पाहिलंच नाही हे कसं म्हणू शकतेस?? ) असा डायलॉग ऐकायचा आणि  खाली मान घालायची.. ओशाळवाण्या चेहेऱ्याने… असु दे.. काही हरकत नाही असं म्हणायचं..

यातला एक जोक मात्र मस्त आहे, एका मुलाला एक मुलगी राखी बांधायला जाते, तर तो मुलगा सरळ नकार देतो, ती मुलगी म्हणते का नाही म्हणतोस?? तर त्यावर त्या मुलाचं उत्तर असतं…. वा रे वा, जर मी मंगळसूत्र आणलं तर तु घेशील का बांधून??? मग मी का म्हणून राखी बांधून घेउ??

’मानलेला भाउ’ हे नातं अगदी तकलादू स्वरूपाचं असतं..आणि अतिशय ’सेफ’ पण. या नात्याच्या आड अगदी काहीही केलं तरीही चालून जातं.अगदी आई वडिलांना पण हा माझा मानलेला भाऊ म्हंटलं की बरेच आई वडील त्या संबंधांकडे दुर्लक्ष करतात. ( मी नाही हं..)  माझ्या पहाण्यात एक मित्र होता, त्याने त्याच्या  सख्ख्या मावस बहिणीशिच लग्न केलं तेंव्हा तुम्ही हे मानलेल्या बहिणीचं नातं काय घेउन बसलात??  त्या पेक्षा मित्र हे नातं जास्त  स्वच्छ वाटतं आणि  जवळचं वाटतं मला तरी.

एकदा मित्र किंवा मैत्री म्हटली की मग मात्र त्यातला स्वच्छ पणा टिकुन रहायलाच पाहिजे. अर्थात ते पण इतकं सोपं नाही. कारण मैत्री आणि प्रेम या मधे अतिशय थिन लाइन असते,आणि ती कधी ओलांडली जाईल हे  सांगता येत नाही.   परिचय अती परिचयात अवज्ञा म्हणतात ते या बाबतीत अगदी खोटं ठरतं. इथे एक मेकांना व्यवस्थित ओळखायला लागले की मग  प्रेम सुरु होण्याची शक्यता जास्त असते. 🙂

बरेचदा एखाद्या मुलीवर आपलं प्रेम आहे हे लक्षात तेंव्हाच येतं जेंव्हा त्या  मुलीच्या घरचे लोकं  मुलं पहाणं सुरु करतात. आणि एक दिवस ती बॉंब स्फोट करते, अरे मला आज पहायला येणार आहेत ….  की जाणवतं.. अरे हे काय होतय़? मग अशा परिस्थितीत जर करेक्ट निर्णय घेतला तर ठीक.. नाही तर त्या न सुरु झालेल्या  प्रेमकहाणीचं थडगं बांधलं जातं दोघांच्याही मनात!

त्यामधे काही वावगं आहे असं पण म्हणता येत  नाही, असं सायकॉलॉजिस्टचं म्हणणं आहे.. कारण हा एक मानवी स्वभावाचा पैलु आहे. तो जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो.. असं मी नाही तर फ्रॉयड म्हणतो. एकदा बायकोच्या सायकॉलॉजिच्या पुस्तकांत वाचलं होतं हे …नाहितर मला कुठुन कळणार ?

नाते संबंध नेहेमीच बदलत रहातात.मग ते मैत्री चं नातं असो.. की मानलेल्या भावाचं.. तेंव्हा ,, जरी कोणी राखी बांधली तरीही काळजी करु नका… दादा भाई नौरोजींचा मार्ग आहेच तुमच्या साठी… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , . Bookmark the permalink.

12 Responses to दादा ,भाई ,नौरोजीं …

 1. “मानलेला भाऊ किंवा बहिण” ही नाती कॉलेज मध्ये फार फेमस असायची… कदाचित आजही असावित… मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे मीही मैत्रीच्याच नात्याला जपतो.. कारण इतर सारी नाती [आई, वडिल, भाऊ, बहिण…] आपल्या जन्माबरोबरच आपसुकच आपल्याला मिळतात.. त्यात आपलं असं काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं.. मात्र मैत्रीच्या नात्याचं तसं नसतं… हे नातं आपणच निवडतो! त्यामुळे ते हक्काच तसंच पवित्रही.. त्याचं पावित्र्य जपायलाच हवं!

  दादा भाई नौरोजी – ही फ्रेज आजच वाचणात आली… मात्र त्याच्या मतितार्थ पुर्ण पोस्ट वाचल्यावरच कळाला!

  आणि हो.. ” मी तुझ्याकडे त्या नजरेनं कधी पाहिलंच नाही “- या वाक्याचा तर मी स्वत:ही अनुभव घेतलाय… नशिब चांगलं म्हणायचं… राखी बांधुन घ्यायची वेळ नाही आली…; )

  • Mahendra says:

   दिपक
   सगळेच जण त्या “मी तुझ्याकडे तशा नजरेने पाहिलं नाही” चा अनुभव घेतात. पण असं सोडून द्यायचं नसतं.. प्रयत्न करित रहायचं.. नजर पण चेंज होऊ शकते.. 🙂

 2. अनिकेत वैद्य says:

  मी ११वीत असताना नविन कॉलेज मधे मला १७ मुलींनी राख्या बांधल्या होत्या. ओळखत नसणार्या मुलींनी पण राख्या बांधल्या. तेंव्हा मी प्रत्येक मुलीच नाव विचरल न मग राखी बांधुन घेतली.
  १२वीत मात्र एकाही मुलीला राखी बांधू दिली नाही.

  <>
  भातुकलीच्या खेळामधली हे गाणं आठवायच अन गप्प रहायच.

 3. अनिकेत वैद्य says:

  आणि एक दिवस ती बॉंब स्फोट करते, अरे मला आज पहायला येणार आहेत …. की जाणवतं.. अरे हे काय होतंय़?

  भातुकलीच्या खेळामधली हे गाणं आठवायच अन गप्प रहायच.

  • गप्प कशाला रहायचं?? प्रपोझ करुन टाकायचं सरळ… आणि दुसऱ्याला चान्संच मिळु द्यायचा नाही.. 🙂

 4. deepaksalunke says:

  महेंद्र काका,

  “दादा भाई नौरोजीं” या फ्रेज चा अर्थ मला आजच कळला.

  लेख वाचुन शाळेतले दिवस आठवले. मस्त दोन्ही हात भरभरुन राख्या बांधल्या जायच्या. फ़ॅशन होती राखी बांधायची आणि बांधुन घ्यायची !

  शाळेत असताना एका मुलीला माझ्यावरुन चिडवायचे. आमची ”तशी” नजरानजर सुद्धा व्हायची. पण मग चिडवण्याला कंटाळुन मुद्दाम तिने मला सर्वांसमोर राखी बांधली. चिडवणॆ कमी झाले. पण आमची “तशी” नजरानजर पुढे होतच राहली. दुर्दैवाने आमची मजल नजरानजरेच्या पुढे कधी गेली नाही.

  बाकी मानलेल्या भावापेक्षा मैत्रीचं नातंच अधिक योग्य, असं मला वाटतं.

 5. बरेच दिवसांपासुन काहितरी हलकं फुलकं लिहायचं होतं ते आज लिहिलं..आजकाल काही लिहायच मुडंच येत नाही.. दादाभाईनौरोजी माहित नव्हतं?? खरंच?? अरे मला तर वाटलं की ही कॉमन फ्रेझ आहे. असो..
  प्रतिक्रियेकरता आभार..

 6. inkblacknight says:

  छान लिहिलय … आवडल … मस्तच … मी कोलेज मध्ये असताना तितकी भीती नव्हती … की अगदी इकडे – तिकडे बघत चालाव लागेल. पुन्हा मी चांगल इंग्रजी बोलत असे, सो मी लाडका होतो मुलींचा …

  http://asachkahitari.wordpress.com/

 7. bhaanasa says:

  महेंद्र, धमाल आली. ही राख्या बांधण्याची प्रथा आमच्या शाळेत(जास्ती) कॊलेजातही मजा मजा घडवे. काही मुले अगदी हात पुढे करून बांधून घेत. नंतर ओरबाडून फेकून देत. तर काही त्या दिवशी चक्क दांडीच मारत. तू म्हणतोस तसे हे मानलेले भाऊ-बहीण नाते मात्र तकलादूच असावे. त्यापेक्षा मैत्री जास्त….. ते म्हणतात ना, ” घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे ”
  मलाही ही ’ दादाभाईनौरोजी ’ प्रकार माहीत नव्हता. 🙂

 8. Parag says:

  mahendraji

  dada bhaai nauroji hee phrase maaze kaakaa tyaanchyaa jaavayaalaa vaaparat asat! parantu aaj tyaacha ek ajoon navaa arth umajala!!!

  keep it up!

  Parag

 9. Amol says:

  I think all Forced relations leads nothing, cause they mean nothing right from begining. Btw nice post. I knew DADA BHAI NAV-ROJI kay aste te, me shalet astana khup famous hoti hi term. Thank god mala koni rakhi badhat nhvate.:)

 10. भाग्यश्री
  आमची शाळा फक्त मुलांची होती, त्यामुळे बाहेरच्या मुलिंनी राखी बांधायचे प्रसंग कमीच आले. नुसती मुलंच असल्यामूळे धमाल असायची. मुलिंच्या शाळेसमोरुन येतांना उगिच तिकडे लक्षं जायचं. वाटायचं यातलिच फार नाही पण एखादी तरी आपल्या शाळॆत आणी वर्गात असती तर कित्ती मज्जा आली असती ? असो…

  पराग,
  ही टर्म आमच्या शालेय जिवनात वापरली जायची. कोणिही राखी बांधते.. ( शेजारच्या मुलिने) तरिही नाही म्हणायचं नाही.. दुसरा ऑप्श असतोच ना ओपन..:)

  अमोल
  तुमचं म्हणणं अगदी खरंय.. मला पण हे ओढुन ताणुन जुळवलेले नाती आवडत नाहित. बायकोचे मित्र आहेतच, तसेच माझ्या पण मैत्रीणी आहेत.. त्या नात्यांना फक्त मित्र हेच नातं आम्ही दोघंही आवर्जुन मेंटेन करतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s