बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

इ बे वरची एक जाहिरात वाचण्यात आली. खरं तर  या विषयावर बरयाच ठिकाणी थोडं थोडं वाचल्या गेलंय.. ई बे ला आताच १० वर्ष पुर्ण झाले.एक संपुर्ण ऑन लाइन खरेदी विक्री केंद्र म्हणून त्याचे नांव युरोप आणि अमेरिकेत परिचयाचे आहे. याची पॉप्युलरीटी पण खुप आहे. अगदी टी शर्ट पासून तर इतर लहान सहान गोष्टी म्हणजे सेफ्टी पिन्स पर्यंत वस्तुंमध्ये व्यवहार इथे होतो.इथे काही विचित्र जाहिरातींच्या बद्दल लिहिलंय… ज्यांच्या बद्दल आपण कधी कल्पनाही करु शकत नाही अशा!!!!!

Wife_for_sale २६ वर्षं ती दोघं अगदी सुखासमाधानाने राहिली. पण नंतर त्याला (पॉल ऑस्बॉर्नला) समजलं की आपली बायकॊ आपल्यालाच चिट करते आहे. म्हणून त्याने एका नॉव्हेल पद्धतिने बदला घेतला. त्याने काय केलं की सरळ इ बे वर एक जाहिरात टाकली, त्यात त्याने एक्स बायकोचा फोटो, तिचा सेल नंबर, तिच्या बॉय फ्रेंड चा फोन नंबर,दिला होता आणि ज्यात तो म्हणतो, ही माझी … बिच वाइफ… वगैरे वगैरे… इथे लिहायला पण ऑकवर्ड होतंय.. पण तिच्या साठी तुम्ही बिड करु नका, असाही सल्ला देतोय..

Merlinएका जर्मन कपल ने आपले बाळ खूप रडत म्हणून इबे वर विकायला ठेवले होते.स्टार्टींग प्राईस होती १ डॉलर.त्या बाळाचा फोटो दिलाय खाली इतकं सुंदर आणि गोड बाळ आहे ते…… !आणि म्हंटलं होतं, मेल बेबी, २८ इंच लांबीची ,कॅन बी युझ्ड इन बेबी कॅरीअर ऑर प्रॅम. आता पोलिसांनी जेंव्हा जाउन चौकशी केली तेंव्हा मर्र्लीन   (त्या छॊट्य़ा बाळाची) आई म्हणाली की नाही हो… तो फक्त एक लहानसा प्रॅक्टिकल जोक होता, मी आपल्या छकुल्याला कधीच विकणार नाही. नंतर मग पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल तर केलाच, पण नंतर कोर्टाने समज देऊन सोडून दिले.. खरं तर असे जोक्स  करणे हे अमेरिकन्सच्या बाबतीत  ऐकुन आहे, पण आता युरोपियन्स पण???

Wedding Dressत्याचं लग्न झालं होतं ५ वर्षांपूर्वी, लग्नामधे मोठ्या कौतुकाने आपल्या बायकोसाठी वेडिंग ड्रेस घेतला होता विकत.. १२०० डॉलर्स चा.. जाहिरातीत लिहिले होते, की ह्या ड्रेस करता १२०० डॉलर खर्च केलाय , खरं तर लग्न ठरलं तेंव्हा  माझ्या बेवड्या सासर्याने ह्या ड्रेसचे पैसे  देण्याचे मान्य केले होते , पण त्याने ते पैसे दिले नाहीत. फक्त दोन वेळा हा ड्रेस घातल्या गेलाय हा ड्रेस, एकदा लग्नात बायकोने वापरलाय, आणि आता ह्या फोटॊ शुट करता मी घातलाय तो.आता बायको ला पण सोडून दिलंय आणि सासऱ्याने पण पैसे दिले नाहीत म्हणून आता थोडे तरी पैसे वसूल करण्यासाठी हा सुट विकायला काढला आहे.. आणि टू माय  सर्प्राइझ हा ड्रेस   ३८५० डॉलर्स विकल्या गेला. परवाच वाचले होते की एका मुलीला इबेवर ९९ सेंट्स मधे वेडींग ड्रेस मिळाला विकत..

रोझी रेड … हिने आपली व्हर्जिनिटी विकायला काढली होती ई बे वर. रेड…   तिला कॉलेज एज्युकेशन करता पैसे हवे होते, म्हणून तिने जाहिरात दिली होती.अर्थात, लवकरच ही जाहिरात इबे ने काढून टाकली,पण तिच्या जाहिरातीला एका दिवसात ७ हजारच्या वर हिट्स मिळाले होते. तिला कमीत कमी २२ लाख इ मेल्स पाठवले लोकांनी.

खरं तर , तिच्यावरच एक संपुर्ण लेख होऊ शकतो.रोझी ला कॉलेज शिक्षणासाठी पैसे हवे होते म्हणून तिने इंटरनेट वर जाहिरात दिली होती इ बे वर. पण लवकरच ती विथड्रॉ केल्यावर  र्रोझी ने आपली वेब साईट सुरु केली आणि तिथे पोस्ट पाउंडाच्या कर्जात असेन.सध्या मी ४.७५ पाउंड दर तासाला या रेटवर वेट्रेस म्हणून काम करते पण ते पैसे पुरेसे नाहीत. आणि जर अशाच तर्हेने मी माझं शिक्षण पुर्ण होईपर्यंत जवळपास १५ हजार पाउंडाच्या कर्जात असेन.
आता बरेच लोकं सेक्स मधे इन्व्हॉव्ल्ड असतातच, पण मी  एक लेस्बियन आहे आणि त्यामुळे अजूनही व्हर्जिन आहे. तेंव्हा या साठी मी पैसे घेण्याचं ठरवलंय..!

virginrosyreidतीने आपले शिक्षण ब्रिस्टॉल उनिव्हर्सिटी मधे  सुरु केले आहे, ती बॅचलर्स डिग्री इन सोशल पॉलिसी या विषयात ग्रॅज्युएशन करते आहे.तिने लिहिलंय, की अजुन तिन महिने जायचे आहेत आणि मी ऑलरेडी ३००० पाउंडाच्या कर्जात आहे. जस्ट माहिती साठी.. तिच्याच कॉलेज मधे टोनि ब्लेअरचा मुलगा पण शिकतो..:)

रोझी  – तिचे वडील जे व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यांनी म्हटलंय, की ती आपलं  शरीर नाही तर आत्मा विकते आहे आणि ही एक एम्ब्रॅसिंग सिच्युएशन आहे आमच्या साठी.

तिच्या साठी कित्येक लोकांनी ( जगात कुठेही जा , अगदी सारखीच मेंटॅलीटी.. आपल्या कडे जुन्या काळी पाटील , सावकार लोकं ’नथ’ उतरवायचे हजारो रुपये द्यायचे) बिड केले होते!

अमेरिकन इंटेरिअर डिझायनर कॅथी कॉब्लरसन याने तर ६५ हजार पाउंड ची ऑफर दिली होती.  पण काही रिस्पॉन्स मधे तिला लोकांनी ती स्वतःला कुठल्या धोक्यात घालते आहे याची जाणिव पण करुन दिली होती.

इ बे ने तिची जाहिरात काढून टाकल्यावर मग मात्र तिने आपली वेब साईट सुरु केली,आणि फायनली द चेरी वॉज पॉप्ड फॉर सम अनडिस्क्लोज्झ्ड अमाउंट!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , . Bookmark the permalink.

3 Responses to बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

  1. मला वाटतं अशा “प्रकरणांमध्ये” सेल पेक्षा पब्लिसिटी स्टंट जास्त असावेत. शिवाय परवाच पुण्यात एकाने प्रॉपर्टीसाठी बायकोचा खुन केला…. संपत्तीसाठी अघोरी प्रकाराने मुलांचे खुन झाले – बळी दिले गेले.. फरक एवढाच म्हणायचा की यांत अरोपींनी लपायचा – सुटकेचा प्रयत्न केला आणि हे बेशरम लोक ते उघडपणे करताहेत!

  2. bhaanasa says:

    एकंदरीतच जगभरात लोकांना प्रसिध्दी अन येनकेन मार्गाने पैसा मिळवण्याचा हव्यास असतो त्याचेच हे नमुने आहेत. नुकतेच वाचले, जापनीज बायकांना म्हणे गर्भारपणात नग्न फोटो काढून घेण्याचे डोहाळे लागलेत. म्हणून असे स्टुडिओज निघत आहेत. काय म्हणावे यावर? 😦

    • ते मी पण वाचलं होतं कालच्या टाइम्सला. हे नविन फॅड कुठे घेउन जाणार कोणास ठाउक, यु ट्युब वर तर अगदी डिलिव्हरीचे पण व्हिडिओज दिसले, आता लोकांना स्वतःचेच असे व्हिडिओ अपलोड करण्यात काय समाधान मिळतं ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s