मुकेश-अनिल-गॅस वॉर

या लोकांच्या बद्दल बातमी वाचली की मला त्या गुरु सिनेमातला एक डायलॉग आठवतो. उसे जुता मारो.. सोनेका, चांदी का.. या कुछ भी.. लेकीन काम होना चाहीये. काम करुन घ्यायला हे कार्पोरेट्स कुठल्या लेव्हलला जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यांचे आतले व्यवहार गुलदस्त्यातच रहातात.

अनिल- मुकेश च्या भांडणा मुळे हे सगळॆ व्यवहार आता उघड्यावर आले आहेत. मला तर वाट्त की हे दोघं वेगळे झाले हे भारताच्या दृष्टीने खूपंच बरं झालं, नाहितर या दोघांना अख्खा देश आंदण दिल्या गेला असता आणि आपल्याला समजलं पण नसतं. अर्थात, आपल्याला समजून पण आपण काही करू शकू असंही नाही.. तरी पण…………..

अनिलने  उघडपणे  पेट्रोलियम मंत्रालयावर आरोप केले आहेत की हे मंत्रालय मुकेशच्या इशाऱ्यावर काम करते आहे.  मुकेशचे संबंध कॉंग्रेस आणि भाजपा बरोबर, तर ह्याचे समाजवादी बरोबर.अनिल आणि समाजवादी पक्षाचे संबंध काही लपून राहिलेले नाहीत. ह्या माणसाला  अगदी असंख्य वेळा समाजवादी पक्षाच्या स्टेजवर पाहिलेलं आहे. अमरसिंग आणि मुल्लायम सिंगाचे खासम खास आहेत हे.

आजकाल एक गोष्ट पहाण्यात आलेली आहे, की प्रत्येक इंडस्ट्रिअलिस्ट ( बारिंग फ्यु अदर्स) हे कुठल्याना कुठल्यातरी पक्षाच्या झेंड्याला आपल्या खांद्यावर मिरवण्यात धन्यता मानतात.अर्थात त्या मधे राजकिय पोहोच वापरुन स्वतःचा फायदा करुन घेणं हाच मुख्य उद्देश असतो.

आता भारत हा करप्ट देशांच्या रांगेत कुठल्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान, आणि इंडोनेशियाच्या वर आहे की खाली आहे, ह्याच्यावरच आपण डिस्कस करतो आणि मग भारत पाकच्या खाली आहे म्हणून आनंद मानतो.

असो, विषयांतर होतंय, पण हे गॅस चं प्रकरण आहे तरी काय? बरेच दिवसापासून ही बातमी फॉलो करतो आहे. आणि आज त्यावर जरा सविस्तर लिहावं म्हणून हा लेख . मी अनिल, किंवा मुकेश, कोणाचाच फॅन नाही हे आधी नमूद करू इच्छितो.तर या दोघांचं हे भांडण सुर कसं झालं हे बघू या आपण!!!!!!

कोणे एके काळी.. मुकेश आणि अनिल नावाचे दोन भाउ एकत्र होते. एकमेकांशिवाय त्यांचं पानंही हलत नसे. त्यांच्या कंपनीला केजी बेसिन मधे गॅस  काढण्याचं काम मिळालं.लवकरच गॅस स्ट्राइक झाला, रिलायन्सचा शेअर अगदी अत्युच्य पातळीला पोहोचला. रिलायन्स म्हणजे भारत असं चित्र कार्पोरेट जगतामधे उभं केलं जाऊ लागलं.माती हातात घेतली तरी त्याचं सोनं करतील अशी प्रतिमा होती या दोन्ही भावांची. पण तेवढ्यात… म्हणजे २००५ मधे दोन्ही भावंडांमधल्या कुरबुरीचे पर्यावसान दोघांच्या वेगळं होण्यात झालं.

ही कुरबुर आधीपासूनच सुरु होती, म्हणूनच अनिलने समाजवादी पार्टी सोबतचे आपले संबंध वाढवणे सुरु केले. मुकेशला ते पसंत नव्हतेच,आणि एक दोन वेळा तर मुकेशने पत्रकारांसमोर बोलूनही दाखवले होते.आता २००४ च्या सुमारास अमरसिंगाचे आणि अनिलचे संबंध इतके सख्ख्याचे झाले होते की अनिलने  गॅस वर आधारित दादरी येथे ५००० मेगॅ वॉट चा विद्युत प्रकल्प युपी मधे उभा करण्याचे जाहीर आश्वासन एकदा समाजवादी पक्षाच्या पार्टीच्या डायसवरुन    दिले –मुकेशबरोबर डिस्कस न करता.. (!). ( या वेळी अनिल- आणि मुकेश बरोबर होते, पण कुरबुर सुरु होती दोघांत) दोघेही आपापले राजकीय खुंटे हलवून बळकट करण्याच्या मागे लागले होते.

२००५ मधे दोघंही भाउ जेंव्हा वेगळे झाले, तेंव्हा मात्र गॅस आणि पेट्रोलियम हे मुकेशच्या ताब्यात आणि इन्फोकॉम ,एनर्जी अनिलच्या ताब्यात  गेले. आणि इथूनच मग खरा खेळ सुरु झाला.

जेंव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले तेंव्हा अनिल ने या गॅस परियोजनेतुन मिळणाऱ्या गॅसचा एक हिस्सा अनिलला देण्याचे मान्य केले होते. त्याबद्दल एक किंमत २.५ डॉलर्स प्रती घन मिटर ठरवण्यात आलेली होती.पण!!!!!!! आता मुकेशने जास्त भाव मागितलाय गॅस साठी ज्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय पण त्याला सपोर्ट करतंय. म्हणुनंच अनिल म्हणतोय, की  सरकारला या करारामधे फक्त १ टक्काच फायदा आहे, बाकी सगळं मुकेशच्याच फाय्द्याचं आहे, तेंव्हा सरकार इतकं का सपोर्ट करतंय मुकेशला प्राइस वाढवून देण्यासाठी??

पर्सनल लेव्हल वरची भांडणं कार्पोरेट लेव्हलला लढली जाऊ लागली. मुकेश ने पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहमतीने आपला फायदा करुन घ्यायचा प्रयत्न करणे सुरु केले. या मधे अनिल ला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे पण त्याने पाहिले.

अजूनही दादरी परियोजना सुरु झालेली नाही. फक्त अनिलने अनाउन्स केले आहे, आणि कंपनी रजिस्टर केलेली आहे.

अजूनही काही मुद्दे आहेतच..अनुत्तरित… पण आता ही केस सुप्रिम कोर्टाधिन असल्यामुळे यावर जास्त काहि लिहित नाही. पण एकच प्रश्न आहे…

“नैसर्गिक संपत्ती एखाद्या कंपनीला आंदण देणे कितपत योग्य आहे”
“नैसर्गिक संपत्तीवर अधिकार कोणाचा?”
“केवळ नाममात्र १ टक्का अधिभार देऊन सगळे अधिकार (गॅसच्या प्रॉडक्शन आणि वितरणाचे) अनिल ला देणं हे कितपत योग्य आहे?”

” सरकार आपल्या स्वतःच्या अखत्यारीत हे गॅसचे उत्पादन का सुरु करित नाही?ओएनजीसी प्रमाणे एखादे कार्पोरेशन का सुरु करुन किंवा  सध्या अस्तित्वात असलेल्या गेल ( गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) च्या अखत्यारीत हे बेसिन का देत नाही?”

असे असंख्य प्रश्न मनात आहेत , पण लेख फार मोठा होतोय, म्हणून संपवतो..तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे..

मुरली देवरांचं वक्तव्य आज पहिल्यांदा पटलं.. संसदेतलं…!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , , . Bookmark the permalink.

5 Responses to मुकेश-अनिल-गॅस वॉर

 1. san says:

  अगदी बरोबर आहे, दोन्ही भाउ एकत्र असते तर RELIANCE chi EAST INDIA COMPANY व्हायला वेळ लागला नसता

 2. bhaanasa says:

  दोघे एकत्र नसले तरीही पिताश्रींनी दिलेली शिकवण त्यांच्यापैक्षाही जास्ती समर्थपणे राबवत आहेत. देश अनेक अंगानी त्यांच्या अख्त्यारीतच आहे. एकच बरी गोष्ट मला वाटते ती म्हणजे रोजगार वाढला आहे. स्वत:च्या उन्नतीबरोबर थोडासा परमार्थही होतोय.

  • अर्थात, रोजगार वगैरे तर मिळालेच लोकांना. मुकेशच्या एसईझेड (जामनगरच्या) काhttps://kayvatelte.wordpress.com/wp-admin/edit-comments.php#comments-formमाच्या वेळेस माझे दर महिन्याला तिथे जाणे असायचे, तेंव्हा यांची कामाची स्पिड अनुभवली आहे. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता आणि काम पुर्ण झालं होतं ते दिड वर्षात. फक्त जेंव्हा हेपुर्ण झालं तेंव्हा रेसेशन सुरु झालेल होतं,म्हणुन गंगाजळितुन पैसे काढुन वापरावे लागले यांना..
   परवाच जाउन आलो जामनगरला, ४हजाराच्या वर एम्प्लॉइज कमी केले आहेत असं ऐकण्यात आलंय.
   “स्वत:च्या उन्नतीबरोबर थोडासा परमार्थही होतोय.” True..

 3. Vaibhav says:

  “जेंव्हा दोन्ही भावांचे सेपरेशन झाले तेंव्हा अनिल ने या गॅस परियोजनेतुन मिळणाऱ्या गॅसचा एक हिस्सा अनिलला देण्याचे मान्य केले होते.”

  Anil was supposed to give Mukesh right?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s