कावळा हा नेहेमी दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त तिरस्कृत पक्षी आहे. पण हुशार कावळ्याच्या गोष्टी ऐकतंच आपण मोठं झालोय, म्हणून आता सहज यु ट्युबवर शोधाशोध केल्यावर हुशार कावळ्यांचे हे व्हिडीओज हाती लागले. सगळेच अगदी अफलातून आहेत .. मस्ट सी…
पहिला व्हिडीओ आहे, नट्स फोडणाऱ्या कावळ्यांचा . कल्पनेपेक्षाही रम्य असेच ह्याचे वर्णन करता येइल. मला हेच समजलं नाही की त्या कावळ्याला सिग्नल कसा समजतो??
या दुसऱ्या व्हिडीओ मधे एक कावळा एका तारेचे टुल बनवून वापरताना दिसतो.
आणि हा शेवटला पण खूपंच मस्त आहे..
सही!
मधली क्लीप मध्यंतरी पाहण्यात आली होती… मात्र पहिली आणि शेवटचीही क्लीप मस्तच आहेत! मराठीच्या पुस्तकात लहाणपणी वाचलेली ती – “हुशार कावळा” या कथेची आठवण झाली.. 🙂
मी तर अगदी स्पेलबाउंड झालो होतो.. कसं शक्य आहे? विश्वासच बसत नाही.
एकदम मस्तच आहे. शेवटच्या वीडियोत एक कावळा काढतो आणि दुसरा ते पळवतो ते पाहून मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकिरची आठवण झाली 🙂
प्रविण..
प्रतिक्रिये करता धन्यवाद
काय डोके चालते आहे यांचे. आक्रोड खाली टाकणे, सिग्नलची वाट पाहणे अन झेब्रा क्रॊसिंगवरून चालत जाऊन तो खाणे व पुन्हा सिग्नल चालू झाल्यानंतर पळणे….सही.
दुसराही मस्त. तिसरा म्हणजे एकदम कलियुग.
आवडली रे पोस्ट. शौमित्रलाही दाखवले. LOL.
अगदी सहज सर्फिंग करतांना हे सापडलं.. अजुनही काही होते, जसे बोलणारे कावळे.. पण त्यामधे मला तरी ते खोटं वाटलं म्हणुन इन्क्लुड केलं नाही.
tinhi video pahilyandach pahile ekdam zakkas aahet…thanx 4 sharing.
सहीच आहेत व्हिडीओज…… हिंदु पुराणांनुसार पक्षीजगतात गरुड हा राजा असतो, चक्रवाक हा पक्षी निती अमात्य असतो आणि काक म्हणजे कावळा हा शठामत्य असतो, डीप्लोमसी वगैरे कावळा सांभाळतो, कावळ्यासंबंधी आपल्या धर्मात अजुनही काही प्रचलित समजुती असतात ,जसे कावळा-कावळी चे मिलन पाहील्यास जवळच्या ५ नातलगांना स्वतः च्या मृत्यु ची खोटी बातमी कळवणे वगैरे, तसेच कावळे एकाक्ष म्हणजे एकच डोळा धडका असणारे असल्याचे पण सांगतात, सगळ्यात मोठी गंमत म्हणजे मेलेला कावळा कधीच दिसत नाही (मी तर २६ वर्षांच्या आयुष्यात एकदाही नैसर्गिक मेलेला कावळा बघितलेला नाही) मरण आले की कावळे हिमालयात एका विशिष्ट ठीकाणीच देह ठेवतात असे ही ऐकले होते, काकभ्रृषुंडी ह्या ऋषींबद्दल सुद्धा असे सांगितले होते की ते एक कावळा होते (म्हणजे त्याच्या सारखे चाणाक्ष असे आपण मानुयात) त्यांचे नितीसारावरचे विचार प्रसिद्ध आहेत
बहुदा कावळ्याची ही हुशारी आपल्यासाठी डोइजड ठरू नये म्हणूनच बहूदा माणसाने कावळ्याला तिरस्कृत ठरवलं असावं.
सदानंद
आभार.. खरं आहे. तो आक्रोड फोडून खाणारा कावळा ग्रेट आहे.. तसे सगळेच व्हिडीओ चांगले आहेत, पण तो आक्रोडवाला अप्रतीम..