स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल?

काही दिवसांपासूनच स्वाइन फ्लु चं वारं सुरु झालं होतं. टीव्ही वर मोठा गाजावाजा करित एअर पोर्ट्स वर स्क्रिनिंग सुरु असलेलं दाखवायचे. तोंडाला मास्क लावलेले डॉक्टर्स, आणि प्रवासी.. जस्ट खानापुर्ती म्हणून डॉक्टर्स प्रवाशांकडून फॉर्म भरुन घ्यायचे आणि सोडुन द्यायचे.म्हणजे हा एक नुसता फार्स होता हे आता लक्षात येतंय..म्हणजे हे एअरपोर्ट वरचे डॉक्टर्स( ??) काहीच  चेक करित नव्हते.

अशा प्रकारच्या निष्काळजी  अटिट्य़ुड्स मुळेच हा आजार इथे फोफावला आहे. या केअरलेस लोकांपैकी कोणालाच काही झालं नाही,सगळ्या ईटर्नॅशनल एअरपोर्टवरच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जेल मधे टाकले पाहिजे, करोडॊ लोकांच्या जिवाशी खेळल्या बद्दल, म्हणजेच इतरांना पण जरा जरब बसेल आणि असे दुर्लक्ष पुढे कधी केले जाणार नाही.

पण इतर अगदी मासूम मुलं की ज्यांचा काहीच दोष नाही ते मृत्युमुखी पडले आहेत. त्या  पुण्याच्या १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यु अगदी मनाला चटका लाउन गेला. बातम्या पहातांना डॊळ्यात पाणी आलं होतं तिच्या आईकडे पहातांना.
अमेरिकेतूनआणि युरोप मधून येणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स बंद करणे हा एक चांगला उपाय झाला असता , किंवा कमीत कमी जो पर्यंत त्या प्रवाशांपैकी कुणालाच स्वाइन फ्लु नाही हे प्रुव्ह झाल्याशिवाय त्यांना सगळ्यांमध्ये मिसळू द्यायला नकॊ होते..पण या आजाराकडे अगदी कॅज्युअली पाहिलं गेलं भारतीय अधिकाऱ्यांनी, आणि केवळ त्या मुळेच इतके बळी जाताहेत..

आधीचा लेख इथे आहे.

स्वाइन फ्लु म्हणजे काय आणि त्याची चर्चा इथे केलेली आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged . Bookmark the permalink.

12 Responses to स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल?

 1. Bhannat says:

  Tumcha agadi barobar aahe. Mi May mahinyat 1 mahinya sathi US madhun Bharatat aalo hoto. Tya veli US madhe Swine Flu chi saath chalu hoti. Airport var tumhi mhanta tasach, tya lady doctors form hatat ghet hotya ani stamp marun pudhe ja mhanaychya. Aho, US madhe tya kali prachanda pramanat hota swine flu. Ashya veli asa nishkalji pana nako hota asayla. Var ti lady doctor tithlya shipayala mhante, “aho ti Dr. amuk amuk aali ka bagha na. mi 8 taas jhale ithe aahe. mala kaay hich kame aahet ka?” Patient la haat lavana tar door, tyachya kade pahat suddha navhate he doctors. Sagla batyabol hota. Tumhi mhanta tasach, kunala dosh denar?

 2. Pravin says:

  आता सध्या तरी कोणाला ब्लेम न करता कठोर उपाययोजना उचलणे आवश्यक आहे. एकदा परिस्थिती नियंत्रणात आली की मग चौकशी करता येईल. नागरिकांनी सुद्धा गणेशोस्तवात आणि दही हांडीला अनावश्यक गर्दी टाळणेच हितकारक ठरेल.

 3. जिथे पाहिजे तिथे सिरियसनेस नाही हिच दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रतिक्रियेकरता आभार.

 4. chandrashekhara says:

  विमानतळावरच्या तपासणीला खूप मर्यादा असतात. स्वाइन फ्ल्यूचा जिवाणू अतिशय चटकन आणि जलद पसरणारा आहे. सिंगापूरमधे प्रत्येक ठिकाणी अतिशय कडक तपासणी होऊन सुद्धा हा फ्ल्यू पसरलाच व 3 महिने झाले तरी अजून चालूच आहे. विमानतळावरच्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आपण वैयक्तिक काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे.

  • चंद्रशेखर
   तपासणिला मर्यादा असतात हे मान्य, पण अगदीच काहिही तपासणी न करता सरसकट सगळ्यांना केवळ फॉर्म भरुन सोडून देणं, हा तर अक्षम्य गुन्हा वाटतो मला तरी..

 5. ..पण या आजाराकडे अगदी कॅज्युअली पाहिलं गेलं भारतिय अधिकाऱ्यांनी, आणि केवळ त्या मुळेच इतके बळी जाताहेत..

  खरं आहे… त्यांच्या अशा या कॅज्युअली पाहण्याणच एकडे कॅज्युअल्टीज वाढताहेत!

  या आधी ही मी म्हटलंच होतं की एअरपोर्टवरती चेक करणं फारच गरजेचं होतं. फ्लाइट थांबवणं हे हा ही एक उपाय होताच… अजुनही आहे!

 6. harshal says:

  maala vatate saglya goshtina sarkari adhikari ani politicians na jababdar dharne yogya nahi…. mhanje tyanche chuktech….tya saglya kamchukar ani bejababdar lokana jabari shiksha jhalyach pahijet….pan samanya manase pan titkich jababdar ahet

  aaj mumbait media itke bomblun sangtayt ki mask vapra mask nastil tar rumal vapra.pan mumbait koni hi ajun seriously ghetlele mala disle nahi. lok nak shinkarat ahet, thunkat ahet. sagle sale bejababdar…

  Aaj gunhegarana shiksha ashi rahileli nahi…konala kasle bhay nahi. mhanoon konihi uthato ani vattel te karto.Nirapradh manase matr fukat martat.

 7. kanchan says:

  tumhi je bolalat te 100% Khare Aahe Aapalya rajkarni lokana hey sahaj karata aale asate pan te kashala krtil ? fakta tamasha baghane yanna jamete. lok martat tar maru dya tanaa havi fakta news

 8. Harshal, Kanchan
  Thanks for the comments

 9. geetapawar says:

  shashnala kahi lok melya var jaag ,,aani main jevha koni adhikri marto tevha kal kal yete, me hya aajartun geliye, me aani punyat ch aastana mala ha aajr changla bhovla hota… aani mediya walyani ke parkarn changlech hatale te he ghabrun sodle aani kai dr, he kiti mele changle changle…. hyala shikshit aadani pana mahntat..thanku sir ….

  • तेंव्हाचे दिवस खरंच खूप टेन्शनयुक्त होते. लोकल मधे कोणी खोकललं तरीही श्वास रोखून ठेवायचे लोकं.. खूप भिती बसली होती.पुण्याचे काही लोकं मरण पावले होते, त्यामुळे अजूनच घाबरले होते लोकं.

 10. geetapawar says:

  me swata yhatun geliy mala thauk aahe kiti tras aani kay lokanchi pratikriya aaste sir……….. aajun hi hua aajarane manat tar bhitich ghatr kelay pan sir khup kami haant madtila aale lokanchya…………….. hadjid pana. dur rahne.. lokan mahit hote ki ha rog kasa pasrto pan preane jar rogyala samjun sangitle tar rogi kadhich manala laun ghet nahi…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s