सगळ्यात कृर प्राणी.. मानव?

फर कोट, मिंक कोट, किंवा सिल्व्हर फॉक्स कोट हे अगदी मोस्ट सॉट फॉर आयटम्स मधे मोडतात. ह्या सगळ्यांसाठी फर लागते. मेलेल्या जनावराची फर काढुन जर कोट बनवला, तर त्याला कोणाचिच हरकत नसते, पण जर मुद्दाम जिवंत प्राण्याला सोलुन त्याच्या कातडिचे कोट बनवणे आणि ते फॅशन स्टेटमेंट म्हणुन वापरणे ह्या गोष्टीला कोणिही माणुस विरोध करेल.
मला आठवतं, माझ्या एका मित्राचं लग्नं ठरलं म्हणुन त्याने घरी जेवायला बोलावले होते, त्यांच्याकडे एक पध्दत आहे, की लग्न जुळलं की नवऱ्या मुलाने स्वतःच्या हाताने तलवारिने बोकडाला कापायचे. पहिले तर असे काही पहाणे हेच माझ्या प्रवृत्तित बसत नाही. जरी कधी तरी नॉन व्हेज खात असलो, तरिही आजपर्य़ंत कधिच कुठल्याही प्राण्याला मारतांना पाहिलेलं नाही, आणि पाहु पण शकत नाही.
तर त्या मित्राने बोकडाची पुजा केली , हळद कुंकु , आणि फुलांचा हार घातलेला तो बोकड समोर उभा होता. त्याला काहिच कळंत नसावं, पण थोडाफार सिक्स्थ सेन्स मुळे असेल , तो थोडा बावरलेला दिसत होता. तर तो विधी सुरु झाला, मित्राने तलवारिने त्या बोकडाचे शिर धडावेगळे करायचा प्रयत्न केला. आता पुर्वी प्रमाणे तलवारिने शिरछेद करण्याइतकी ताकत आणि मनगटात जोर नसतो कोणाच्या, त्यामुळे तो बोकड तडफडत खाली पडला होता. शेवटी एका एक्स्पर्टने त्याचे शिर धडावेगळे केले आणि तो शांत झाला.
मला मळमळुन आलं. सगळ्यांसमोरुन आपण निघुन जाणं म्हणजे मनाचा  कमकुवत पणा दिसेल आणि नंतर इतर मित्र चेष्टा करतिल याची पण भिती मनातुन वाटतंच होती. तरी पण हलकेच बाजुला झालो, आणि माझ्याबरोबरंच इतर मित्रं पण बाजुला निघुन गेले. मला वाटतं की सगळ्यांनाच तो प्रसंग पाहुन मनातुन खुप वाईट वाटलं असावं.
नॉन व्हेज खाणं ही एक पुर्ण वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या प्राण्याला अशा तर्हेने मरतांना पहाणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. या प्रसंगापासुन मी बोकडाचं मिट खाणं बंद केलंय. ते अजुनही खाउ शकत नाही. नजरेपुढे तोच त्या बोकडाचा केविलवाणा चेहेरा आणि डॊळॆ समोर दिसतात.. दे आर हॉंटींग मी टुडे ऑल्सो…
दोन तिन महिन्यांपुर्वी चंद्रपुरला गेलो होतो. पुढे सास्ती माइन्स ला काम होतं . टॅक्सी मधेच बसलेलो होतो. एका ठिकाणि एक डंप ट्रक बंद पडला म्हणुन ट्राफिक जॅम झालेला होता. सहज खिडकी बाहेर पाहिलं . तर एक चिकनचं दुकान होतं. दुर्लक्ष करु म्हंटलं तरिही त्या पक्षांच्या आवाजामुळे दुर्लक्ष केलं जात नव्हतं. इथे जरा विचित्रंच पध्दत दिसली चिकन कापायची.
एक लहानसं सिमेंटच टाकं बनवलेलं होतं. त्यामधे चिकनची मान अर्धी कापुन त्यात टाकुन द्यायचा तो कसाई, नंतर साधारण दोन मिनिटात ते चिकन पुर्ण शांत झालं की त्याची पिसं उपटुन त्याला तो स्वच्छ करायचा. या मागचा काय उद्देश तो मला कळला नाही. म्हणुन साईटला पोहोचल्यावर एका इंजिनिअरला विचारले, तर तो म्हणाला, की या मागचं लॉजिक असं आहे, की अर्धवट कापल्यामुळे चिकन मरत नाही आणि हार्ट सगळं रक्त पंप आउट करतं. नविन ट्रेंड आहे म्हणे हा… माझ्या तर अंगावर काटा आला होता ते पाहुन..
आज हे मी काय लिहितोय??माझं मलाच कळत नाही. कदाचित आज सहज म्हणुन नेटवर बघितलेल्या काहि क्लिप्स मुळे ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओ पाहिला यु ट्य़ुबवर. नरम फर मिळावी म्हणुन जिवंतपणे प्राण्याला सोललं जातं होतं.. त्यामधे अगदी सगळे प्राणि होते, कुत्रे, मांजरं, आणि गाई, म्हशी, बकऱ्या.. यु नेम इट दे वेअर देअर.
सिल्व्हर फॉक्सची तर संख्या आता अगदी संपत आलेली आहे. तसेच मिंक या प्राण्याच्या कातड्याची किंमत तर अगदी आकाशाला टेकली आहे. अतिशय मुलायम कातडं असलेला हा लहानसा प्राणी… अगदी संपायच्याच मार्गावर आलेला आहे.
काही दिवसांपुर्वी थायलंडमधे एक नविन ट्रेंड सुरु करण्यात आलेला होता. शेतकऱ्यांनी मोठे उंदिर इम्पोर्ट करुन त्यांचं ब्रिडींग सुरु केलेलं होतं. पण रॅट स्किन कोट्स फारसे लोकांना आवडले नाही म्हणून लवकरच हा ट्रेंड बंद झाला.
सांपांना पण स्किनिंग अलाइव्ह केलं जात होतं. स्किन काढुन घेतल्यावर त्या स्किनलेस सापांचं किंवा प्राण्यांचं तडफडणं पहावत नव्हतं. मी मुद्दामच ते व्हिडिओज इथे पोस्ट करित नाही. अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओज आहेत ते.
मी स्वतः पेटाचा मेंबर आहे. त्यामुळे माझ्या एका पेटा मधल्या मित्राने इ मेल द्वारा ती लिंक पाठवली होती. खुपंच उदास वाटतंय आज मला..

फर कोट, मिंक कोट, किंवा सिल्व्हर फॉक्स कोट हे  सगळ्यात महाग असलेले आणि प्रत्येकाला आपल्या कडे असावेच असे वाटणारे ( अर्थात आपल्या कडे नाही अमेरीकेत) अशा वस्तू  मधे मोडतात. ह्या सगळ्यांसाठी फर लागते. मेलेल्या जनावराची फर काढून जर कोट बनवला, तर त्याला कोणाचीच हरकत नसते, पण जर मुद्दाम जिवंत प्राण्याला सोलून त्याच्या कातडीचे कोट बनवणे आणि ते फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरणे हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही..

मला आठवतं, माझ्या एका मित्राचं लग्नं ठरलं म्हणून त्याने घरी जेवायला बोलावले होते, त्यांच्याकडे एक पद्धत आहे, की लग्न जुळलं की नवऱ्या मुलाने स्वतःच्या हाताने तलवारिने बोकडाला कापायचे. पहिले तर असे काही पहाणे हेच माझ्या प्रवृत्तित बसत नाही. जरी कधी तरी नॉन व्हेज खात असलो, तरीही आजपर्य़ंत कधीच कुठल्याही प्राण्याला मारतांना पाहिलेलं नाही, आणि पाहू पण शकत नाही.

तर त्या मित्राने बोकडाची पुजा केली , हळद कुंकु , आणि फुलांचा हार घातलेला तो बोकड समोर उभा होता. त्याला काहीच कळत नसावं, पण थोडाफार सिक्स्थ सेन्स मुळे असेल , तो थोडा बावरलेला दिसत होता. तर तो विधी सुरु झाला, तलवार उंच उचलली आणि त्या बोकडाच्या मानेवर वार केला. त्या केलेल्या वारा मधे फारसा जोर नसल्याने असेल पण तो बोकड फक्त घायाळ होऊन खाली ओरडू लागला. त्याचं ओरडणं अगदी एखाद्या लहान मुलासारखं वाटत होतं. तिकडून नजर काढून घेतली आणि उगाच इकडे तिकडे पाहू लागलो.मित्राने तलवारीने त्या बोकडाचे शीर धडावेगळे करायचा प्रयत्न केला. आता पुर्वी प्रमाणे तलवारीने शिरछेद करण्याइतकी ताकत आणि मनगटात जोर नसतो कोणाच्या, त्यामुळे तो बोकड तडफडत खाली पडला होता. शेवटी एका एक्स्पर्टने त्याचे शीर धडा वेगळे केले आणि तो शांत झाला.

मला मळमळून आलं.उलटी होते का असं वाटत होतं. सगळ्या समोरून आपण निघून जाणं म्हणजे मनाचा  कमकुवत पणा दिसेल आणि नंतर इतर मित्र चेष्टा करतील याची पण भिती मनातून वाटतंच होती. तरी पण हलकेच बाजुला झालो, आणि माझ्या बरोबरच इतर मित्रं पण बाजुला निघून गेले. मला वाटतं की सगळ्यांनाच तो प्रसंग पाहून मनातून खूप वाईट वाटलं असावं.

नॉन व्हेज खाणं ही एक पुर्ण वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या प्राण्याला अशा तर्हेने मरताना पहाणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. या प्रसंगापासून मी बोकडाचं मिट खाणं बंद केलंय. ते अजूनही खाऊ शकत नाही.हे इथे लिहितोय, कारण ते अगदी शंभर टक्के खरं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल  मी खूप कमकुवत मनाचा माणुस आहे म्हणून .. पण मी आहे तो असा आहे..! नजरेपुढे तोच त्या बोकडाचा केविलवाणा चेहेरा आणि डॊळॆ समोर दिसतात.. दे आर हॉंटींग मी टुडे ऑल्सो…

दोन तिन महिन्यांपूर्वी चंद्रपुरला गेलो होतो. पुढे सास्ती माइन्स ला काम होतं . टॅक्सी मधेच बसलेलो होतो. एका ठिकाणी एक डंप ट्रक बंद पडला म्हणून ट्राफिक जॅम झालेला होता. सहज खिडकी बाहेर पाहिलं . तर एक चिकनचं दुकान होतं. दुर्लक्ष करु म्हंटलं तरीही त्या पक्षांच्या आवाजामुळे दुर्लक्ष केलं जात नव्हतं. इथे जरा विचित्रच पद्धत दिसली चिकन कापायची.

एक लहानसं सिमेंटच टाकं बनवलेलं होतं. त्यामधे चिकनची मान अर्धी कापून त्यात टाकुन द्यायचा तो कसाई,ते चिकन त्या टाक्यामधे तडफडत रहायचं जवळपास दोन तिन मिनिटं आणि नंतर शांत व्हायचं.  साधारण दोन मिनिटात ते चिकन पुर्ण शांत झालं की त्याची पिसं उपटून त्याला तो स्वच्छ करायचा. या मागचा काय उद्देश तो मला कळला नाही. म्हणून साईटला पोहोचल्यावर एका इंजिनिअरला विचारले, तर तो म्हणाला, की या मागचं लॉजिक असं आहे, की अर्धवट कापल्या मुळे चिकन मरत नाही आणि हार्ट सगळं रक्त पंप आऊट करतं. नवीन ट्रेंड आहे म्हणे हा… माझ्या तर अंगावर काटा आला होता ते पा्हून..आणि अशा तऱ्हेने कापल्या मुळे म्हणे त्याचं मांस सॉफ्ट होतं..! मानव हा सगळ्यात कृर प्राणी आहे हे पटतंय मला तरी. तुम्हाला काय वाट्त?

आज हे मी काय लिहितोय??माझं मलाच कळत नाही. कदाचित आज सहज म्हणुन नेटवर बघितलेल्या काही क्लिप्स मुळे ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओ पाहिला यु ट्य़ुबवर. नरम फर मिळावी म्हणून जिवंतपणे प्राण्याला सोललं जातं होतं.. त्यामधे अगदी सगळे प्राणी होते, कुत्रे, मांजरं, आणि गाई, म्हशी, बकऱ्या.. यु नेम इट दे वेअर देअर.

सिल्व्हर फॉक्सची तर संख्या आता अगदी संपत आलेली आहे. तसेच मिंक या प्राण्याच्या कातड्याची किंमत तर अगदी आकाशाला टेकली आहे. अतिशय मुलायम कातडं असलेला हा लहानसा प्राणी… अगदी संपायच्या मार्गावर आलेला आहे.सापांची  पण कातडी ते जिवंत असतानाच काढली जाते. . कातडी काढून घेतल्यावर त्या स्किनलेस सापाचे किंवा प्राण्यांचं तडफडणं पहावत नव्हतं. मी मुद्दामच ते व्हिडिओज इथे पोस्ट करित नाही. अतिशय डिस्टर्बिंग व्हिडीओज आहेत ते.

मानवाने आपल्या शक्ती आणि चातुर्याच्या जोरावर या इतर प्राण्यांचा जगण्याचा अधिकार संपवून टाकला आहे. लिव्ह ऍंड लेट लिव्ह हे प्रिन्सिपल पुर्ण विसरुन गेलाय  सगळ्यात कृर प्राणी..   मानव!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , . Bookmark the permalink.

7 Responses to सगळ्यात कृर प्राणी.. मानव?

 1. महेंद्रजी,
  आपण एका नाजुक अशा विषयाला हात घातला आहे. मी स्वतः “प्युअर नॉनवेजिटेरीयन” म्हणण्याईतपत नॉनवेज खाणारा आहे/होतो.. मात्र काही दिवसांपासुन म्हणा ही ईच्छा हळु-हळु का होईना पण थंडावतेय.. कारण नक्की सांगता येणार नाही.

  आठवणीतला एक किस्सा आहे – गावी असताना मीही तुमच्या मित्राप्रमाणे एक दिवस कोंबडी कापण्याचे शौर्य करायला गेलो.. म्हणजे कोंबडी कापणारा कोणीच नसल्याने मला ते करावे लागले… मात्र कापताना नेम चुकला आणि अर्धीच मान कापली गेली… किती तरी वेळ ती कोंबडी तडफडत होती आणि माझे मनही… त्यादिवशी मी चिकन खाऊच शकलो नाही! त्यानंतरही कितीतरी दिवस ती कोंबडी मला इतर कोंबड्यांमध्ये दिसायची. 😦

  लिव्ह ऍंड लेट लिव्ह हे प्रिन्सिपल पुर्ण विसरुन गेलाय.. सगळ्यात कृर प्राणी.. मानव!

  एकदम रास्त!… कदाचित “बळी तो कानपिळी” यांवर त्याचा पुर्ण विश्वास बसलेला दिसतोय!

  गावी असताना वाघाचे नख, हरिणाचे कातडे, अस्वलाची नखे अशा बर्‍याच वस्तु फासेपारधी [एक जमात] विकायला यायचे. ते विकत घेणारेही खुप लोक असायचे. आजही मी अशा वस्तु बर्‍याच लोकांकडे पाहिल्यात.

  …… आणि चिकन तोडण्याचा जो प्रकार आपण बघितला – तो बहुदा – हलाल करण्याचा प्रकार असावा…. काही प्राणी मरताना वा बचाव करताना बर्‍याचदा काही विषारी द्रव सोडतात… असे केल्यानेविषारी द्रव रक्ताबरोबरच बाहेर टाकले जातात…काही असो… एकंदरीत भयानक – अघोरी वाटतंय हे सारं..

 2. अनिकेत वैद्य says:

  महेंद्रजी,
  आपण वर्णन केलेली चिकन मारायची पद्धत ही “हलाल” आहे. हाल हाल करून मारणे ह्याचा अपभ्रंश हलाल. प्रामुख्याने मुस्लिम समाजात ह्याच पद्धतिचे मांस खल्ले जाते. एका झटक्यात शिर धडावेगळे करणॆ ह्या पद्धतीला “झटका” म्हणातात. ह्या दोन्ही पद्धतीत मांसाची चव बदलते असे म्हणतात. (ऐकीव माहीती)
  डुक्कराचे मांस (pork) मिळवण्याची अशीच १ पद्धत मी वाचली होती. डुक्कराला आधी काठीने भरपूर मारतात. खूप जोर जोरात फ़टके मारतात. साधारण २ तास. त्यानंतर त्याचा शिरच्छेद करतात. ह्यामुळे ते मांस खुप चविष्ट लागते असे म्हणतात.

  अनिकेत वैद्य.

 3. bhaanasa says:

  शिर्षकातच सारे आलेय महेंद्र….. फार दु:ख होते असे काही वाचले, पाहीले की. आशा आहे जगात संपूर्ण शाकाहारी लोकांची संख्या वाढेल. अर्थात तरीही हे कातड्याचा व्यापार करणारे थांबणार नाहीतच. 😦

 4. mugdhamani says:

  kal paravach office boy tyachya gavala sajara hot asalelya utsavabaddal sangat hota..
  tithe mhane 1000 chya var bokadanna bali dile jate..
  sajavun aanun tyachyavar thoda haldicha pani simpadalya jata..tyane te bokad maan halavata…aani lagech tyala halal kela jata…
  angavar kaatach aala tyacha evdha varnan aikun….

 5. s n patil says:

  I HAVE READ ALL STROIES MENTIONED STROIES AND MR ANIKET “S KRITYA. BUT WE ARE DEEPLY SORROWFUL AND PAINED ABOUT THE COLOUMS WRITTEN FOR KILLING INNOCENT ANIMALS. AS MAHARASHTRA IS HAVING SPRITUAL BACK GROUND OF GREAT SAINTS, LIKE SHREE TUKARAM, SHREE RAMDASS SWAMI JI, SRI SAI BABA, SRI AKKAL KOT MAHARAJ, SHREE GAJANAN MAHARJI, AL WAYS SHOWN PATH TO MERCY ON ALL. AND NOT TO KILL ANIMALS. BUT HERE I NOTED ALL PEOPLE ALRE EATING NON VEG VERY HEAVELY. NO GRANTH, NO RAMAYAN, NOR GURUGRANTH SAHIB PERMITS MAN TO EAT NON VEG. ONE DAY EVERY ONE HAS TO DIE. REMEMBER THIS AND MAKE WAY TOWARDS SPIRITUAL PATH. AND ONE THING MOST IMP KILLING ANY ANIMAL OR BIRD IS SIN(PAAP).

 6. नितीन says:

  आम्ही जैन !!!!!!
  ‘शाकहार – उत्तम आहार’

  • वयाची पहिली १९ वर्ष मी पण शुद्ध शाकाहारी होतो. 🙂 पण नंतर कालांतराने बराच बदल झाला. ऋग्वेदी ब्राह्मण म्हटल्यावर घरी तर शुद्ध शाकाहारीच आहे 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s