ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स

ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स
१२ वी चांगल्या मार्काने पास होऊन पण काही मुलांना विशेष समाधान नसतंच. १२वीत ८९ परसेंट मार्क्स मिळाले तरी पण.. ” अहो बाबा, सिईटी चे मार्क्स जास्त महत्वाचे” हे ऐकावं लागतं. मग या १२ वी ची परिक्षेचे महत्वंच काय राहिले?
निकाल लागला, की मग पेढे वगैरे वाटण्यात मुलांना अजिबात इंट्रेस्ट नसतो.. “थांबा  हो बाबा, जरा सिईटीचा निकाल लागु द्या, मग पेढे वगैरे वाटा” असे काहिसे ऐकु येते.
होता होता सिईटीच्या निकालाचे वेध पण संपतात, आणि एकदाचा निकाल समजतो. पण अरेच्या.. हे कसं झालं?? मला तर जास्त मार्क्स अपेक्षित होते? इतके कमी कसे? या वर्षी फिजिक्स चा पेपर कठिण होता म्हणुन ओवरऑल परसेंटेज खाली आलंय असंही ऐकिवात आहे. उगिच काळजी करायचं कारण नाही…
मग कुठे तरी कन्सोलिंग सुरु होतं.. म्हणजे सिईटीचा  फॉर्म कसा भरायचा, कसे ऑप्शन्स द्यायचे , वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी काही क्लासवाले फुकट मार्गदर्शन क्लासेस घेतात. त्यामधे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फॅकल्टीला बोलावले जाते , मार्गदर्शनासाठी ( की त्याच्या क्लासच्या जाहिरातीसाठी?) जे काही असेल ते असेल, पण या लोकांच्या लेक्चर्स चा मुलांवर खुप परिणाम होतो. आणि मग फॉर्म भरतांना, बाबा, नाही हो… त्या सरांनी सांगितलंय.. की असा फॉर्म भरायचा .. सुरु होतं.. या वयात मुलांना आपल्या वडिलांना काही फारसं कळत नाही ह्याची पुरेपुर खात्री असते,त्यामुळे मग, ठिक आहे.. तुला वाटेल तसे ऑप्शन  भर म्हंटलं जातं. मग मुलांच्या इच्छेप्रमाणे ( त्या सरांनी सांगितल्या प्रमाणे) ऑप्शन्स भरल्यावर जेंव्हा पहिल्या लिस्ट मधे नांव लागत नाही तेंव्हा मात्र मुलांना घाम फुटतो आणि मग “बाबा कसं करायचं” ? !
कांही एक्स्पिरिअन्स्ड पालक, ज्यांच्या मुलांच्या ऍडमिशन्स गेल्या वर्षी झाल्या आहेत असे, किंवा ज्यांनी पण असे कन्सोलिंग क्लासेस अटेंड केले आहेत ते,  बऱ्याच आय्डियाज देतात फॉर्म भरायच्या. ज्या पुन्हा मला पटत नाहित. माझ्या म्हणण्याप्रमाणे मिळण्यासारखे कॉलेजेस आधी द्यावेत ऑप्शन्स मधे न मिळणाऱ्या कॉलेजेस पेक्षा.
सिईटी च्या साईटवर जाउन फॉर्म भरावा लागतो. त्यात तुम्हाला २० ऑप्शन्स द्यायचे असतात, त्यापैकी जर  तुम्ही दिलेल्या पहिल्या ९ ऑप्शन्स पैकी एखाद्या  कॉलेजमधे तुमचे नांव लागले, तर तुम्हाला तिथे ऍडमिशन ही घ्याविच लागते.
काही लोकं असंही म्हणतात, की पहिल्या ९ मधे तुम्हाला न मिळणारे कॉलेजेस टाका, ( कां?? ते कोणि सांगत नाही, पण हा एक फंडा आहे हल्ली). मग बरेच मुलं गेल्या वर्षीचे कटऑफ मार्क्स बघुन न मिळणारे कॉलेजेस शोधुन तिथे पहिले नऊ ऑप्शन्स देतात.माझ्या मते ही पहिली मोठी घोड चुक सगळेच जण करतात.
कारण?????  पहिल्या राउंडच्या शेवटी जेंव्हा शिल्लक जागांची लिस्ट लागते तेंव्हा समजते की अरे.. इतर कॉलेजेस मधे- जिथे आपल्या मार्कांवर आपल्याला हवी ती ब्रॅंच मिळाली असती, त्या कॉलेजेस मधल्या जागा भरल्या आहेत, आणि आपण तिथे तर अप्लायंच केलं नाही! आता मात्र कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ येते.
आमच्या घरी पण थोड्याफार फरकाने असंच झालं.. मुलिच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या पहिल्या कॅप राउंड च्या बाबतित हिच घोडचुक केली. ऑव्हर कॉन्फिडन्स मुळे बरेच ऑप्शन्स दिलेच नव्हते.. त्यामुळे जिथे मिळण्यासारखी होती ऍडमिशन, तिथे आम्ही अप्लायंच केलं नव्हतं.. फक्त न मिळणारे कॉलेजेस मधे अप्लाय केलं होते, त्या सरांच्या सांगण्याप्रमाणे.. ( काय लॉजिक आहे काय माहिती या मागचं)
त्यामुळे फर्स्ट कॅप राउंड मधे नंबर न लागल्यामुळे मात्र थोडा भ्रम निरास झाला होता मुलिचा. म्हणुन दुसऱ्या कॅप राउंडच्या वेळेस मात्र  व्हेटो वापरुन ऑप्शन फॉर्म मी स्वतः भरला, अगदी माझ्या सद सद विवेक बुध्दीला स्मरुन. अजिबात लक्ष दिलं नाही मुलिकडे … आणि एका चांगल्या कॉलेजमधे ,घरापासुन जवळ -म्हणजे वेस्टर्न  ट्रॅकवर असलेल्या  कॉलेजमधे ऍडमिशन मिळाली आणि गंगेत घोडं न्हायलं!!!!!

पुर्वी बरं होतं, एकदाचं बारावीला चांगले मार्क्स मिळवले की इंजिनिअरिंगची ऍडमिशन पक्की.. पण आता तसं राहिलेलं नाही. आधी एआयट्रिपलई किंवा सिईटी ची कटकट मागे असतेच. या परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळणे जास्त महत्वाचे, १२वी ला अगदी ५० टक्क्यांच्या आसपास असले तरीही पुरे! १२ वी चांगल्या मार्काने पास होऊन पण काही मुलांना विशेष समाधान नसतंच. १२वीत ८९ परसेंट मार्क्स मिळाले तरी पण.. ” अहो बाबा, सिईटी चे मार्क्स जास्त महत्वाचे” हे ऐकावं लागतं. मग या १२ वी ची परीक्षेचे महत्त्वच काय राहिले?

निकाल लागला, की मग पेढे वगैरे वाटण्यात मुलांना अजिबात इंट्रेस्ट नसतो.या सिईटीचं महत्व इतकं वाढलेलं आहे की , “थांबा  हो बाबा, जरा सिईटीचा निकाल लागु द्या, मग पेढे वगैरे वाटा”- मुलांचं म्हणणं असतं.म्हणजे १२वीत मिळवलेल्या चांगल्या मार्कांचा आनंद पण मुलं उपभोगू शकत नाहीत या पॅटर्न मुळे..

होता होता सिईटीच्या निकालाचे वेध पण संपतात, आणि एकदाचा निकाल समजतो. पण अरेच्या.. हे कसं झालं?? मला तर जास्त मार्क्स अपेक्षित होते? इतके कमी कसे? या वर्षी फिजिक्स चा पेपर कठिण होता म्हणून ओव्हरऑल परसेंटेज खाली आलंय असंही ऐकिवात आहे. उगाच काळजी करायचं कारण नाही, म्हणून ऍज अ पॅरंट मुलांना समजावणे सुरु होतं.  …

आकस्मित पणे एक दिवस क्लासेसचा फोन येतो की फ्री कौन्सिलिंग सुरु केलंय म्हणून.. तुम्ही या.. कन्सल्टींग  म्हणजे सिईटीचा  फॉर्म कसा भरायचा, कसे ऑप्शन्स द्यायचे , वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी काही क्लासवाले फुकट मार्गदर्शन क्लासेस घेतात. त्यामधे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फॅकल्टीला बोलावले जाते , मार्गदर्शनासाठी ( की त्याच्या क्लासच्या जाहिरातीसाठी?) जे काही असेल ते असेल, पण या लोकांच्या लेक्चर्स चा मुलांवर खूप परिणाम होतो.

आणि मग फॉर्म भरताना, बाबा, नाही हो… त्या सरांनी सांगितलंय.. की असा फॉर्म भरायचा .. सुरु होतं.. या वयात मुलांना आपल्या वडिलांना काही फारसं कळत नाही ह्याची पुरेपुर खात्री असते! त्यामुळे मग, ठीक आहे.. तुला वाटेल तसे ऑप्शन  भर म्हंटलं जातं. मग मुलांच्या इच्छेप्रमाणे ( त्या सरांनी सांगितल्या प्रमाणे) ऑप्शन्स भरल्यावर जेंव्हा पहिल्या लिस्ट मधे नांव लागत नाही तेंव्हा मात्र मुलांना घाम फुटतो आणि मग “बाबा कसं करायचं” ? !

सिईटी च्या साईटवर जाउन फॉर्म भरावा लागतो. त्यात तुम्हाला २० ऑप्शन्स द्यायचे असतात, त्यापैकी जर  तुम्ही दिलेल्या पहिल्या ९ ऑप्शन्स पैकी एखाद्या  कॉलेजमधे तुमचे नांव लागले, तर तुम्हाला तिथे ऍडमिशन ही घ्याविच लागते.१० च्य पुढे तुमचे नांव लागले तर तुम्ही थांबू शकता.. आणि नेक्स्ट कॅप राउंड मधे चान्स घेऊ  शकता.

काही लोकं असंही म्हणतात, की पहिल्या ९ मधे तुम्हाला न मिळणारे कॉलेजेस टाका, ( का?? ते कोणी सांगत नाही, पण हा एक फंडा आहे हल्ली). मग बरेच मुलं गेल्या वर्षीचे कटऑफ मार्क्स बघून न मिळणारे कॉलेजेस शोधून तिथे पहिले नऊ ऑप्शन्स देतात.माझ्या मते ही पहिली मोठी घोड चूक सगळेच जण करतात. .

कारण?????  पहिल्या राउंडच्या शेवटी जेंव्हा शिल्लक जागांची लिस्ट लागते तेंव्हा समजते की अरे.. इतर कॉलेजेस मधे- जिथे आपल्या मार्कांवर आपल्याला हवी ती ब्रॅंच मिळाली असती, त्या कॉलेजेस मधल्या जागा भरल्या आहेत, आणि आपण तिथे तर अप्लायंच केलं नाही! आता मात्र कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ येते.

आमच्या घरी पण थोड्याफार फरकाने असंच झालं.. मुलीच्या इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनच्या पहिल्या कॅप राउंड च्या बाबतीत हिच घोडचूक केली. ओव्हर कॉन्फिडन्स मुळे बरेच ऑप्शन्स दिलेच नव्हते.. त्यामुळे जिथे मिळण्यासारखी होती ऍडमिशन, तिथे आम्ही अप्लाइड केलं नव्हतं.. फक्त न मिळणारे कॉलेजेस मधे अप्लाय केलं होते, त्या सरांच्या सांगण्याप्रमाणे.. ( काय लॉजिक आहे काय माहिती या मागचं)

त्यामुळे फर्स्ट कॅप राउंड मधे नंबर न लागल्यामुळे मात्र थोडा भ्रम निरास झाला होता मुलींचा. म्हणून दुसऱ्या कॅप राउंडच्या वेळेस मात्र  व्हेटो वापरुन ऑप्शन फॉर्म मी स्वतः भरला, अगदी माझ्या सद सद विवेक बुद्धीला स्मरून. अजिबात लक्ष दिलं नाही , माझ्या स्वतःच्या ऑप्शन्स नुसार.. त्या सरांनी दिलेल्या गाइडलाइन्स बाजुला ठेउन  🙂  आणि सेकंड लिस्ट मधे घरापासून जवळ -म्हणजे वेस्टर्न  ट्रॅकवर असलेल्या इंजिनिअरिंग  कॉलेजमधे (इनफर्मेशन टेक्नॉलॉजीला) ऍडमिशन मिळाली आणि गंगेत घोडं न्हायलं!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , , . Bookmark the permalink.

11 Responses to ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स

 1. The asshole responsible for all this pathetic situation is now the head of PVG, pune. Kick him if you have suffered becasue of this entire process..!!

 2. abhijit says:

  अभिनंदन. हे ऍडमिशनवाले दरवर्षी काहीतरी नवे नियम काढतात. आमच्या वेळेला ३०% मध्ये नाही लागला तर ७०% मध्ये यायचो.७०% चे राउंड चांगले असायचे. म्हणजे सरळ सरळ सांगायचे हे हे आहे काय पाहिजे बोला?
  मी त्याच क्षेत्रातला असुनही कॊणाला गाईड करु शकत नाही.

  • अभिजित
   प्रतिक्रियेकरता आभार. पण ह्या आताच्या सिस्टीममधे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कसे ऑप्शन देता यावर अवलंबुन असते. जर तुम्ही बरोबर ऑप्शन दिले नाहित तर एखाद्या चांगल्या कॉलेजमधला चान्स पण चालला जाउ शकतो. जसे आम्ही एसएनडीटी चा ऑप्शन दिलाच नव्हता. आणि पहिल्या राउंडमधे आय टी हा ऑप्शन पार ऑप्शनलाच टाकला होता, त्यामुळे दोन चांगल्या कॉलेजेसचा चान्स गेला. दुसऱ्या राउंडला सिट्स बाकी नव्हत्या. बऱ्याच कमी मार्क्स असलेल्या मुलांना पण जेंव्हा ऍडमिशन मिळालेली पाहिली , तेंव्हा मात्र मुलिला अगदी डिप्रेशन आल्यासारखं झालं होतं..
   सगळा दोष , सिस्टीमचा आहे.. सिस्टीमच चुकिची आहे सगळी..

 3. >>> अगदी बरोबर म्हणता महेंद्रजी चुकी तशी डीटीई वाल्यांचीच आहे, खुप भगदाडं आहेत एडमिशन प्रोसेसमध्ये, नाकी अगदी नऊच येतात! मला मागच्या वर्षी तोच अनुभव आला होता.
  >>> पण थोडी चुकी तुमची पण आहे, व्यवस्थित भरायला हवा होता तुम्ही ऑप्शन फॉर्म, पहिल्याच राउंडमध्ये आयटी किंवा सीएसई फिक्स असतं!
  >>> जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच ना!
  >>> तुमच्या मुलीला माझ्यातर्फे शुभेच्छा सांगा.
  >>> आपल्या प्रकृतीच्या काळजी घ्या.

 4. विशाल
  पहिल्या वेळेस कोणी ऐकायलाच तयार नव्हतं.. म्हणुन असं झालं. असू.पहिल्या राउंड मधे आयटी किंवा सिई ऑप्शन दिलाच नव्हता.. आणि ज्या कॉलेजमधे इएक्स्टीसी मिळण्याचे चान्सेस होते तिथे अप्लायच केला नाही.. असो… शेवटी अध्याय संपला हा एकदाचा!!

 5. archana says:

  archana :salle denaare lok nehmeech barobar nasattat. maazyaa olakheetalyaa muleene konaache taree aikun medicalchyaa option formmadhe 64 option astaanaa fakt 16ch bharale aani chanagale mark asataanaa akkhee warsha wayaa ghalavale.option form chaa sadhaa thumb rule asato, havya asalelya college/branch cha option aadhee dyayache milo na milo (allowed options kamee asateel tar gelya warsheeche cutoff refer karayache).ekda dusaryala chanaglee seat milalee ki aapan hat cholat basato.

  • अर्चना
   त्या थंब रुल मुळेच सगळे प्रॉब्लेम्स झाले होते. जिथे मिळण्यासारखी होती ऍडमिशन, तिथे ऑप्शन्स दिलेच नाहित. पहिल्या लिस्टच्या वेळेस २० ऑप्शन्स अलाउड असतांना फक्त १३ भरले होते.
   तुमचं दुसरं मत मला पटतं.. की तुम्ही गेल्यावर्षीचे कटऑफ बघुन आपण कुठे बसतो ते बघुन ऑप्शन्स द्यावेत.त्यामधे हवे असलेले कोर्सेस आधी वर आणि इतर कोर्सेस मागे ठेवावे.
   सेकंड लिस्ट्च्या वेळेस आम्ही सगळे तिस ऑप्शन्स भरले होते, आणी नंबर लागला होता ऑप्शन नंबर ८ चा.. जर पहिल्या वेळेस आयटी चा ऑप्शन घराजवळच्या कॉलेजमधला दिला असता तरिही ऍडमिशन मिळाली असती. पण …. ह्या पण नेच सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत नां!!!!!!
   असो.. प्रतिक्रियेकरता आभार..

 6. Deep says:

  Hmm khary kaka 🙂 mala vaatt bar zaale mi HR madhye pg kely haha (ani aata job shodhoty ajun!! 😦 ) pan gondhal ghaalnyat aaple “shikhsan samrat” maahir aahet shivaay to dhanda hi changlaa aahe ho! khoooooooooop mothi baajarpeth aahe 😦

 7. Swati says:

  hey nice that u have written, its true that’s it affects lots of students and their parents too…this kind of process is nothing but mental harassment.. 😦

  • नशिब, की एकदा तरी यातून पार पडलोय. यंदा अकरावीची ऍडमिशन हा अजेंडा आहे , दुसऱ्या मुलीसाठी..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s