गोविंदा आला रे….. ..

दही हंडी बंद
खरं तर काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर? खरं तर प्रत्येक विभागातिल पोलिटीकल स्ट्रेंथ दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.एका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार हे नक्की. बरं एकाने जर सात माळ्यावर हंडी बांधली तर दुसरा ८ माळ्यावर बांधणार. ह्या दोघांचंही बघितल्यावर शिवसेनेची हंडी पण असतेच कुठे ना कुठे तरी.
काही मोक्याच्या ठिकाणावरच्या दहिहंड्य़ांना हिरो आणी हिरोइन्स पण आपली हजेरी लावतात. मग अशा वेळी स्टेजवर जागा मिळवण्यासाठी बऱ्याच लोकल स्वघोषीत नेत्यांचा स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. स्टेजवर गळ्यात ५० तोळ्यांच्या सोन्याच्या माळा आणि पाची बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातलेले सगळे हे नेते आपापल्या ’आका’ ला , एखाद्या मोराने लांडोरा समोर केलेल्या नाचा प्रमाणेच , प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अगदी पांढरे शुभ्र कपडे आणि पांढऱ्या चप्पल किंवा बुट जरी घातले तरिही ह्यांचा व्यवसाय काय असावा हे न सांगता ओळखु येतो.
अर्थात इतक्या वर बांधलेली हंडी कोणिच फोडु शकत नाही, मग रात्री नंतर तिला खाली करुन आपल्याच एखाद्या पिट्टुला हंडी फोडु दिली जाते. असो.. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ लाइव्हलीनेस कडे लक्ष द्यायचं.. आणि मग बघा दही हंडी बघणं पण कसं एंजॉय करता येते ते!!!!
अगदी सकाळपासुन काही भागातले गोविंदा दोन दोन घोट रिचवुन  ट्रकमधे मागच्या भागात बसुन आरडाओरडा करित दही हंड्या फोडण्यासाठी निघतात. एका भागातिल दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करुन झाला की मग इतर ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी हे गोविंदा निघतात.
आमच्या कॉम्प्लेक्स मधे प्रत्येक बिल्डींग मधे ११२ फ़्लॅट्स आहेत. अशा १८ बिल्डींग्ज आहेत म्हणजे टॊटल २०१६ फॅट्स , प्रत्येक फ्लॅटमधुन  २०१ रुपये म्हणजे टॊटल कलेक्शन ४०५२१६/- रुपये फक्त.दही हंडी   असते साधारणपणे १०००१ रुपयांची.. उरलेल्या पैशाचं काय होतं?? हा तर एका लहानशा सोसायटितला सोहोळा, जे मोठ मोठ्या हंड्या बांधतात त्यांचं काय??
या वर्षी स्वाइन फ्लु मुळे दहिहंडीला विराम आहे…! कसंही जरी असलं तरी हा एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो!

1234गोविंदा आला रे….. हा गजर या वर्षी ऐकु येणार नाही. एक करमणुकीचा कार्यक्रम नाही या वर्षी.  स्वाइन फ्लु चं  गोकुळाष्टमी  ला लागलेलं ग्रहण , आणि त्यामुळे पुर्णपणे झाकाळून गेलेली दहीहंडी…. असंही वाटतं, की, काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर? पण नंतर असंही वाटतं की हा सोहोळा म्हणजे आपले संस्कार आहेत. गेल्या कित्येक पिढी दर पिढी चालत आलेला वारसा आहे. हिंदू संस्कृतिचे प्रतीक पण म्हणता येइल याला.त्यामुळे दहीहंडी चा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे वाईट वाटले.

खरं तर प्रत्येक विभागातल्या  राजकीय नेत्यांना स्वतःची शक्ती दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.प्रत्येक लहान मोठा नेता आपलाच कसा   या भागात ’वट आहे” हे दाखवण्याचा प्रयत्न करित असतो. आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी यावं म्हणून मग मोठ्य़ा रकमेची हंडी बांधली जाते. या साठी पैसे गोळा केले जातात ….. ..

एका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार हे नक्की. बरं एकाने जर सात माळ्यावर हंडी बांधली तर दुसरा ८ माळ्यावर बांधणार. याहून मोठ्या रकमेची दहीहंडी बांधण्याच्या होड मधे शिवसेना पण मागे नसते.हंडी जितकी उंच तितका जास्त गाजावाजा केला जातो शहरभर..

काही मोक्याच्या ठिकाणावर च्या दहीहंड्यांसाठी हिरो आणि हिरोइन्स पण आपली हजेरी लावतात. मग अशा वेळी स्टेजवर जागा मिळवण्यासाठी बऱ्याच लोकल स्वयंघोषित नेत्यांचा स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. स्टेजवर गळ्यात ५० तोळ्यांच्या सोन्याच्या माळा आणि पाची बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातलेले सगळे हे नेते आपापल्या ’आका’ ला (मुख्य नेत्याला), एखाद्या मोराने लांडोरा समोर केलेल्या नाचा प्रमाणेच , काहीतरी ऍक्टीव्हीटी करुन  प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अगदी पांढरे शुभ्र कपडे आणि पांढऱ्या चप्पल किंवा बुट जरी घातले तरीही ह्यांचा व्यवसाय काय असावा हे,गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या आणि हातातल्या अंगठ्या बघूनच- न सांगता ओळखू येतो.

मोठ्या रकमेची हंडी खूप उंचीवर बांधली जाते. दिवसभर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केल्यावर पण ती फुटत नाही.अर्थात इतक्या वर बांधलेली हंडी कोणिच फोडु शकत नाही, मग रात्री नंतर तिला खाली करुन आपल्याच पक्षाच्या एखाद्या गोविंदा पथकास   हंडी फोडू दिली जाते. असो.. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ लाइव्हलीनेस कडे लक्ष द्यायचं.. आणि मग बघा दही हंडी बघणं पण कसं एंजॉय करता येते ते!!!!

अगदी सकाळपासून कुठल्यातरी राजकीय पक्षाने किंवा एखाद्या लोकल लिडर ने स्पॉन्सर केलेल्या टी शर्ट घालुन ,काही भागातले गोविंदा दोन दोन घोट रिचवून, ट्रकमधे मागच्या भागात बसुन आरडाओरडा करित दही हंड्या फोडण्यासाठी निघतात. एका भागातील दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करुन झाला की मग इतर ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी हे गोविंदा निघतात.ह्या गोविंदापैकी किती जण उद्या दवाखान्यात किंवा हात गळ्यात बांधून दिसतील याचा विचार नक्कीच डोक्यात येतो.. इतके लोकं पडतात, धडपडतात ,तरी पण या हंडी फोडण्यातला उत्साह काही कमी होत नाही.

आमच्या कॉम्प्लेक्स मधे प्रत्येक बिल्डींग मधे ११२ फ़्लॅट्स आहेत. अशा १८ बिल्डींग्ज आहेत म्हणजे टॊटल २०१६ फॅट्स , प्रत्येक फ्लॅटमधुन  २०१ रुपये म्हणजे टॊटल कलेक्शन ४०५२१६/- रुपये फक्त.दही हंडी   असते साधारणपणे १०००१ रुपयांची.. उरलेल्या पैशाचं काय होतं?? हा तर एका लहानशा सोसायटीतील सोहोळा, जे मोठ-मोठ्या हंड्या बांधतात त्यांचं काय??

या वर्षी स्वाइन फ्लु मुळे दहीहंडी ला विराम आहे…! मुंबईकर या वर्षी गोविंदाला नक्कीच मिस करणार ….!!कसंही जरी असलं तरी हा एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , . Bookmark the permalink.

6 Responses to गोविंदा आला रे….. ..

 1. mugdhamani says:

  hyaa sagalyaa raajakaranyanni dahi handi peksha public health mahatvachi aahe he demonstrate karun bare kele nahitar paristhiti ajunach bikat jhali asati..

 2. Raghu says:

  २०१ रुपये प्रत्येक घरातून ?
  मुर्खापनाचा कलस आहे… कशाला देता एवढे पैसे ?
  मुम्बैतील दही हंडी हा पैसे कमावान्याचा एक सोपा मार्ग जाला आहे.
  गणपति, डंडिया नंतर दहिहंदी …

 3. pratyek sanskrutik goshteench rajkaran kel nahee ta te nete kasale an te hee public chya jiwawar.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s