मी “बेकार”

माझी नविन कार
कार विकत घेणं म्हणजे एक टेन्शनंच असतं. एकदा ठरलं, की आता कार जुनी झाली, मेंटेनन्स चा खर्च वाढतोय, किंवा आता हे जे वापरतोय ते डिझाइन बोअर झालं की नविन कार घेण्याचे विचार डॊक्यात घोंघावु लागतात. मग सुरु होते सगळी  चौकशी… कुठली घ्यावी.. आणि कधी घ्यावी?
खरं तर आधी असं काहिच ठरलेलं नव्हतं. पण आधी मारुती, नंतर सॅंट्रो आणी सध्या वॅगन आर वापरत असल्यामुळे आता तरी नविन कार मोठी असावी असं वाटंत होतं. म्हणुन सर्व्हे सुरु केला. बऱ्याच मित्रांजवळच्या कुठल्या गाड्या आहेत याची चौकशी आणी परफॉर्मन्स आणि सर्व्हिस कोणाची बरी.. यावरपण बराच उहापोह झाला.
आधी वाटलं होतं की सरळ ईंडीगो घ्यावी विकत. म्हणुन त्या शोरुम मधे पण जाउन टेस्ट राइड घेतली. अगदी स्लगिश वाटली पिक अप च्या बाबतित ही कार. पण कमी पैशात सेमी मोठी कार होते, म्हणुन वाटलं होतं घ्यावी म्हणुन. परफॉर्मन्स मारक ठरला, म्हणुन विचार ड्रॉप केला.
ट्विटरवर पण मेसेज टाकला होता. अनिकेत म्हणाला की एकदा स्विफ्ट ची टेस्ट ड्राइव्ह घेउन मग ठरवा.. स्वतः वापरतोय, म्हणुन एकदम मस्त आहे आणी स्ट्रॉंगली रेकमंडेड आहे म्हणे ही कार.. अगदी हेच मत माझा शेजारी संदिप उन्नी आणी संजयचं पण पडलं. मारुतीच्या शोरुमला जाउन टेस्ट ड्राइव्ह घ्यायला गेलो. पण तिथे सगळाच सावळा गोंधळ होता. अतिशय दुर्लक्ष करणं आणि आहे ते हे असं आहे, हवं तर घ्या, नाहि तर चालते व्हा..  अशी अटीट्य़ुड दिसली.मोठ्या मुश्किलने त्यांनी टेस्ट राइड दिली..कार अगदी अफलातुन आहे. ड्रायव्हिंग प्लेझर आहेच.. आणी आपल्या सारख्या सेल्फ ड्रिव्हन व्हेइकल साठी ही कार खरंच छान आहे. पिक अप, मॅनोव्हर करणं खुप सोपं आहे या कारला. किंमत पण मुंबईला ५ लाख ५ हजार  व्हिएक्स़आय मॉडेल.
अगदी फायनलाइझ केल्यातंच जमा होतं, पण या मारुतीच्या शोरुममधे माझ्या एक्झिस्टींग वॅगन आर या  कारचं व्हॅल्युएशन अगदी खुपंच कमी केलं होतं यांनी. मी म्हंटलं पण… अरे हुंडाइ मधे या कारचं व्हॅल्युएशन तुमच्या पेक्षा ४० हजाराने जास्त आहे.. तर  तो माणुस विश्वास ठेवायला तयारंच नव्हता. त्याला वाटलं की मी उगिच खोटं बोलतोय. मी आधी हुंडाइ शोरुम मधे पण जाउन आलो होतो. तिथे ऍसेंट बघितली होती… .
जेंव्हा तो अगदीच काही ऐकायला तयार नव्हता तेंव्हा ठरवलं की सध्या काहि दिवसांसाठी तरी ड्रॉप करुया नविन कारचं. मागच्याच रविवारी माझ्या आतेभावाकडे गेलो होतो दहिसरला. हा आतेभाउ आरबिआय मधे असतो. त्याने नुकतिच आय १० घेतली होती. म्हणाला , टेस्ट ड्राइव्ह कर.. कार मस्त आहे.. म्हणुन मग त्याची कार काढली . आणि एक मोठा राउंड मारुन आलो. ड्रायव्हिंग मधे फारसा फरक वाटला नाही. पण कंट्रोल करणं खुपंच सोपं वाटलं. लहानशा रस्त्यावरुन यु टर्न मारणं एकदम बाये हाथ का खेल. म्हंटलं मलाडच्या दफ्तरी रोडला अशिच कार हवी. मोस्ट ऑफ द टाइम आपण दफ्तरी रोडला जाणारंच.. तिथे मोठी कार घेउन फिरणं त्रासदायकंच ठरेल.कधी नव्हे ते पुन्हा लहान कारचा विचार करणं सुरु केलं होतं मी..
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे जातांना कार घेउन गेलो.कारण रविवारी पुन्हा रतन मोटर्स चेंबुरचा फोन आला होता, म्हणाले, और किसने कितना डिकाउंट दिया है हमे बताओ, तो हम भी उतनाही देंगे. त्याला फोनवरंच म्हंटलं की इतना व्हॅल्युएशन हुवा है कार का, अगर तुम भी उतनाही पैसा दोंगे तो ठिक है.. नहीं तो मुझे कुछ भी इंटरेस्ट नही… तर तो म्हणाला, की आप आज कार लेके आवो, फायनल कर देंगे.. म्हणुन म्हंट्लं पुन्हा एकदा मारुतीच्या शोरुम मधे जाउन चान्स घ्यावा. तिथे पोहोचलो, तर अगदी इन डीफरंट बिहेवियर होतं त्या माकडांचं, मला तर वाटतं की त्यांना बहुतेक असं वाटलंच नव्हतं की मला इतकी चांगली ऑफर मिळेल, आणी त्यांनी फक्त १० हजार वाढवुन दिलेत ऑफरमधे.. मी सरळ, उठुन निघालो, आणी पोहोचलॊ हुंडाय शोरुममधे..
आधी हुंडाइ आय टेन घ्यायचं नक्की केलं होतंच.. फक्त ११०० सिसी की १२०० सिसी हे पक्कं नव्हतं.. १२०० सिसी आणी पॉवरविंडॊ, पॉवर स्टेरिंग साठी एक्स्ट्रॉ ४० हजार द्यावे लागतिल, असं तो म्हणाला. १२०० सिसी कार अजुन छान वाटली चालवायला. मुख्य म्हणजे वजन कमी आहे, आणि पिक अप.. सुपर्ब… मजा आली चालवायला. आणि मग ती कार बुक केली. सगळं पेमेंट करुन झालं.. आता डिलिव्हरी म्हणे बुधवारी देणार.. तो पर्यंत मी “बेकार” म्हणजे बिना कारचा!!!!

Hyundai i10 Magnaकार विकत घेणं म्हणजे एक टेन्शनच असतं. एकदा ठरलं, की आता कार जुनी झाली, मेंटेनन्स चा खर्च वाढतोय, किंवा आता हे जे वापरतोय ते डिझाइन बोअर झालं की नवीन कार घेण्याचे विचार डॊक्यात घोंघावू लागतात. मग सुरू होते सगळी  चौकशी… कुठली घ्यावी.. आणि कधी घ्यावी?

खरं तर आधी असं काहीच ठरलेलं नव्हतं,कुठली कार घ्यायची ते… पण आधी मारुती, नंतर सॅंट्रो आणि सध्या वॅगन आर वापरत असल्यामुळे आता तरी नवीन कार मोठी असावी असं वाटत होतं. म्हणून सर्व्हे सुरू केला. बऱ्याच मित्रांच्या जवळच्या कुठल्या गाड्या आहेत याची चौकशी आणि परफॉर्मन्स आणि सर्व्हिस कोणाची बरी.. यावर पण बराच उहापोह झाला.

आधी वाटलं होतं की सरळ ईंडीगो घ्यावी विकत. म्हणून त्या शोरुम मधे पण जाउन टेस्ट राइड घेतली. अगदी स्लगिश वाटली पिक अप च्या बाबतीत ही कार. पण कमी पैशात सेमी मोठी कार होते, म्हणून वाटलं होतं घ्यावी म्हणून. .परफॉर्मन्स मारक ठरला,तसाच अनिकेतची ट्विटरवरची कॉमेंट .. तिने थोडा विचार करायला लावला म्हणून विचार ड्रॉप केला.

ट्विटरवर पण मेसेज टाकला होता. अनिकेत म्हणाला की एकदा स्विफ्ट ची टेस्ट ड्राइव्ह घेउन मग ठरवा.. स्वतः वापरतोय, म्हणुन एकदम मस्त आहे आणि स्ट्रॉंगली रेकमंडेड आहे म्हणे ही कार.. अगदी हेच मत माझा शेजारी संदिप   आणि संजयचं पण पडलं. मारुतीच्या शोरुमला जाउन टेस्ट ड्राइव्ह घ्यायला गेलो. पण तिथे सगळाच सावळा गोंधळ होता. अतिशय दुर्लक्ष करणं आणि आहे ते हे असं आहे, हवं तर घ्या, नाहि तर चालते व्हा..  अशी अटीट्य़ुड दिसली.मोठ्या मुश्किलीने त्यांनी टेस्ट राईड दिली..कार अगदी अफलातून आहे. ड्रायव्हिंग प्लेझर आहेच.. आणि आपल्या सारख्या सेल्फ ड्रिव्हन व्हेइकल साठी ही कार खरंच छान आहे. पिक अप, मॅनोव्हर करणं खुप सोपं आहे या कारला. किंमत पण मुंबईला ५ लाख ५ हजार  व्हिएक्स़आय मॉडेल.

मारुतीचे नवीन मॉडेल्स रिट्ज पण अगदी जवळपास याच किमतीला उपलब्ध आहे. पण लहान इंजिन आणि जास्त किंमत?? मला पटलं नाही म्हणून सोडून दिलं.. फक्त ३० हजाराचा फरक आहे फुलली लोडेड स्विफ्ट आणि रिट्झ मधे. ए स्टारचा परफॉर्मन्स खुप चांगला आहे म्हणून माउथ शट वर वाचलं, पण किंमत मात्र ४ लाख ५५ हजार लोडेड कार साठी.. खुपच जास्त वाटली , ९९० सिसी च्या कारसाठी..

अगदी फायनलाइझ केल्यातच जमा होतं, पण या मारुतीच्या शोरुममधे माझ्या एक्झिस्टींग वॅगन आर या  कारचं व्हॅल्युएशन अगदी खुपंच कमी केलं होतं यांनी. मी म्हंटलं पण… अरे हुंडाइ मधे या कारचं व्हॅल्युएशन तुमच्या पेक्षा ४० हजाराने जास्त आहे.. तर  तो माणुस विश्वास ठेवायला तयारच नव्हता. त्याला वाटलं की मी उगाच खोटं बोलतोय. मी आधी हुंडाइ शोरुम मधे पण जाउन आलो होतो. तिथे ऍसेंट बघितली होती.ऍसेंटचा आकार गेल्या कित्येक वर्षात अपग्रेड झालेला नाही. म्हणून तो पाहून पाहून अगदी कंटाळवाणा झालाय. एखादा फ्रेश लुक असलेली कार हवी होती म्हणून ऍसेंट ड्रॉप केली…. . जेंव्हा तो अगदीच काही ऐकायला तयार नव्हता तेंव्हा ठरवलं की सध्या काही दिवसांसाठी तरी ड्रॉप करुया नवीन कारचं.

मागच्याच रविवारी माझ्या आतेभावाकडे गेलो होतो दहिसरला. हा आतेभाउ आरबिआय मधे असतो. त्याने नुकतीच आय १० घेतली होती. म्हणाला , टेस्ट ड्राइव्ह कर.. कार मस्त आहे.. म्हणून मग त्याची कार काढली . आणि एक मोठा राउंड मारुन आलो. ड्रायव्हिंग मधे फारसा फरक वाटला नाही. पण कंट्रोल करणं खुपच सोपं वाटलं. लहानशा रस्त्यावरून यु टर्न मारणं एकदम बाये हाथ का खेल. म्हंटलं मलाडच्या दफ्तरी रोडला अशीच कार हवी. मोस्ट ऑफ द टाइम आपण दफ्तरी रोडला जाणारच.. तिथे मोठी कार घेउन फिरणं त्रासदायकच ठरेलआणि बायकोची कॉमेंट “नुसत्या गाड्याच उडवायच्या आहेत की , मुलींचे शिक्षण, लग्नं वगैरे पण करायचे आहेत? हा पण हॉंटिंग करित होताच…म्हणून कधी नव्हे ते पुन्हा लहान कारचा विचार करणं सुरु केलं होतं मी..

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे जातांना कार घेउन गेलो.कारण रविवारी पुन्हा रतन मोटर्स चेंबुरचा फोन आला होता, म्हणाले, और किसने कितना डिकाउंट दिया है हमे बताओ, तो हम भी उतनाही देंगे. त्याला फोनवरंच म्हंटलं की इतना व्हॅल्युएशन हुवा है कार का, अगर तुम भी उतनाही पैसा दोंगे तो ठिक है.. नहीं तो मुझे कुछ भी इंटरेस्ट नही… तर तो म्हणाला, की आप आज कार लेके आवो, फायनल कर देंगे.. म्हणून म्हट्ल पुन्हा एकदा मारुतीच्या शोरुम मधे जाउन चान्स घ्यावा. तिथे पोहोचलो, तर अगदी इन डीफरंट बिहेवियर होतं त्या माकडांचं, मला तर वाटतं की त्यांना बहुतेक असं वाटलंच नव्हतं की मला इतकी चांगली ऑफर मिळेल, आणि त्यांनी फक्त १० हजार वाढवून दिलेत ऑफरमधे.. मी सरळ, उठून निघालो, आणि पोहोचलॊ हुंडाय शोरुममधे..

आधी हुंडाइ आय टेन घ्यायचं नक्की केलं होतंच.. फक्त ११०० सिसी की १२०० सिसी हे पक्कं नव्हतं.. १२०० सिसी आणी पॉवरविंडॊ, पॉवर स्टेरिंग साठी एक्स्ट्रॉ ४० हजार द्यावे लागतील, असं तो म्हणाला. १२०० सिसी कार अजुन छान वाटली चालवायला. मुख्य म्हणजे वजन कमी आहे, आणि पिक अप.. सुपर्ब… मजा आली चालवायला. आणि मग ती कार बुक केली. सगळं पेमेंट करुन झालं.. आता डिलिव्हरी म्हणे बुधवारी देणार.. तो पर्यंत मी “बेकार” म्हणजे बिना कारचा!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to मी “बेकार”

 1. Pravin says:

  कॊन्ग्रेजुलेशन . हे मारुति वाले खूप माजले आहेत. मी कार घेण्या अगोदर मागे मागे होते, पण कार घेतल्यावर कस्ट्मर सर्विस च्या नावाने बोम्ब.

 2. प्रविण
  धन्यवाद.. महिन्याभरापासुन सुरु आहे हे.. शेवटी गोकुलाष्टमीला संपवलं!

 3. देवेंद्र चुरी says:

  अभिनंदन….!!!
  थोड़े दिवस बेकार झाल्यासाठी नाही हो नविन गाडी घेतालित त्यासाठी ….

 4. आल्हाद alias Alhad says:

  अभिनंदन!
  🙂

 5. आल्हाद
  धन्यवाद..

 6. Ashish says:

  Abhinadan

  Maruti Swift ghetli astit tar aadhik anand zala asta.

  Ashish

  • आशिश
   धन्यवाद. खरं तर आधी मारुती स्विफ्ट घ्यायचाच विचार होता,पण ते मारुती ट्रु व्हॅल्यु वाले माझ्या जुन्या कारला फारच कमी किंमत देत होते. वॅगन आर- ५ वर्षं जुनी.. फक्त १.१० लाख देत होते, हुंडाइने १.५ दिले, म्हणुन आय टेन घेतली ..

Leave a Reply to Pravin Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s