स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्य…
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय तुम्हाला.. आणि फक्त स्वातंत्र्य मिळालं आणि आपण त्याचा कसा वापर केलाय ये सांगतो..
१) पहिलं स्वातंत्र्य कुठेही पान खाउन थुंकण्याचं..
२) स्वातंत्र्य बिहारातुन मुंबईत येउन झोपड्या बांधुन रहाण्याचं.
३) स्वातंत्र्य लोकल ट्रेनमधे लटकुन प्रवास करण्याचं.
४) स्वातंत्र्य लाच देउन आपलं इल्लिगल काम करुन घेण्याचं
५) स्वातंत्र्य परिक्षांचे पेपर्स विकत घेउन पास होण्याचं
६) स्वातंत्र्य आहे फाशीची शिक्षा  झाल्यावर  पण जेल मधे बिर्य़ाणी
खात दिवस काढायचं.’
७) स्वातंत्र्या आहे भारतिय विमानाचे अपहरण करुन इथल्या टेररिस्ट्स ना
सोडवण्याचं.
८) स्वातंत्र्य आहे दुसऱ्या देशातुन इथे  येउन अंदाधुंद गोळ्याबरसवुन
इथल्या निरपराध नागरिकांना मारण्याचं.
९) स्वातंत्र्य आहे, देश प्रॉब्लेम मधे असतांना,  बातम्यांमधे ट्रेररिस्ट
लोकांना उपयोगी पडतिल अशा बातम्या दाखवण्याचं
१०) या पुढे तुम्ही अजुन ऍड करु शकता.. कसलं स्वातंत्र्य आहे ते….

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय तुम्हाला..

आणि फक्त स्वातंत्र्य मिळालं आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण काय उपयोग करुन घेतलाय -हे पण इथे नमूद करतोय. …….

१) पहिलं स्वातंत्र्य कुठेही पान खाऊन थुंकण्याचं..

२) स्वातंत्र्य, बिहारातुन मुंबईत येउन झोपड्या बांधून रहाण्याचं.

३) स्वातंत्र्य, खून, बलात्कार, दरोडे घालुन नांव झाल्यावर , नेते पदाच्या शर्यतीत उभं राहुन राष्ट्रीय नेता बनण्याचे.

४) स्वातंत्र्य, लाच देऊन आपलं इल्लिगल काम करुन घेण्याचं

५) स्वातंत्र्य, परिक्षांचे पेपर्स विकत घेउन पास होण्याचं

६) स्वातंत्र्य आहे फाशीची शिक्षा  झाल्यावर  पण जेल मधे बिर्याणी  खात दिवस काढायचं.’

७) स्वातंत्र्य आहे भारतीय विमानाचे अपहरण करुन इथल्या टेररिस्ट्स ना सोडवण्याचं.

८) स्वातंत्र्य आहे दुसऱ्या देशातून इथे  येउन अंदाधुंद गोळ्याबरसवुन  इथल्या निरपराध नागरिकांना मारण्याचं.

९) स्वातंत्र्य आहे, देश प्रॉब्लेम मधे असतांना,  बातम्यांमधे ट्रेररिस्ट लोकांना उपयोगी पडतिल अशा बातम्या दाखवण्याचं

१०) स्वातंत्र्य, स्वतःला कमी मार्क्स मिळाले तरीही,  कॉलेजेस मधे पैसे देऊन, लाच देऊन ( मेडिकल, इंजिनिअरिंगला)  ऍडमिशन्स घेण्याचं..

मला माहिती आहे ही लिस्ट कितीही मोठी होऊ शकते… तरी पण मी इथेच थांबतोय…या पुढे तुम्ही अजुन ऍड करु शकता.. कसलं स्वातंत्र्य आहे ते….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

10 Responses to स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

 1. Pravin says:

  लिस्ट मारुतीच्या शेपटापेक्षा मोठी होऊ शकते. हे सर्व माझ्या हयातीत तरी बदलेल असे वाटत नाही. आशा करूया की कमीत कमी पुढच्या स्वातन्त्र्य दिनापर्यंत यातील काही गोष्टी तरी कमी होतील.

 2. Madhuri says:

  स्वातंत्र्य आहे शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करण्याचे
  स्वातंत्र्य आहे स्वतःच्या स्वार्था साठी शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करुन घेण्याचं
  स्वातंत्र्य आहे बाबासाहेब पुरंदरेंसारख्या मोठ्या माणसाचा स्वतःची त्यांच्या पायाशी बसायची लायकी नसतांना पण केवळ राजकिय पुल मुळे अपमान करण्याचे.
  स्वातंत्र्य आहे दादोजी कोंडदेवांचा अपमान करण्याचे.
  स्वातंत्र्य आहे हवा तसा इतिहास बदलण्याचे.

 3. mandar says:

  आपल्याला स्वातंत्र मिळून काही उपयोग नाही झाला
  आपण पूर्वी जे काही होतो त्या पेक्षा आपली वाट लागली आहे…
  आज माझा बाविसावा वाढदिवस आहे
  पण मी लहान पणा पासून ऐकतो आहे विकसनशील भारत !!!!
  माझ्या उभ्या जन्मात भारत विकसित नाही होणार… हे १०० टक्के खर आहे

  • मंदार
   वाढदिवसाच्या शुभेच्छा…
   बऱ्याच गोष्टीत आपण बरंच कांही अचिव्ह केलंय… पण काही बाबतित मात्र आपण अजुनही खुप मागे आहोत.. पण ठिक आहे.. आशेवरच हे जग अवलंबुन आहे नां..

 4. ajay says:

  khar aahe, svaatrantya milun kahich upyog nahi jhaala, aapan ajun hi kunachya tari gulamgiritcha ahee

 5. bhaanasa says:

  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची आहुती दिलेल्या सगळ्यांचे आत्मे तळतळाट करत असतील. याचसाठी का केला होता अट्टाहास……… एकही दिस गोड झालाच नाही. असो. आपण प्रगती खूप केली आहे परंतु साध्या साध्या गोष्टी अजूनही आपल्यात उतरत नाहीत. शिस्त, सचोटी, एकमेकाचे पाय खेचण्याची वृत्ती. सर्वधर्म समभाव असे नुसते म्हणून थोडेच का तसे होणार आहे. मुळात हा समभाव हवा आहे असे वाटतच नाही. ह्म्म,तू म्हणतोस तसेच लिस्ट प्रचंड मोठी होईल, तेव्हा……

 6. Darshan Mahadev Nakti says:

  १ १) स्वातंत्र्य आहे, इथल्या गोर गरिबांना लुटून आपली तिजोरी भरण्याचं .

  १ २) स्वातंत्र्य आहे, कामाच्या नावाखाली हजारो करोड आपल्या खिशात घालण्याचं .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s